जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. बीना रॉय यांचा जन्म ४ जुन १९३८ रोजी झाला. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग बनल्या. बीना रॉय व प्रेमनाथ यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यात औरत चा समावेश होता विवाहानंतर या दोघांनी पी.एन.फिल्मस ही कंपनी काढली होती.
शगुफा हा त्यांच्या या कंपनीचा पहिला चित्रपट होता. समुंदर व वतन हे आणखी दोन चित्रपट त्यांनी काढले पण ते चालले नाहीत. बीना राय यांनी प्रदीपकुमार समवेत केलेले चित्रपट गाजले होते. अनारकली, ताज महल, घुंगट हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. बीना रॉय यांचे ६ डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2019
सुहासिनी मुळगावकर यांनी आपले संगीताचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्या कडून घेतले. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली व याचे त्यांनी ५०० हून अधिक प्रयोग केले होते.
June 13, 2022
शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.
शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.
शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.
शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे.
शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2018
रासायनिक खतांच्या वापराविना म्हणजे म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये चांदवडच्या संजय पवार या तरुणाने केलेले प्रयोग म्हणजे शेतीचे विद्यापीठच ठरले आहे. आशियातून युरोपात ऑरगॅनिक द्राक्षांचा पहिला कंटेनर निर्यात करण्याचे श्रेय त्याने मिळवले. त्याचबरोबर दशपर्णांक या सेंद्रीय कीटकनाशकाचा शोधही लावला. सेंद्रीय शेती करणार्यांसाठी त्याने मुंबईत सुरु केलेल्या फार्मर्स मार्केटला आता बॉलिवुडची पसंती मिळाली आहे...
सूखशेतीचा मळा ...
July 14, 2017
दिव्या भारती हे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न होतं असं म्हटलं तर अतिशोयक्ती वाटू नये. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला.कारण वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिनेमा. राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और शबनमनं तिच्या विजयात आणखी भर घातली. दिव्या आणि गोविंदा जोडी झाली होती. तर शाहरुख खान ऋषी कपूरबरोबरच दिवानानं तर तीनं सर्व अभिनेत्रींना मागं टाकलं. शाहरुख खान बरोबरच्या या चित्रपटानं तिला यश तर दिलच पण त्यावेळी ती सर्वात मोठी स्टारही झाली होती. दिवानानंतर दिव्याचं मानधन २५ लाखांवर गेलं होतं असं सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळी टॉपवर असलेल्या श्रीदेवी, माधुरी यांच्यापेक्षा जास्त मानधन ती घेऊ लागली. त्यातच दिवानाची गाणी आणि चित्रपटानं सगळ्यांच्या ह्रदयाचा गेमच केला होता. कॉलेजमधली तरुणाई तर “ऐसी दिवानगी देखी नही कही..” या शाहरुख आणि दिव्याच्या गाण्यावर फिदा झाली होती..शाहरुख आणि दिव्या हीच चर्चा त्यावेळी होत होती. दिवाना रिलीज झाला ते वर्ष होतं १९९२ त्यावर्षी सगळीकडं दिव्याचा बोलबाला होता..दिव्यानं हिंदीत जवळपास १३-१४ चित्रपट केले. त्यातले काही सुपर डुपर हिट झाले तर काही जेमतेम चालले..पण तीनं त्यावेळच्या सर्व प्रस्थापित अभिनेत्रांनी धक्का दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर दिव्यानं तेलुगु चित्रपटातून आपलं करिअर सुरु केलं होतं. तेलुगुतले प्रसिद्ध निर्माता डी रामानायडू यांनी मुलगा व्यंकटेश याच्याबरोबरच्या “बोब्बीली राजा ” या चित्रपटातून हिरोईन म्हणून दिव्याला पुढं आणलं. दिव्याचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा हिट झाला आणि बघता बघता तिनं तेलुगु चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केलं. त्यावेळी तेलुगुतली यशस्वी अभिनेत्री विजयाशांती हिच्या नंबर एकच्या स्थानाला तिनं आव्हान दिलं होतं. त्यानंतर तिचा प्रवास हिंदीत झाला.. पण बोब्बीला राजा च्या अगोदर दिव्यालाही मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवेशच खूप त्रासदायक झालाय. वयाच्या अवघ्या १४ वर्षी तीला चित्रपटासाठी विचारण्यात येत होतं. त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी हिच्या चेह-याशी थोडीफार मिळती जुळती असल्यामुळे तिला मागणी होत होती. नंदू तोराणीनं तिला गुनाहों का देवता साठी विचारलं होतं. त्यानंतर गोविंदाचा भाऊ किर्तीकुमार यानं दिव्याला घेऊन राधा का संगम करण्याचं ठरवलं…पण काही दिवसाच्या शुटींगनंतर दिव्याला तो सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर सुभाष घई यांनी दिव्याला सौदागरमध्ये अमिर खानबरोबर घेतलं होते. पण तिथंही माशी शिंकली आणि सुरवातीचं काही शुट झाल्यानंतर दिव्याला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिला शेखर कपूर, शबनम कपूर, यांनीही विचारणा केली होती..पण तिचा कोणताच चित्रपट सुरु होत नव्हता. मुंबईत आपली डाळ शिजत नाही असं समजल्यानंतर तीनं हैदराबाद गाठलं. तोपर्यंत तिला शाळा अर्धवटच सोडावी लागली होती. त्यामुळे पुन्हा शाळेत जाणं शक्य नव्हतं. त्याचवेळी तिला डी. रामानायडूंचा बोब्बीली राजा मिळाला आणि तिचं नशिब बदललं. बोब्बीली राजा नंतर तिला विश्वात्मा मिळाला आणि त्यानंतर दिव्या भारती हिंदीत पुन्हा झोकात आणि धडाकेबाज यश मिळवत आली.. साजीद नाडीयादवालाशी तीनं लग्न केलं होतं. पण त्यातही काही वाद होते असं म्हणतात. त्यावेळच्या लाखो ह्रदयाची धडकन होती दिव्या भारती. अभिनेत्री म्हणून हिट ठरलेली दिव्या तिचा जिवनाचा प्रवास सुरु करण्याअगोदरच सर्वांना सोडून गेली. दिव्या भारती यांचे ५ एप्रिल १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दिव्या भारतीची गाणी
February 27, 2017
इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
December 17, 2021
पत्रपंडित प्रभाकर पाध्ये यांची पत्नी असलेल्या कमल पाध्ये यांनी “बंध अनुबंध” या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे कधीही पुसली न जाणारी ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांच्या पतीदेवांच्या गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधत, या कादंबरीला साहित्य विश्वात एका उंचीवर नेऊन ठेवले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
आज १४ ऑक्टोबर. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.
निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान. अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. मा.निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
October 14, 2016
मुंबईच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुधीर राशिंगकर यांचे नाव माहित नसलेला उद्योजक विरळाच असावा, एवढया सक्रियतेने व सक्षमतेने आपल्या उत्तुंग कारकिर्दीत, मुंबईच्या व्यावसायिक विस्तारीकरणामागे त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. शैक्षणीक दिवसांपासुनच त्यांच्यातील इतरांना दिपवणारी बुध्दिमत्ता, व दुसर्यांना सतत आपल्या खिशांत ठेविण्यासाठी लागणारी संभाषण कला त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहून ते व्यावसायिक उड्डाणपट्टीवर, आपल्या यशाचे विमान लीलया उडवू शकतील, याची त्यांच्या घरच्यांना चांगलीच कल्पना होती.
August 29, 2011
व्हॅन शिप्ले एक महान वादक व संगीतकार होते. त्यांनी १५०० हून अधिक चित्रपटां मध्ये गाणी वाजवली होती. ५० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा बरसात चित्रपटाच्या यशाने त्यांचे नाव एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीच्या चित्रपटातील गाण्यांच्या इंस्ट्रुमेंटल आवृत्त्यांचे रेकॉर्डिंग करणारे ते पहिले होते. एचएमव्हीने त्यांना वैयक्तिक वादक म्हणून साइन केले. त्यांचे पहिला रेकॉर्ड गिटारवर सादर केलेला तुम भी भूल दो (जुगनू)चे गाणे होते.
March 8, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti