व्यक्ती-परिचय

नारायण गंगाराम सुर्वे

Category:

 

नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले.

व्यक्ती-परिचय

पं. मधुकर दीक्षित

Category:

 

पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे.

व्यक्ती-परिचय

निलेश हरिश्चंद्र चव्हाण

Category:

 

निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.

व्यक्ती-परिचय

पं. नारायणराव बोडस

Category:

 

त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या.

व्यक्ती-परिचय

नाना शंकरशेट

Category:

 

एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली.

व्यक्ती-परिचय

न्या. महादेव गोविंद रानडे

Category:

 

निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.

नारायण हरी आपटे
व्यक्ती-परिचय

नारायण हरी आपटे

Category:

 

ख्यातनाम कादंबरीकार, कथालेखक नारायण हरी आपटे. त्यांचे लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ७५ इतकी आहे.

व्यक्ती-परिचय

पं.जगन्नाथबुवा पुरोहित

Category:

 

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.  पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या शिष्यांच्या मध्ये राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, जितेन्द्र अभिषेकी, सी.आर्.व्यास, यशवंतबुवा जोशी, वसंतराव कुलकर्णी, लीलाताई करंबेळकर, मनोरमा वागळे, मोहनतारा अजिंक्य, जी.एन्.जोशी, मन्ना डे, आणि तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे! अशी अनेक दिग्गजाची नावे होती.

व्यक्ती-परिचय

निलेश दत्ताराम बामणे

Category:

 

निलेश दत्ताराम बामणे हे ठाण्यामधील प्रतिभावंत व हौशी लेखक व कवी असून नुकतेच त्यांच्या ‘कवितेचा कवी’ व ‘प्रतिभा’ या दोन कवीतासंग्रहांनी, अगदी थाटात मराठी कविताविश्वामध्ये आगमन केले. ठाण्याच्या सिध्दी फ्रेन्डस पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे कवितासंग्रह अनुक्रमे 2009 व 2010 मध्ये प्रकाशित झाले व त्यांना मराठी रसिकांकडुन उदंड प्रतिसाद लाभला.