(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर

    जांभकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते.

      January 6, 2022


  • चिंतामण गणेश कर्वे

    कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संग्राहक व संपादक चितामण गणेश कर्वे.

      January 22, 2010


  • कवयित्री बहिणाबाई चौधरी

    कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी
    बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला.
    बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

    ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

    तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. मा.बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकीपीडीया

      December 3, 2016


  • दिग्गज कसोटीपटू, यशस्वी कर्णधार अजित वाडेकर

    अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपले करिअर निवडले व यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.

      April 2, 2019


  • ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न सी. एन. राव

    डॉ. राव हे ‘ सॉलिड स्‍टेट केमिस्‍ट्री ‘ (Solid State Chemistry) म्हणजे घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.

      July 26, 2021


  • किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक श्रीकांत देशपांडे

    श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता.

    श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे तालीम घेतली होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते सहसचिव होते. तसेच या महोत्सवात अनेकदा त्यांनी आपली गायकी सादर केली होती. ते पुणे विद्यापीठाच्या डॉक्टसरेटसाठीच्या (संगीत विषय) प्रवेश समितीवर सन्माननीय सदस्य होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.

    भारतातून अनेक संगीत परिषदांमधून श्रीकांत देशपांडे यांचे गायन झाले. तसेच रागमाला परफॉर्मिग आर्टस् ऑफ कॅनडा आणि इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनच्या वतीने अमेरिकेसह कॅनडामध्ये त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशाविदेशात गायनाच्या अनेक मैफली केल्या होत्या. सवाई गंधर्वसंमेलन, तानसेन समारोह, गुणीदास संमेलन, दीनानाथ मंगेशकर संमेलन, सूरश्री केसरबाई संमेलनातही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले होते. श्रीकांत देशपांडे यांचे २९ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 12, 2017


  • प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

    ’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत.

      October 28, 2021


  • किशोर रामराव कुलकर्णी

    किशोर रामराव कुलकर्णी निवृत्त आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी आहेत.

      December 15, 2010


  • वसंतराव गोवारीकर (डॉ.)

    भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्‍या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे.

      December 15, 2010


  • वसंत देसाई

    हिंदी चित्रपट संगीतकारांचा विचार करताना, बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटांपुरते किंवा हिंदी भाषिक गीतांपुरते आपले अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार जसे बंगाली, मराठी, पंजाबी दक्षिण भारतीय संगीतकार (जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांसाठीच स्वररचना करीत होते) यांनी आपली कारकीर्द हिंदी चित्रपटाभोवतीच साकार केली. अर्थात हे त्यांची मर्यादा असे म्हणता येणार नाही पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपले ध्येय ठेवले. या मताला सणसणीत अपवाद म्हणून वसंत देसाई यांचे नाव अवश्यमेव घ्यावेच लागेल.

    कोकणपट्टीतील सावंतवाडी जवळील सोनवड गावी जन्म. हा तपशील जरा महत्वाचा म्हणायला लागेल कारण हा परिसर धर्म आणि लोकसंगीताने गाजणारा आहे. याचा प्रभाव आणि परिणाम वसंतदेसायांवर नक्कीच झाला असणार. त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीचा बारकाईने आढावा घेतला तर वरील मताला पुष्टी मिळते.

    संगीतात लहानपणापासून अतोनात रस, याची परिणीती, उस्ताद इनायत खान आणि डागर बंधू, यांच्याकडून शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली. वसंत देसायांच्या स्वररचनेवर रागसंगीताचा फार प्रभाव आहे, याचे मूळ इथे सापडू शकते. पुढे तरुण वयात प्रभात कंपनीत, गोविंदराव टेबे यांच्या हातखिळी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रभात कंपनीत स्थिरावले. इथे त्यांना व्ही. शांताराम भेटले आणि नंतर जेंव्हा व्ही. शांतारामांनी प्रभातपासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला तेंव्हा वसंत देसाई यांना तिथे भरपूर संधी मिळाल्या. या दोघांना प्रभातचा वारसा मिळाला होता, हे मुद्दामून ध्यानात ठेवावे लागेल. समान विचार आणि ध्येये यांचा परिणाम दोघांच्याही कार्यात दिसला. राजकमल बरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केले.

    वास्तववादी चित्रपटनिर्मितीत ज्याचा उद्भव होतो त्या संगीतावरच भर असल्याकारणाने विविध आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर देसाई यांचा कटाक्ष होता. उदाहरणार्थ, " डॉ आँखे बारा हाथ" या चित्रपटातील "सैय्या झुठो का बडा सरताज निकला" या गाण्यात "रावणहथ्था" या लोकवाद्याचा समर्पक उपयोग!! तसेच याच चित्रपटातील "ऐ मालिक तेरे बंदे हम" या गाण्यात योजलेला लयबंध वाऱ्याने उघडझाप करणाऱ्या खिडकीने पुरवला जातो.

    वसंत देसाईंच्या रचनांत थोडाफार नाट्यगीतांचा गंध राहिलापण हे थोडे अपेक्षित असेच म्हणावे लागेल. याशिवाय असे जाणवते, पारंपरिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्या कारणाने त्या जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागेपुढे पहिले नाही. याचाही संबंध मराठी नाट्यसंगीताशी असलेल्या त्यांच्या जवळच्या नात्याचा असावा. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीतपरंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, हा दृष्टिकोन इथे महत्वाचा आहे. या परंपरेचा आणि देसाई यांचाही कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भरवसा नव्हता. उदाहरणार्थ "दिल का खिलौना हाये टूट गया" (भैरवी), "बोल रे पपीहरा" ही गाणी ऐकावीत. तसेच "गुड्डी" या चित्रपटातील गाणे - हमको मन की शक्ती देना - या प्रार्थना गीताला केदार या शांत-गंभीर रागाचा आधार आहे पण रागविस्ताराची अपेक्षा निर्माण होऊ नये अशी खबरदारी चालीच्या चलनातून घेतली आहे. या उलट "बोल रे पपीहरा" ही शास्त्रोक्त चीज त्रितालाऐवजी केहेरवासारख्या तालात बांधून जरा हलकी फुलकी केली आहे. याचाच वेगळा अर्थ असा घेता येतो, परंपरेत राहून प्रयोग करण्याकडे देसायांचा कल होता.

    "झनक झनक पायल बाजे" या चित्रपटातील "नैन सो नैन" या गाण्यासाठी "मालगुंजी" रागाचा आधार घेतला आहे आणि हा राग प्रेम-प्रणय इत्यादींसाठी वारंवार वापरलेल्या बागेश्रीपासून नाजूक अंतर राखून असतो म्हणजे तास ठेवावा लागतो. याच चित्रपटातील, भारताच्या अनेक प्रांतांत प्रचलित "बारमासा" या पारंपरिक लोकगीतप्रकारच्या धर्तीवर त्यांनी ऋतूवर्णनपर पद्यें योजली आहेत. या रचनांना गीतांचे स्वरूप न देता केवळ चाली ठेवण्यात देसाई यांनी परंपरेत राहून थोडा बदल करण्याच्या रचनापद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे त्यांच्यावर काही बंधने आली हे खरे, पण त्याचबरोबर तयार चाली व त्यासाठी सज्ज ऐकणारेही निश्चित झाले. "जो तुम तोडो पिया" किंवा " ऐ मेरे दिल बता" या रचनासुद्धा ठरीव दृश्यांसाठी साचेबंद संगीत, वसंत देसाई कसे वापरीत असत, याची कल्पना येते,

    आणखी एका बाबीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. व्ही. शांतारामांसाठी काम करताना केलेल्या रचना नाट्यप्रभावित वास्तववादाला धरून असत पण इतर चित्रपटांसाठी त्यांचे धोरण वेगळे रहात असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी दिलेले "मेघा बरसने लगा है आज की रात" - शक चित्रपटातील गाणे अधिक वेधक उदाहरण म्हणून मांडता येईल. राजकमलसाठी केलेल्या संगीतरचनांत न आढळणारे विशेष अशा संगीतरचनांत आढळतात याचा वेगळा अर्थ, त्यांच्या सर्जनशीलतेस व्यापक रूप होते.

    वसंत देसायांच्या पुढील सांगीतिक रचनांचा आराखडा अत्यंत व्यामिश्र तसेच परंपरेत राहून प्रयोग करणारा आणि नंतरच्या काळात आधुनिक वाद्यांच्या सहाय्याने अधिक गुंतागुंतीचा होता, असे विधान ठामपणे करता येते. अशी प्रतिभा लाभलेला संगीतकार विरळाच असतो. एका बाजूने हिंदी चित्रपट, दुसरीकडे मराठी चित्रपट आणि तिसरीकडे मराठी रंगभूमीवरील कामगिरी - इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे हाताळणे, हीच खरी वसंत देसायांची सर्जनशीलता म्हणायला लागेल.

      August 29, 2018