(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेते विवेक

    प्रभात ‘ चित्रपट संस्थेत मालक असलेल्या दामले आणि फत्तेलाल या दोघांना ते भेटले कारण त्यांना चित्रकलेत जास्त रुची होती . जातिवंत चित्रकार असलेल्या फत्तेलाल यांनी त्याच्यातील चित्रकार अचूक हेरला त्यांचे कौतुक केले, दामल्यांनी त्यांचा देखणा चेहरा बघून त्यांच्या आगामी ‘ दहा वाजता ‘ चित्रपटासाठी विचारले पण विवेक याना त्यावेळी चित्रपटात काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती , त्याचा ओढा चित्रकलेकडे जास्त होता .

      July 22, 2021


  • अभिनेत्री जयमाला शिलेदार

    संगीताची तालीम जयमाला शिलेदार यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून घेतली. टेंबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेषांतर’ या नाटकामधून शिलेदार यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर आपल्या अभिनय आणि गायनानं रंगभूमी गाजवून सोडली. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२६ रोजी झाला. प्रमिला जाधव हे त्यांचं माहेरचं नाव.

    संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांच्याबरोबर भूमिका केल्याने गंधर्वसुरांची शिलेदारी जतन करणारी गायिका अशीच जयमाला शिलेदार यांची ओळख होती. ‘शाकुंतल’ नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर हे दोघं विवाहबद्ध झाले. विवाहानंतर या दोघांनीही आपल्याला संगीत रंगभूमीसाठी वाहून घेतलं. या दोघांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ आदी नाटकांची निर्मिती केली.

    १९६२ मध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली. जयमाला शिलेदार यांनी ४६ संगीत नाटकांमध्ये ५२ भूमिका रंगभूमीवर साकारल्या, तर १६ नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले. सलग २५ वर्षे नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल १९७६ मध्ये त्यांचा सत्कार झाला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षांत १९८७ मध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाटय़प्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वाना अभिवादन केले. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर २१ वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेलली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत १२ वेगवेगळय़ा नाटकांचे ५० प्रयोग करण्यात आले.

    नाटकांच्या निर्मितीबरोबरच जयमाला शिलेदार यांनी त्या काळातील बहुतेक सर्व गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये काम केलं. ‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ आदी नाटके त्यांनी गाजविली होती. रसिकांच्या प्रेमाबरोबरच विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

    बालगंधर्वांच्या चाहत्या असणार्याय जयमालाबाईंना त्यांच्या नावाचा पुरस्कार तब्बल तीन वेळा मिळाला होता. २००६ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला होता. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड झाली होती. जयमाला शिलेदार यांचे ८ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 8, 2017


  • रमाबाई महादेव रानडे

    स्त्री शिक्षण ज्याकाळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानली जात होती अश्या परिस्थितीत शिक्षणासाठी पुढाकार घेणारी महिला म्हणजे रमाबाई महादेव रानडे.

      May 7, 2014


  • दिनकर धोंडो कर्वे

    भारतीय रसायनशास्त्रज्ञ. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. नंतर ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. विज्ञान प्रसारासाठी मराठीतून भाषणे दिली, मराठी वृत्तपत्रे आणि मासिकातून लेख लिहिले.

    सृष्टीज्ञान या विज्ञान मासिकाच्या संपादक मंडळावर काम केले. आकाशवाणीवरून भाषणे दिली.

    जन्म १८९९

    मृत्यू १९८०

    माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

      December 15, 2010


  • संत आडकोजी महाराज

    महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसेच त्यांचे गुरु आडकोजी महाराज.

      August 22, 2010


  • अशोक कुमार

    कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. जेष्ठ कलाकार अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले.

    वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.

    दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.

    शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.

    अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 5, 2019


  • लेखिका प्रा. यास्मिन शेख

    ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘अंतर्नाद’ या वाङमयीन मासिकाच्या त्या गेल्या दीड दशकाहून अधिक काळ ‘व्याकरण सल्लागार’ आहेत. ‘अंतर्नाद’ची मुद्रितं त्या अजूनही म्हणजे वयाच्या नव्वदीतही तपासतात. त्या ‘अंतर्नाद’च्या केवळ मुद्रित तपासनीस नाहीत, तर ‘व्याकरण-सल्लागार’ आहेत.

      June 21, 2022


  • पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत

    पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत यांचा जन्म ७ मार्च १९३३ रोजी  हुमरस अण्हेरी, सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला. त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली. राजकारण गेल चुलीत–वरचा मजला रिकामा हि त्यांची नाटके खुप गाजली. १९९४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते.

      March 4, 2025


  • शंकर दत्तात्रय भोसले

    विनोदाची झालर व हास्याचे कल्लोळ तसंच आपल्या कवितांमधून रसिकांना अंतर्मुख करायला लावणारे कवी म्हणजे शंकर दत्तात्रय भोसले हे होते. “बाहेरचा वारा”, “गालावरचे गुलाब”, “जवानीचे विमान”, “स्वप्नातील चुंबन”, “चटक चांदण्या” अश्या अनेक विनोदी, संवादात्मक, व मिश्कील काव्यसंग्रहांची निर्मिती त्यांनी केली आहे.

      January 16, 2015


  • ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर

    ‘अजिंठा’, ‘मराठवाडा’ या दैनिकांपासून त्यांनी चित्रपट समीक्षा लेखनास आरंभ केला. महाराष्ट्रातील विविध दैनिकांत चित्रपट, दूरदर्शन या विषयावर जसे दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत, मराठवाडा, अजिंठा इत्यादी ठिकाणी त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभ लेखन केले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजवर त्यांनी तब्बल ३३६५ मुलाखती घेतल्या आहेत. चित्रपट विषयास वाहिलेला नवरंग रुपेरी नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी १९८७ साली केली व जवळपास ३० वर्षे त्याचे संपादन केले.

      June 10, 2022