जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होत्या हे खूप जणांना माहित नसेल.
त्यांचे काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी त्यांना व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात.
हे दोन शेर मा.मीनाकुमारी यांचे
आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास) बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
August 18, 2017
शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात.परंतु शिक्षकांच्या शिकवण्याच्या प्रयत्नांना अनेक वेळा मर्यादा असतात.कधी कधी अशा शिक्षकांमुळे मुलांच्या त्या विषयाचे नुकसान होते.माझ्या बाबतीत पण असेच झाले होते.माझ्या संस्कृत शिकवणा-या शिक्षिका यथा तथाच होत्या .एस एस सी ला संस्कृत हा भरपूर गुण मिळवून देणारा विषय.त्यामुळे काळजीत पडलो. मुख्य परीक्षेच्या आधी काही दिवस भीत भीत वडिलांना सांगितले .जानेवारी महिना होता.वडिलांनी मला एक पत्र दिले आणि कर्जत जवळच्या दहिवली गावात ठाण्याहून पाठवले.मला आठवतंय ,सकाळी ११ च्या गाडीने मी कर्जत ला दर रविवारी जायचो.कर्जत हून दहिवली पर्यंत चालत.दहिवली ला मुळे गुरुजींचे घर होते. घर कसले सुंदर वाडाच होता.सर्व प्रथम गुरुजी जेवायला बसवायचे.अतिशय सुग्रास जेवण त्यांच्या पत्नी करीत असत. मग जेवण झाल्यावर मुळे गुरुजी त्यांच्या सोप्यावर फे-या मारत मला संस्कृत वाक्य, संधींची फोड करून कसे वाचावे हे शिकवत .पांढरे शुभ्र धोतर,खांद्यावर शुभ्र पंचा आणि अतिशय प्रसन्न मुद्रेचे वयोवृद्ध मुळे गुरुजींचे ते शिकवणे अजूनही माझ्या डोळ्या समोरून हलत नाही. अतिशय कमी वेळात त्यांनी मला संस्कृत हा विषय माझ्या आवडीचा करून दिला. जवळ बसवून प्रेमानी जेवायला घालणे, त्यानंतर संस्कृतची शिकवणी हे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. शिक्षक कसा असावा याचे मुळे गुरुजी मूर्तिमंत उदाहरण होते. मुळे गुरुजींनी माझ्या कडून एक पैसा न घेता मला शिकवले आणि त्यांची प्रतिमा माझ्या मनात कायमची कोरली गेली.
हे सर्व सांगण्याचे कारण असे कि -
खासदार परेश रावल यांनी सभागृहात चे कोचिंग क्लास कडे लक्ष वेधले .रावल म्हणाले, विविध क्षेत्रात झुंडशाहीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या माफियांची वर्णने आजवर सर्वांनी ऐकली आहेत. त्या यादीत आता पालकांचे शोषण करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या दहशतवादाची भर पडली आहे. त्यांच्या विचित्र शोषणातून गरीब व मध्यमवर्गीय पालकांना भगवान काय रजनीकांतही वाचवू शकणार नाही. ( रावल यांनी अभिनेता रजनीकांतचा असा मजेशीर उल्लेख करताच सभागृहात हास्याची कारंजी उडाली )
परेश रावल पुढे म्हणाले-भारतात बालवाडीच्या प्रवेशापासूनच पालकांच्या शोषणाला प्रारंभ होतो. प्रवेशासाठी लाखो रूपयांच्या देणग्या उकळल्या जातात. ज्यांच्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता खालावली त्यापैकी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसचा आग्रह करतात. क्लासेसमधे जाणाऱ्या मुलांना अधिक चांगल्या गुणांनी पास केले जाते. भारतात कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी, शैक्षणिक अर्हता अथवा गुणवत्ता लागत नाही.
चिंतामणी कारखानीस --
February 17, 2016
जळगावच्या विवेक भोळे यांनी वास्तुरचनाकार म्हणून भरारी घेताना मुंबई बरोबरच जयपूर, दिल्लीपासून चीनमध्येही कार्यालये थाटली. जगभर अनेक प्रकल्प तडीस नेले आणि वास्तुरचनेबरोबर इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन या क्षेत्रातही काम केले...
विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला खान्देशची 'वास्तु' भरारी हा लेख पुढील पानावर वाचा.
विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला खान्देशची 'वास्तु' भरारी हा लेख वाचा.
September 7, 2015
मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.
स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. १९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९८६ मध्ये त्यांनी "गडबड घोटाळा' व "तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी "अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले. "कळत नकळत' व "तू तिथे मी' या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. "अस्मिता चित्र'चा "चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी "मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने "तू तिथे मी', "सातच्या आत घरात', 'आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले. "सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. "अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.
स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी "अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. 'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत. स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
स्मिता तळवलकर यांचे चित्रपट : तू सौभाग्यवती हो, गडबड घोटाळा (१९८६), कळत नकळत (१९८९), चौकट राजा (१९९१), सवत माझी लाडकी (१९९३), शिवरायाची सून ताराराणी (भूमिका : येसूबाई) (१९९३), तू तिथे मी (१९९८), सातच्या आत घरात (२००४), आनंदाचे झाड (२००६), चेकमेट (२००८), टोपी घाला रे (२०१०), अडगुळं मडगुळं (२०११), एक होती वाडी (२०११), जन्म (२०११), श्यामचे वडील (२०१२), या गोल गोल डब्यातला (२०१२), प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१३)
मालिका : घरकुल, पेशवाई, अवंतिका, ऊनपाऊस, कथा एक आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी, उंच माझा झोका.
नाटके : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या (भूमिका : जनाबाई), दुर्गाबाई जरा जपून.
पुरस्कार : कळत नकळत (राष्ट्रीय पुरस्कार), तू तिथे मी (राष्ट्रीय पुरस्कार व महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार), सवत माझी लाडकी (महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार), महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (2010).
August 6, 2021
एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असणार्या् दिलीप कुलकर्णी यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधुन चरित्रात्मक भुमिका साकारल्या होत्या. मा.सुरेश खरे यांच्या “एका घरात होती” या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. “बखर एका राजाची”, “अफलातून”, “घरोघरी” ही नाटके व “चौकट राजा”, “आक्रित”, “रात्र आरंभ” या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘ओली’ या नाटकात त्यांनी शरीरभाषेचा केलेला वापर हा अभिनेता म्हणून एक आदर्श वस्तुपाठ होता. संवेदनशील मनाच्या मा.दिलीप कुलकर्णी यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे,याचा सतत ध्यास असे.”आपलं बुवा असं आहे!” ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात अप्रतिम भूमिका ठरली होती.
दिलीप कुलकर्णी यांचे २२ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 22, 2018
शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला.
बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांची पुस्तके होत.
महर्षी अण्णासाहेब कर्व्यांचे ते द्वितीय पुत्र.
## Bhaskar Dhondo Karve
July 27, 2017
गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल'
त्यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला. कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना. रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama". १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला. 'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. 'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. मा.एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
January 8, 2017
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.
बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!
नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा एक मास्टरपीसच. ‘अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच ‘नाट्य’मय ठरलेली. आता ‘करायला गेलो एक’ हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या ‘श्रीस्टार’तर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.
पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. ‘नटसम्राट’ नाटकातील विठोबा, ‘भावबंधन’ मध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडी’तला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.
फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा 'वारा फोफावला' हा कवितासंग्रह, 'करायला गेलो एक', ' संसार पाहावा मोडून', 'अन् झालं भलतंच', 'नवरा म्हणून नये आपला', 'रात्र थोडी सोंगे फार' इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 15, 2017
काव्यसंग्राहक – संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर गंगाधर केळकर हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असेच. त्यांचा जन्म १० जानेवारी, १८९६ रोजी झाला.
February 2, 2010
नाट्य-चित्र समीक्षक आणि लेखक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१८ रोजी झाला.
मोहिनी मासिकातील “हिरव्या चादरीवर” या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरुपात आले. शिवाय “नाटकांच्या नवलकथा” त्यांनी लिहिल्या. त्यांनी “स्वरराज छोटा गंधर्व” या ग्रंथाचे संपादनही केले.
१७ जुलै २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
## Vasudeo Yashwant Gadgil
July 26, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti