जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.
November 22, 2021
थोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती.
June 22, 2022
आप्पासाहेबांनी मतदारसंघ टँकरमुक्त होण्यासाठी आपल्या कार्यकालात अपार मेहनत घेतली. शेतकर्यांची शेती-बागायती वाचवण्यासाठी आप्पासाहेबांनी अनेक बंधारे मंजूर करून घेतले. जुन्या किंवा आतापयर्ंत प्रचलित असणार्या देवगड मतदारसंघातील किनारपट्टी भागात गावोगावी आप्पांच्या कार्याची साक्ष देत हे बंधारे उभे आहेत.
June 21, 2022
चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.
हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे.
मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती.
या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.
"रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं.
पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.
संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मंदार जोशी
January 24, 2018
७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले.
January 22, 2010
विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
March 5, 2011
दीपस्तंभ, रातराणी, पांडगो इलो रे, आसू आणि हसू, रमले मी अशी विविध विषयांवरील उत्कृष्ट नाटके देणारे प्रख्यात ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांनी ‘बेस्ट’मध्ये नोकरीला असतानाच लेखनाला सुरुवात केली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी झाला.
ऐंशीच्या दशकात मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटककार म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली. त्यापूर्वी हौशी रंगभूमीवर एकांकिकाकार आणि नाटककार म्हणून त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. जगन हं', 'आद्यंत इतिहास' ही फँटसीच्या अंगाने जाणारी, काल्पनिक प्रदेशातील रुपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये गाजली होती. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके त्यांनी लिहिली.
निवृत्तीनंतरचे आयुष्य रत्नागिरीत व्यतीत केले. रत्नागिरीतल्या आपल्या वास्तव्यात येथील नाटय़ चळवळीने जोर धरावा, यासाठी त्यांनी हिरीरीने काम केले. येथील रंगकर्मीना सोबत घेऊन त्यांनी रत्नागिरीच्या नाटय़ चळवळीला स्थिर दिशा दिली. तरुणांनी या क्षेत्रात यावे आणि अभ्यासपूर्ण काम करावे, यासाठी प्र.ल.मयेकर यांनी खूप प्रयत्न केले. नाटकाविषयी आवड, तळमळ जपणा-या तरुणांना ते स्वत: मार्गदर्शन करत असत.
प्र.ल.मयेकर यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरचे प्रेम! भाषेच्या शुद्धतेचा आग्रह नेहमीच त्यांच्या बोलण्यातून, लेखनातून उमटायचा. भाषा शुद्ध बोलली, लिहिली जात नसल्याबद्दल ते अनेकदा खंत व्यक्त करायचे. आपल्या लेखनातून ती मांडायचे. मराठी भाषेचे उत्तम जाणकार असल्याने दूषित होत चाललेल्या भाषेचा सल त्यांच्या मनात होता.
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशा सर्व प्रकारची नाटके प्र. ल. नी लिहिली. बीईएसटीतील नोकरीपासून त्यांनी नाटय़ लेखनाला सुरुवात केली. दशकभर एकांकिकाकार आणि नाटककार म्हणून हौशी रंगभूमी गाजवल्यानंतर ऐंशीच्या दशकात त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटककार म्हणून त्यांचा उदय झाला.
रातराणी, सवाल अंधाराचा, रानभूल, तो परत आलाय, काळोखाच्या सावल्या, केला तुका न झाला माका, सुखा सैलाब, श्रीयुत नामदेव म्हणे, पांडगो इलो रे बा इलो, अंदमान, तक्षकयाग, रमले मी, आसू आणि हसू, अब्द शब्द, शांत-श्रांत, घोस्ट यासारखी अनेक रसांनी परिपूर्ण अशी अनेक नाटके त्यांनी मराठी रंगभूमीला दिली.
‘मसीहा’ या त्यांच्या कादंबरीवरून त्याच नावाचे नाटकही उदय कला केंद्राने रंगभूमीवर आणले होते. आय कन्फेस, रोप ट्रिक यांसारख्या १३ एकांकिका त्यांनी लिहिल्या. जी. ए. कुलकर्णी यांच्यानंतर प्रतिकात्मतेचा कथा, कादंबरी आणि नाटकांतून प्रभावी वापर करणारा लेखक म्हणून प्र. ल. नी आपला ठसा उमटवला होता. मा अस् साबरीन (अल्ला तुम्हे जो चाहो वो देगा), अथं मनूस जगनं हं आणि तक्षक याग ही प्र. लं. ची नाटके ही चिरंतन स्मृतीशिल्पे आहेत. ‘अथं मानूस जगनं ह’ आणि ‘मा अस साबरीन’ या प्र. लं.च्य वेगळय़ा शैलीतील नाटकांनी राज्य नाटय़ स्पर्धा गाजवली.
आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील सर्वाधिक नाटकं त्यांनी ‘चंद्रलेखा’ या संस्थे साठी लिहिली. यातील अनेक नाटकांनी महोत्सवी उच्चांक गाठला. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने प्र. लं. च्या नाटय़क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कार देऊन गौरवले होते. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती.
मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले. प्र.ल.मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला. प्र.ल.मयेकर यांचे १८ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 18, 2017
कोल्हापूरजवळ वाढलेला एक तरुण केमिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतो, नंतर मिशिगन विद्यापीठात पीएचडी करतो आणि आता अमेरिकेच्या वाइडनर विद्यापीठात स्मृतिभ्रंशावरील संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतो. “अल्झायमर असोसिएशन” ची शिष्यवृत्ती मिळालेल्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक डॉ. सचिन पाटील यांची अमेरिकेत स्वत:ची प्रयोगशाळाही आहे.
स्मृतीचे तल्लख रसायन
July 24, 2015
अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा, क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. त्यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी झाला.माणिक वर्मा यांचा जन्म पुण्याचा. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.
सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर ''यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले.
पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खाँसाहेब, ‘भारत गायन समाज’चे अप्पासाहेब भोंपे यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला.
दरम्यान पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिकाच सुरू झाली. लांबलांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि माणिक वर्मा हे नाव संगीतविश्वात गाजू लागले. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली.
किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या 'गीत रामायण'चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या.
'घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा', हे 'ळ'चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले. ते तितक्याच लडिवाळ आवाजात माणिक वर्मा यांनी गायलेलुद्धा. भक्ति व भावगीतांमध्ये रमलेल्या मा.माणिक वर्मा यांनी एकच लावणी गायली. गदिमांची 'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी 'पुढचं पाऊल' या चित्रपटात हंसा वाडकर यांच्या अदाकारीसह चित्रित झाली. मा.बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातील त्यांनी गायलेले 'आली दिवाळी दिवाळी' हे ह्रदयस्पर्शी गीत खूपच गाजले होत. माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील मा.अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.च्या एका वाक्याने फुलांची चादर पसरली.
‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल. पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की..’ आणि मग माणिक दादरकर-अमर वर्मा यांच्या लग्नाच्या पत्रिका निघाल्या. त्या पत्रिकांवर त्या काळाला अनुसरून त्या काळातील समाजाची दैवते असलेले महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो होते. मा.माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे मा.माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.
१९७४ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आला. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहील. दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून मे महिन्यात तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.
माणिक वर्मा यांची वेबसाईट
http://www.manikvarma.com
माणिक वर्मा यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=EfM1M0SW-DA
'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी
https://www.youtube.com/watch?v=C4x27eCejpQ
हसले मनी चांदणे
https://www.youtube.com/watch?v=0cRSC3AAdHU
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 15, 2017
स्वातीने कळत नकळत, कुंकू, वादळवाट, विवाहबंधन, पुढचं पाऊल, पारिजात अशा अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तसेच तिने ‘वन टू का फोर’ या नाटकात देखील उत्तम अभिनय केला आहे. विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर स्वातीने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.
July 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti