जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी
November 22, 2016
साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व
June 10, 2017
१९९२ साली जॉन कोयुम नावाचा १६ वर्षांचा मुलगा युक्रेममधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियाधील माऊंटनव्हु या गावी आला तो आपली गरीबी व दारिद्र्य घेऊनच. त्याने ग्रोसरी स्टोअरमध्ये ‘झाडुवाला’ म्हणून काम करायला सुरवात केली तर त्याच्या आईने बेबी सिटर म्हणून काम करायला सुरवात केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. त्यामूळे ‘सोशल सपोर्ट प्रोग्रॅम’ च्या आधारे ही फॅमिली कशी बशी तग धरून राहीली.
तो 18 वर्षांचा झाला आणि त्याला कॉंप्युटर प्रोग्रॅमींग आणि नेटवर्कींगमध्ये रस वाटू लागला. पण पुस्तके विकत घेण्यापुरतेही पैसे नसायचे. त्याने पुस्तकाच्या दुकानातून जुनी पुस्तके उधारीवर आणून अभ्यास करायला सुरवात केली. अभ्यास झाला की तो आणलेली जुनी पुस्तके दुकानदाराला परत करायचा. त्याचा इंटरेस्ट वाढू लागला तेव्हा त्याने सॅन ओजे युनिव्हर्सिटींमध्ये ऍडमीशन घेतली. त्याच वेळी एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम करायला सुरवात केली. दिवसभर कॉलेज व रात्री नोकरी असे त्याचे जिवनचक्र सुरू झाले.
1997 साली त्याला याहूमध्ये नोकरी मिळाली. त्याने 9 वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्याची ओळख ब्रॅयन ऍक्टन या तरुणाबरोबर झाली. लोकांना उपयोगी पडेल असे एखादे कॉम्युटर ऍप्लिकेशन तयार करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्याने असे ऍप्लिकेशन तयार पण केले. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटल्याने त्याने व त्याच्या मित्राने कंपनी सोडली व स्वतःची कंपनी स्थापन केली.
पण त्याचा हा प्रयोग संपुर्ण फसला. त्याचे ऍप्लिकेशन काही लोकांना आवडले नाही. नोकरी नाही, पैसे नाहीत, धंदा नीट चालत नाही अशी त्याची अवस्था झाली. म्हणून त्याने परत नोकरी शोधायला सुरवात केली. त्याने फेसबूक मध्ये अर्ज केला. त्याला मुलाखतीला बोलावणे आले पण त्याला ‘रिजेक्ट’ करून परत पाठवले.
जानेवारी 2009 मध्ये त्याने आयफोन विकत घेतला आणि त्याच्या लक्षात आले की यामूळे अनेक ऍप्लिकेशनसाठी मोठे मार्केट खुले झाले आहे. त्याने चार दिवसातच स्मार्ट फोनसाठी एक ऍप्लिकेशन तयार केले व बाजारात आणले. अल्पावधीतच हे ऍप्लिकेशन लोकप्रीय झाले व फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या कानावर याची माहीती पोचली. त्याने जॉन आणि ब्रायनला भेटायला बोलावले. फेब्रुवारी 2014 मध्ये फेसबूकने ही कंपनी 1.9 मिलीयन डॉलर्सला ( म्हणजे 1 कोटी 90 लाख डॉलर्स= 123 कोटी रुपये) विकत घेतली व ब्रायनला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये घेतले. ज्या फेसबूकने ब्रायनला नोकरीसाठी ‘रिजेक्ट’ केले होते त्याच कंपनीनीने त्याला डायरेक्टर म्हणून नियुक्त केले.
या ऍप्लिकेशनचे नाव आहे ‘व्हॉट्स अप’
तात्पर्य -
यत्न तोची देव जाणावा. प्रयत्न कधी सोडू नये. प्रयात्नांती परमेश्वर या म्हणीवर विश्वास ठेवावा.
अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!
-- उल्हास हरी जोशी
मोः-9226846631/ 8308462259
October 10, 2016
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ या मालिकेमध्ये तितिक्षाने मुख्य अभिनेत्रींचे काम केले. झी मराठीवरील ‘कन्यादान’ या मालिकेमधून तितिक्षा घराघरात पोहोचली. ‘टोटल नादानिया’ या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा तितिक्षाने काम केले आहे.
July 4, 2022
बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली.
December 17, 2021
बोट ही एक कंपनी आहे जी हेडफोन्स, वायरलेस स्पीकर आणि इयरफोन्समध्ये डील करते जे समकालीन डिझाइनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये देतात. त्याचप्रमाणे अमन आता सोनी टीव्ही वरील शार्क टँक या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
March 5, 2025
जळगावच्या विवेक भोळे यांनी वास्तुरचनाकार म्हणून भरारी घेताना मुंबई बरोबरच जयपूर, दिल्लीपासून चीनमध्येही कार्यालये थाटली. जगभर अनेक प्रकल्प तडीस नेले आणि वास्तुरचनेबरोबर इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन या क्षेत्रातही काम केले...
विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला खान्देशची 'वास्तु' भरारी हा लेख पुढील पानावर वाचा.
विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला खान्देशची 'वास्तु' भरारी हा लेख वाचा.
September 7, 2015
भैरोसिंग शेखावत हे भारताचे ११ वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ या कालावधीत हे पद भूषवले होते. तब्बल तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.
October 23, 2021
मंगेश देसाई समंजस, परिपक्व अभिनेता… फोटो काढताना मंगेशच्या व्यक्तिमत्त्वातील समोर न आलेले अनेक पैलू उलगडलेत… मंगेशकडे कोणताही चेहरा ताकदीने प्रेझेंट करण्याची दैवी कला आहे आणि ते तो प्रामाणिकपणे गेली तेवीस-चोवीस वर्षे करतोय. मंगेशचा ‘खेळ मांडला’ ते ‘एक अलबेला’ असा प्रवास याचीच प्रचीती म्हणता येईल.
November 29, 2018
वाङ्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द. का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय. यानंतर मात्र वसंतरावांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती सुरू केली. बाबा कदमांच्याच कथेवर त्यांनी ‘दगा’ हा चित्रपट काढला. ‘ग्यानबाची मेख’ हा विनोदी चित्रपट काढला.
May 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti