(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर

    मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.

    अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.

    गीतकार म्हणून अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी
    आता कशाला उद्याची बात
    आला खुशीत्‌ समिंदर
    एकलेपणाची आग लागली
    तू माझी अन्‌ तुझा मीच
    दर्यावर डोले माझं
    अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 13, 2019


  • दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते अरुण काकतकर

    जन्म. २४ एप्रिल १९४७

    अरुण काकतकर हे एक चालते बोलते सांस्कृतिक केंद्र आहे. ते दूरदर्शन वर नोकरीत असताना त्यांचे मुंबईतले घर म्हणजे अनेक मराठी कलाकारांचे मुंबईत उतरण्याचे हक्काचे ठिकाण होते. अरुण काकतकर हे नांव आता पन्नाशीच्या अलिकडे पलिकडे असणाऱ्या सर्व मराठी माणसांच्या डोळ्यांपुढचं नांव. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातले ते निर्माते. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर माझं घर अशा नुसत्या नावांनीही या पिढीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर माझं घर, युवदर्शन, शब्दांच्या पलीकडले, सायन्स् रिपोर्ट्, नाटक, स्पोर्टस् राउंड अप,आरोही या सर्वाचे निर्माते असायचे अरुण काकतकर.

    दूरदर्शनवर सुमारे पंधरा वर्षे अनेक मालिकांची निर्मिती आणि इतर सेवा केल्यानंतर १९८७ ते २००५ पर्यत अरुण काकतकर यांनी 'बालचित्रवाणी'चे निर्मिती उपप्रमुख म्हणून काम बघितले होते, तेव्हा अरुण काकतकर यांनी दहा वर्षे स्वतःला बालचित्रवाणी मध्ये लहान मुलांचे मनोरंजन करत वाहून घेतले होते.

    दूरदर्शनच्या दर्जेदार कार्यक्रमांचे निर्माते म्हणून काम करत असताना अरुण काकतकर यांनी स्मिता पाटील, लक्ष्मीकांत बेर्डे अशांना दूरदर्शन वर आणले. त्यांनी दूरदर्शनवर पु लं देशपांडे, सुधीर फडके (बाबुजी) आणि ग. दि. माडगुळकर (अण्णा) मैफील जमवली होती. अरुण काकतकर यांनी विनय धुमाळे, सुधीर गाडगीळ, समीरण वाळवेकर यांना कायम प्रोत्साह्नन दिले.आरोही हा कार्यक्रम त्यांनी एक वर्ष सादर केला व त्यातील पहिला कार्यक्रम लता मंगेशकर यांचा होता. जितेंद्र अभिषेकी, आशाताई, लतादिदींना दूरदर्शनवर लाईव्ह आणण्याचे श्रेय अरुण काकतकर यांना जाते.

    दिग्दर्शक अंकुर काकतकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. अंकुर काकतकर यांनी अनेक नाटके व चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गोंद्या आला रे वेब सिरीज मालिकेचे दिग्दर्शन अंकूर काकतकर यांनी केले आहे. ढोलताशे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

    अरुण काकतकर यांच्या कडे अनेक जुन्या दर्जेदार कार्यक्रमांच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफिती आहेत. विदुषी माणिक वर्मा, डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, सुरेश भट,पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशाताई भोसले, किशोरीताई आमोणकर, मोगुबाई कुर्डीकर आणि लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गजांच्या अजरामर कार्यक्रमांची अरुण काकतकर यांनी निर्मिती केली आहे.

    अरुण काकतकर यांची आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली असून "नक्षत्रांचे दिवस" आणि अनुभवसिद्ध अल्पाक्षरी+ दासबोध भासबोध ही पुस्तकं अंधांसाठी ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित झाली आहेत. इतर पुस्तकं.. ठसे आणि ठोसे, नक्षत्रांचे दिवस, ठोसबोध(९०० ओव्या), ई-बुक्स्.. मनगुंफी, आशयसूत्रे ओविले शब्द (१६०० ओव्या), कॉफी टेबल बुक: जगन्नाथे केले...(जगन्नाथ जाधव CEO, B G SHIRKE GROUP, यांचं आत्मचरित्र), (घ)बाड.. हे पुस्तक छपाईं च्या प्रक्रियेत आहे. अरुण काकतकर यांचे मनगुंफी हे पहिलं ई पुस्तक आहे. आनंद माडगूळकर, नीला सत्यनारायण, विनय हर्डीकर, अशा अनेक नामवंतांनी त्यांचे लिखाण गौरवलेले आहे. सध्या ते पुणे येथे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

    २०१६ मध्ये अरुण काकतकर यांना स्वरशब्दप्रभू पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      April 28, 2022


  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतणे विक्रम सावरकर

    मुंबई महापालिकेत वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत गायले जावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे त्यांना शिक्षाही भोगावी लागली. भिवंडी येथील मुस्लिमबहुल भागात शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठीही त्यांनी आंदोलने केली होती.

      February 23, 2022


  • प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट

    ८६ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या् कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्याय वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल.

    “अयोध्येचा राजा” या चित्रपटाने दुर्गा खोटें यांच्या रुपाने भारतातील बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आल्या. पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी सिनेमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येइल त्या त्या वेळेस 'प्रभात फ़िल्म ' चे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. १९२९ ते १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.

    http://www.prabhatfilm.com/home.htm
    अयोध्येचा राजा
    १९३२
    पौराणिक
    ३५ मिमी/कृष्णधवल/१३१४२ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११०६०/ ६-२-३२
    निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
    दिग्दर्शक :व्ही. शांताराम
    कथा :ना. वि. कुलकर्णी
    संवाद :ना. वि. कुलकर्णी
    संगीत :गोविंदराव टेंबे
    छायालेखन :केशवराव धायबर
    संकलक :व्ही. शांताराम
    गीतलेखन :गोविंदराव टेंबे
    कला :साहेबमामा फत्तेलाल
    वेषभूषा :एच्.एस्.काकडे
    गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
    ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
    निर्मिती स्थळ :कोल्हापूर
    रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
    कलाकार :कुमार दिगंबर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, मा. विनायक, मानाजीराव माने, शंकरराव भोसले
    गीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 6, 2019


  • महान गायक महेंद्र कपूर

    मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन्‌ प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मा.मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.

    गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. मा.महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- वेब दुनिया

    काही गाणी महेंद्र कपूर यांची
    तुम अगर साथ देने का वादा करो
    लाखो हे यहाँ दिल वाले पर प्यार नहीं मिलता
    चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ
    तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
    मेरे देश की धरती सोना उगले
    मेरा रंग दे बसंती चोला
    है प्रीत जहाँ की रीत सदा
    नीले गगन के तले
    किसी पत्थर की मूरत से
    भारत का रहने वाला हूँ

      January 11, 2017


  • महान गायक भीमसेन जोशी

    भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले.

    भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी १९३६ ते १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.

    भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी ते ठुमरीही अतिशय छान गात. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्याी संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

    केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्यास विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. महान गायक मा. भीमसेन जोशीं यांचे २४ जानेवारी २०११ निधन रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 24, 2018


  • दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

    शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेऱ्या्समोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणाऱ्या अनंत माने यांनी केलं.

      December 30, 2021


  • अनंत आत्माराम काणेकर

    अनंत आत्माराम काणेकर

    मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.

      April 4, 2019


  • (प्रा.) ल. ना गोखले

    गोखले, (प्रा.) ल. ना.

    लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.

    कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.

      August 5, 2017


  • जनार्दन परब

    मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्‍यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब.अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्‍याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

      June 6, 2014