(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवरुख मधील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक वसंत उर्फ बाळासाहेब पित्रे

    बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले होते. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२८ रोजी झाला. वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे यांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये आधी मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते. बाळासाहेब पित्रे यांनी ४० वर्षांपूर्वी ऑर्थोपेडिक ऑपरेशनसाठी लागणाऱ्या स्टील इन्सर्टची निर्मिती सुरू केली. त्या वेळी कोकणात रस्ते, वीज यांचा पुरवठा नसताना आपला कारखाना सुरू केला आणि तो यशस्वी करून दाखवला. त्यांचे चिरंजीव अजय पित्रे यांनी हाच वारसा पुढे चालू ठेवत देवरूख इथे Export Oriented Unit(EOU) सुरू करून कोकणवासीयांचा चांगला रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

    बाळासाहेब पित्रे यांनी १९७३ पासून सुश्रुत कंपनीच्या कारभाराची सूत्रे सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही आपला सहयोग दिला. बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या पावशतकात निर्माण झाले होते. सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची देवरुखकरांची भूक या उद्योगाच्या पाठबळावर सुरू झालेल्या बाळासाहेब पित्रे यांच्या पित्रे ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी भागविली आहे. बाळासाहेब पित्रे यांनी सिद्धी ट्रस्ट, सेंटर फॉर रुरल आंतर्प्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिसर्च (CREDAR),देवरुख ललित कला अॅकॅडमी, आकार ऑर्गनायझेशन, अशा विविध माध्यमात कार्यरत सामाजिक संस्थांची स्थापना करून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनाही सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन केले होते.

    देवरुख मधील अग्रगण्य अशा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते मानद अध्यक्ष होते. स्व. लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालयाची निर्मिती बाळासाहेब पित्रे यांच्या पुढाकाराने झाली. जुन्याजाणत्या कलावंतांच्या अजरामर कलाकृतींचे सर्वात मोठे संकलन असणारे हे मुंबईबाहेरील एकमेव कलासंग्रहालय आहे. बाळासाहेब पित्रे यांनी स्थापन केलेल्या "सिध्दी ट्रस्ट"द्वारा सन १९८०पासून विकासाचे अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत. सिध्दी ट्रस्टतर्फे "शालेय परिसर विकास प्रकल्प" या प्रकल्पाची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर १९८८-८९मध्ये करण्यात आली. त्यांच्या ‘क्रेडार’ या संस्थेच्या स्थापनेतून डी-कॅड (देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयात चित्रकला, हस्तकला, पेपर क्राफ्ट, पेपर मॅश, स्क्रीन प्रिंटिंगसह कलाविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात.

    हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची विक्रीही तेथे होते. देवरूखमधील नाट्यगृहाची कमतरता लक्षात घेऊन बाळासाहेब पित्रे प्रायोगिक कलामंच त्यांनी स्थापन केला. तेथे संगीत, सांस्कृतिक महोत्सव, व्यावसायिक नाट्यप्रयोग होतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीने आणि सृजनशील वृत्तीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याकार्तुत्वाने ठसा उमटवला होता. बाळासाहेब पित्रे यांच्या पत्नी सौ. विमलताई पित्रे यांचे ६ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले होते. मी त्यांना दोन वर्षा पुर्वी भेटलो होतो तेव्हा मला त्यांची उद्याेजक व कलावंत अशी दोन्ही रुपे बघण्यास मिळाली होती. या वयात सुध्दा त्यांचा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. बाळासाहेब पित्रे यांचे १२ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 12, 2019


  • डॉ. रमेश रासकर

    अमेरिकास्थित एमआयटी संस्थेतील प्राध्यापक व एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रिसर्च लॅबचे संचालक डॉ. रमेश रासकर यांनी मोबाईल कॅमेराचा खुबीने वापर करुन त्यापासून आयनेत्र, आयमित्र ही डोळे तसेव डायबेटिसच्या आजारांचे निदान करणारी यंत्रे बनविली. नाशिकमधून लहानाचे मोठे झालेल्या रमेश यांच्या संशोधनाचे भिंग यापेक्षा कितीतरी मोठे आहे. आज त्यांच्या नावावर अमेरिकेतील ५० पेटन्ट्सची नोंद आहे.

    कॅमेरा कल्चरची किमया

      July 24, 2015


  • कवी, कथाकार आणि कादंबरीकार डॉ.महेश केळुसकर

    रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी २६ अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी आदी लोकप्रिय कार्यक्रम दिले. त्यांची निर्मिती असलेल्या दोन आकाशवाणी कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

      June 14, 2022


  • शाहरुख खान

    चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. वीसेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा काही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले.

    आमीर खानने सोडलेला रोल शाहरुख खानने पटकावला आणि इथूनच यश चोप्रा-शाहरुख खान हे नवे कॉम्बिनेशन जन्मले. आमीर खानची चूक त्याच्यासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण करून गेली. प्रत्येक सीनचा किस पाडणारा आमीर खान आणि कथा काय आहे, हेही न विचारणा शाहरुख खान या दोघांच्यात यश चोप्राने शाहरुख खानची निवड केली. शाहरुख खान सुपरस्टार झाला १९९२ मध्ये प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका त्याने साकारल्या.

    १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची गाजलेली लोकप्रिय जोडी आहे. शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे.

    २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रिमीयर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्या, आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. आज त्याची जी ‘रोमँटिक हिरो’ म्हणून ओळख आहे, त्यामागे त्याची अफाट मेहनत आहे ‘बादशहा‘ चित्रपटानंतर बॉलिवडूचा बादशहा म्हणून, तर कधी किंग खानला संबोधले जाते. भारताबरोबरच विदेशातही शाहरुखच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 11, 2017


  • हरीष सदानी

    स्त्रियांच्या प्रश्नांविषयी अनेक स्त्री संघटना काम करताना दिसतात. पुरुषांनाही स्त्रियांपासून कायद्याने संरक्षण देण्यासाठी सध्या दबावगट तयार होतो आहे. मात्र या परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी पुरुषांनी तयार केलेली मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज) ही संस्था अपवादात्मक ठरावी. एकमेकांचा आदर करीत, व एकामेकांबद्दलचा विश्वास वृध्दिंगत करून स्त्री-पुरुषांना सहजीवन जगता यावे यासाठी अंधेरीतील ही संस्था काम करते. विश्वस्त म्हणून या संस्थेचे काम करणार्‍या हरीष सदानी यांना महाराष्ट्र फाउण्डेशनने पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेला गौरविले आहे.

      July 27, 2011


  • डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे ऊर्फ अप्पा पेंडसे

    अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले.

      June 29, 2022


  • अजित सातघरे… गाण्यातील माणूस….

    हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून.

      November 12, 2019


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक बासू चटर्जी

    सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९३० रोजी झाला. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बसस्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे ‘पिया का घर’ अगदी ‘खट्टा मिठ्ठा’ खुले. म्हणजे पुन्हा चित्रीकरणाचे दिवस ते किती? फार-फार तर पस्तीस-चाळीस. तेदेखील बातो बातो में कधी निघून जात, हे समजतही नसेल. पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. मा.हृषिकेश मुखर्जी आणि मा.बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले. बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणार्याज मध्यमवर्गीय चित्रपटाचा प्रवाह सुरू झाला. मा.राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.मा.बासु चॅटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील मानवंत निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली `नारबाची वाडी’ हा पहिला वहिला मराठी सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असं म्हणता येईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 11, 2017


  • प्रतिभावंत गीतकार वर्मा मलिक

    बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला.

    खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले.

    संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट 'लच्छी' ची गाणी लिहण्यास दिले. मा.वर्मा पंजाबी चित्रपटाचे हिट गीतकार झाले. याच वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव बदलण्यास सांगीतले बरकत राय मलिक हे वर्मा मलिक नावाने ओळखू लागले.

    वर्मा मलिक यांनी चाळीस पंजाबी चित्रपटासाठी गाणी लिहिली, तीन चित्रपटासाठी संवाद लिहिले व तीन चित्रपटासाठी निर्देशन केले. हिन्दी चित्रपट 'दिल और मोहब्बत' साठी 'आंखों की तलाशी दे दे मेरे दिल की हो गयी चोरी' हे गाणे लोकप्रिय झाले. पण ते प्रसिद्ध झाले नाहीत.

    मनोज कुमार वर्मा मलिक यांना ओळखत होते. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी रात अकेली, साए दो हुस्न भी हो व इश्क भी हो तो फिर, इकतारा बोले तुन तुन, ही गाणी वर्मा मलिक यांच्या कडून लिहून घेतली. मनोज कुमार यांनी इकतारा बोले तुन तुन, 'यादगार' चित्रपटासाठी वापरले, ते गाणे गाजल्यामुळे मा.वर्मा हे प्रसिद्धीच्या झोकात आले. रेखा यांचा पहिला चित्रपट 'सावन भादों' मधील वर्मा यांनी लिहिलेले 'कान में झुमका चाल में ठुमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुर्जा पुर्जा लगे पचासी झटके' हे गाणे अजून लोकांच्या ओठावर आहे.

    या नंतर 'पहचान', 'बेईमान', 'अनहोनी', 'धर्मा', 'कसौटी', 'विक्टोरिया न. २०३', 'नागिन', 'चोरी मेरा काम', 'रोटी कपड़ा और मकान', 'संतान', 'एक से बढ़कर एक', अश्या अनेक चित्रपटासाठी मा.वर्मा यांनी गाणी लिहिली. 'पहचान' चित्रपटातील गाणे सबसे बड़ा नादान वही है व 'बेइमान' चित्रपटासाठी जय बोलो बेइमान की जय बोलो या साठी त्यांना दोन वेळा फ़िल्मफेयर पुरस्कार मिळाला. 'सावन भादो' साठी ओमी यांनी वर्मा मलिक यांना गाणी लिहिण्यास सांगीतली. 'सावन भादों' ची गाणी हिट झाली. वारीस या चित्रपटातले 'मेरे प्यार की उमर हो इतनी सनम ' किंवा 'नागिन' यातील 'तेरे इश्क का मुझपें हुआँ ये असर है ' हि गाणी तर 'बेईमान' या चित्रपटातले, 'ये राखी बंधन है ऐसा', 'जैसे चंदा और किरण का, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का...' हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है एक मेमसाब है साथ में साब भी है मेमसाब सुंदर सुंदर है साब भी खूबसूरत है नेपाळी गुरख्याच्या भूमिकेतील प्राण यांच्या वर चित्रित झालेलं हे गीत चित्रपटाचं विषेश आकर्षण आहे. नेपाळी व्यक्ती हिंदी गीत गात असल्यानं 'स' अक्षराच्या जागी 'श'च्या उच्चाराची तसेच 'बोलना' क्रियापदावर कसरत करण्याची वर्मा मलिक यांनी कल्पकता केली होती.

    आजही हिंदी भाषीकाच्या लग्नाच्या वरातीत 'आज मेरे यार की शादी है' व बिदाईला 'बाबुल की दुआएं लेती जा' ही गाणी ही गाणी वाजवली किंवा गायली जातात. ही दोन्ही गाणी वर्मा मलिक यांची.

    वर्मा मलिक यांचे १५ मार्च २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://youtu.be/HIuYg2XBZMY

      March 18, 2017


  • माझी माणसं – बंडू दादा

    तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही .

      December 13, 2017