(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निर्मलकुमार फडकुले

    लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

      December 20, 2015


  • क्षिती जोग

    तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत.

      June 25, 2022


  • अमेरिकन लेखिका पर्ल बक

    ईस्ट विंड, वेस्ट विंड ही पर्ल बक यांची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने पर्ल बक यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बक यांनी मांडली होती. १९३२ मध्ये या कादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ मिळाले.

      March 14, 2022


  • मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर

    पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे.

      January 23, 2022


  • साबीर शेख

    शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लिम चेहरा अशी ओळखले असणारे नेते म्हणजे साबीर शेख ! साबीर शेख यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे १५ मार्च १९४५ रोजी झाला होता. साबीर शेख यांचे शालेय शिक्षण नारायणगावातील शाळेत झाले. त्यानंतर ते अंबरनाथ येथील “ऑर्डनन्स फॅक्टरीत” नोकरी करू लागले, आणि तेथेच कामगार नेते म्हणून नावारूपाला आले. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणारे साबीर शेख हे युती सरकारच्या काळात ते कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समावून घेतल्यामुळे त्यांचा जनसंपर्क ही दांडगा होता. ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कल्याणच्या उपशहरप्रमुखापासून ते ठाणे जिल्हाप्रमुखापर्यंत विविध पदे त्यांनी भूषवली. ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, शिवचरित्राचे अभ्यासक, कीर्तन-प्रवचनासोबतच हिंदू धर्म, संत वाङ्‌मय, साहित्य आणि दुर्गप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते.

    साबीर शेख आमदार असताना देखील कल्याणजवळच्या कोन गावातील एका चाळीत राहात होते यावरुन त्यांचा साधेपणाची जाणीव होते. शिवचरित्र मुखोद्गत असलेल्या साबीरभाईंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले पालथे घातले. बाळासाहेब ठाकरेंनी साबीरभाईंना “शिवभक्त” ही पदवी दिली होती.

    साबीर शेख यांच्या अअयुष्यातील अखेरच्या काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी साबीर शेख कसे विपन्नावस्थेत जीवन जगताहेत, याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांना अनेकांनी मदत केली होती. मात्र पुन्हा त्यांची दयनीय अवस्था झाल्यानं त्यांना कोन गावच्या घरातून “कल्पतरू युवाविकास मंच”ने पुढाकार घेऊन औरंगाबादच्या “मातोश्री वृद्धाश्रमा”त नेण्यात आलं होतं. १५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी त्यांचे निधन झाले.

    (लेखन व संशोधन - सागर मालाडकर)

      January 3, 2015


  • वीरगाथा : ‘लेफ्टनंट कर्नल’ अजित भांडारकर

    कुसुमाग्रजांनी रचलेल्या “म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात” या वीररसयुक्त गीताने तर ही वीरगाथा अजरामर केली आहे. आत्ताच्या आधुनिक युगातही असे काही वेडे वीर जन्म घेतात जे देशप्रेम आणि पराक्रमाच्या वेडाने भारित होऊन, आपल्यासारख्या जनसामान्यांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या गुहेत निधड्या छातीने चालत जातात. असाच एक आपल्या शेजारच्या कानडी मुलूखातील कोंकणी-मराठी योद्धा म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल श्री. अजित भांडारकर’.

      September 4, 2025


  • ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर

    तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मोलाचे काम जळगावकर यांनी केले आणि त्यामुळेच संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच संवादिनीवादक ठरले. अप्पा जळगावकर सुरूवातीला हे ध्रुपद गायकी करायचे.

    मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. ५० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुणेकरच होवून गेले.

    पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही "स्वर आणि सूरां'चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरत होते. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, ओंकारनाथ ठाकूर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. तसेच रोहिणी भाटे यांच्यासारख्या नृत्यांगनांनाही जळगावकर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, व सुप्रसिद्ध गायक पंडित मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई.

    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली होती, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, सी.डी देखील प्रकाशित झालेल्या आहेत.
    अप्पा जळगावकर यांचे १६ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.

    अप्पा जळगावकर यांचे संवादिनीवादन.
    https://www.youtube.com/watch?v=j0cZearkZss
    https://www.youtube.com/watch?v=fXvijeN-m-w
    https://www.youtube.com/watch?v=Qi26eVirOhw

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2019


  • प्रख्यात ललित लेखक रवींद्र पिंगे

    रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचा जन्म १३ मार्च १९२६ रोजी कोकणातील उफळे गावी झाला.सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीवर नोकरीस होते. सातत्याने "ललितगद्य' हा वाङ्मयप्रकार हाताळणार्यात आणि आपल्या परीने त्यात भरही घालणार्‍या लेखकांत रवींद्र पिंगे हे नाव ठळक होते. रवींद्र पिंगे एक कृतार्थ लेखक, माणूस होते.१९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या "मोकळं आकाश' या पहिल्या ललित लेखसंग्रहापासून "शकुनाचं पान' या ललित लेखसंग्रहापर्यंत त्यांचे एकूण तेरा संग्रह प्रसिद्ध झाले होते.

    रवींद्र पिंगे दुर्बिण, कॅमेरा, टिपण वही आणि जागृत नजर घेऊन भारताच्या या टोकापासून त्या तटापर्यंत आपल्या लिखाणा साठी हिंडले. आसाम, अरुणाचल, अंदमान पाहून ते कच्छच्या चिखल-वाळूच्या रणात गेले/. नर्मदेच्या तीरावर भटकले. दक्षिणेतला श्रुंगेरीचा सुळका सर करून ते तुंगभद्रेच्या किनार्याणवरल्या श्रीशंकराचार्यांच्या मठापर्यंत पोहोचले. कृष्णेच्या डोहाकाठचं कविवर्य मर्ढेकरांचं चिमुकलं खेडं त्यांनी पाहिलं तसंच अयोध्येला जाऊन त्यांनी बंदीवान श्रीरामाला दंडवत प्रणिपात केला.

    "शकुनाचं पान' या त्यांच्या संग्रहात प्रवासवर्णनपर लेख (नर्मदेच्या उगमापाशी, मुक्काम झांशी, गणपती पुळे इ.) स्थलवर्णनपर (सानेगुरुजींचा जन्मगाव, हृदयाची हाक घालणारी ठिकाणं, अबूच्या पहाडावरील सूर्यास्त इ.), आत्मपरलेखन (माझी भूमिका, निवृत्तीतलं भाग्य, आकाशवाणीवरले उमेदवारीचे दिवस इ.) असे विविध प्रकारचे ३० लेख होते. यातील अनेक लेख वेगवेगळ्या दैनिकांसाठी, नियतकालिकांसाठी लिहिलेले असल्यामुळे छोटेखानी आहेत. विविध विषयांवरचं हलकंफुलकं प्रसन्न शैलीतलं लिखाण असं त्यांचं स्वरूप असलं, तरी लेखकाचा मराठी व इंग्रजी साहित्याचा व्यासंग त्यामधून जाणवतो. विविध संदर्भांनी या लेखनाची गुणवत्ता उंचावली आहे. विशेष म्हणजे हे संदर्भ लेखनाच्या ओघात सहजपणे येतात. गोडसे भटजींच्या "माझा प्रवास'चा उल्लेख त्यात येतो तसा प्रिस्टले, ग्रॅहम ग्रीन यांच्या लेखनाचाही येतो. वेणूबाई पानसे लिखित हरिभाऊ आपटे यांच्या चरित्राचा येतो, तसा मेरी हिगीन्स क्लार्क या अमेरिकन लेखिकेच्या "माय वाईल्ड आयरिश मदर'चाही येतो. योगी अरविंदांचा येतो तसा श्रीगोद्याच्या शेख महंमद या सूफी संतकवीचाही येतो. प्रवास करताना पिंगे यांची रसिक, जिज्ञासू वृत्ती जे टिपते ते शब्दांत उतरविण्याचे कसब "मुक्काम झांशी', "मधुर सुखाचा नजराणा' यांसारख्या लेखांतून नजरेत भरते. "लेखकांच्या दुनियेतला गारठा आणि ऊब', "संधिप्रकाशातलं समाधान', "लेखक-कलावंतांचं जग' आणि भाषणबाजीचं भन्नाट वारं' यांसारख्या लेखांतून साहित्यजगातल्या विसंगतीचं, विरूपतेचं दर्शन ते घडवतात. हरिभाऊ आपट्यांचं अद्भुत चरित्र', हीरकमहोत्सवी गीताप्रवचने, "श्री. कृ. कोल्हटकरांचं आत्मवृत्त', "आई, ती आईच' इ. लेख म्हणजे नावीन्यपूर्ण माहितीचा खजिना आहे.

    कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी 'प्राजक्ताची फांदी','मोकळ आकाश','मुंबईचं फुलपाखरु','आनंदपर्व', 'आनंदाच्या दाही दिशा' देवाघरचा पाऊस' असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. निवडक पिंगे या पुस्तकात मा.रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या ३०० व्यक्तिरेखांपैकी निवडक २६ व्यक्तिरेखांचा समावेश आहे. रवींद्र पिंगे यांना आपल्या जीवनात वेळोवेळी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, मर्ढेकर, चि. त्र्यं. खानोलकर, वसंत बापट, इंदिरा संत अशा अनेक श्रेष्ठ साहित्यिकांचा तसेच पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंत देव, सुधीर फडके या गानतपस्वी मंडळींचादेखील दीर्घ सहवास लाभला. शिवाय प्रकाशन क्षेत्रातील केशव कोठावळे, दिलीप माजगावकर आणि श्रेष्ठ संपादक श्री. पु. भागवत, माधव गडकरी व दीनानाथ दलाल यांचा सहवास पण लाभला. या समृद्ध व्यक्तिरेखांच्या संकलनात १३ प्रसिद्ध साहित्यिक, ५ संपादक, ७ गायक आणि १ समाजसेवक अशा बहुविध क्षेत्रातील व्यक्तींचे हुबेहूब व्यक्तिपर चित्रण पिंगे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीत त्यांच्या स्वभावाच्या अनेक बारकाव्यानिशी तितक्याच समर्थपणे सादर केले आहे. रवींद्र पिंगे यांचे निधन १७ ऑक्टोबर २००८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    रवींद्र पिंगे यांचे लेखन.
    कादंबरी - परशुरामाची सावली
    कथा - प्राजक्ताची फांदी, सुखाचे फूल
    ललित लेख - मोकळं आकाश, बकुळफुलं – फुलं मोहाची, प्रकाशाची खिडकी, आनंदपर्व, रिमझिम पाऊस, मुंबईचं फुलपाखरू, आनंदाची फुलं, केशरी कमळ, सुखाचे पदर, माळावरली फुलं.
    व्यक्तिरेखा - शतपावली , दिवे-लामण दिवे, तुषार आणि तारे, देवाघरचा पाऊस, अंगणातलं चांदणं, अत्तर आणि गुलाबपाणी, जिवलग सारे.
    प्रवास वर्णन - आनंदाच्या दाही दिशा, आनंदव्रत, दुसरी पौर्णिमा
    पाश्चात्त्य साहित्य परिचय - पश्चिमेचा पुत्र, पिंपळपान, हिरवी पानं, काही चंदेरी काही सोनेरी अनुवाद, संपादन इ.

      March 15, 2017


  • विनय नारायण राजवाडे

    संगीतकार तसेच गायक म्हणून प्रसिद्ध असलेले विनय राजवाडे हे ठाणेकर आहेत व आजच्या आणि उद्याच्या ठाण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना ह्या अगदी साध्या परंतु महत्वाच्या आहेत.

      May 29, 2014


  • ग. त्र्यं. माडखोलकर

    स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकरांचे वडील मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला. १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. ग. त्र्यं. माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ ग्लोबल मराठी वेब

      November 19, 2019