जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते.
November 13, 2021
पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी बेळगाव येथे झाला. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी "राष्ट्रगीत' वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले. त्याच दरम्यान पुणे आकाशवाणीवर त्यांची निवड झाली होती. दरम्यानच्या काळात अरविंद गजेंद्रगडकर आणि अन्य पाच-सहा मिळून त्यांनी बासरी वादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. त्या काळात बासरीवादनाला स्वतंत्र व्यासपीठ नव्हते.
पं.पन्नालाल घोष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पं. केशव गिंडे यांनी ‘अमूल्यज्योती’ संस्थेची स्थापना केली, व उदयोन्मुख कलावंत, नवीन शिष्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू केले. सर्व शिष्यांना संधी मिळावी, यासाठी काही राग एकत्र करून त्यांनी "वेणू वाद्यवृंदां'ची रचना केली. त्यातून "मल्हार-सागर', ऋतुरंगमध्ये सहा ऋतूंचे बारा राग, "कल्याण-नवरंग' (कल्याणचे नऊ प्रकार), "वेणू-नाट्यरंग', "वेणू-अभंगरंग', "वेणू-सारंग', "वेणू- लंकादहन- सारंग'असे वेगवेगळे राग निर्माण केले. चुलत बंधूपासून प्रेरणा घेऊन १९७० साली घोष घराण्यानुसार खर्ज "सा' वाजणारी बासरी तयार केली.
पंडित केशव गिंडे यावर म्हणतात अर्थात ते मी माझ्या समाधानासाठी केले. मी बासरी टाळ्यांसाठी कधीच वाजवत नाही, ती आत्मिक समाधानाचे साधन आहे. बासरी या वाद्याच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच वादनासाठी बासरीमध्ये वेगवेगळे संशोधनात्मक प्रयोग पं. केशव गिंडे यांनी केले आहेत. १९८४ साली त्यांनी ११ छिद्रांची "केशव वेणू' बनविली. बांबू आणि पीव्हीसी पाइपच्या जोडातून बासरी तयार करण्याचे त्यांचे संशोधन सुरू आहे.
वेगवेगळ्या रागांप्रमाणेच "अतिखर्ज', "अनाहत वेणू', "चैतन्य वेणू' अशा बासऱ्यांची निर्मिती केली. त्यांनी निर्मिलेल्या ‘केशव वेणू’ची लिम्का आणि गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. बासरी या वाद्याची शास्त्रीय माहिती देणारा पंडित केशव गिंडे यांनी ‘वेणू विज्ञान’ हा ग्रंथ लिहिला आहे. ‘वेणू विज्ञान’ हा पहिलाच ग्रंथ असून त्यामुळे बासरीवादकांची आणि रसिकांचीही मोठी सोय झाली.
आपल्या आयुष्यात आठवणीत राहील असा प्रसंग सांगताना पंडित केशव गिंडे म्हणतात.
दिल्ली येथे १९९१ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात मला बासरी वाजवायची होती. माझ्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम होता. समोर प्रेक्षकांत पं. रघुनाथ प्रसन्न (पं. हरिप्रसाद चौरसियांच्या गुरुंचे गुरू) बसले होते. मला खूप दडपण आले होते. या कार्यक्रमात खर्ज, ऋषभ ते अतितार मध्यम अशी ताण घेतली. माझे वादन झाल्यावर मी बाहेर पडलो. समोर पं. भीमसेनजी होते. त्यांना अभिवादन करून जात असताना पं. रघुनाथजींची हाक आली. ते माझी वाट पाहत होते. त्यांनी मी घेतलेल्या तानेबद्दल विशेष कौतुक केले आणि माझ्याकडून पुन्हा मेघमल्हार वाजवून घेतला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
September 5, 2017
मंगळवेढे येथील शामा नायकिणीचे पोटी हिचा जन्म झाला, सौंदर्य व गोड गळा यामुळे आपला व्यवसाय मुलगी आणखी पुढे नेईल असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. विठ्ठल भजनात ती रंगून जात असे. तिने रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. कान्होपात्राच्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठलकृपेने ती बचावली.
May 25, 2010
गोरी तेरा गांव बड़ा प्यारा', 'सुरमई अखियों में', 'दिल के टुकड़े-टुकड़े करके', 'जानेमन-जानेमन तेरे दो नयन', 'चांद जैसे मुखड़े पे', ‘निसा गमा पनी सारे गा’ या सारखी अप्रतीम गाणी देणारे येसुदास यांचे वडील मल्याळम शास्त्रीय संगीतकार होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी झाला.त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, वयाच्या सात वयाच्या वर्षी कोची स्थानिक स्पर्धा भाग घेतला तेव्हा सुवर्णपदक जिंकले. सुरवातीचे संगीत प्रशिक्षण त्यांनी R.L.V. संगीत Thrippunithura अकादमी येथे केले.
येसुदास गाण्याची निवड फारच विचार पूर्वक करीत असतात. सध्याच्या पध्दतीची गाणी त्यांना आवडत नाहीत. १९७० च्या पासून येसूदास हिंदी गाणी गात आहेत. येसूदास यांनी १४ भाषेत जवळजवळ आज पर्यत ४५००० गाणी गायली आहेत. त्यांनी मल्याळम, तामिळ आणि हिंदी मध्ये पण गायली आहेत. ते मल्याळम चित्रपट उद्योगात जास्त प्रसिद्ध आहेत. पहिले हिंदी गाणे गायन सुरु केले तो चित्रपट जय जवान जय किसान होता, पण पहिला प्रदर्शित चित्रपट छोटी छोटीसी बात होता.
येसूदास यांनी अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्या साठी हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल आणि सलील चौधरी याच्या समावेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्याचा एक मुलगा विजय येसूदास, हा गीतकार आहे. मा.येसूदास यांना गायक म्हणून सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे व तो प्राप्त करणारे ते देशातील एकमेव गायक आहेत.
येसुदास हे फक्त गायक नसून दक्षिण भारतीय भाषेत 'वडाक्कुम नाथम', 'मधुचंद्र लेखा' और 'पट्टनाथिल सुंदरन' असे निर्माता म्हणून चित्रपट बनवले आहेत. भारतीय संगीतात मोलाचे योगदान दिल्याने केरळ सरकारने संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम 'स्वाती पुरस्कारम' हा पुरस्कार देऊन येसूदास यांचा गौरव केला आहे. २००२ मध्ये भारत सरकारने 'पद्म भूषण' देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
काही येसूदास यांची गाणी
जब दीप जले आना
तु जो मेरे सूर मे
सुरमई अखीयो से
माना के तुम
गोरी तेरा गाव बडा प्यारा
निसा गमा पनी सारे गा
मराठी गाणी येसूदास यांची
दूर दूर जाऊ या
वेली वेली उमले कळी
https://youtu.be/dNWfplTPYIs
January 10, 2018
जन्म.९ फेब्रुवारी १९७०
महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचा जन्म. पहिल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याला फारशी छाप पाडता आली नव्हती. पण नंतर त्याच्या कारकीर्दीने भरारी घेतली. वेग कमी करून ऑफस्टंप लाइनच्या किंचित डाव्या किंवा उजव्या बाजूची लाइन ‘पकडून’ मॅकग्रा गोलंदाजी करायचा आणि भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडायची. ताशी १२६ ते १३० किलोमीटर इतका माफक वेगही पुरेसा ठरायचा. यात मॅकग्राची नितांत सुंदर शैली त्याच्या प्रतिष्ठेत भर टाकायची.
मॅकग्राने इंग्लंडच्या माइक अँथरटनला १९ वेळा बाद केले. जो एक कसोटी विक्रम आहे. ब्रायन लाराची विकेट त्याने सर्वाधिक १३ वेळा घेतली. १९९९च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला त्याने टाकलेले चेंडू अफलातून होते. या प्रतिभावान फलंदाजांना बाद करण्यासाठी तसेच स्पेशल चेंडू मॅकग्रा अथकपणे टाकायचा.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 9, 2022
दत्तात्रय केशव केळकर यांनी सामाजिक, वाङमयीन, शैक्षणिक असे विविधांगी लिखाण केले.
'काव्यालोचन', 'साहित्यविहार', 'विचारतरंग', 'उद्याची संस्कृती', 'वादळी वारे', 'संस्कृतिसंगम', 'संस्कृति आणि विज्ञान' या पुस्तकांतून त्यांनी दैववादाकडून विज्ञानवादी भारतीयत्वाकडे जाण्याचा शोध सुरु ठेवला होता.
दत्तात्रय केशव केळकर यांचे ८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
## Dattatray Keshav Kelkar
July 31, 2017
शोभना समर्थ यांचे वडील बँकचे संचालक होते. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नूतन व तनुजा यांची मातोश्री व काजोल, मोहनीश बहेलची आजी. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मामा जयवंत (नलिनी जयवंतचे वडील) यांच्याकडे त्यांचे संगोपन झाले. मामाच्या कडक अनुशासनात राहूनही त्या चोरून चित्रपट बघायची व सिनेतारकां होण्याचे स्वप्न बाळगायच्या.
वयाच्या १८ व्या १९३४ साली केवळ ५०० रुपये पगारावर 'निगाह-ए-नफरत' या मास्टर विनायक निर्मित चित्रपटात त्यानी काम केले. हाच चित्रपट १९३५ साली मराठीत 'विलासी ईश्वर' म्हणून निघाला. त्या तारका बनल्या. शोभना समर्थ यांचे माहेरचे नाव सरोज शिलोत्री. जर्मनीहून सिनेमेटोग्राफीचे प्रशिक्षण घेऊन आलेले कुमार सेन समर्थ यांच्यासोबत त्याचा विवाह झाला. सरोज शिलोत्रीची 'शोभना समर्थ' झाल्या. त्या काळातील मातब्बर कलाकार मोतीलाल बरोबर सौंदर्य खणी शोभना समर्थ यांची जोडी खूप गाजली.
'दो खरब जन', 'दो दीवाने' (१९३६), 'कोकिला' (१९३७) हे त्यांचे चित्रपट. त्या काळातील धार्मिक चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार प्रेम अदीब बरोबरही त्यांची जोडी जमली. 'निराला हिंदुस्थान' (१९३८) या सामाजिक चित्रपटानंतर ११ चित्रपटांत ही जोडी कायम होती.
'साधना' (१९३९), 'सौभाग्य' (१९४०), 'भरतमिलाप', 'स्वामीनाथ' (१९४२), 'रामराज्य' (१९४३), 'उर्वशी' (१९४६), 'विधरांगणा' (१९४७), 'रामबाण' (१९४८), 'रामविवाह' (१९४९), 'रामायण' (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली. या जोडीचे राम-सीताच्या चित्रांचे कॅलेंडर्स त्या काळात घरोघरी दिसत होते. त्यातही 'रामराज्य' या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचा दर्जा दिला. आजही त्या काळातील लोक तिची ओळख 'रामराज्य'मधील सीता म्हणूनच सांगतात.
प्रारंभिक काळात तिने वास्ती, नझिर, बलवंतसिंग, याकूब, हरीश, चंद्रकांत जयराज, शाहू मोडक, अरुण आहुजा (गोविंदाचे वडील), चंद्रमोहन इ. बरोबर अनेक चित्रपटात कामे केलीत. १९४५ मध्ये पृथ्वीराज कपूर बरोबर 'श्रीकृष्णार्जून युद्ध' व 'नलदमयंती'मध्ये कामे केलीत. त्याच वर्षी 'वीर कुणाल' चित्रपटात मुबारक बरोबर सम्राट अशोकाची राणी 'तिष्यरक्षिता'चे काम करून अभिनयाची सर्वोत्कृष्ट उंची गाठली.
१९४९मध्ये शोभना पिक्चर्स नामे स्वतःची निर्मिती करून 'हमारी बेटी' चित्रपट काढला. यात तिने आपली ज्येष्ठ कन्या नूतनला नायिकेचा रोल दिला. त्यांनी १९६० साली 'छबीली' चित्रपटाद्वारे दुसरी कन्या तनुजाला चित्रपटात आणले. शोभना समर्थ यांचे निधन ९ फेब्रुवारी २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 10, 2017
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, 'एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते' म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता.
रसिकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप किंवा कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते, तर चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगमधून उत्तम विनोदनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं होतं. रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते. फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/atmaram-bhende/
# Bhende, Atmaram
June 4, 2017
आज ११ सप्टेंबर.. सुप्रसिद्ध मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची जयंती
कवी अनिल यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.
भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कोलकातायेथे प्रयाण केले. त्यांना अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन मिळाले.
त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी मिळाली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय केला. त्यांची १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुक झाली.
कवी अनिलांना १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. कवी अनिल हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे.
कवी अनिल यांचे निधन ८ मे १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी अनिल यांची एक कविता
'तळ्याकाठी'
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्याबत एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
September 11, 2016
तिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.
June 20, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti