जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
January 14, 2016
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
July 15, 2022
खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे 'सुप्रीम पिक्चर्स'चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नन्तरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले. खेमचन्दजीची काही गाणी त्यांच्या मृत्युनन्तर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. 'स्ट्रीट सिंगर' हा सिनेमा त्यातल्या 'बाबुल मोरा' गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्यात 'लो खा लो मॅडम खाना' हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते. सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल. कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते. कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी 'खेमराज' नावाने संगीत दिले होते. संगीतकार खेमचन्द यांचे निधन १० ऑगस्ट १९५० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : विकिपिडीया
January 4, 2017
स्नेहप्रभा प्रधान यांनी ‘ सर्वस्वी तुलाच ‘ हे आत्मचरित्र असलेले नाटक लिहिले आणि त्यात त्यांनी भूमिकाही केली. इ.स. १९५०च्या नंतर त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली.
December 19, 2021
भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या जेष्ठ कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. भारती आचरेकर यांचे लहानपण पुण्यात गेले. भारती आचरेकर यांना भावना प्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला आवडते. मणिक वर्मा यांना त्यांनी अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १० व्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरताही येत नव्हता, तेव्हा पुण्यात तुळशीबागेत मणिक वर्मा यांच्या बरोबर पहिला कार्यक्रम केला. गाण्याचं बाळकडू घरातूनच मिळाले होते, मणिक वर्माच्या मागे बसून तिला साथ करणं, हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. तिच्यामुळे त्यांना गाण्यातला आत्मविश्वास मिळाला. त्यांनी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन एम.ए. केलं. अर्थात जवळजवळ २०-२२ वर्ष त्यांनी मणिक वर्मा यांच्या बरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले. भारती आचरेकर यांनी पूर्णवेळ गाणं करावं, असं अनेकांचं म्हणणं होतं. एकदा प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांनी त्यांचे गाणं ऐकलं आणि 'दि हिंदू गोवा असोसिएशन'च्या 'धन्य ती गायनी कळा' या नाटकासाठी विचारलं. या नाटकाला पं. भीमसेन जोशी यांचं संगीत होतं, तर नाटकात कृष्णराव चोणकर, रामदास कामत, श्रीपाद नेवरेकर अशी संगीतातली बडीबडी मंडळी काम करत होती. ते भारती आचरेकर यांचे पहिले नाटक.
'धन्य ते गायनी कळा'नंतर लगेच त्याच संस्थेचं 'तुझा तू वाढवी राजा' केलं. त्याच वेळी त्यांचे लग्न आचरेकरांशी ठरलं होतं. त्या भारती वर्माची भारती आचरेकर झाल्या. १९७२ ला दूरदर्शन केंद सुरू झालं आणि त्या अगदी पहिल्या दिवसापासून त्या तिथे रुजू झाल्या. त्या वेळचे दूरदर्शनचे संचालक चांगले होते. त्यांनी संगीत-नाटक अशा कलांमध्ये असलेली रुची बघून ते भारती आचरेकर यांच्यावर त्याच प्रकारचं निमिर्तीचं काम सोपले. श्री.अरुण जोगळेकरांबरोबर भारती आचरेकरांनी ‘गजरा’ कार्यक्रम सादर केला होता. आजही ‘गजरा’ मराठी मध्यमवर्गाच्या चांगलाच स्मरणात आहे. तब्बल आठ वर्षं त्या दूरदर्शन वर नोकरी करत होत्या. त्या मुळे गाणं आणि नाटक तसं बाजूलाच पडलं होतं. नाटक पूर्ण थांबलं होतं. आणि पुन्हा एकदा केवळ संगीतामुळेच त्यांना आणखी एका नाटकाची ऑफर आली. ते नाटक होतं, विजया मेहता दिग्दशित 'हमीदाबाईची कोठी.' आणि या नाटकासाठी दूरदर्शन वरील नोकरी सोडून, त्यांनी हे नाटक केले. 'हमीदाबाईची कोठी'च्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा रंगभूमीवर आल्या. या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडविला. त्यानंतर एकातून एक याप्रकारे 'महासागर', 'दुभंग', 'नस्तं झेंगट' अशी नाटकं त्यांनी केली. रंगभूमीवर अशी घोडदौड सुरू असतानाच त्यांचे पती डॉ. विजय आचरेकर यांचे निधन झालं आणि मग चरितार्थासाठी म्हणून नाटकात काम करणं हेच त्यांनी ठरवले. त्या हिंदी मालिका, सिनेमा करत गेल्या. त्या विजया मेहता यांच्याकडे खूप शिकल्या. त्यांनी अंजन श्रीवास्तव यांच्याबरोबर ‘वागले की दुनिया’मध्ये काम केलं होतं. चाळीमध्ये राहणारं, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जोडपं त्यांनी छोटय़ा पडद्यावर साकारलं होतं. गंभीर असो वा विनोदी, सर्वच प्रकारच्या भूमिका त्या लिलया साकारतात. ‘चिडियाघर’ ही विचित्र व हास्यापद व्यक्तिमत्वांच्या कुटुंबाची एक मालिका यात भारती आचरेकर यांनी अप्रतिम काम केले आहे. एक गृहिणी, कलावंत, अशी भारती आचरेकर यांची ओळख आहे. खरं तर भारतीताईंच्या घरात परंपरागत कला नांदत आहे. त्यांच्या आई माणिक वर्मा, गेल्या पिढीतील संगीत क्षेत्रातील मापदंड होत्या. कलावंतांचं घर म्हटलं की, बराचसा लहरीपणा असतो. मात्र भारती आचरेकरांमध्ये तो गुण आढळत नाही. त्यांचं सारं जीवन कसं नियोजनबद्ध आखीव, रेखीव. त्यामुळेच त्या सदैव नाटक-मालिका-चित्रपट-जाहिरातींतून वारंवार दिसत नाहीत.भारती आचरेकर यांचा जेव्हा आपण कलावंत म्हणून विचार करतो, त्यावेळी त्यांच्या अप्रतिम अभिनयाचं सक्षम दर्शन घडतं. सारं काही सहजच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 14, 2017
इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक, चरित्रलेखक, कादंबरीकार चिं. गं. भानु यांचा जन्म २४ जुलै १८५६ रोजी झाला.
हबर्ट स्पेन्सरचे नीतिशास्त्रविषयक निबंध त्यांनी मराठीत आणले. “नाना व महादजी” ही लेखमालाही ग्रंथरूप झाली.
November 6, 2017
श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.
December 14, 2021
धनंजय कुलकर्णी हे सकाळ, लोकसत्ता, पुढारी, लोकमत सोबतच प्रीमियर, तारांगण या अंकातून चित्रपट विषयी स्तंभ लेखन करीत असतात. त्यांनी पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन केले आहे. तसेच खाजगी रेडिओ एफ. एम. वर अनेक चित्रपट विषयक कार्य क्रमाचे सादरीकरण केले आहे.चित्रपट विषयक अनेक वेब पोर्टल वर ते लिखाण करीत असतात.
June 15, 2022
स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती.
तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. १९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९८६ मध्ये त्यांनी "गडबड घोटाळा' व "तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी "अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले. "कळत नकळत' व "तू तिथे मी' या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. "अस्मिता चित्र'चा "चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी "मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने "तू तिथे मी', "सातच्या आत घरात', 'आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले. "सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. "अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.
स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी "अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. 'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत.
स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 6, 2017
श्री के क्षी’. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत प्रा. श्री. के. क्षीरसागर हे शायरीचे अभ्यासक होते. टीकाकार म्हणूनही ते परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.
April 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti