रूपाली शिरोडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमनात जिद्दीचा अंकुर जपून ठेवून त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड दिली तर अडीअडचणींच्या वादळवार्यांतही यशाचा वटवृक्ष बहरू शकतो, हे धुळ्याच्या रूपाली शिरोडेने दाखवून दिले आहे. एमपीएससीने २०११ मध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत रूपालीने राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.