कार्तिक वजीर: लोकशाहीवरचे भाषण

एखादं कौशल्य जनसामान्यात ओळख होण्यास पुरेसं असतं. कौशल्यानं वैगुण्यावरही मात करता येते. कौशल्य ओळखली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत. भाषण पाठ असून ते नजरेत भरत नाही; पण त्याचं सादरीकरणाचं कौशल्य लोकांच्या नजरेत भरतं, लक्षात राहातं. नुकताच दूरदर्शनवर एका लहान शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी शाळेच्या ध्वजारोहण समारंभात त्याने आपल्या विनोदी भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘भारतात आजपासून लोकशाही लागू झाली असून लोकशाहीत आपण काहीही करू शकतो. मला स्वतःला मूर्ख बनवायला आवडते.’ त्याने लोकांना अक्षरशः मोठ्याने हसवले.

कार्तिक वजीर असे त्याचे नाव असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. या शाळेतील तो पहिल्या वर्गातील विद्यार्थी असूनं त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याची घरची परिस्थितीही बिकट असून तो लहानपणापासून खोडकर म्हणून ओळखला जातो. रातांधळेपणामुळे त्याची दृष्टी कमी आहे. म्हणून तो वर्गात फळ्याजवळ बसतो.
तो दिसायला गोरा असल्यामुळे सगळे त्याला भुऱ्या नावाने चिडवतात.

सुरुवातीला त्याला प्रजासत्ताक दिनी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. मात्र त्याच्या जिद्दीमुळे त्याला नंतर संधी देण्यात आली. त्याच्या शिक्षकाने त्याला एक भाषण लिहून दिले होते. त्याच्या शिक्षकाचे नाव भरत मस्के असून, त्याने आपल्या बहिणीकडून कार्तिकचे भाषण तयार करून घेतल्याची माहिती आहे. त्याच्या रातांधळेपणावर लवकरात लवकर उपचार व्हावेत, असे मत त्याच्या शिक्षकाने व्यक्त केले आहे.

‘लोकशाहीमुळे मी खेळतो, माकडासारखा झाडावर चढतो, पण लोकशाहीमुळे माझे वडील मला काही बोलत नाहीत. पण काही मुलं शाळेत मास्तरांना माझं नाव सांगतात आणि काही जण लोकशाहीला पायदळी तुडवतात, तसं मास्तरही मला तुडवतात. पण मी खूप गरीब आहे. संपूर्ण तालुक्यात माझ्यासारखा गरीब कोणीही नसेल’, अशा शब्दांत त्यांनी प्रेक्षकांची मनं अक्षरश: जिंकली.

मनातील आशय जेव्हा सहजपणे, उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो तेव्हा लोकांना तो भावतो. आशय पुस्तकातला जरी असला तरी तो सादर करताना कौशल्य, भाषेचा लहेजा, आरोह अवरोह संवादाची फेक या बाबी पुस्तकांच्या पलीकडील आहेत.

यशोगाथा या व्हायरल व्हायलाच हव्यात. संस्कृती संक्रमण हे पूर्वी मौखिक होत असे, आता ते व्हायरलच्या माध्यमातून प्रसारमाध्यमामुळे अनेकापर्यंत चांगला संदेश घेऊन पोहोचत आहे.

मुख्यमंत्री यांनीही या मुलाची चौकशी करून त्याच्या डोळ्यावरील उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. केवळ पुस्तके वाचून अभ्यास करून यश संपादन करत असतानाच आपल्या अंगभूत कौशल्यांची जोपासना करत व त्याला वृद्धिंगत करत आपल्याला यशाचा टप्पा गाठता येतो, हेच यावरून लक्षात येते.

अनेक ठिकाणी अनेक चांगलं चाललेलं आहे. सातत्याने चांगल्या गोष्टी समाजासमोर आणल्या पाहिजेत, त्या वारंवार बिंबवल्या पाहिजेत.

केवळ अनुवांशिकतेच्या पुण्याईवर जगण्यापेक्षा स्वतःमधील सुप्त गुण ओळखून आपणच आपल्यातून उमलायला हवं. संधी नेहमीच दार ठोठावत नसते. ती आपल्याला खेचूनही आणावी लागते.

शाळेमधून सहशालेय उपक्रमांची रेलचेल हवी, तरच विद्यार्थ्यांना त्यांचे अंगभूत कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. जे जे व्हायरल होतं तीच संस्कृती म्हणून आपल्यासमोर येते. पण प्रत्येक व्हायरल सत्य नसतं त्याची पडताळणीही करायला हवी, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं. अनेक चांगल्या गोष्टी अजूनही व्हायरल होत नाही, त्या शोधायला हव्यात, हे यानिमित्ताने लक्षात घेण्यासारखे आहे.

Author