(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन

    अभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    अभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन सोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. आहे. अभिषेकला एक मोठी बहीण असून तिचे नाव श्वेता नंदा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 5, 2019


  • वंशभेदाचा सामना करणारी रोझा पार्क्‍स

    रोझा पार्कने उठविलेल्‍या आवाजामुळे वांशिक भेदाभेदाविरूध्‍द लढाई पेटली या संपुर्ण कालावधीत ती कृष्‍णवर्णीयांच्‍या न्‍यायाकरीता लढत होती. 1992 साली रोझा पार्कने रोझा पार्क्‍स – माय स्‍टोरी हे आपले आत्‍मचरित्र प्रसिध्‍द केले. रोझा पार्क्‍सला स्प्रिगर्न मेडल, मार्टिन ल्‍युथर किंग, ज्‍यु अवार्ड टु पुरस्‍काराची सन्‍मानित करण्‍यात आले.

      May 6, 2018


  • बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर

    २००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.

      September 21, 2017


  • बहुप्रसव लेखक राजा राजवाडे

    बहुप्रसव लेखक राजा राजवाडे यांचा जन्म १ जानेवारी १९३६ रोजी देवरूख जवळच्या निवे बुद्रुक येथे झाला. राजा राजवाडे यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिकपर्यंतच शिक्षण, देवरूखच्या‘न्यू इंग्लिश स्कूलमधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईल आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज मधून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए झाले. त्यावेळी नोक-यांचा सुकाळ होता.

    राजा राजवाडे यांनी‘एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदवलं. तिथून त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. तोपर्यंत ते गिरगावात राहायला आले होते. १९६५ च्या सुमारास राजा राजवाडे यांनी लेखन सुरू केले. १९६२ साली‘ स्त्री’ मासिकात ‘उन्हातलं घर’ ही कथा पहिल्यांदा आली. ते गिरगावात राहात असल्याने, मुंबईतलं साहित्यिक क्षेत्र जवळपासचं. तिथून साहित्य संघ, मौजचं ऑफिस, मॅजेस्टिकचं ऑफिस सर्व जवळपास. त्यामुळे अनेक नावाजलेल्या लेखक-कवींची पायधूळ त्यांच्या गिरगावच्या घराला लागलेली. या साहित्यिकांमध्ये ठळकपणे आरती प्रभू, वसंत सावंत, केशव मेश्राम, श्रीपाद भागवत, मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे अश्या अनेक साहित्यिक येथ असत.

    राजा राजवाडे यांचि पहिली कादंबरी चांदण्यातलं ऊन. जवळपास १३ वर्षे महानगरपालिकेत नोकरी केल्यानंतर, त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा, चिकाटी, उत्साह पाहून त्यांचे स्नेही वैद्य यांनी ‘सिडको’ या गृहनिर्माण संस्थेसाठी नोकरी करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी म्हणजे १९७३ला ते ‘डेव्हलपमेंट ऑफिसर’ म्हणून सिडकोत रुजू झाले. त्यावेळी त्यांचं ऑफिस नरिमन पॉइंट, निर्मल भवन येथे होते. वास्तविक पाहता सिडको ही गृहनिर्माण संस्था होती. आपल्या अधिकाराचा वापर करून, त्यांना एखादा मोठा फ्लॅट मिळवता आला असता, पण आयुष्यात जवळपास १९८६ पर्यंत ते गिरगावात त्या जुन्या खोलीत राहत होते.

    एकतर त्यांना गिरगावातील साहित्य संस्कृती मनापासून आवडत होती. १९८०च्या सुमारास, त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘सायाची पाने’ हा प्रसिद्ध झाला. त्याचे प्रकाशक होते त्यांचे मित्र वामन देशपांडे. राजा राजवाडे हे खूप भावुक होते. म्हणूनच ‘सायाची पाने’ या शीर्षकाची कविता त्याचं भावविश्व उलगडून दाखवते.
    गरगरत पडतात सायाची पाने
    कोरीत वर्तृळे दाटलेल्या धुक्यावर
    तसेच आहेत हे आलेख कोरलेले
    स्मृतीने एखाद्या व्याकूळ मनावर
    याच कवितासंग्रहात ‘उन्मादक अभंग’ आहेत. राजा राजवाडे यांनी जवळपास शंभर असे अभंग लिहिले. त्यातील काही अभंग सायाची पाने यात आहेत.
    उदाहरण द्यायचे तर..
    तुझ्या अंगातला
    गाभुळला ऋतू
    जातो आहे ऊतू
    अंगोपांगी
    सुचतात मला
    कोयलाची गाणी
    तुझी न्हाणी-धुणी
    पाहताना..
    वास्तविक राजा राजवाडे हे विचाराने संपूर्णपणे कम्युनिस्ट होते. तरुण भारत’मध्ये तर संपूर्ण एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस राजा राजवाडे यांनी‘उतरती उन्ह’ हे सदर चालवलं. तसेच ‘ललित’मध्ये ‘उदंड झाली अक्षरे’, ‘सोबत’मध्ये ‘सप्तरंग’ त्याचप्रमाणे मार्मिक, धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी टाइम्स यांसारख्या अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत त्यांनी सदर लेखन केलं.
    त्याचं कथालेखन हे रोजच्या दैनिक घटनांवर आधारित त्यांच्या कथा असायचे म्हणजे रस्त्यावर झोपणा-या माणसांपासून ते कोकणातल्या घरापर्यंत त्याचं लेखन सर्वत्र भ्रमण करायचं. अगदी उल्लेखण्याजोग्या कादंब-या म्हणजे धुमसणारं शहर (१९७५), कार्यकर्ती (१९७९), अस्पृश्य सूर्य (१९७८), दुबई-दुबई (१९८०) ह्या आहेत.
    राजा राजवाडे यांचा त्यांच्या मित्रावर खूप लोभ.म्हणूनच त्यांच्या ‘दोस्ताना’ या व्यक्तिचित्रण संग्रहात त्यांनी आरती प्रभू, नारायण सुर्वे, रमेश मंत्री, वसंत सावंत, श्याम जोशी, मधु मंगेश कर्णिक या मित्रांबद्दल खूप प्रभावीपणे लिहिले आहे. आपल्या जवळच्या मित्रांचं आजारपण किंवा मृत्यू ते सहन करू शकत नव्हते. मला आठवतं कधी वसंत सावंत, रुग्णशय्येवर होते, तेव्हा आपल्या या मित्राला भेटायला जायची हिंमत ते करू शकले नाहीत. पण हॉस्पिटलमध्येच कविवर्य सावंतांना ‘कोकण साहित्यभूषण’ पुरस्कार देण्यासाठी धावपळ करण्यासाठी ते आघाडीवर होते. एवढे मित्रांच्या बाबतीत हळवे होते.

    साहित्य व्यवहारात त्यांनी आपली मते खूप परखडपणे मांडली, म्हणजे विंदांनी गणपतीवर एक विरूपिका लिहिली. ती विरूपिका राजा राजवाडे यांना सहन झाली नाही. त्यांनी ‘सोबत’ या मासिकातून झोड काढणारा लेख लिहिला. कोमसापच्या अलिबागच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना श्री. ना. पेंडसे यांनी इंग्रजीची वाखाणगी करणारं आणि मराठीची अवहेलना करणारे भाषण केले. त्यावेळी कोमसापचे पदाधिकारी असूनही त्यांनी श्री.नांच्या भाषणावर आक्षेप घेत आपला जाहीर निषेध नोंदविला.

    त्याचप्रमाणे गोविंदराव तळवलकरांनी एका भाषणात, ‘आपण मराठीतलं साहित्य वाचत नाही..’ असं म्हटलं. तेव्हा राजा राजवाडे यांनी गोविंदरावांना जर तुम्ही मराठीतलं काही वाचत नाही तर मराठीतल्या एका प्रमुख वृत्तपत्राचे संपादक म्हणून राहण्याचा तुम्हाला काय अधिकार होता? असा प्रश्न केला. याच गोष्टीची चिड येऊन १९९६च्या हिवाळीत बाबांनी ‘मराठी बाणा’ हा दिवाळी अंक संपादित केला. त्यात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे किती तरी लेख नामवंत लेखकांकडून लिहून घेतले. त्यात दुर्गा भागवत, माधव गडकरी, प्रा. मं. वि. राजाध्यक्ष, प्रा. कोडोलीकर, डॉ. सुभाष भेंडे, मधु मंगेश कर्णिक यांचे लेख होते. नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ साली, आचार्य अत्रे यांची जन्मशताब्दी असल्याने, आचार्य अत्रे यांच्या जीवनावर व साहित्यावर हिवाळी विशेषांक बाबा संपादित करणार होते. पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

    १९९६ साली बाबा नोकरीतून निवृत्त झाले. त्याचवेळी कोमसाप जोरदारपणे कोकणात कार्य करत होती. श्री अरुण आठल्ये यांच्या निधनानंतर कोमसापच्या मुंबई जिल्हय़ाच्या अध्यक्षपदी बाबांची निवड झाली. कोमसापच्या अंतर्गत त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. कोमसापचं त्रमासिक ‘झपूर्झा’च्या संपादनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. राजा राजवाडे "३० कांदबऱ्या, १४ विनोदी कांदबऱ्या, ८ कथासंग्रह, ९ विनोदी कथासंग्रह, ४ कविता संग्रह, १ व्यक्तिचित्रणपर तर ३ ललितगद्य,व २ चित्रपट पटकथा (वऱ्हाडी झटका पुणेरी फटका, शंभू गबाळे) इतके विपुल लेखन केले. तर सलग ३५ वर्षे १८ नियतकालिकांतून त्यांनी स्तंभलेखन केले. राजा राजवाडे यांचे चिरंजीव म्हणतात बाबा नावाप्रमाणेच राजा होते. एक ‘राजा लेखक’ आणि ‘एक राजा माणूस’.. राजा राजवाडे यांचे २१ जुलै १९९७ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/डॉ. माधव राजवाडे

      January 1, 2019


  • नाना पाटेकर

    नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत

      December 15, 2010


  • टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा ‘ओपरा विनफ्रे’

    “क्वीन ऑफ ऑल मीडिया” म्हणून प्रसिद्ध असणारी ओपरा विन्फ्रे अमेरिकन टॉक शो होस्ट, अभिनेत्री, निर्माती आणि समाजसेविका आहे. टीव्ही जगतात वावरताना ओपेरा विनफ्रे यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.

      January 29, 2022


  • मनोज जोशी

    मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.

      July 14, 2022


  • आघाडीच्या लोकप्रिय गायिका मंजूषा कुलकर्णी-पाटील

    मंजूषा कुलकर्णी-पाटील यांची तब्बल दोन दशकांहून अधिक सांगीतिक कारकिर्द आहे. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९७१ रोजी सांगली येथे झाला. थेट काळजाला भिडणारा स्वर, लांब पल्ला असणाऱ्या आणि दाणेदार ताना, तारसप्तकातील स्वरांची सहज फिरत, सुरांवरची घट्ट पकड, गायनाकडे पाहण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी आणि त्यामागचा विचार नेमका पोहोचवण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे मंजूषा पाटील या सातत्याने देशभरातील रसिकांची दाद घेत आल्या आहेत. मुर्ती लहान पण किर्ती महान याची प्रचिती त्यांचे गायन ऐकल्यावर येते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच ठुमरी, दादरा, अभंग आणि नाट्यसंगीत या प्रकारांमध्येही आपले नाव कोरले आहे. मूळच्या सांगलीच्या असलेल्या व पुण्यात स्थाईक झालेल्या मंजूषा पाटील कुलकर्णी यांनी पंडित चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडून गायनाचे प्राथमिक धडे गिरवले.

    मिरजेच्या ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’तून त्या संगीत विशारद झाल्या. त्यानंतर, त्यांनी हिंदी या विषयातील पदवीसह कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून संगीतातही सुवर्णपदकासह मास्टर्स पदवी संपादन केली. देशभरातील प्रसिद्ध संगीत स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवणाऱ्या मंजूषा यांच्या गायनाकडे इचलकरंजीचे संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा यांचे एकदा लक्ष गेले. मग त्यांच्याकडील मार्गदर्शन हाच मंजूषा यांच्या गायन कारकिर्दीतील निर्णायक टप्पा ठरला.

    काणेबुवांकडे मंजूषा यांनी आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे रीतसर शिक्षण घेतले. त्यानंतर पंडित नरेंद्र काणेकर आणि त्यानंतर डॉ. विकास कशाळकर यांचेही मार्गदर्शन मंजूषा यांना लाभले. त्यांनी पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडे गायनाचे अध्ययन केले आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. संगीतकार राम कदम पुरस्कार , पंडित रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, पंडित जसराज गौरव पुरस्कार , विदुषी माणिक वर्मा आणि विदुषी मालती पांडे पुरस्कार, षण्मुखानंद संगीत शिरोमणी पुरस्कार , संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’, राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

    सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, चंदीगढचे आकाशवाणी संगीत संमेलन, धारवाडचे उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव अशा देशभरातील विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीत महोत्सवांमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे. लंडन, बांगलादेश, शिकागो, मस्कत, अमेरिका, सिंगापूर येथेही त्यांनी अनेक मैफली रंगनव्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 10, 2017


  • ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित पुरुषोत्तम वालावलकर

    मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.

      June 15, 2022


  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ३

    अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

      June 1, 2019