(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूडमधील ‘काश्मीर की कली’ शर्मिला टागोर

    शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. १९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली.

    भारताला सर्वात प्रथम नोबेल पुरस्काार मिळवून देणा-या रवींद्रनाथ टागोर यांची नातेवाईक असलेली शर्मिला टागोर आणि मन्सू र अली खान पतोडी ही एक आदर्श जोडी म्हीणून गणली जाते. मन्सूीर अली खान पतोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. जेव्हा नवाब मन्सूर अली खाँ पतौडी यांनी आपल्या आई साजिदा सुल्तान यांच्याकडे शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली व आपल्या आईकडे शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र साजिदा सुल्तान या नात्यासाठी तयार नव्हत्या. कारण शर्मिला या बंगाली होत्या.

    लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी साजिदा यांनी नवाब पतौडी आणि शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे लग्नापूर्वी शर्मिला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा. धर्मांतर करुनच त्या नवाब पतौडीसोबत लग्न करु शकतील, असे त्यांनी म्हटले. शर्मिला यांनी ही अट मान्य केली आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यासाठी त्यांचे नाव बदलून आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये मन्सूेर पतोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला टागोर यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती.

    शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला टागोर यांना नवीब पतोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला टागोर यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. १९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला टागोर बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्द्यावरून रणक्रंदन झाले.

    शर्मिला टागोर त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणाऱ्या त्या पहिल्या अॅक्ट्रेस बनल्या. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार.

    राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता. बेशरम सिनेमात मा.अमिताभ सोबत काम केले होते. २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. आज शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 8, 2017


  • सुभाष शहा

    सुभाष शहा यांनी 1965 मध्ये आपले बंधु विमलकुमार यांच्या समवेत चेतन फौंड्रीची स्थापना करून उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांना वालचंद समुह, कुपर, एस्कॉर्ट, एच. एम. टी. सारखे ग्राहक मिळाले. शहा यांचे सुपुत्र यतिन यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर 1992 साली प्रिसिजन उद्योग समुहाचा श्रीगणेशा केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या प्रिसिजनने सन 2007 मध्ये ब्रिटनची व्हल्वट्रेन कंपनी ताब्यात घेतली.

      August 16, 2011


  • सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर

    एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव.

      November 1, 2016


  • बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार

    दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे झाला. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणीसमोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. १९४४ साली आलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मा.दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ और सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला. १९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. १९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’ पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ‘शक्ति’, ‘विधाता’, ‘मजदूर’, ‘दुनिया’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले. ‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकले, असा दिलीपकुमार यांचा विश्वास होता. दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमारपेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 11, 2016


  • बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना

    सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘...बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं... हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता... हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ मा.राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.

    बॉलीवूडचा ‘सुपरस्टार’ अशी ओळख असलेला मा.राजेश खन्ना यांनी चित्रपटात येताना आपले खरे नाव बदलले. त्यांचे मूळचे नाव जतीन खन्ना. गिरगावातच राहणारे अभिनेते रवी कपूर अर्थात जीतेंद्र यांच्यासोबत मा.राजेश खन्ना यांनी केसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना ‘जतीन’ खन्ना हे वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये भाग घेत असे. प्रत्येक स्पर्धेत बक्षीस जतीन घेऊनच जाणार हे ठरलेले असायचे. एकदा युनायटेड प्रोडय़ुसर्स आणि एका चित्रपटविषयक मासिकाने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही मा. जतीन खन्ना यांनी चांगली कामगिरी केली. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जतीन खन्ना याला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मा.राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. त्या वेळी एका प्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्टने जतीन खन्ना यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. तू तुझे नाव बदललेस तर बॉलीवूड तुझ्यासाठी लाल गालिचा अंथरेल, तू प्रसिद्ध होशील, असा सल्ला दिला तो जतीन यांनी मानला आणि जतीनचा ‘राजेश खन्ना’ झाले. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते रातोरात सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्याक फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वैगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. आपल्या चाहत्यांमध्ये 'काका' नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते. रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. १९८४ मध्ये डिंपल आणि मा.राजेश खन्ना विभक्त झाले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतला नाही. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. मा.राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 29, 2016


  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. मा.नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे. मा.नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीी ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली मा.नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. मा.नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्यातवर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्यायवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले. हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. मा.नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मा.नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. मा.नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मा. मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 1, 2017


  • विवेक पटाईत

    श्री विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते नियमितपणे चारोळी तसेच इतर अनेक प्रकारचे मराठी लेखन करत असतात.

      July 16, 2017


  • भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे

    आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती.

    विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला.

    भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पतंलजोगाचे शिक्षण घेतले.

    पुढे १९२१ मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी महात्माजींच्या १९४० त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते.

    विनोबांनी १९५१ ते ५३ हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढले.

    भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.

    विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.इंटरनेट

      September 11, 2016


  • ज्येष्ठ कवी प्रा. वि. म. कुलकर्णी

    वि. म. कुलकर्णी यांनी निरनिराळ्या ठिकाणी भरलेल्या कविसंमेलनात सहभाग घेतला. त्यांच्या कवितांना श्रोत्यांच्या पसंतीची दादही उत्तम मिळत असे. त्यांनी लिहिलेली ‘न्याहरी’ हा संग्रह आणि ‘विसर्जन’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली. त्यांची ‘झुक झुक गाडी’ सारखी बालगीतं, तशीच ‘चालला चालला लमाणांचा तांडा’ सारखी दहावीच्या पुस्तकातील कविता लोकप्रिय होती.

      October 8, 2017


  • आंतरराष्ट्रीय पंच बिली बावडन

    किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.

      April 11, 2022