(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक निरंजन घाटे

    प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत.

      January 10, 2022


  • प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार भालचंद्र नेमाडे

    भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.

    'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते... ' भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली.

    रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

    नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विकिपीडिया.

      May 27, 2017


  • आर्या आंबेकर

    आर्या आंबेकर

    आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

      November 9, 2010


  • श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

      December 15, 2010


  • मराठी हिंदी अभिनेत्री अश्विनी भावे

    अश्विनी भावे यांनी १४व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९७२ रोजी झाला.अश्विनी भावे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन त्यांनी आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अश्विनी लहानपणापासून ’ऋषी कपूर’ ची फॅन होत्या आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा ’हिना’ चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. ’हिना’ हा खूप गाजला. अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर बरोबर ’हनिमून’ व ’मुहब्बत की आरझू’ सारखे अजूनही काही चित्रपट केले. त्यांचे ’अशान्ते’, ’सैनिक’, ’जखमी दिल’ हे चित्रपट अक्षय कुमार सोबतचे आहेत. अश्विनी भावे यांनी मीरा का मोहन, परंपरा, कायदा कानून, चौराह, इक्का राजा रानी, वापसी साजन की व युगपुरुष या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे दोनच चित्रपट हिट झाले, श्रीधर बरोबरचा ’भैरवी’ (१९९६) आणि जॅकी श्रॉफ बरोबरचा ’बंधन’ (१९९८). २००७ साली त्यांनी ’कदाचित’ ह्या मराठी चित्रपटामध्ये काम केले. कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना त्यांनी अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनीयर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. त्यामुळे चित्रपटांत काम करणे, बंद केले. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी चार वर्षाचा ‘अॅपकॅडमी ऑफ आर्ट्स युनिव्हर्सिटी’ हा कोर्स पूर्ण केला. बऱ्या वर्षांनंतर २०१७ त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणून. तिने निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ’.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      May 8, 2017


  • सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके

    राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्ती येत असत त्यांना जवळून पाहता यावे म्ह्णून दादा सेवादलामध्ये भरती झाले. दादा त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम भागही घेऊ लागले आणि तेथेच त्यांची निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी मैत्री झाली.

      August 17, 2021


  • आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

    आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

    काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

      July 8, 2026


  • गजानन त्र्यंबक माडखोलकर

    स्पष्टवत्त*ेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यत्ति*मत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत.

      January 22, 2010


  • कवी ना. घ. देशपांडे (नागोराव घन:श्याम देशपांडे)

    ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला. त्यांचा जन्म नागपंचमी च्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात.

    ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वर्तुळात घेतली गेली. ‘नाघं’च्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणाऱ्या खेडय़ामध्ये होते. पण ‘नाघं’नी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणाऱ्या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. १९२९ मध्ये लिहिलेला ''शीळ'' या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली '' शीळ '' या नावाने त्यांचा काव्यसग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली ‘अभिसार’. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने.. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते.

    ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. ‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. ‘नाघं’नी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्वेतिहासात दिले. नेहरूंना ‘उदयाचा यात्रिक’ म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १० मे २००० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ना.घ. देशपांडे यांची काही गाणी
    अंतरीच्या गूढ गर्भी,काळ्या गढीच्या जुन्या ,घरदिव्यांत मंद तरी ,डाव मांडून भांडून ,तुझ्याचसाठी कितीदां ,नदीकिनारीं नदीकिनारीं,फार नको वाकू जरी,बकुळफुला कधीची तुला,मन पिसाट माझे अडले रे,रानारानांत गेली बाई.

      May 10, 2017


  • सिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी विक्रम पंडित

    १९८३ मध्ये त्यांनी मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीत नोकरी स्वीकारली. या कंपनी रूजू होणारे ते पहिले भारतीय होते. १९९० मध्ये कंपनीच्या यूस इक्विटी सिंडिकेट विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाली.

      January 14, 2022