(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फारसी आणि उर्दू कवी मिर्झा गालिब

    वयाच्या ११ व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.

      December 27, 2021


  • मास्टर विनायक

    मास्टर विनायक यांचे विनायक दामोदर कर्नाटकी हे पुर्ण नाव. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९०६ रोजी झाला. मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक' असं त्यांना गौरवानं म्हटलं जातं.

    धार्मिक कथा, करमणूक, साहस वगैरे कल्पनारम्य विश्वातून मराठी बोलपटांना अर्थपूर्ण करण्याचं मोठंच कार्य मा. विनायकांनी केलं. फक्त अभिनयासाठीच त्यांनी परिश्रम घेतले नाहीत, तर दिग्दर्शन व निर्मितीचंही महत्त्वाचं योगदान केलेलं आहे.

    गंभीर, सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे आणि कारुण्याने ओंथबलेले माझे बाळ, छाया यासारखे चित्रपट अतिशय भावनिक स्तरावर हाताळले तर ब्रह्मचारी, सरकारी पाहुणे यासारख्या चित्रपटांची निर्मिती करून विनोदप्रधान चित्रपटांद्वारा रसिकांना मनमुराद हसवले.

    करूण आणि हास्य या परस्परविरोधी असलेल्या दोन्ही भावनांना स्वतःची पकड असलेला दिग्दर्शक या नात्याने भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. उपहास, विडंबन, उपरोध, विनोद आणि विनोदी कोट्या या सगळ्यांचा उपयोग करून त्यांनी उत्कृष्ट आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. मराठी रंगभूमीवर खाडिलकर, गडकरी, वरेरकर, देवल यांनी विविध प्रयोग करून एक नावीन्य निर्माण केले होते. त्या नावीन्यपूर्ण गोष्टींचा विनायकरावांनी आपल्या चित्रपटांमध्ये सहज समावेश करून घेतला. त्यांनी अनेक चित्रपटातून स्वतः भूमिका केल्या. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री बेबी नंदा ह्या मास्टर विनायक यांच्या कन्या होत.

    मायामच्छिंद्र, डॉ. कोटणीस की अमर कहानी, माझे बाळ, अमृत, संगम, अर्धांगी, घर की रानी, लंपडाव, ब्रँडी की बोतल, ब्रह्मचारी, ज्वाला, धर्मवीर, छाया, भिकारन, निगाहए नफरत, विलासी विश्व, आकाशवाणी, सैरंध्री, सिहगड, अयोध्येचा राजा, जलती निशानीहे त्यांचे गाजलेले चित्रपट. मास्टर विनायक यांचे १९ ऑगस्ट १९४७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ.वेबदुनीया

      January 19, 2017


  • बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी

    बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. त्यांचा जन्म ६ मे १९९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. बुलो सी रानी यांचे वडीलही संगीतकार होते. ४० ते ६० च्या दशकात त्यांनी संगीत दिले. बुलो सी रानी यांनी १९३९ रणजीत मोविटोन पासून आपली सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांना असीस्टट म्हणून मदत करायला सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांच्या तानसेन, चांदनी, सुखदुख या चित्रपटाना असीस्टट म्हणून काम केले. त्या काळी बुलो. सी. रानी अमीरबाई कर्नाटकी यांच्या आवाजाने इतके प्रभावित होते की आपल्या पुढील चित्रपटांसाठी इतर कोठल्या गायिकेचा विचार करण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या १९४४ साली आलेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील धिम्या लयीतील ‘सूनी पडी है प्यार की दुनिया तेरे बगैर जली हुई है दिल में तमन्ना, तेरे बगैर’ या गाण्यातील अमीरबाईचा एकेक स्वर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. तसेच १९४५ सालच्या ‘चांद चकोरी’ मध्ये तर त्यांनी सर्वच्या सर्व गाणी अमीरबाईच्या आवाजात स्वरबद्ध केली होती. बुलो सी रानी यांचे २४ मे १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 24, 2017


  • प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर

    शरद पिळगावकर यांचे गाव 'पिळगाव'. मा.शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं. 'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही. मा.शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन. दत्ताच करतील, असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला,'अपराध मीच केला' हे नाटक मा.शरद पिळगावकर यांनी मधुसुधन कालेलकरांना सुचविले होते, ज्याचा विषय होता 'कमांडर नानावटी खटला'.

    सव्वा शेर, चोरावर मोर जागृती, अपराध व अष्टविनायक हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यातील अष्टविनायक हा तर लोकांना आवडलेला सर्वात चित्रपट सांगली जिल्ह्यातल्या एका गणेश भक्त असलेल्या उद्योगपतीच्या जीवनात १९७५ साली घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याच चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. मा.शरद पिळगावकर यांचे चिरंजीव सचिन पिळगावकर हे आज सुद्धा मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत.

    शरद पिळगावकर यांचे १७ जून १९८३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 17, 2018


  • अष्टपैलू संगीतकार सी. रामचंद्र

    सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र चितळीकर, ‘सी. रामचंद्र’ हे नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीत क्षेत्राविषयी निस्सीम प्रेम व भक्ती असल्याने याच विषयात कारकीर्द गडवण्याच्या हेतूने नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त प्रवेश घेऊन त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले; व उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. जयकोडी या तमीळ चित्रपटासाठी त्यांनी प्रथम संगीतरचना केली. सुखी जवान हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट! मा. भगवान यांनी तो निर्माण केला. त्यात सारे जहाँसे अच्छा या इक्बाल यांच्या विख्यात गीतासाठी सी रामचंद्र यांनी चाल दिली. या जोडीचा अलबेला हा चित्रपट तुफान चालला. त्यात मास्टर भगवानची नृत्ये आणि सी.रामचंद्र यांचे अफलातून संगीत यांची जादू आजही कायम आहे. त्यातील भोली सुरत दिलके खोटे हे गीत तर जाम धमाल आहे. सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले सरगम,पतंगा, सगाई, अनारकली इत्यादी अनेक चित्रपट आले. काही संगीतदृष्टया चांगलेच गाजले. त्यात अनारकली हा ऑल टाईम ग्रेट आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे २५० हिंदी, मराठी, तमिळ , तेलुगु चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या बहराचा काळ १९४४ ते १९५५ हा मानला जातो. १९४९ ते १९५८ या काळात त्यांच्यासह लता मंगेशकर गात असत. पण नंतर त्यांचा वाद झाला. पण लता आणि त्यांचे बिनसले आणि ते नंतर जवळजवळ या व्यवसायातून बाहेर फेकले गेले. १९६० नंतर त्यांची कारकीर्द संपली. १९६४ च्या सुमारास कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भर लो पानी या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीत दिले. लता मंगेशकर यांनी ते गीत गायिले होते. त्यांनी हलक्या फुलक्या पाश्चात्य संगीतावर मनापासून प्रेम केले आणि त्या संगीताच्या सादरीकरणाचे एक नवे युगच निर्माण केले. भारतीय संगीत आणि पाश्वात्य संगीताचा एक अप्रतिम संगम त्यांनी घडविला. कव्वाली या संगीत प्रकाराला संजीवनी देण्यातहि त्यांचा महत्वाचा वाटा होता. अनारकली या १९५३ साली आलेल्या चित्रपटात त्यांनी यह जिंदगी उसी की है या गीताला दिलेलं संगीत अत्यंत सुंदर आहे. त्या गीतात वापरलेली सतार अविस्मरणीय आहे. ते अष्टपैलू संगीतकार होते. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे. सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 12, 2017


  • प्रदीप भिडे

    प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.

      July 7, 2022


  • ममता सपकाळ

    ममता सपकाळ यांच्या जीवनाची कथा ही सर्वांच्या समोर आणायची झाली तर त्यावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते.

      August 16, 2011


  • नामवंत कथाकार प्रकाश संत

    कादंबऱ्या न वाचलेला रसिक मराठी वाचक दुर्मीळच! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या चार कादंबऱ्यांमधून लंपन आणि त्याची मैत्रीण सुमी, इतर मित्रमंडळी, लंपनच्या मनातली सुमीविषयीची हुरहुर, प्रेम हे सर्व संतांनी तपशीलवार, पण सुंदर प्रकारे रेखाटलंय आणि या चारही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात एक वेगळंच स्थान राखून आहेत.

      June 16, 2022


  • अलौकिक गणिती श्रीनिवास रामानुजन

    गणिती प्रज्ञावंतांना सहसा त्यांच्या योगदानानुसार उत्तम आणि अत्युतम अशा दोन वर्गात विभागले जाते. पण काही गणितज्ञ अपवादात्मक असामान्य अशा तिसर्याु वर्गात मोडतात. अशा मोजक्या प्रतिभावंतांमध्ये भारताचे रामानुजन यांचा समावेश असणे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला.

    वयाच्या दहाव्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील मा.बबरामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती. पण दुसर्याप विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्नातक पदवी मिळवू शकले नाहीत. पोटापाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली व वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले. त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जी. एच. हार्डी यांना एका नऊपानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले व त्यांनी रामानुजनला १९१४ मध्ये इंग्लंडला बोलवून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखीन पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी १९१९ मध्ये ते मायदेशी परतले. केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे.अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.

    रामानुजन सांगत की त्यांच्या स्वप्नात त्यांची नामाककलची नामगिरी ही आराध्य देवता आणि नरसिंह देव प्रकट होऊन रक्ताचे थेंब सोडत. त्यात असंख्य अतिशय प्रगत गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत व ती सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. त्यांच्या मते, गणिती सूत्र म्हणजे देवाच्या मनातील विचार, असा होता. कदाचित अशा निष्पाप, अतिशय संवेदनशील ग्रहणशीलता व तरल चित्तवृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे दिसत, रोखठोक तर्कशात्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्यांना ती सहसा दिसणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल.

    रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. १९९७ पासून ‘द रामानुजन जर्नल नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध होत असून त्यात त्यांच्या कार्याशी निगडित असे दर्जेदार शोध लेख प्रसिद्ध होतात.

    आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली. केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मा.रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास ४००० सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.

    श्रीनिवास रामानुजन आजारी होते तेव्हा त्यांचे गुरु प्रो. हार्डी त्याना भेटावयास आले. गप्पा मारता मारता प्रो. हार्डी सहज म्हणाले की मी ज्या टॅक्सीतून आलो तिचा क्रमांक अशुभ होता. १७२९.

    तेव्हा रामानुजन म्हणाले अहो ही अतिशय शुभ संख्या आहे. कारण दोन संख्यांचा घन करुन त्यांची बेरीज केली असता एकच उत्तर येते अशी दोन उदाहरणे असलेली सर्वात लहान संख्या आहे ही.
    तेव्हा प्रो. हार्डी म्हणाले ते कसे काय?

    तेव्हा चटकन रामानुजन यानी पुढील गणित करुन दाखविले.
    ०९×०९×०९= ७२९
    +१०×१०×१०= १०००
    ===========
    १७२९

    १२×१२×१२ = १७२८
    +०१×०१×०१ = ०००१
    ==============
    १७२९

    रामानुजन यांचे निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 22, 2018


  • ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले

    ‘बिब घ्या बिब शिककाई.., परिकथेतील राजकुमारा..गोड गोजिरी लाज लाजिरी.. अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या.

    त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहेजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धामध्ये आपले गुण प्रदíशत करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षाच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. मा.कृष्णा कल्ले पुढे आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार झाल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा-या यात्रा-जत्रांतील संगीत कार्यक्रमातही यांचा आवाज लोकप्रिय ठरू लागला. एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांचा आवाज मा.अरुण दाते यांच्या कानावर पडला आणि त्यांनी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणा-या संगीत दिग्दर्शक यशवंत देवांपर्यंत पोहचवला. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली. जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही मा.कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. कृष्णा यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. त्यांनी ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर जयकिशन आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांचे पती मा.मनोहर राय हे पण संगीतकार आहेत. मा. कृष्णा कल्ले यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    कृष्णा कल्ले यांची गाजलेली गाणी.
    अंतरंगी रंगलेले गीत, अशा या चांदराती, गोड गोजिरी लाज लाजिरी, आईपण दे रे, अशी नजर घातकी बाई, कशी रे आता जाऊ घरी, गुपित मनिंचे राया, चंद्र अर्धा राहिला, चंद्रकळा रुक्मिणी नेसली, तू माझ्या स्वप्नांची कल्पना, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, पुनवेचा चंद्रमा आला घरी, मन पिसाट माझे अडले रे.
    अनमोल गाणी कृष्णा कल्ले.

    https://www.youtube.com/watch?v=BriN4Xq6JcU

    https://www.youtube.com/watch?v=gc0hi_d9sd4

      March 18, 2017