(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रमेश गणेश खारकर

    ठाण्याचं निसर्गसौंदर्य, तलावांचा सुंदर परिसर यामुळे ठाण्याचं वातावरण खरोखरचं अल्हाददायक वाटतं. मग अशा वातावरणात खेळाडू निर्माण न होतील तरच नवल. अशा खेळाडूंना स्फूरण देणारं आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारातलं ज्येष्ठ नाव म्हणजे रमेश गणेश खारकर हे होय

      May 16, 2014


  • फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

    प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती.

    एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं. प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं.

    प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई.

    १९५१ साली प्रेमनाथची सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.

    ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली.

    सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 8, 2017


  • माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

    कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची ओळख १९७७ पासुनच निर्माण झाली. आपल्या वक्तृवानं सुषमा भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचला. भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी सियालकोट पंजाब येथे झाला.

    सुषमा स्वराज यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. सुषमा स्वराज यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली.

    पुढे चंदीगडमधून लॉची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. सुषमा स्वराज यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल व वकिल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला होता. लग्न झाल्यावर सुषमा स्वराज यांनी अडनाव म्हणून पतीचे नाव 'स्वराज' लावण्यास सुरुवात केली.

    त्यांचे पती स्वराज कौशलही याच काळात सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते.

    १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या. सुषमा स्वराज यांनी १९७७ ते ८२ आणि १९८७ ते ९० सालापर्यंत हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून काम केलं. १९७७-७९ दरम्यान सुषमा स्वराज यांनी हरियाणा सरकारमध्ये विविध मंत्रीपदं सांभाळली. १९९० मध्ये सुषमा स्वराज यांची पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली.

    १९९६ मध्ये सुषमा स्वराज पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. ११ व्या लोकसभा निवडणुकीत १६ मे-१ जुन १९९६ दरम्यान त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं.

    १३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला. सुषमा स्वराज या प्रामुख्यानं समोर आल्या, जेव्हा त्या १९९९ मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. ही निवडणूक त्या हरल्या. त्यानंतर २००४ मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं पुढं आणलं तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला. देशातील सर्वोच्च स्थानी जर परदेशी महिलेला बसवलं तर स्वत:ला बोडकं करणार... सुषमा स्वराज यांच्या या धमकीनंतर देशात एक मोठं नाट्य घडलं होतं.

    अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये २०००-२००३ दरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले. २००३-२००४ दरम्यान त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले, तसेच त्यांनी दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.

    २०१४ ते २०१९ या काळात सुषमा स्वराज यांनी मोदी सरकार मध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. सुषमा आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी आहे. तिचे नाव बांसुरी आहे. श्रीकृष्ण हे आवडते दैवत असल्यामुळे सुषमा यांनी मुलीचे नाव बांसुरी ठेवले. ती देखील वकील आहे. सुषमा स्वराज यांचे निधन ६ ऑगस्ट २०१९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 6, 2021


  • भारताचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग

    झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.

      October 29, 2023


  • जेष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबामहाराज सातारकर

    नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे. एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे बाबामहाराज सातारकर यांचे व्यक्तिमत्व बहु आयामी आहे.

    बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात. बाबामहाराज सातारकर यांची पुरस्कार यादी खूप मोठी आहे. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. बाबामहाराज सातारकर यांचे संकेतस्थळ www.babamaharajsatarkar.com

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 5, 2019


  • कवयित्री संजीवनी मराठे

    कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणार्‍या संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत.

      February 14, 2018


  • गुलजार

    हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९४३ रोजी झाला.

    गुलजार यांचे खरे नाव संपूर्णासिंह कालरा! चित्रपटसृष्टीत नाव चमकण्यापूर्वी संपूर्णानंद सिंह कालरा हे मोटार मेकॅनिक होते. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर प्रेम केले, जीवतोड केले, शायरीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, रात्ररात्र जागून काढल्या. खाजगी आयुष्यात वादळं आलीत, तरी गुलजार यांनी शायरी कधीच थांबवली नाही. स्वत:च्या बायकोपेक्षाही त्यांनी शायरीवर जास्त प्रेम केलं. उच्च कोटीची, प्रचंड भावनाप्रधान असलेली शायरी त्यांनी लिहिली. लोकजीवनाशी जुळलेल्या वैविध्यांनी नटलेल्या रचना गुलजार यांनी रचल्या.

    लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला खास ठसा मा.गुलजार यांनी चित्रपटसृष्टीत उमटवला. गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या १९६२ सालच्या ‘बंदिनी’ पासून सिनेकारकीर्दीला प्रारंभ केला होता. बिमल रॉय हेच त्यांचे गुरू! संपूर्णानंदाचा गुलजार कसा झाला? याची कहानी रंजकच आहे. ‘मेरे साजनऽ है उस पार...’वाले ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन एकदा मोटार मेकॅनिक असलेल्या संपूर्णानंदाकडे गाडी सुधरविण्यासाठी आले होते. संपूर्णानंदाशी बोलता बोलता त्याच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनदांनी हेरली. सचिनदा तेव्हा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’साठी काम करीत होते. बंदिनीचे गीतकार शैलेंद्र होते. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यावर शैलेंद्र यांचे कोणतेच गीत बिमल रॉय यांना हजम होत नव्हते. अशा स्थितीत सचिनदांना संपूर्णानंदाची आठवण आली आणि संपूर्णानंदाची बिमल रॉय यांच्याशी भेट घालून देण्याचा निश्चतय त्यांनी केला. परंतु, अडचण अशी होती की, बिमलदा कुणाचेही म्हणणे सहजतेने कधीच स्वीकारत नव्हते. सचिनदांनाही आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत असे. ‘‘जे होईल, ते होईल, पाहू पुढची पुढं,’’ म्हणत त्यांनी संपूर्णानंदाची भेट बिमल रॉय यांच्याशी घालून दिली व आश्चनर्य म्हणजे, संपूर्णानंदामधील प्रतिभा पाहून ते देखील प्रभावित झाले आणि ‘बंदिनी’चे गाणे संपूर्णानंदांना मिळाले. ‘मोरा गोरा अंग लई ले... मोहे श्याम रंग देई दे, छुप जाऊंगी रात ही मे, मोहे पी का रंग देई दे...’ हे गाणं संपूर्णानंदानं रचलं आणि हे गाणं एवढं हिट झालं की, ते रसिकांच्या ओठी आजही आहे. लतादीदींनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आणि एस.डींनी चढवलेला संगीतसाज, यामुळं हे गाणं अधिकच नटलं. हे गाणं हिट होताच संपूर्णानंद रातोरात हिट झाले व ‘गुलजार’ हे नाव देशभरात पोहोचलं. यानंतर गुलजार यांना बिमल रॉय यांनी आपला सहायक बनविले. म्हणून गुलजार हे बिमल रॉय यांना आपला गुरू मानतात.

    बिमल रॉय यांच्या मृत्यूनंतर गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम केले. ही जोडी चित्रपटसृष्टीत यशस्वी जोड्यांपैकीच एक महत्त्वाची जोडी आहे. हृषीकेशदांसाठी गुलजार यांनी सर्वप्रथम संवाद ‘आनंद’साठी लिहिलेत. ‘आनंद’साठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर मिळाला होता. या चित्रपटातलं मुकेश यांच्या आवाजातलं राजेश-अमिताभ या दोन सुपरस्टार्सवर चित्रित ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...’ गुलजार यांच्या कलमातूनच रचलं गेलं होतं. हृषीदांसोबत गुलजार यांनी बावर्ची, गुड्डी, मिली, नमक हराम, गोलमाल, अभिमान यांसारखे चित्रपट केलेत. मात्र, या जोडीला नजर लागली. नंतर दोघांमध्ये मतभेद झालेत व ‘यापुढे सोबत काम करायचे नाही,’ असा निर्णय त्यांनी घेतला. गुलजार यांनी स्वतंत्र मार्ग निवडला. त्यांनी स्वत: चित्रपट निर्मिती करायला प्रारंभ केला. स्वत:च्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गुलजार स्वत:च लिहायचे.

    संजीव कुमार आणि जया भादुरी हे दोघेही त्यांचे आवडीचे कलावंत! या दोघांच्या सुंदर अभिनयाने नटलेला ‘कोशिश’ हा गुलजार यांचाच चित्रपट होता. ‘कोशिश’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजीव कुमार यांच्यासोबत गुलजार यांनी ‘आँधी’, ‘मौसम’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘अंगूर’, ‘नमकीन’ असे चित्रपट केले. याशिवाय त्यांनी जितेंद्र, विनोद खन्ना, अमोल पालेकर, नसिरुद्दिन शहा आदी कलांवतांसोबतही चित्रपट बनविले. ‘परिचय’मध्ये ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्रला त्यांनी घेतले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जितेंद्र यांची इमेज पाहता ते गंभीर अभिनय करूच शकणार नाही, असा सर्वांचाच कयास होता. गुलजार यांनी या सर्व कयासांना दूर सारत जितेंद्रला गंभीर भूमिका करायला लावली व जितेंद्र यांनी गंभीर तसेच सुंदर अभिनयाचा ‘परिचय’ देताना भूमिकेचं सोनं करून टाकलं. ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाणा...’ हे गाणे अजूनही तोंडावर आहे.

    ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी यांच्याशी गुलजार यांचं नातं भावनात्मक होतं. मीनाकुमारीने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व डायऱ्या आणि शायरी गुलजार यांना सोपविली होती. गुलजार यांनी त्यावर संपादकीय संस्कार करून तिची शायरी प्रकाशित करण्याचे पुण्याचे काम केले. ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर मीनाकुमारीशी त्यांची भेट झाली होती. तेव्हा गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक होते. गुलजार यांनी मीनाकुमारीला ‘मेरे अपने’मध्ये झळकवले होते. मीनाकुमारीने १९७२ साली जीवनयात्रा संपविली होती. मात्र, मीनाकुमारीच्या आठवणींनी ते आजही व्याकुळच होतात. ‘कोई होता जिसको अपना, हम अपना कहलाते यारो...पास न सही दूर ही होता, लेकिन होता कोई अपना...हे ‘मेरे अपने’तलं गुलजार यांचं गीत भावदर्द जागवतात.

    १९८८ साली ‘मिर्झा गालिब’ व ९३ साली ‘किरदार’ या छोट्या पडद्यावरील मालिका त्यांनीच केल्या होत्या. ‘चौरस रात (लघुकथा संग्रह)’, ‘जानम’ (कवितासंग्रह ) एक बूंद चॉंद (कवितासंग्रह), रावी पार (कथासंग्रह), रात चॉंद और मै, रात पश्मीने की, खराशें आदी त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले गुलजार यांचे योगदान वाघाचे आहे आणि त्यांना ‘भारतीय शायरीचं विद्यापीठ’चं म्हणायला हवं! चित्रपटाकडून ते आता त्याच्या पहिल्या प्रेमाकडे- साहित्याकडे वळले आहेत. केवळ स्वत:च्या लेखनापाशी न थांबता ते आता दुसऱ्यांच्या साहित्यातही लक्ष घालता आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचा अनुवाद केला आहे. ते लेखक म्हणून जगत नसतात आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो.

    सत्तरीच्या आसपास तो कॉम्प्युटर शिकले आणि आता ते रोज इंटरनेट वापरतात. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्यांचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे. त्यांना उत्तमोत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. डायबेटिसमुळे बंगाली मिठाई खाता येत नाही, हे त्यांचे दु:ख आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट
    https://www.youtube.com/watch?v=F3hX-yNPb2E

      August 18, 2017


  • अभिनेत्री शमा देशपांडे

    आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी नाव मिळवलं होतं.

      May 26, 2022


  • मराठी भावगीतांचे सम्राट – गजाननराव वाटवे

    ‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ या गाण्यांचे गायक गजाननराव वाटवे यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य.

    गजाननराव वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला. मराठीत भावगीताचा जन्म गजानन वाटवेंच्या काव्यगायनाने झाला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गजाननराव वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले.

    गजाननराव वाटवे यांचं खास वैशिष्टय़ म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड व पुस्तकांतून त्यांनी घराघरांत व गल्लोगली लोकप्रिय केल्या. गजाननराव वाटवे यांच्या भावगीतांना कवितांतून जन्म मिळाला. प्रथमच कवितांना चाल लावली जाते व ती गोड गळ्याने म्हटली जाते हे रसिकांच्या ध्यानात आले. वाटवे यांचा हा प्रयत्न सुरुवातीलाच एवढा गाजला व त्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली.

    त्याकाळी गजाननराव वाटवेंचे भावगीत गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले. गजाननराव वाटवेंची भावगीतातील कारकीर्द म्हणजे भावगीतांचा सुवर्णकाळ होता. आपल्या कार्यक्रमात ते स्वत: लावलेल्या चालीच बहुधा ते म्हणत. त्यामुळे प्रत्यक्ष गाताना हवे ते बदल ते करून घेत. त्यामुळे त्यात ठराविकपणा येत नसे. प्रत्येक वेळी ते काव्य नवीनच वाटे. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधी लावण्या, नाटय़संगीत, सिनेसंगीत इतर काही प्रकार त्यांच्या कार्यक्रमात आणले नाहीत. द्वंद्वगीते नाहीत. साधेसुधे शब्द, साध्यासुलभ चाली यांचं जणू मनोमीलन त्यावेळच्या भावगीतात झालं आहे. दुधात साखर पडावी अशी भावगीतं पानफुटीसारखी जमून गेली आहेत की या भावगीतातील शब्दासाठी चाल जन्माला आली की चालीसाठी शब्द जन्माला आले, अशा गोड संभ्रमात भावगीतांचे रसिक पडतात, मनात घर करणारी व ओठावर रेंगाळणारी ही गोड गोड भावगीते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ झाले. हा सांस्कृतिक ठेवा अवीट आहे. खरं तर या साध्या कविता होत्या, त्यांना गजानन वाटवेंनी सहज सुलभ चाली लावल्या. आश्चर्य म्हणजे गजाननराव वाटवे यांनी कवितेतील एकाही शब्दाचा बदल न करता त्यांना सुंदर चाली लावलेल्या आहेत.

    मात्र एक काळ गजाननराव वाटवे यांनी गाजवला होता, हे मात्र नक्की. कवी मनमोहन यांच्या ‘राधे तुझा सैल अंबाडा’ आणि राजा बडे लिखित ‘नका मारू खडा शिरी भरला घडा’ या गीतांनी पुण्या-मुंबईत खळबळ उडवून दिली. दोन्ही गीतं अश्लील असल्याचं शिक्कामोर्तब संस्कृतीरक्षकांनी केले होते. रेडिओने दोन्ही गाण्यांवर बॅन टाकला. त्याकाळच्या लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डस्पेक्षाही अधिक विक्री या दोन प्रायव्हेट गाण्यांच्या रेकॉर्ड्सने केली. गजाननराव वाटवे यांच्या स्वरातलं भावदर्शन ही त्याकाळच्या तरुण पिढीची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेट साठच्या दशकातील सुरुवातीपर्यंत गजाननरावांच्या भावगीतांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गांधी हत्येनंतर महंमद रफीचं ‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की अमर कहानी’ ऐकून गजाननरावांनी कवी मनमोहन यांना गांधीजींच्या जीवनावर कविता लिहिण्याची विनंती केली.

    तुफान लोकप्रियता हे ‘गजाननराव वाटवे’ या नावासरशी जणू घट्ट चिकटलं होतं. गजाननराव वाटवे यांचे २ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गजाननराव वाटवे यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=pYqBj-cduu8
    https://www.youtube.com/watch?v=u8LD6_Q4OKQ
    https://www.youtube.com/watch?v=C316cQP3EYI
    https://www.youtube.com/watch?v=Zdfh5gVMA60
    https://www.youtube.com/watch?v=8EJxW0rNF7k

      April 15, 2017


  • गुरु ठाकूर

    गुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात.

      July 23, 2017