जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते .
July 9, 2012
पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला.
वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.
## Anant Janardan Karandikar
July 27, 2017
अभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो.
October 31, 2020
रचनात्मक कार्य कारणार्या संस्था उभारुन भरीव सामाजिक कार्य करणारे मोहन सदाशिव हळबे हे ठाण्यातील एक तरुण व्यक्तिमत्व ! मोहन हळबे हे “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” चे सुमारे ३० वर्षांपासूनचे संस्थापक व विश्वस्त आहेत. ठाण्यातील नौपाडा भागात राहणारे, बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेले, “ठाणे पीपल्स” आणि आता रुपी को-ऑप बॅंकेत काम करणारे मोहन हळबे ह्यांनी आपल्या वडिलांची आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून जिद्दीनं आतापर्यंतचं त्यांचं सर्व कार्य उभारलं आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” ची ठाण्यात स्थापना केली. त्यानंतर ठाण्यातील शिवाई नगर या भागात दोन भूखंड खरेदी करुन तेथे मंडळाच्या कार्यकरीता मंडळाच्या दोन अद्ययावत वास्तू उभ्या केल्या. जेथे “गजानन महाराज मेडिकल सेंटर” व कै. आनंदराव कृष्णराव चोणकर अभ्यासिका” या संस्थांचे काम चालते.
मोहन हळबे ह्यांनी आपल्या कार्याचे धोरण धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा असे ठेवले आहे. त्यामुळेच या संस्थांमार्फत ठाण्यात त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या सर्व कार्यासाठी त्यांना आतापर्यंत “यशवंत पुरस्कार” (२००५) तसेच ठाणे महागरपालिकेचा “ठाणे गुणीजन” (२०१०) हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी उभारलेल्या अभ्यासिकेत जवळपास १५० विद्यार्थ्यांना पुस्तकांसहित सर्व सुविधा प्राप्त होतात. तसेच ठाणे शहरातील व शहरालगतच्या लोकांसाठी उभारलेल्या श्री गजानन महाराज मेडीकल सेंटरच्या माध्यमातून सर्वांना केवळ ५० टक्के खर्चात आरोगय सेवा पुरविली जाते.
त्यांनी चालू केलेले धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचे कार्य शहराच्या कानाकोपर्यात पोहचविण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भविष्यात ठाणे शहरालगत एखादा “वृद्धाश्रम” बांधण्याचं त्यांच्या मनात आहे.
अशाप्रकारे आदर्श धार्मिक स्थळ उभारून अध्यात्मिक वृत्तीने सामाजिक पण रचनात्मक कार्य कसे करावे, याचा वस्तूपाठच मोहन हळबे यांनी घालून दिला आहे.
March 3, 2018
December 15, 2010
मांगते चुंगनेजंग मेरी कोम उर्फ मेरी कोमचा मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये, असे वाटू लागले.
March 1, 2024
सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा.
October 25, 2019
विदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.
विद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते सुरूवातीला केंन्द्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.
लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी विद्यासागर राव करीमनगर जिल्हयातील मेटपल्ली विधानसभा मतदार संघातून आंध्रप्रदेश विधान सभेवर १९८५, १९८९ व १९९४ असे सलग तीनवेळा निवडून गेले. या तिन्ही वेळा ते भाजप सांसदिय मंडळाचे सभागृहातील गटनेते होते.
१९९८ साली विद्यासागर राव करीमनगर मतदार संघातून बाराव्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. १९९९ साली त्यांची आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. १९९९ साली ते तेराव्या लोकसभेवर दुसऱ्यांलदा निवडून गेले. आपल्या सांसदीय जीवनामध्ये त्यांनी लोकलेखा समिती, कामकाज सल्लागार समिती व अर्थविषयक समितीवर सदस्य म्हणून काम केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लामसलत समितीचे देखिल ते सदस्य होते.
करीमनगर येथे त्यांनी सुरूवातीला जनसंघ व नंतर जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून देखिल काम केले आहे. १९७५ साली त्यांना मिसा खाली अटक झाली व वरंगळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्यांनी एक वर्ष तुरुंगवास भोगला. विद्यासागर राव यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 12, 2019
आज २२ सप्टेंबर. स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला.
चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.
सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली.
न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. १९३० च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.
चित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्यांजोगा होता.
या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत.
त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला आहे. दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- वेब दुनिया/ विकिपीडिया
September 22, 2016
प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून 'स्थलांतरित' होत होत हे वाद्य अमजद अलींच्या 'बंगश' घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. वादनाची विशिष्ट पद्धत हे अमजद अली खान यांच्या वादनाचे वैशिष्ट्य. यात ते उजव्या हाताच्या बोटांच्या नखांच्या टोकांनी सूर निर्माण करतात. त्यामुळेच त्यांचे सूर संपूर्ण वैशिष्ट्यांसह श्रोत्यांसमोर प्रकट होतात आणि आपले साम्राज्य निर्माण करतात.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सरोदवादनाने भारतातीलच नव्हे, तर जगभरातील संगीतरसिकांवर ख्यातनाम सरोदवादक अमजद अली खान यांनी मोहिनी घातली आहे. म्हणून तर सरोद आणि अमजद अली खान हे समानार्थी शब्द बनले आहेत. ग्वाल्हेरमधील "सरोदघर‘ या त्यांच्या अमजद अली खान यांचा जन्म झाला आणि शालेय शिक्षणही; अत्यंत प्रभावशाली, पुरूषी, खर्जातला आवाज ही या वाद्याची खासियत. या वाद्याला 'पडदे' नाहीत. वादकाचे कान विलक्षण 'तयार' नसतील आणि तो स्वराला पक्का नसेल तर सरोद त्याला क्षणार्धात 'बेपरदा' करते असे अमजद अली नेहेमी म्हणतात. वाद्याच्या ध्वनीची गुणवत्ता मु़ळातच इतकी अप्रतिम आहे, की फारशी धडपड न करताही दोन चार स्वरावली वाजवताच नाणावलेल्या सरोद वादकाला मैफिल ताब्यात घेता येते. आपल्या मनात उमटेल त्या प्रमाणे वाद्य 'गायला' लागावं यासाठी स्वतः अमजद अलीं खान यांनीही या वाद्यात बरेच तांत्रिक बदल केलेले आहेत.
मासूम अली खान उर्फ अमजद अली खान यांना आपली सुरवातीची तालीम वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील उस्ताद हाफ़िज़ अली खान हे ग्वाल्हेर राज-दरबार मध्ये प्रतिष्ठित संगीतज्ञ होते. वडिलांकडून मिळालेल्या पक्क्या तालिमीला डोळस रियाझाची जोड दिल्यानेच आत्ममग्न, स्वतःशीच संवाद साधणारं असं अमजद अलींचं आगळंवेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व घडत गेलं आहे. सरोद वादनातल्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्या वडिलांकडूनच कलेतली 'अंतर्मुखता' त्यांना परंपरेनेच मिळाली. सरोद हातात घेतल्यावर ते फार कमी वेळा आपल्या श्रोतृवर्गाकडे आवर्जुन लक्ष देताना दिसतात. आपल्या वादनात ते इतके तल्लीन होउन जातात, की एकदा डोळे मिटून घेतल्यावर भर मैफिलीत सभागृहाच्या आत-बाहेर करणार्यात 'असुरांची' चाहूलही त्यांना सहजी अस्वस्थ करू शकत नाही. श्रोत्यांकडे वारंवार बघून मैफिल रंगते आहे की नाही अशी 'चाचपणी' करतानाही ते फारसे दिसत नाहीत. एखाद्या सृजनशील व्यक्तीला आपल्याच कलाकृतीकडे तिची निर्मीती सुरू असताना तटस्थपणे पाहता येण्यासाठी लागतो तो 'स्थितप्रज्ञ' भाव त्यांच्याकडे सहजच आला आहे हे लक्षात येते.
अमजद अलींच्या पत्नी शुभलक्ष्मी यांचे साहचर्य लाभणे ही त्यांच्या सांगितीक जीवनातली एक खूप मोठी जमेची बाजू आहे. उस्तादजींचे ते एक सुप्त बलस्थानच आहे. शुभलक्ष्मी या मूळच्या आसामच्या, पण वृत्तीने मात्र पूर्णपणे दक्षिण भारतीय! कै. रूक्मिणीदेवींच्या ऐन उमेदीच्या काळात चेन्नईच्या विख्यात 'कलाक्षेत्रात' तब्बल दहा वर्षे शुभलक्ष्मींना भरतनाट्यमचं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. दाक्षिणात्य संस्कृतीतही त्या पूर्णपणे रममाण झाल्या. त्यांचं तमिळ भाषेवर असाधारण प्रभुत्व आहे. अमजद अलींच्या घरातच हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा असा सुरेख मिलाफ झालेला आहे. एक कलाकार या दृष्टीने पाहता शुभलक्ष्मी याच अमजद अलींच्या आद्य समीक्षकाचे काम चोखपणे करतात, त्यांना मोलाच्या सूचनाही देतात.
आपल्या दोन मुलांचं यथास्थित संगोपन करण्यासाठी शुभलक्ष्मीजींनी आपल्या यशस्वी कारकिर्दीवर भर उमेदीच्या काळात पाणी सोडलं. आज ही दोन्ही मुलं यशस्वीरीत्या आपली उज्वल परंपरा पुढे नेताना दिसतात. अमान अली आणि अयान अली 'बंगश' जगभर आपल्या वडिलांच्या जोडीने तसेच आपसातल्या जुगलबंदीच्या सरोद वादनाच्या मैफिली अक्षरशः गाजवतात. या त्रयीने सरोदच्या तारा छेडताच त्या वाद्यातून उमटणारा वेगळाच गाज, सुरांचे माधुर्य आणि 'बंगश' घराण्याची राजमुद्रा भाळी घेउन आलेला शैलीदार नाद चटकन ओळखता येतो. श्रोत्यांच्या मनावर तो कायमची छापही सोडून जातो. या मुलांच्या वादनातून हे सहज सिद्ध होतं की उ. हफीज अलींचं घराणं काळाच्या कसोटीवर निर्विवादपणे उतरलेलं आहे.
सच्चं, सुरेल आणि पराकोटीचं सृजनशील जीवन जगण्यासाठी लागणारी आई सरस्वतीच्या कृपेची शिदोरी अमजद अलींनी आपल्या मुलांना दिलेली आहे. हाडाचे कलावंत असलेले वडिल आपल्या मुलांना यापेक्षा वेगळे आणखी काय देउ शकतात? आपली विद्या अमान आणि अयानच्या हाती सुपूर्त करून, घराण्याची परंपरा अखंड ठेउन अमजद अलींनी आपलं गीत, संगीत 'अमर' केलेलं आहे. सरोद वादनाच्या क्षेत्रात आणि एकंदरच हिंदुस्थानी अभिजात संगीतातल्या वाद्यसंगीताच्या महान परंपरेत त्यांचं स्वत:चं अढळ असं ध्रुवपदच त्यामुळे निर्माण झालं आहे.
भारतासह विदेशातही त्यांनी संगीत मैफिली केल्या असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अमजद अली खान यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. राघव मेनन यांच्या 'द साँग ऑफ अमजद अली खाँ' या लेखावर आधारित / इंटरनेट
October 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti