कथा

वास्तव

Category:

 

आजकाल कुठल्याही समारंभाला जा, कुठल्याही पार्टीला जा, अगदी आम्हा बायकांच्या किटी पार्टीला जा कुठेही जा, सगळीकडे एका कॉमन विषयावर लोक बोलत असतात. “बदललेले हे जग आणि आजच्या मुलांचे रहाणीमान.” सगळ्यांची मुले खूप शिकलेली असतात

कथा

सोनलबेन

Category:

 

दुपारच्या वेळेस जेवण उरकून थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून झोपले होते. जरा डोळा लागला होता की फोन वाजला, अगदी त्रासून फोन उचलला. समोरुन संध्याचा आवाज आला, “हॅलो, मॅडम कशा आहात? ” खरे तर ठीक आहे म्हणण्यापेक्षा ही काय फोन करायची वेळ आहे का? असे विचारवासे वाटत होते पण काय करणार असे बोलता येत नाही नां नाईलाजास्तव अगदी उसना उत्साह आणून म्हणाले, “बरी आहे, बोल कां फोन केलास ह्या वेळेस आज? ” “मॅडम, उद्या दुपारी तीन वाजता संस्थेमध्ये मिटींग ठेवली आहे,

कथा

साठीच्या उंबरठ्यावर

Category:

 

काही केल्या झोप येत नव्हती जीवाची घालमेल चालू होती. कधी ह्या कुशीला वळ कधी त्या कुशीला. सहज उठून घड्याळ पाहिले. बारा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. बाहेर सगळी सामसूम होती. रात किड्यांची किरकिर ऐकू येत होती. एकदा उठून खिडकीतून बाहेर पाहिले

कथा

फ्रेंडशिप

Category:

 

चहा घेतांना कोणा कोणाला फोन करायचे असे ठरवतच होते फोन हातात घेतला, विचार केला की कामात लागल्यावर विसरुन जाईन. अलिकडे बरेच वेळा विसरायला होते. पण अचानक फोन करण्याची इच्छाच निघून गेली.

कथा

एक स्पर्श

Category:

 

संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले एक वयोवृध्द आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दोन पावले पुढे यायचे की समोरुन भरधाव गाड्या यायच्या आणि ते परत उभे रहायचे असा प्रकार माझे फोनवर बोलून संपले तरी चालूच होता.

कथा

त्या दोघी

Category:

 

बघता बघता काय होत आहे हे कळण्यापूर्वीच हातून निसटली ही मैत्रीची माला. विखरून पडला एक एक मोती. निसटलेल्या मोत्यांना पकडण्याचा जिवापाड प्रयत्न केला पण हे सगळे हाती नाहिच आले. काही हाती आलेले हे विखुरलेले मोती आठवणींच्या कुपीत अलगद उचलून दडवून ठेवले आहेत. काही छोटे आहेत काही मोठे आहे. रिकाम्या वेळात कित्येकदा त्या एक एक मोत्याला मी हरवलेल्या मैत्रीच्या माळेत गुंफायचा प्रयत्न करत असते.

कथा

वाढदिवस

Category:

 

गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी ताईंची पळापळ सुरु होती. मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हातान्हात बाजारात फिरून फिरून खणाचे परकर पोलक्याचे कापड आणले होते. तसे ते त्यांच्या मनासारखे मिळाले नव्हतेच, पण काही तरी मिळाले याचा त्यांना आनंद झाला होता

कथा

एक सत्यकथा

Category:

 

ऐन थंडीचे दिवस होते, भर दुपारी देखील अंगावरच्या चादरीत गुरफटुन झोपण्याची मजा येत होती. पण भिंतीवरचे घड्याळ साडे चार वाजले असे आनंदाने ठण ठण करुन ओरडले आणि नाईलाजास्तव उठावेच लागले. खरे तर उठून काम करण्याची बिलकूल इच्छा होत नव्हती

कथा

शिकवण

Category:

 

सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते.
इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता.

कथा

अनुभूती

Category:

 

ट्रींग ट्रींग फोनची घंटी जोरजोरात घणघणली. मी उठून उभा राहतो तोपर्यंत बंद झाली. बहुतेक राँग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई घाईत घेतला, “काय रे काय problem? ” मी विचारले.