जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी पाच वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जन्मदिनी शिक्षकदिन साजरा करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते.
October 12, 2023
चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.
May 16, 2014
श्री राजन राजे हे कामगार नेते असून त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा हे आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांत त्यांची कामगार संघटना कार्यरत आहे.
September 12, 2011
न. गो. राजूरकर यांची म्हणावी तशी ओळख झाली नाही. ते हैदराबादचे रहिवासी असल्यामुळे कदाचित हे झाले असावे किंवा त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा इंग्रजीत असल्यामुळे हे झाले असावे. डॉ. राजूरकर हे ख्यातनाम लेखक व वक्ते आहेत. त्यांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत.
June 1, 2011
कुलभूषणचे सध्याचे कार्यक्षेत्र कोळसा, विविध ज्वलनशील वायू आणि इंधन यांचा निर्मिती क्षेत्रात वापर करतानाचे कारखान्याचे नियोजन आणि आराखडा तयार करणे आहे. आगीशी खेळू नकोस हा मराठमोळा सल्ला धुडकावून एक मराठी ठाणेकर तरूण खरोखरच प्रत्यक्ष आगीशी खेळून जागतिक पातळीवर ठाणे शहराचे नाव मोठे करीत आहे ही आपल्या सर्वांनाच अभिमानाची गोष्ट आहे.
October 11, 2018
असंख्य गाण्यांना आपल्या सृजनशीलतेनं प्रकाशमान करणारा हा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर !
January 17, 2017
किशोर कुमार यांच्या गायनाचे विश्लेषण करण्याअगोदर या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यावरील “यॉडलिंग” करणारा गायक असा लागलेला शिक्का किती चुकीचा आहे, हेच दर्शवायचे आहे. आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला झापडबंद अशा लेबलात अडकवतो यायचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार.
August 23, 2018
लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे,हे पेशाने वास्तुविशारद होते.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत.
June 4, 2014
एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज.
February 4, 2010
शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील
पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे. पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले. ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.
पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.
मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं. मा. मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मंगेश पाडगावकर यांचे कविता वाचन.
https://www.youtube.com/shared?ci=GhwamUyYrhQ
December 30, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti