जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.
February 3, 2022
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे.
June 21, 2022
लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या मराठी लेखिका डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला.
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.
महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून...
हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
रांगत रांगत, हअम डौलात...
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
झेप झेपावून, तोल सावरून...
नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
माझ्या जीवाचं, सुख दाटलं...
January 7, 2017
अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅाव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती.
छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅणन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
विनय आपटे यांच्या वर मा.सुधीर गाडगीळ यांनी लिहिलेला लेख
मित्राची गोष्ट..
http://www.loksatta.com/vishesh-news/story-of-a-friend-305830/
June 22, 2018
मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील चतुरस्त्र अभिनेते सुधीर जोशी यांचा जन्म १९४८ रोजी मुंबईत झाला. सुधीर जोशी यांनी मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून अर्थशास्त्रात बी.ए. केले होते. अभिनया कडे वळण्या आधी ते मुंबईतल्या ब्लॅकी ॲड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते.
सुधीर जोशी यांच्या निधनानंतर ते करत असलेल्या "मातीच्या चुली' या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका अभ्यंकर यांनी पूर्ण केली होती. सुधीर जोशी यांचे १४ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले.
April 14, 2010
बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्ये ही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून, एक व्यंगचित्रकार म्हणून, त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले होते. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत होते. पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यां ना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आले होते. महाराष्ट्रात निर्माण झालेले, मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले.. ”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे, दौऱ्यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्यार अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला. हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्याद धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्याण राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले होते. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेना प्रमुखांमुळेच. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
January 23, 2017
बहनो और भाइयो
नमस्कार, आदाब, सतश्री अकाल,
मैं आप का दोस्त
अमीन सायानी
आज जो गीत पेश करने जा रहा हूँ
बहनो और भाइयो
वो गीत बिनाका गीतमाला की
पहली पायदान पे पहुँच गया है
तो बहनो और भाइयो
तैयार हो जाये
दिल थाम के बैठिये
,,जिसे लिखा है,हमारे
श्री आनंद बक्शी जी ने
संगीत से सवारा है
लष्मीकांत प्यारे लाल जी ने
,आवाज़ के जादूगर
हमारे प्यारे श्री,,मोहम्मद रफ़ी साहब
तो लीजिये गीत पेश ऐ खिदमत है
पिक्चर का नाम है,,,,,फ़र्ज़,,, गेली कित्येक वर्ष अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत आहेत. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी झाला. एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.
अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते. पुढे ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सभापती झाले. अमीन सायानी यांची आई गांधीजींची शिष्या होती. स्वतंत्र भारताला जो झेंडा भेटरूपाने देण्यात आला होता, त्या झेंडय़ावर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी शंभर महिलांच्या सहय़ा होत्या. त्यात अमीन सायानी यांच्या आईची सही होती.
अमीन सायानी यांनी सिनेसंगीताचं सुवर्णयुग रेडिओ सिलोनच्या माईकसमोर बसून अनुभवलं. श्यामसुंदर, खेमचंद प्रकाश, हुस्नलाल भगतराम यांचा जमाना मागे सरला होता. गुलाम हैदर, नूरजहा ही मंडळी पाकिस्तानात निघून गेली होती. नौशाद, सी. रामचंद्र टॉपला येत होते. मा.अमीन सायानी लोकप्रिय गाण्यांचं गणित उलगडून सांगताना म्हणतात.
‘‘त्या वेळची परिस्थिती फार वेगळी नव्हती. त्या वेळेस तर गाणी ऐकण्याचे सोर्सेसही खूप कमी होते. गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचं, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला. तेव्हा गाणी ऐकण्याकरिता लोक सिनेमाला गेलेच नाहीत तर चांगली गाणी नाहीशी होत. कधी तरी उलटाच प्रकार घडत असे. फिल्मीस्तानचा ‘नागिन’ रिलीज झाला त्याआधी त्याची गाणी बाहेर आली नव्हती; पण गाणी वाजायला सुरुवात झाली आणि लोक ‘नागिन’ पहायला झुंडीने थिएटरवर जाऊ लागले. धीरे धीरे फिल्म हिट हो गयी और गाने भी धूम मचा गये.’’
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सायानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमालाची सुरुवात झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. मा.अमीनभाई सांगतात. ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा (प्रत्येक आठवडय़ाला अर्थात) साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’
बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ आहे. शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहनपर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना आहे. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.
‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. आज वयाच्या ८४ व्या वर्षी अमीनभाई नव्या समालोचक-निवेदकांना कोणता सल्ला देतात?
‘‘प्राणायाम. सर्वाधिक बेस्ट. प्राणायाम से पूरे फेफडे साफ हो जाते है. आवाजात ताकद येते. स्टॅमिना वाढतो. ते म्हणतात मला मेहंदी हसननने सांगितलेला किस्सा आठवतो. त्यांनी गायक म्हणून करिअर करण्याचा निर्णय त्यांच्या वडिलांना, काकांना सांगितला तेव्हा दोघे हिरीरीने पुढे आले आणि त्यांनी मेहंदी हसनना दररोज हजार दंड-बैठका काढण्यास भाग पाडलं. हजारो मैल धावण्याचा सराव करण्याची सक्ती केली. मेहंदी हसनच्या मनावर एकच गोष्ट त्या दोघांनी बिंबवली- ‘जब तुम्हारा शरीर मजबूत नही तो तुम गा नही पावोगे.’ मी तर म्हणतो, कोणत्याही व्यवसायात शरीर का स्वस्थ होना जरूरी है बोलने मे तो और भी अच्छा है. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सिगारेट कधी पिऊ नका. मी सुरुवातीला चिक्कार सिगरेट पीत असे, अगदी ‘चेन स्मोकर’च्या पठडीत. प्रचंड प्रॉब्लेम्स निर्माण होत. ऐन वेळेला सर्दी-खोकला. त्याचा परिणाम आजही माझ्या शरीरावर दिसतो. हालांकी मै बरसो पहेले सिगरेट छोड चूका हू, पण दुष्परिणाम व्हायचे ते झालेच. अनाऊन्सर, गायक किंवा नट यांनी कधीही सिगारेटच्या वाटेला जाता कामा नये. उससे ज्यादा कोई खातरनाक चिज नही है.’’
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=_c9Ua847_oo
https://www.youtube.com/watch?v=uV5RbKz0R8M
https://www.youtube.com/watch?v=c0g1waPEKJc
December 26, 2017
माणूस रंगांकडे जसा ओढला जातो, तितके शक्यतो रेखाटनाचे अप्रूप नसते. परंतु याच रेखाटनामध्ये एखाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्याइतके सामर्थ्य असते. नाशिकचे अशोक नागपुरे हे व्यक्तिमत्व जगभरात त्यांच्या रेखाटनासाठी प्रसिद्ध झाले. त्यांनी तयार केलेल्या २ हजार ७०० चौरस फुटांच्या पेन्सिल रेखाटनाची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसनेही घेतली.
केल्याने रेखाटन
July 14, 2017
पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर म्हणजेच बशीर कमरुद्दीन मोमीन यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले होते. मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेले पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जात असे.
March 1, 2024
पी. सावळाराम यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.पी.सावळाराम यांचे खरे नाव- निवृत्ती रावजी पाटील. वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले ते नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्या कॉलेजात माधव ज्यूलिअन शिकवत असत. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी
‘सौंदर्य नसते रंगात।
सौंदर्य असते अंतरंगात।
उघडुनि पाही।’
या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली.
ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा- म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती.
त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत. ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते बृहन्महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत. ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात. सावळारामांनी जवळजवळ सातशे ते आठशे गाणी लिहिली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९६४ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 23, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti