जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शोभा गुर्टू ह्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला.लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते. शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या उस्ताद अल्लादिया खान यांचेकडून घेतले होते. शोभाताईंचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण त्या लहान असतानाच उस्ताद भुर्जी खान यांचेकडे सुरू झाले. ते उस्ताद अल्लादिया खानांचे धाकटे सुपुत्र होत. शोभाताईंची ग्रहणशक्ती व प्रतिभा यांमुळे भुर्जी खानांच्या कुटुंबाने ह्या मुलीस आपल्या परिवाराचा जणू हिस्साच बनविले. नंतर त्या उस्ताद नथ्थन खानांकडे संगीत शिकू लागल्या. उस्ताद घम्मन खान हे शोभाताईंच्या आईला, मेनकाबाईंना त्यांच्या मुंबई येथील घरी ठुमरी - दादरा व इतर उपशास्त्रीय संगीताचे प्रकार शिकवायला यायचे. त्यांच्याकडेही शोभाताई संगीत शिकल्या.
ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत. गायिका बेगम अख्तर व उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते. त्यांनी मराठी व हिंदी भाषा चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तो म्हणजे कमाल अमरोहींचा पाकिजा (१९७२) होय. फागुन (१९७३) मध्ये त्यांनी 'बेदर्दी बन गए कोइ जाओ मनाओ सैंयां' हे गीत गायले. मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) साठी त्यांनी गायलेल्या 'सैंया रूठ गए' गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन मिळाले होते. 'सामना' व 'लाल माती' ह्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. गझल, मराठी नाट्य संगीत या गायन प्रकारांतही त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. २७ सप्टेंबर २००४ रोजी शोभा गुर्टू यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
February 9, 2017
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत असत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत.
बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2019
उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.
March 31, 2022
डॉ. दीपक अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे यकृताचे तज्ज्ञ डॉक्टर..! बॉम्बे हॉस्पिटलची शान, अचूक निदान करणारा, अतिशय बुद्धिमान डॉक्टर..! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्याच्या मदतीला कायम तयार असायचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.
September 4, 2017
मोहंमद जहूर खय्याम हाश्मी... त्यांना सारे जग प्रख्यात संगीतकार खय्याम या नावाने ओळखते.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी जालंधरनजीकच्या राहों शहरात झाला.खय्यामम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लीयत राहणार्या काकांच्याेकडे आले. तेथेच राहून त्यांपनी आपल्या करिअर घडवण्याघची स्वयप्नेा बघितली. मुंबईत आल्याेनंतर त्यां च्याा करिअरला खर्याक अर्थाने सुरु झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या मा. खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नाहसच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले आहे. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवतो. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. मा.खय्याम हे गेली ७० वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मा.खय्यायम यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. त्यांनी 'त्रिशूल', 'थोडी सी बेवफाई', 'बाझार', 'कभी कभी', 'उमराव जान', आणि 'नूरी'सारख्या सिनेमांना संगीत दिले. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. व्यावसायिक यशासाठी झगडत असलेल्या मा.ख्ययाम यांच्या 'फिर सुबह होगी' या चित्रपटाची गाणी ऐकल्यावर राज कपूर यांनी 'खय्यामसाहब अब आपकी सुबह हो गयी' असे प्रेमाने म्हटले होते.प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड लावले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून मा. खय्याम टाकले होते. ’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.खय्यायम यांचा गौरव केला आहे. मा.खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. मा. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. मा.जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी मा.खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांाना आर्थिक मदत केली जाणार आहे. या ट्रस्टमध्ये काही मान्यवरांना ट्रस्टीच्या रूपात जोडले जाईल. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
February 20, 2017
बाबूभाई मिस्त्री हे भारतीय चित्रपटातील स्पेशल एफ़ेक्ट्स जनक होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.
February 15, 2024
डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते, पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… मा.संभाजी राजे म्हणजे फक्त आणि फक्त “डॉ.काशिनाथ घाणेकर”…रायगडाला जेंव्हा जाग येते मधला त्याचा संभाजी दुसरा कुणीही करू शकणार नाही…अंगकाठी नसली तरी केवळ जरब बसवणारे डोळे, उत्भेदक अभिनय आणि आवाज या हुकमी अस्त्रांवर त्यांचा संभाजी बघताना अंगावर शहारे येत असत., परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार म्हणताना कासावीस झालेला संभाजी अजूनही डोळ्यांपुढून जात नाही… वसंत कानेटकर यांचे‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मराठी रंगभूमीवर आले आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेने ते नाटक कमालीचे गाजले.
कांचन या काशीनाथ घाणेकरांचे “नाथ हा माझा” हे वाचून तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले जाते…गारंबीचा बापू चित्रपट त्यांनी केला होता. चित्रपटाच्या शेवटी विठोबाssss म्हणून त्यांनी जी आर्त साद घातली होती ती आजही तशीच मनात घुमत राहते…तितक्याच आर्ततेने… कुणा एकेकाळी संभाजी आणि “डॉ.काशिनाथ घाणेकर” हे कधीही वेगळं होऊ न शकणार समीकरण होतं…केवळ किस्से ऐकून डॉक्टरांनी अजरामर केलेले संभाजी आजही कधीकधी डोळ्यासमोरून झरझर जातात…कदाचित असेच असतील त्यांचे त्यावेळचे प्रवेश असे सारखे वाटत राहते….आबा ,परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार हा संवाद कानात घुमत राहतो… मधुचंद्र हा राजदत्त दिग्दर्शित एन. दत्ता यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील सगळी गाणी लोकप्रिय झाली. या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर, उमा यांच्या प्रमुख भूमिकाही गाजल्या. अश्रुची झाली फुले हे सुद्धा डॉक्टरांचे गाजलेले नाटक. 'हे चिंचेचे झाड दिसे मज' हे मधुचंद्र चित्रपटातील गीत रसिकांनाही मोरपिशी स्पर्श करून गेले. १९७० साली डॉक्टरांचा 'देवमाणूस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. डॉक्टरांनी काही हिंदी चित्रपटात कामे केली. “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांचे २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
हे चिंचेचे झाड गाण्याची लिंक
https://www.youtube.com/shared?ci=guwaXT874XI
March 2, 2017
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ.चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म १ मे १९२२ पुणे येथे झाला. मधु लिमये यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले.
१९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळच्या वातावरणामुळे त्यांना राजकारणात रस वाटू लागला. योगायोगाने त्यांचा परिचय एस. एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे व पां. वा. गाडगीळ यांच्याशी झाला. एस. एम. जोशी यांच्या प्रोत्साहनाने वयाच्या १८ व्या वर्षीच ते स्वातंत्र्य चळवळीत शिक्षण सोडून सामील झाले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. १९४८ साली त्यांची काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली.
१९४९ साली समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर गोवामुक्ती आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९५८ मध्ये समाजवादीपक्षाचे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर १९६४ मध्ये मुंगेर (बिहार) येथून ते लोकसभेवर निवडून गेले. १९७३ ते ८० या काळात बांका मतदार संघातून त्यांची निवड झाली. मधू लिमये यांनी विपुल लेखन केलेले आहे.
त्रिमंत्री योजना, कम्युनिस्ट जाहीरनाम्याची १०० वर्षे, स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा, पक्षांतर बंदी ? नव्हे, अनियंत्रित नेतेशाहीची नांदी इ. त्यांची मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिदीत व इंग्रजीतही पुष्कळ लेखन केलेले आहे. राजनिती का नया मोड, मार्क्सवाद और गांधीवाद, संक्रमणकालीन राजनिती इ. तर प्राईम मुव्हर्स : रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल इन हिस्टरी हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे.
त्यांच्या या विविधांगी लेखनावरून त्यांच्या चौफेर व्यासंगाची कल्पना करता येते. आपल्या विविध आठवणींचे संकलन करून आत्मचरित्र लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला होता. आत्मकथा या नावाने त्यातील एक खंड प्रसिद्ध झलेला आहे. अनेक व्यक्ति, अनेक घटना या खेरीज मधू लिमये यांच्या जीवनाची समृद्धता व त्यांच्यावरील संस्कार याचेही आपल्याला त्यात दर्शन घडते. मा.मधू लिमये यांचे ८ जानेवारी १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 8, 2019
मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली. त्यांचा जन्म २५ जून १९२४ रोजी बगदाद, इराक येथे झाला.मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते आणि मदन मोहन यांचा इराकमधला जन्म. १९३२ साली त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली. तेथे त्यांची काळजी आजी आणि आजोबा घेत असत. त्यांचे वडील व्यवसायाच्या शोधात मुंबईला गेले. लखनउ, मुंबई आणि देहरादून ह्या शहरात शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांचे संवेदनशील मन सैन्यात काही रमले नाही आणि १९४६ साली संगीतात काही करावे या उद्देशाने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली.
सैन्य सोडल्यावर मदन मोहन यांना ऑल इंडिया रेडियोत नोकरी मिळाली आणि लखनौ आकाशवाणीवर ते रुजू झाले. तेथे त्यांची गाठ उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद फैय्याज खान यांच्यासारख्या महान संगीतकारांशी पडली. योगायोगाने, संगीतकार रोशन पण त्याच काळात लखनौ आकाशवाणीवर नोकरीस होते. पण मदन मोहन यांच्यावर खरा प्रभाव पडला तो बेगम अख्तर यांच्या संगीताचा. त्यांची कारकीर्द याच प्रभावामुळे घडली आणि हा प्रभाव शेवटपर्यंत टिकून होता. आकाशवाणीच्या वास्तव्यात त्यांना तेथील महान कलाकारांना ऐकून जे ज्ञान मिळाले तेच त्यांचे संगीताचे शिक्षण म्हणायला हवे कारण संगीताचे रीतसर शिक्षण त्यांना काही मिळाले नाही. फक्त लाहोरच्या वास्तव्यात कर्तार सिंग यांच्याकडून थोडेसे संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. हिराबाई बडोदेकराचा त्यांच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई गधर्वची वारीही त्यांनी कधी चुकविली नाही.
फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात गायक म्हणून झाली १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात. मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. यानंतर ते संगीतकार एस. डी. बर्मन आणि श्यामसुंदर यांचे सहाय्यक झाले. त्यांना संगीत देण्याची पहिली संधी मिळाली १९५० साली ‘आँखें' या चित्रपटात. चित्रपट काही फार चालला नाही पण काही चोखंदळ रसिकांनी संगीताच्या वेगळेपणाची नोंद जरूर घेतली. जेव्हा लता मंगेशकर यांना मदन मोहन यांच्या चित्रपटाकरता गाणार का असे विचारले तेव्हा त्यांचा दोन क्षण विश्वास बसला नाही आणि हसायला आले. याचे मुख्य कारण त्याकाळात मदन मोहन यांची ओळख एक धनिकाचा वाया गेलेले, लहान पोरांबरोबर क्रिकेट खेळणारा पोरगा अशीच होती. आज जेथे वानखेडे स्टेडियम आहे तेथे त्याकाळी एक खुले मैदान होते आणि मा.मदन मोहन तेथे सतत लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळत असत आणि त्यांचे वडील याबद्दल अतिशय नाराज असत. मोठे झाल्यावर जेव्हा जेव्हा ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी सामने होत, तेव्हा मा.मदन मोहन सामन्यांना नियमित हजेरी देत असत. गॅरी सोबर्स हा त्यांचा आवडता खेळाडू होता. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोणी ओळखीची व्यक्ती भेटली आणि ती त्यांच्याशी संगीतावर गप्पा मारायला लागली तर ते आवर्जून सांगत की हे ठिकाण फक्त क्रिकेटचा खेळ पाहण्याचे आणि त्यावर चर्चा करण्याचे आहे; तुम्हाला संगीतावर काही बोलायचे असल्यास उद्या माझ्या घरी या. सुरुवातीची पाच सहा वर्षे मदन मोहन यांची संघर्ष करण्यात गेली आणि पहिला चित्रपट गाजला तो ‘भाई भाई’, या चित्रपटाची सर्व गाणीही गाजली. मला त्यात आवडलेले एक श्रवणीय गीत आहे, ‘कदर जाने ना’. त्या अगोदर आलेला ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातील ‘देख तेरे इन्सान की हालत’ आणि ‘बस्ती बस्ती पर्बत पर्बत’ ही गाणी गाजली पण इतर गाण्यांची फारशी नोंद घेतली गेली नाही.
‘भाई भाई’ भरपूर चालला आणि मा.मदन मोहन यांना प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपटाचा रौप्य महोत्सव होणार पण मा.मदन मोहन यांचे दुर्दैव आड आले. २५ आठवडे पूर्ण व्हायच्या अगोदर चित्रपट पडद्यावरून काढला गेला आणि पहिल्या रौप्य महोत्सवाकरता मदन मोहन यांना आणखी काही वर्षे थांबायला लागले. मदनमोहन अतिशय शिस्तप्रिय संगीतकार होते. स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होते. ते भेंडी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ताना खिलवित असे अशी मन्ना डेनी आठवण सा॑गितली होती. हिंदूस्थानी वाद्याचा सुयोग्य वापर हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य होते. मा.प्रभाकर जोग, उत्तम सिंग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक यांच्याशिवाय मदनमोहन यांचे पान हलत नसे. ते सतारीचा विशेष चाहते होते. मा.रईस खान यांनी वाजवलेली 'आज सोचा तो आसू भर आये मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या असे म्हणतात. 'रस्मे उल्फत' 'वो चूप रहे तो ' नैनो मे॑ बदरा छाये इ गाण्यामधील सतार अगावर काटा उभा करते. 'नौनिहाल' मधील प. नेहरूच्या अत्यंयात्रेवर चित्रित केलेले 'मेरी आवाज सुनो' हे गाणे ऐकून इदिंराजी॑चे डोळेही भरून आले होते. मा.मदनमोहन यांचे १४ जुलै १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / शैलेश दामले
मदनमोहन यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=ocGQ2pDnzJs
https://www.youtube.com/watch?v=bcacqhxf86M
मदनमोहन व लता मंगेशकर यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=eXRvC91yLcQ&t=1243s
https://www.youtube.com/watch?v=I8tVaKhVuBo
June 27, 2017
भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म १३ मे १९०५ रोजीं झाला.
फक्रुद्दीन अली अहमद यांचे शिक्षण उत्तर-प्रदेश व दिल्ली येथे झाले. शिक्षण झाल्या वर ते १९२३ ला इंग्लैंडला गेले. तिथे कैम्ब्रिज मधून उच्च शिक्षण घेतले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
फक्रुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती २९ ऑगस्ट १९७४ साली झाले. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७ हा राहिला. २५ जून १९७५ रोजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या शिफारशीनंतर भारतीय संविधानाच्या परिच्छेद ३५२अंतर्गत देशात आणीबाणीची घोषणा केली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासाती हा सर्वात वादग्रस्त काळ होता. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती.
फक्रुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती पदावर असताना त्यांचे ११ फेब्रुवारी १९७७ रोजी निधन झाले.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
July 13, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti