जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्रीविद्या प्रकाशनचे श्री मधुकाका कुलकर्णी.
गेली कित्येक वर्षे, अनेक दर्जेदार ग्रामीण कवी व नवोदित लेखकांचे आर्थिक चणचणींमुळे अंधारात राहिलेले साहित्य आकर्षक व सुबक रूपांमध्ये प्रकाशित करून ते नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. स्थानिक ग्रामीण कवी व लेखकांना ओळख मिळवून देण्यात मधुकाकांचा मोलाचा वाटा आहे.
कोणत्याही जादा अपेक्षांचे ओझे साहित्यिकांवर न लादता त्यांनी अनेकजणांना या क्षेत्रात आर्थिक भरभराट व सुबत्ता मिळवून दिली. उपेंद्र कुलकर्णींचे विपूल व दर्जेदार साहित्य त्यांनी पुस्तकरूपांत आणले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
त्यांनी पुढे स्वतःच्या लेखनकौशल्यावर , स्वतःच्या प्रतिभेवर रेडिओसाठी कार्यक्रम लिहावयास सुरवात केली. तिथे यशवंत देव , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर यांच्याशी त्यांची ओळख आणि मैत्री झाली. रेडिओवर त्यांची ‘ मास गीत ‘ ह्या कार्यक्रमात गाणे लागे . ‘ मास गीत ‘ म्हणजे एकच गाणे महिनाभर दर रविवारी लागायचे. त्यावेळी त्यांची तेथे खूप गाणी रेकॉर्ड झाली आणि ती आकाशवाणीवर प्रसारितही झाली. त्यावेळी कॅसेट्स नसायच्या किंवा आजच्यासारख्या डी.व्ही.डी. ही नसायच्या . त्यावेळी रेकॉर्ड्स असायच्या , ध्वनिमुद्रिका असायच्या. त्यांच्या खूप खूप ध्वनिमुद्रिका रेकॉर्ड झाल्या.
July 21, 2021
मित्र सुधीर पेशवे – हे तुळजापूरचे एक ध्वनिमुद्रिका संग्राहक. नळदुर्गच्या आठवडे बाजारात हिंडताना एका चहाच्या टपरीकडे त्यांचे लक्ष गेले. दोरीला लटकत असलेली “चहा – २५ पैसे” असे लिहिलेली ती वर्तुळाकार चीज एक रेकॉर्डच होती. कुणाची आहे म्हणून त्यांनी ती जवळ जाऊन पाहिली. सुधीर पेशवेंचा डोळ्यावर विश्वास बसेना. ती ध्वनिमुद्रिका होती विष्णुपंत पागनीस यांची. चित्रपट ‘संत तुकाराम’आणि गीत होते -आधी बीज एकले ! चार चहांची किंमत देवून त्यांनी ती हस्तगत केली.
February 26, 2022
विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या इंग्लंडला गेल्या. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून कुसुमावती १९२९ला भारतात परतल्या. त्याच वर्षी त्यांचा आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्याशी विवाह झाला.
नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये केवळ मुलगे शिकत असल्याने त्यांना इंग्रजीच्या प्राध्यापकाची नोकरी स्त्री म्हणून नाकारली गेली. शेवटी गव्हर्नरपर्यंत जाऊन, भांडून कुसुमावतींनी ती नोकरी मिळविली. त्यानंतर त्यांनी काही काळ नागपूर आकाशवाणी केंद्रात आणि नंतर दिल्लीच्या केंद्रात त्यांनी कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मा.कुसुमावतींना मिळाला. मा.कुसुमावती देशपांडे यांचे १७ नोव्हेंबर १९६१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 16, 2017
स्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे.
June 6, 2021
अर्जुन चंदीरामानी हे सी. अर्जून यांचे नाव. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. सी.अर्जुन म्हणजे बुलो सी रानी या सिंधी संगीतकाराचा सहायक. वडील गायक त्यामुळे घरचं वातावरण संगीताला पोषक. सी. अर्जून १९६० सालापासुन चित्रपट सृष्टीत कार्यरत होते. १९६० साली रोड नं. ३०३ या चित्रपटाने त्यांची सुरुवात झाली. ‘पास बैठो तबीयत मचलं जायेगी’ १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुनर्मिलन’ चित्रपटातील हे त्यांचे सर्वात गाजलेले गाणे. पुनर्मिलन मधील तशी सर्वच गाणी उत्तम होती. परंतु बी ग्रेड चित्रपटामुळे या चित्रपटाला मर्यादित लोकप्रियता लाभली. त्यानंतर त्यांचा आला ‘सुशीला’ नावाचा चित्रपट १९६६ साली. यातील रफी व तलतच्याही आवाजातील गीत ‘गमकी अंधेरी रात में दिलको न बेकरार कर सुबह जरुर आयेगी सुबह का इंतजार कर’ ऐकताना निराश मनाला उभारी कशी येते ते आपण अनुभवले असेलच.
सी. अर्जुन यांनी उत्तरार्धात ‘जय संतोषी मॉं’ चित्रपटातील आरती, ‘मैं तो आरती उतारूँ रे’ हे गाणे अजरामर केले. सी. अर्जुन त्या चित्रपटाचे संगीतकार होते. ‘मैं अभी गैर हूं, मुझको अभी अपना ना कहो..’ हे मुकेश-आशाचं, ‘मैं और मेरा भाई’ मधील ही पण गाणी गाजली. हिंदी चित्रपटांबरोबर त्यांनी काही गुजराथी व एका सिंधी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. मा. सी. अर्जून यांचे ३० एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सी. अर्जून यांची काही गाणी
आये हो तो जाना का
मैं तो आरती उतारूँ रे
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
ग़म की अंधेरी रात में
April 30, 2017
रणदिवेंनी त्यांच्याबरोबर काम करणारे शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांच्या मदतीने निरनिराळ्या पेशींच्या स्वतंत्र वाढणाऱ्या मालिका प्रस्थापित केल्या. त्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून या तंत्रज्ञानाचा उपयोग कर्करोग संशोधनासाठी भारतात सर्वप्रथम केला.
June 28, 2022
रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे ‘गाँव की गोरी’ या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले.
July 31, 2021
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
June 4, 2010
थोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती.
February 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti