लाईफबोट
ID: 122441
लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते. [...]
Category:
अवर्गिकृत
Tags:
C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
pd - July 15, 2021
(PID -122441)
pd - July 15, 2021
md - April 1, 2026
Status - publish