(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोविंद सदाशिव आपटे

    ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७० रोजी झाला.

    त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.

    Govind Sadashiv Apte

      November 7, 2017


  • लेखक,राजकारी,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

    काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    देशासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी खूप काम केले पण कामाची प्रसिद्धी कधीही केली नाही. गंमतीचा भाग म्हणजे 'प्रसिद्धीविना काम म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे' हे काकासाहेब गाडगीळ यांचे वाक्य प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसच्या अनेक शिबीरातून सांगायचे. पुण्यातील एन.डी.ए. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी ही सुरुवातीला दक्षिण भारतात उभारण्याची कल्पना होती. पण असे म्हणतात की, काकासाहेब गाडगीळ यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पंडित नेहरूंपुढे हुशारीने मांडला व अखेरीस मंत्रिमंडळाने एन.डी.ए. पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुळे एन.डी.ए. पुण्यात आले, ही बाब अनेकांना ठाऊक नसेल.

    पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे. गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार हाही काकांमुळेच घडला. लेखक या बरोबरच काकासाहेब गाडगीळ यांची राजकिय कारकिर्द मोठी होती. भारत सरकारने टपाल तिकीट प्रसिध्द केले होते. काकासाहेब गाडगीळ यांचे १२ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 12, 2019


  • चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे (कवी चंद्रशेखर)

    पंडिती काव्याचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, गंभीर, बोधपर आणि प्रौढ कविता करणारे कवी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होते.

      January 30, 2010


  • हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी

    हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. मा.सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. मा.सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 8, 2017


  • ज्योती चांदेकर

    मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर.

    पुण्याच्या सरस्वती नाट्यमंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरुन त्यांना' सुंदर मी होणार' या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या १४ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता त्यांचं प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून 'नाट्यसंपदा' च्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या 'बेइमान' या नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या त्या बदली खेळाडू म्हणूनच. यावेळी त्यांचा सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांच्यांवर शाबासकीची पहिली थाप पडली ती दुभाषी यांच्याकडूनच.

    मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवतानाच, त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही.'थ्री स्टार्स' या बाबूराव गोखले यांच्या संस्थेतून 'वर्‍हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'प्रेमा तुझा रंग कसा ?' आदी अनेक नाटकं केली. घरातल्या दोन धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्याकाळी ऑर्केस्ट्रामधून आपलं नृत्यकौशल्यही दाखवलं. अनेक लोकनाट्यातून काम केलं. परंतु, अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली ती १९७५ साली आलेल्या 'रखेली' या नाटकामुळे. अरुण सरनाईकही या नाटकात मुख्य भूमिका करत. हे नाटक होतं आशयघन. पण त्या काळी 'प्रौढांसाठी' च्या नाटकांचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं, तरी ज्योती यांच्या कामाचं कौतुक होत होतं. त्यानंतर 'श्रीचिंतामणी', 'सुयोग' आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. 'नाट्यदर्पण', 'रंगदर्पण' आदी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

    अनेक नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असतानाच, आठ वर्षांपूर्वी आलेल्या 'मित्र' नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे पाचेक वर्षं ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते 'सुखान्त' या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी 'मटा सन्मान', 'झी' यांसह अनेक पुरस्कार पटकावले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाऊलवाट' या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. आगामी काळात त्यांचे आणखी काही सिनेमे येणार आहेत. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान कोणताही गाजावाजा न करता दिलं आहे. गेल्या ४५ वर्षांचं त्यांचं नाट्य, सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांचा 'चित्रकर्मी' पुरस्काराने उचित गौरवच केला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड विल्सन रेगन

    राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.

      February 6, 2022


  • लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख

    कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर, मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “we चार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे.
    देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं संगीत देवबाभळी हे नाटकही प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय ठरलं.

      June 7, 2022


  • डॉ. सिंधू दोंदे-मांडवकर

    सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.

      March 22, 2022


  • संगीतकार श्रीनिवास खळे

    इ.स. १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले.

      August 11, 2021


  • मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

    तेजस्विनी पंडीत ही रणजित पंडित आणि जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या... तिचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. तेजस्विनी पंडित ने 'अग बाई अरेच्चा ' मधील निगेटिव्ह शेडमधील भूमिकेतून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर सुरु झालेला तिचा प्रवास जाहिरात, चित्रपट,मालिका,नाटक अशा चारही माध्यमात सुरु आहे. भूमिका ग्लॅमरस असो कि सोज्वळ त्या भूमिकेत शिरून त्यावर आपली छाप पाडण्याचे कसब तिला उत्तम जमलंय. ‘रानभूल’, ‘गैर’ आणि ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटांमध्ये आणि ‘कालाय तस्मै नम:, ‘एकाच या जन्मी’, ‘घर श्रीमंताचं’ अशा टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचणाऱ्या तेजस्विनी पंडीतला ‘मी सिंधूताई सपकाळ’ मधील भूमिकामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला. तेजस्विनी पंडितने एक अभिनेत्रीची उद्योजिका बनून ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांचा ब्रँड उभा केला आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्ड अंतर्गत साड्या तयार करण्यात येतात. ‘एक महिला एक साडी’ अशी त्यांच्या ब्रॅण्डची टॅगलाइन आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 23, 2017