मॉर्निंग वॉक
Category:
कथा साहित्य - ललितमॉर्निंग वॉक’ हा प्रकार भयंकर असतो हे तुमच्यावर जेव्हा तो ‘कंपल्सरी’ या प्रकारात येतो तेव्हाच कळते. तसे तरुणपणी आपण ‘बारीक’ असताना किंवा स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी किंवा गंमत म्हणून जेव्हा आपण ‘मॉर्निंग वॉक’ साठी जात असतो तेव्हा आपण चार लोकांशी गप्पा मारताना काहीतरी विषय काढून आपण वॉकसाठी जात आहोत हे आवर्जून त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असतो.