जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
किशोर कुमार यांच्या गायनाचे विश्लेषण करण्याअगोदर या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यावरील “यॉडलिंग” करणारा गायक असा लागलेला शिक्का किती चुकीचा आहे, हेच दर्शवायचे आहे. आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला झापडबंद अशा लेबलात अडकवतो यायचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार.
August 23, 2018
अतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो.
May 17, 2012
मराठी प्रायोगिक रंगभूमीचे जनक आणि बुजूर्ग नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे यांचा जन्म ५ मे १९२८ रोजी झाला.
दामोदर काशिनाथ केंकरे उर्फ दामू केंकरे यांनी तब्बल सहा दशके रंगभूमीची सेवा केली. दामू केंकरे हे मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. या दरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली. चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते. त्यांनी हॅल्मेट या नाटकात हॅम्लेटची मुख्य भूमिकाही केली होती. वाजे पाऊल आपुले हे नाटक १९६७ साली दामू केंकरे यांच्या अभिनयाने गाजले होते.
अरविंद देशपांडे दिग्दर्शित तुघलक व बादल सरकार यांच्या सारी रात या नाटकाचे नेपथ्य दामू केंकरे यांनी केले होते. तुघलक व सारी रात या नाटकांच्या नेपथ्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काभराने सन्मानित करण्यात आले होते. 'सुर्याची पिले' या गाजलेल्या नाटकाने त्यांनी मराठी रंगभूमीला समृध्द करण्यात मोठे योगदान दिले.
दामू केंकरे यांचा गोवा कला अकादमीच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. दामू केंकरे यांनी डारेक्टर ऑफ कल्चरल अफेअर महाराष्ट्र राज्य म्हणून काही वेळ काम केले. त्यांना जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांची जन्मशताब्दी २००२ मध्ये साजरी करण्यात आली. त्या वेळी हा नाटय़ोत्सव उपक्रम सुरू करण्यात आला. दामू केंकरे यांच्या निधनानंतर पासून हा महोत्सव दामू केंकरे यांच्या नावाने साजरा केला जातो.
दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. या नाटय़ोत्सवासाठी केंकरे कुटुंबीयातर्फे प्रायोगिक नाटय़संस्था किंवा व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून नाटय़निर्मितीसाठी एक लाख रुपये देण्यात येतात. बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणाऱ्या सुधाताई करमरकर व दामू केंकरे यांच्या पत्नी ललिता केंकरे या दोघी बहिणी. ललिता केंकरे यांनीही नाटकातून काम केले. मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे त्यांचे चिरंजीव. गोवा हिंदू असोसीएशनने दामू केंकरे यांच्या वर “३ अंकी गुरुकुल” या नावाने गौरवग्रंथ लिहिला आहे.
दामू केंकरे यांचे २८ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.
#DamuKenkare
May 4, 2022
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.
June 25, 2022
कादंबऱ्या न वाचलेला रसिक मराठी वाचक दुर्मीळच! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या चार कादंबऱ्यांमधून लंपन आणि त्याची मैत्रीण सुमी, इतर मित्रमंडळी, लंपनच्या मनातली सुमीविषयीची हुरहुर, प्रेम हे सर्व संतांनी तपशीलवार, पण सुंदर प्रकारे रेखाटलंय आणि या चारही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात एक वेगळंच स्थान राखून आहेत.
June 16, 2022
संगीत रंगभूमीवर नायकाच्या भूमिका गाजवणाऱ्या मोजक्या अभिनेत्री मध्ये दीप्ती भोगले यांचे नाव वरती आहे. त्यांच्या कृष्ण, धेर्यधर या भूमिका खूपच गाजल्या होत्या. दीप्ती भोगले यांनी संगीत रंगभूमीवर स्त्री भूमिके पासून पुरुष भूमिके पर्यत आपले स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.
October 26, 2021
श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत.
February 28, 2024
श्रीनिवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे पहिले धडे मिळाले. त्यांना अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडूनही संगीताची तालीम मिळाली. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई येथे झाला. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून त्यांनी नोकरी धरली पण त्यांचे आणि संगीताचेही भाग्य मुंबईत होते. शांताराम रांगणेकर या बालपणीच्या मित्राच्या मदतीने श्रीनिवास खळे मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संगीतक्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी धडपड सुरू झाली; रांगणेकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. नवलकर चाळीत राहणाऱ्या रांगणेकर यांच्या कुटुंबात सतरा जणांचा समावेश होता; त्यात खळे यांची भर पडली. रांगणेकरांनी खळेंना आपल्या कुटुंबात सामावून घेतले; एवढेच नाही, तर आपल्या खिशातील आठ आण्यांतील सहा आणे ते खळे यांना जेवणाचा डबा आणि रेल्वेच्या पासासाठी देत असत. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात खळे तेव्हाचे विख्यात संगीतकार डी. पी. कोरगावकर म्हणजेच के. दत्ता यांच्याकडे सहायक म्हणून काम करू लागले. स्वरांच्या सान्निध्यातच जीवनाचा आनंद घेण्याची आंतरिक इच्छा आणि स्वप्न पूर्तीसाठीचे प्रयत्न सुरूच होते. त्यातून त्यांना "लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी बोलावण्यात आले. त्या चित्रपटातील गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती. पण मुंबईत आल्यानंतर खळे यांनी केलेली पहिली स्वररचना गुजराती गाण्यासाठी होती; या गीताला स्वर दिला होता तलत मेहमूद यांनी. खळे यांनी "लक्ष्मीपूजन' या चित्रपटानंतर "यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटाला संगीत दिले. त्यातील "गोरी गोरी पान' हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यानंतर "जिव्हाळा', "बोलकी बाहुली', "पळसाला पाने तीन', "सोबती' या चित्रपटांना खळे यांचे संगीत लाभले. त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकीच राहिली. पण आकाशवाणीने या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. "निळा सावळा नाथ', "कळीदार कपुरी पान', "सहज सख्या एकटाच' ही गाणी आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली आणि "शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचे स्वर लाभलेले हे गाणे पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीच्या "भावसरगम' कार्यक्रमातून रसिकांपुढे आले. या भावगीतानेच अरुण दाते या सुरेल गायकाची ओळख मराठी श्रोत्यांना झाली. मा.पु. ल. देशपांडे, केशवराव भोळे, मंगेश पाडगावकर, वा. रा. कांत, यशवंत देव असे दिग्गज आकाशवाणीत मा.श्रीनिवास खळे यांचे सहकारी होते. आकाशवाणीत असताना त्यांनी "विदूषक', "पाणिग्रहण' आणि "देवाचे पाय' या नाटकांना संगीत दिले. ते १९६८ मध्ये "एचएमव्ही'च्या (हिज मास्टर्स व्हॉईस) मराठी विभागाचे संचालक झाले. त्यांच्या चाली अवघड असतात असे म्हटले जाते; परंतु त्यावर खळे यांचे उत्तर असे असायचे, ""माझ्या चाली गायला अवघड असल्याची तक्रार मला मान्य आहे. पण माझी प्रत्येक चाल ही सर्वस्वी माझीच असली पाहिजे. माझ्यानंतर किमान १०० वर्षे तरी या चाली रसिकाला आवडल्या पाहिजेत, यासाठी माझा प्रयत्न असतो.'' "एचएमव्ही'मध्ये असताना त्यांनी विविध प्रकारच्या कॅसेट काढल्या. "अभंग तुकयाचे', "राम शाम गुण गान', "अभंगवाणी' असे त्यांचे "अल्बम' अत्यंत लोकप्रिय ठरले. भेटी लागी जीवा...' सारख्या आर्त अभंगापासून 'कळीदार कपुरी पान...' सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' सारख्या चिमखड्या बालगीतापासून 'जय जय महाराष्ट्र माझा...' सारख्या रांगड्या शब्दांना त्यांच्या अतिशय चपखल चालीचे कोंदण लाभले होते.
खळे यांच्या संगीत रचनांना अनेक गायकांनी स्वर दिला आहे. खळे यांनी तब्बल ३० वर्षांनंतर "कळी' या मराठी चित्रपटाला संगीत दिले. हाच त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. खळे यांना तब्बल सहा दशकांच्या प्रदीर्घ, स्वरमय कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान लाभले. श्रीनिवास खळे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते.श्रीनिवास खळे यांचे २ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीनिवास खळे नक्षत्राचे देणे.
https://www.youtube.com/watch?v=KCWhc4XgRE4
https://www.youtube.com/watch?v=Q9mVK0BLUgA
https://www.youtube.com/watch?v=duI_pIz9SlM
https://www.youtube.com/watch?v=BfOKjCLHVZw
https://www.youtube.com/watch?v=O-tcQdcNZoY
https://www.youtube.com/watch?v=tBA-8FKXmrQ
https://www.youtube.com/watch?v=PDjfG6zBKZc&list=PLB81B18245264CEF7&index=7
https://www.youtube.com/watch?v=L5jfG1Nja1U&list=PLB81B18245264CEF7&index=8
https://www.youtube.com/watch?v=C1Q9-BfNxmU&list=PLB81B18245264CEF7&index=9
https://www.youtube.com/watch?v=PveG3siOos0&index=10&list=PLB81B18245264CEF7
https://www.youtube.com/watch?v=Um87jA1RU4s&list=PLB81B18245264CEF7&index=11
https://www.youtube.com/watch?v=nY3_LvxHtKQ&list=PLB81B18245264CEF7&index=12
May 2, 2017
लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत.
June 18, 2022
नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
April 21, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti