(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नरेंद्र तिडके

    संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार येणे काहीसे दुरापास्त झाले होते. काही आमदारांचे संख्याबळ कमी पडत असताना यशवंतराव चव्हाणांना साथ मिळाली ती विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांची. त्यावेळी विदर्भात कामगार चळवळीत अग्रेसर असलेले काँग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी पुढाकार घेत २३ आमदारांची ताकद यशवंतरावांच्या पाठीशी उभी केली आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

    कायम समन्वयाची भूमिका घेणारे आणि तीच त्यांची प्रतिमा असलेले नरेंद्र तिडके तेव्हापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. यशवंतरावांच्या बाजूने म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने कायम उभे राहणारे नरेंद्र तिडके संयुक्त महाराष्ट्रवादी नसले तरी ते स्वतंत्र विदर्भवादीही नव्हते. विदर्भाचा विकास झाला पाहिजे यासाठी आग्रह धरतानाच स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही न करणाऱ्या नरेंद्र तिडके यांचे व्यक्तिमत्त्व मृदूभाषी, सर्वाना सोबत घेऊन चालणारे आणि कोणालाही टोकाचा विरोध न करणारे असे होते. म्हणूनच राज्यातील कामगार आणि भांडवलदार यांची विळ्या-भोपळ्याची मोट बांधण्याचे काम त्यांना सहज जमले. विदर्भाच्या शेतकरी वर्गातून म्हणजेच कास्तकार वर्गातून आलेले तिडके महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी विदर्भात कामगारांचे नेते म्हणून ओळखले जात. मात्र कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही तर कायम काँग्रेसलाच साथ केली. कधीही एका वर्गाची बाजू न घेता समन्वयाच्या भूमिकेतून अनेक प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

    दीर्घकाळ कामगार आणि उद्योग विभागाचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या तिडके यांच्या काळात कामगारांच्या संपाचे प्रमाण काहीसे कमी होते. राज्यातील कामगार धोरणाला आकार देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले. अत्यंत हळू आवाजात बोलणारे तिडके यांचे म्हणणे चर्चेच्या काळात कामगार नेत्यांना आणि भांडवलदारांना (मालकांना) कधीही ऐकू येत नसे, म्हणून कदाचित कामगार आणि भांडवलदार यांच्यात समन्वय साधण्यात ते यशस्वी झाले असावेत, असे विनोदाने बोलले जात असे. अनेक कामगार संघटनांचे पदाधिकारी म्हणून प्रदीर्घ काळाचा अनुभव असलेल्या तिडके यांनी १९५६ आणि १९६९ मध्ये जिनिव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले होते.

    १९५६ मध्ये ऑक्सफर्ड येथे झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात विद्यार्थी दशेत सहभागी झालेल्या तिडके यांनी कारावासही भोगला होता. १९५२ मध्ये तत्कालीन मध्यप्रदेश राज्य विधानसभेचे सदस्य म्हणूनही संसदीय कामकाजाचा अनुभव घेतला होता. १९५३ मध्ये तत्कालीन मुंबई राज्य विधानसभेवर त्यांची निवड झाली होती. १९६० मध्ये प्रथम उपमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आणि त्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास, कामगार, उद्योग, ऊर्जा, मुद्रणालये, नियोजन आणि विधानकार्य आदी विभागांचे मंत्री म्हणून कामकाज सांभाळले. १९७६ मध्ये राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत त्यांनी काही काळ हंगामी मुख्यमंत्री म्हणूनही काम सांभाळले होते. कधीही कोणत्याही प्रश्नावर न चिडता सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिडके यांनी संसदीय कामकाजमंत्री म्हणूनही आपला ठसा उमटवला.

    विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणाऱ्या तिडके यांना आदर्श संसदीय कामकाजमंत्री म्हणूनही गौरविले जातेच पण त्यांच्या काळातील विधिमंडळाच्या कामकाजाचा अनेकदा दाखला देण्यात येतो. सध्या काँग्रेसमधील अनेक गटातटात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये नरेंद्र तिडके यांच्यासारख्या समन्वयकाची उणीव भासते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष असताना किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) पक्षाच्या निवडणूक आघाडीचे प्रमुख म्हणून काम करीत असताना तिडके यांनी कधीही अंतर्गत गटबाजीला खतपाणी घातले नाहीच, पण अशी गटबाजी होऊ नये यासाठी सर्वच घटकांना एकत्र आणण्याचेच प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस एका सच्चा समन्वयवादी काँग्रेस नेत्याला मुकली आहे.

    VV

      August 4, 2017


  • विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल  लॉर्ड बेडन पावेल

    २२ फेब्रुवारी स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लॉर्ड बेडन पावेल यांचा स्मृतीदिन. यांचा जन्म दि. २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला.

    लॉर्ड बेडन पावेल यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले. १९०७ साली त्यांनी; बालवीर’ चळवळ सुरु केली.थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोडन- पॉवेल यांनी सांभाळली संघटनेच्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्राने मध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देशाना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.

    भारतात १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली. १९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्याचे नाव बाय स्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोसीएेयन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.

    भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व इतराच्या विषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्देश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ८ जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.

    -संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 29, 2024


  • डॉ.अमोल दिघे

    विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयोग जिनिव्हाच्या सर्न प्रयोगशाळेत सुरु झाला, या घटनेचे डॉ. अमोल दिघे साक्षीदार ठरले. मूलकणांवरील संशोधन हा या प्रयोगाचा पाया आणि अमोल यांनी त्यांचे संशोधनाचे करिअर याच विषयातले. देशोदेशीच्या नामवंत विद्यापीठांमध्ये मूलकणांवरील संशोधन केल्यानंतर ते पुन्हा भारतात टीआयएफआर या मूलभूत संशोधनाच्या पंढरीत परतले आहेत...

    विश्वाचे आर्त ...

      July 24, 2015


  • डॉ. तात्याराव लहाने

    बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे ३५ टक्यांवरुन १ टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.

      June 28, 2022


  • एम.एस.सुब्बुलक्ष्मी

    जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व 'एमएस' नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला.

    एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. त्यांचे वडिल वीणा वादक होते. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं.

    १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले होते.

    २३ ऑक्तोबर १९६६ रोजी राष्ट्रसंघाचे माजी सचिव दिवंगत यू. थॅंट यांनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅरकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. पं. नेहरूंनी मा.सुब्बुलक्ष्मी यांना‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले.

    सुब्बुलक्ष्मी या महान कलाकारासोबतच त्या एक महान व्यक्तीही होत्या. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे श्री. वेंकटेश स्तोत्र
    https://www.youtube.com/watch?v=1-VzQZowjBE
    व्यंकटेश स्तोत्र शब्द
    कौशल्या सुप्रजा राम ! पूर्व संध्या प्रवर्तते ,उत्तिष्ठ ! नारासर्दुला ! कर्तव्यं देवं अह्निकम . उत्तिश्ठोत्तिष्ठ ! मनोहर गोविंदा ! उत्तिष्ठ गरुडध्वजा ! उत्तिष्ठ कमलकान्त! त्रैलोक्यंमंगलम कुरु.

    मतससमस्तजगतमधुकैटभअरेह्वाक्सोविहारिणी ! मनोहर-दिव्यमूर्ते ! श्रीस्वामिनी ! श्रीतजनप्रिय -दानासिले ! श्रीवेंकटे सदायिते ! त्वसुप्रभातम त्वसुप्रभातम अरविन्द लोचने ! भवतु प्रसन्नमुख -चन्द्र मंडले ! विधि शंकरेन्द्र -वनिताभीर अर्चिते ! वर्सा सिला नाथ -दायिते ! दयनिधेअत्र्यदि - सप्तऋषयासमुपास्या संध्यामअक्सासिन्धु -कमलानी मनोहरनी, आद्यपदयुगम अर्चयितुम प्रपन्ना शेशाद्री -शेखर -विभो ! तव

      November 4, 2019


  • बॉलिवूड गायक, रॅपर आणि अभिनेता हनी सिंग

    हनी सिंग हा गायक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म १५ मार्च १९८३ रोजी झाला.

    हनी सिंग खरंतर यो यो हनी सिंग म्हणून प्रसिद्ध आहे. हनीने ट्रिनिटी स्कूल ऑफ यूकेमधून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने एक रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.

    हनी सिंगच्या शाळेतल्या दिवसांबद्दल बोलायचे झाले तर त्याने वाणिज्य शाखेतून आपले शिक्षण पूर्ण केले. दिल्लीचा असणारा हनी सुरुवातीच्या दिवसांत करमपुरामध्ये राहत होता. त्याचे आई-वडिल आजही दिल्लीत राहतात. हनीला दिल्लीच्या रस्त्यांवर बाईक चालवायला फार आवडते. त्याच्या आतापर्यंतच्या गाण्यांचे तर सर्वच चाहते आहेत. त्याने सिनेमात अभिनयही केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 17, 2017


  • अदिती सारंगधर

    स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली.

      June 17, 2022


  • भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक – वासुदेव बळवंत फडके

    पिळदार शरीर, पाच फूट दहा इंच उंची, गोरा वर्ण, तरतरित नाक, निळसर डोळे, रुबाबदार चेहरा अशी सिंहासारखी देहरचना असणारी व्यक्तिच, ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेडीत अडकलेल्या तमाम भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पहिली डरकाळी फोडू शकते आणि फोडली ती वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाने. म्हणूनच त्यांना 'भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक ' म्हटले जाते. थोर क्रांतिकारकाच्या जीवनाचा आढावा घ्यावयाचा ठरल्यास तो दोन पर्वात घ्यावा लागेल. एक म्हणजे सांसारीक जीवन जगत असतानाचे जीवन व दुसरे सशस्त्र क्रांतिकाराकाचे जीवन. या दोन्ही जीवनात वासुदेवांचे ध्येय मात्र एकच होते. आणि ते म्हणजे 'स्वराज्य'.

    अशा या महान देशभक्ताचा जन्म इसवी. सन. ४ नोव्हेबेर १८४५ रोजी पनवेलपासून ८ किमी. दूर असलेल्या 'शिरढोण', रायगड (महाराष्ट्र ) येथे झाला. इतिहासात डोकावले असता या गावाला ऐतिहासिक महत्त्व होते. इसवी.सन.१६६५ ला शिवरायांना औरंगजेबाला जे किल्ले परत द्यावा लागले होते त्यात शिरढोणच्या 'कर्नाळा' या किल्ल्याचा समावेश होता. विशेष म्हणजे या किल्ल्याची किल्लेदारी वासुदेवांचे आजोबा अनंत रामचंद्र फडके यांच्याकडे होती. म्हणूनच की काय शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावातून वासुदेवांना बालपणीच देशभक्ति, राष्ट्रप्रेम, स्वराज्य, बलिदान या गोष्टी मिळाल्या असाव्यात. वासुदेवांच्या संपूर्ण जीवनावर शिवरायांचा प्रभाव दिसतो.

    वासुदेवांच्या घरची परस्थिति आर्थिकदृष्ट्या संपन्न होती. किल्लेदारी जाऊनही बळवंतरावांना लोक 'सुभेदार' म्हणत. आजोबा वासुदेवांना लाड़ाने 'छकड्या' म्हणत असे. लहान असतानाच १८५७ च्या उठावातील क्रांतिकारक घटना त्यांच्या कानी पडत असत, त्यात प्रामुख्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, मंगल पांडे यांच्या पराक्रमाच्या घटनांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्याच वेळी वासुदेव शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. सुरुवातीला नाना शंकरशेठ यांच्या शाळेत प्रवेश घेतला पण अवघ्या चार महिन्यात शाळा सोडली व पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठले, 'पूना हायस्कूल ' येथे इंग्रजीचे उत्तम शिक्षण घेतले. शिक्षणानंतर लगेचच वयाच्या पंधराव्या वर्षी १० फेब्रुवारी १८६० मध्ये त्यांचे लग्न 'गोपिकाबाई' हिच्याशी झाले. विवाहानंतर लगेचच वासुदेवाना मुंबई येथील ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे (जी.आय.पी) नोकरी मिळाली. परन्तु हेडक्लार्कच्या त्रासाला वैतागून नोकरी सोडली. त्यानंतर लगेच ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला लेखनिक म्हणून नोकरी स्वीकारली. पण मुंबईचे हवामान न लाभल्याने पुण्याची वाट धरली. तिथे 'सेनासामग्री निरीक्षक' म्हणून नोकरी मिळवली. पुण्यात आल्यानंतर त्यांना पुत्ररत्न झाले. पण अवघ्या दोन महिन्यातच दगावाले. आधीच ज्वराचे दुखणे व् नंतर हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारला ते तासंतास ध्यानस्थ अवस्थेत बसत असत म्हणून त्यांना लोक भ्रमिष्ट समजायला लागले. कालांतराने त्यांना १८६८ मध्ये कन्या झाली तिचे नाव 'मथुताई' ठेवण्यात आले. नोकरी करत असतांनाच त्यांची आई (सरस्वती) आजारी पडल्या पण रितसर अर्ज करूनही त्यांना रजा नाकारली. त्यामुळे आईला अखेरचे भेटता आले नाही. त्यांचा ब्रिटिश राजवटीबद्दलचा रोष अजूनच वाढला. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांनी आपला राज्यविस्तार वाढवण्यास सुरुवात केली व दड़पशाहीचे धोरण स्वीकारले. याविरोधात १० में १८५७ ला पहिला देशव्यापी उठाव झाला. तो उठाव ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने चिरडून टाकला. हा उठाव दड़पल्यानंतर सर्वत्र पराभवाच्या शांततेची लहर पसरली होती. कोणीही ब्रिटिशांच्या विरोधात 'ब्र' देखिल काढत नसे. अशा पराभवाच्या छायेतून नवप्रेरणा घेत इंग्रजांच्या विरोधात पहिली 'सिंहगर्जना' केली ती वासुदेव फडके यांनीच.

    त्यांनी प्रथम 'स्वदेशी' हे व्रत हाती घेतले. विदेशी मालावार बहिष्कार टाकला. स्वदेशी वस्तुचा प्रसार व् प्रचार करण्यासाठी त्यांनी 'फडके स्वदेशी संस्था' काढली. याच बरोबर नुसते भाषणबाजी ऐकून व् स्वदेशी वस्तुचा वापर करून उपयोग होणार नाही. त्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने ' पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट' ची स्थापना केली. तसेच 'भावे स्कूलची' स्थापना केली. केवळ 'स्वदेशी' व् 'शिक्षण' इतकेच नव्हे तर संपूर्ण 'स्वराज्य' प्राप्ति हेच ध्येय असावे या विचाराने प्रेरित होउन त्यांनी 'व्याख्याने' देण्यास सुरुवात केली. भर रस्त्यात ते व्याखाने देऊ लागले. इंग्रज भारतीयांची आर्थिक लूट कशी करत आहेत हे अनेक उदाहरणे देऊन लोकांना पटवून देत असत.

    अशातच १८७० च्या सुमारास भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यात हजारो माणसे मृत्यूमुखी पडली. इंग्रजांना त्याची पर्वा नव्हती. लोक अन्नपाण्या वाचून तडफड़त असताना इंग्रज मात्र ऐष-आरामत जगत होते. त्यातच सोलापूरला एकाच दिवशी २५ लोक भुकेने मृत्यूमुखी पडले. या घटनेने वासुदेव अस्वस्थ झाले. दुर्दैवी बांधवांची स्थिति पाहण्यासाठी त्यांनी बैराग्याचा वेश धारण करून बड़ोदा, इंदूर, उज्जैन, अकोला, नागपुर, अहमदनगर, नाशिक, कोल्हापुर, मिरज, सांगली, सोलापुरचा दौरा केला. जनतेची दु:खे प्रत्यक्ष् पाहली. सरकारी यंत्रणाची ढिलाई पाहून प्रतिशोधाची भावना अधिकच तीव्र झाली. अशातच दुष्काळावर उपाय करण्याऐवजी राणी व्हिक्टोरियाला 'हिन्दुस्थानची साम्राज्ञी' ही पदवी देण्यात आल्याने दिल्लीत एक सोहळा आयोजित करण्यात आला त्यावर करोडो रुपये खर्च करण्यात येणार असल्यामुळे हे पाहून त्यांचा देशाभिमान अधिकच वाढत गेला.

    व्याख्याने, लेखनबाजी करून देशावरील संकट दूर होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. आता शस्त्र उचलल्या खेरीज पर्याय नाही. ते शस्त्र चालविण्यात पटाईत होते. बन्दुक, दांडपट्टा, भाला, बरची, चालविण्याचे कसब त्यांनी लहुजी वस्ताद साळवे या मातंग तर घौड़दौड़ व् मल्लविद्या रणबा या महार जातीतील वस्तादा कडून घेतले होते. तसेच त्यांनी पत्नी गोपिकाबाई हिलाही सशस्त्र शिक्षण दिले होते. याचाच अर्थ ते जातीयतेचे विरोधक तसेच स्त्री सुधारणावादी होते. याचकाळात त्यांनी 'दत्तमहात्म्य' हे ५१ अध्याय व् ७१७४ ओव्यांचे लेखनही पूर्ण केले. स्वराज्यप्रप्तिच्या ध्येयाने पुरते झपाटलेल्या वासुदेवांनी मार्ग बदलून शस्त्र हाती घेण्याचा निश्चय केला आणि कुटुंबाचा त्याग करुन स्वराज्यप्राप्त करण्यासाठी निघाले. दुसरी पत्नी गोदुबाई हिला जुन्नर येथे माहेरी सोडले. आता तेथूनच ख-या अर्थाने त्यांचे सशस्त्र क्रांतिचे जीवन सुरु झाले. देवभक्त असलेल्या वासुदेवांनी या कामासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यास गेले असता त्यांना स्वामींनी निराश हाताने पाठवले. वासुदेवांनी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी सशस्त्र सैन्य उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही सहकारी तयार केले. त्यात दौलतराव, गोपाळराव, गणपतराव घोटवडेकर, अप्पा वैद्य, अण्णासाहेब पटवर्धन, परशुराम पाटनकर, भिकाजी पंथ हर्डीकर, माधवराव नामजोशी, सितारामपंत गोडबोले, विष्णु खरे ,बाबु जोशी अदि तरुण होते.
    त्यांनंतर त्यांनी मुंबई, पुण्यातील धनिक लोकांकडे आर्थिक मदत मागितली परंतु त्यांना कोणीही मदत केली नाही, परिणामी त्यांनी मार्ग बदलला. शिवरायांनी ज्या तंत्राने शत्रुचा नायनाट केला त्याच मार्गाने ब्रिटिशांचा खात्मा करण्याचे ठरले व त्यासाठी 'गनिमी कावा' स्विकारला. आर्थिक मदतीसाठी समाजातील धनिक लोकांची लुट करण्याचे ठरले. या कार्यासाठी त्यांनी 'रामोशी' या शूरवीर व् प्रामाणिक जातीतील तरुणांची सेना उभारली. त्यात व-हाड व खांदेशातील आगरीकोळी, भिल्ल व धनगर जातींच्या तरुणांचाही समावेश केला. त्यानंतर लुटालुटीचे सत्र सुरु झाले. ब्रिटिशांचे सरकारी खजिने लुटले गेले, तसेच २३ फेब्रुवारीला 'धामारी' या गावावर पहिला छापा पडला. त्यापाठोपाठ मल्हारगड, वाल्हेगाव, मंगदारी, सोनापुर, सावरगाव, नेरेगाव, चांदखेड, चौल, चिखले, पळस्पे आशा अनेक गावावर छापे टाकून लाखो रुपये लुटले. या लुटीतून सैन्याच्या पगार व् शस्त्र खरेदी करण्यात येई. त्यावेळी सर्व वर्तमानपत्रांनी त्यांना 'दरोडेखोर' म्हणून प्रसिद्धी दिली. त्यात मुंबई टाइम्स, लंडन टाइम्स, पूना हेरॉल्ड, डेक्कन हेरोल्ड, इंडियन डेली न्यूज, यांनी तर अग्रलेखातूनही टिका केली. याच सुमारास मुंबईच्या गवर्नरने वासुदेवरावाच्या त्रासाला वैतागून त्यांना पकडणा-यास चार सहस्त्रे पारितोषिक जाहिर केले. दोनच दिवसांनी वासुदेवांनी गवर्नरला मारणा-यास पाच सहस्त्रे देण्याचे जाहिर केले. शेवटी मेजर डॅनियल या अधिकारयाने वासुदेवांचा पिछाच पुरवला. कसारा घाटात वासुदेवांचे उजवे हात असलेल्या दौलतरावांचा लुटीसह खात्मा केला. हा धक्का त्याना सहन झाला नाही त्यानी प्रसंगी आत्म दहनाचाही प्रयत्न केला पण मल्लाच्या ब्राम्हणाने त्यांचे मत परिवर्तन केले. पुढे शिवरायांची प्रेरणा घेउन पुन्हा कार्याला लागले. प्रसंगी त्यांनी रोहिल्यांच्या इस्माइल खानची मदत घेतली. तसेच लिंगायत व आगरीकोळी समाजातील नाईकांची मदत घेतली व पुन्हा सशस्त्र सैन्य उभे केले. या सैन्याच्या पगार व उदरनिर्वाहासाठी पैसा मी पडत असल्याने ते स्वतः गोपाळरा्वांसोबत पुण्याला निघाले. दुर्दैवाने हाच त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. निजामाचा मुख्यमंत्री सलारजंग व् सय्यद अब्दुल हक़ याची मदत, रंगोपंत महाजनाची फितूरीने रोहिले व इस्माइल खान पकडले गेले. नारायणपुर मार्गे पंढरपुरला निघालेल्या वासुदेवांच्या मागावर मेजर डॅनियल होताच, त्याने मोठ्या सावधगिरिने खिंबिखुद्द या गावातील बुद्धविहारत थकून शांतपणे निजलेल्या वासुदेवरावांवर घाला घातला. बंदिस्त केले.

    वासुदेवांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना सुरुवातीला सिटिजेल, नंतर ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे डांबण्यात आले, पुढे त्यांचे वकिलपत्र सार्वजनिक काका व नंतर महादेव चिमनाजी आपटे यांनी घेतले. परंतु राजद्रोहाचा आरोप असलेले पहिले भारतीय असलेल्या वासुदेवांना ते वाचवू शकले नाही, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली. अंदमानचे काम सुरु असल्याने त्याना यमन देशातील 'एडन' येथील तुरुंगात डांबण्यात आले. तेथून निसटण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न होता. अखेर तुरुंगातील त्रासाला वैतागून त्यांनी अन्नत्याग केला. अशक्तपणाने १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 'प्रजाकसत्ताक'राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारे 'झंझावती वादळ' अखेर शांत झाले. वासुदेवांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांची प्रेरणा घेउनच पुढे अनंत कान्हेरे, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, सुभाष चन्द्र बोस अदि क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतले. या सर्वांचे मूळ मात्र 'भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक' वासुदेव बळवंत फडकेच होते.

      November 5, 2016


  • जेष्ठ व्हायोलिन वादक मा. लालगुडी जयरामन

    व्हायोलिन हे मूळचे भारतीय वाद्य नसले, तरी आज ते देशातील मैफलींच्या मध्यभागी विराजमान झाले आहे. त्याला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कलावंतांमध्ये प्रामुख्याने लालगुडी जयरामन यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३० रोजी झाला. दाक्षिणात्य संत परंपरेतील महान संगीतकार त्यागराज यांच्या वंशात जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने घराण्याची परंपरा वेगळ्या उंचीवर नेली, त्याचबरोबर जगभरातील संगीत क्षेत्रात भारताचाही सन्मान वाढवला. व्ही. आर. गोपाल अय्यर या कर्नाटक संगीतातील दिग्गज कलावंताच्या पोटी जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलिनवादक म्हणून आपली संगीत क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. तीव्र आकलनशक्ती, अवतीभवतीचे संवेदनशीलतेने टिपण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी कर्नाटक संगीतातील बारकावे आत्मसात केले आणि स्वतःची शैली विकसित केली. प्रचंड मेहनत आणि संगीतावरील निष्ठेमुळे अल्पावधीत ते नामवंत व्हायोलिनवादक म्हणून नावारूपाला आले. व्हायोलिनच्या आत्म्याशी तादात्म्य पावून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी उपयुक्त ठरणारे तंत्र निर्माण केले, जे 'लालगुडी वाणी' म्हणून ओळखले जाते. राग, भाव, ताल आणि गीतात्मक सौंदर्याचे अद्भुत मिश्रण असलेल्या त्यांच्या संगीताने जगभर चाहतावर्ग निर्माण केला. काव्यात्म तरलतेने रसिकांसमोर येणारी वाद्यप्रतिभा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळेच नामवंत गायकांना साथ-संगतीसाठी लालगुडी जयरामनच हवे असत. कर्नाटकी शैलीच्या व्हायोलिन वादनाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे ते पहिले कलावंत होते. वीणा आणि बासरीशी व्हायोलिनला जोडण्याचा अलौकिक प्रयोग त्यांनी १९९६ मध्ये केला आणि त्याला विशेष दादही मिळाली. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम झाले. १९६५ मध्ये एडिनबर्ग महोत्सवात प्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेनूहिन हे लालगुडी यांच्या तंत्राने एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपले इटालियन व्हायोलिन त्यांना सप्रेम भेट दिले. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांचा उल्लेख करावा लागेल. लालगुडी जयरामन यांचे २२ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 22, 2017


  • सूत्रसंचालक व लेखक डॉ. सुनील देवधर

    डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे.

      July 27, 2024