(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भूमिपुत्र व जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन

    सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी आपली ‘भाऊ’म्हणून ओळख निर्माण केली होती. भंवरलाल जैन यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला.

      March 1, 2024


  • चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने

    राजा नेने यांनी आपल्या कामाची सुरवात प्रभात फिल्म कंपनी पासून केली. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९१२ रोजी झाला. व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला. रामशास्त्री अर्धा तयार झाल्यावर राजा नेने यांनी १९४३ नोव्हेंबरमध्ये प्रभात कंपनी सोडली. नंतर राजा नेने यांनी पहिली तारीख या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. राजा नेने यांचे निधन २१ फेब्रुवारी १९७५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 21, 2018


  • ज्ञानदीपकार आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद

    नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले.

      March 13, 2022


  • (डॉ.) मा. स. गोरे

    गोरे, (डॉ.) मा. स.
    मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. माधव सदाशिव गोरे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण धारवाड, पुणे आणि सांगली येथे झाले.

    ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये ते शिकले. तिथे त्यांनी ‘सोशल सव्‍‌र्हिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली. १९४८ मध्ये त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवली. १९४८ ते १९५३ या काळात ते ‘दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क’मध्ये अधिव्याख्याते होते. त्यांना फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी १९६१ मध्ये कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. १९८२ पर्यंत ते मुंबईच्या ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या संचालकपदी होते. १९८३ ते १९८६ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. बेलॉईट कॉलेज आणि विस्कॉन्सिन विद्यापीठाचे ते नियमित मानद व्याख्याते होते. १९९७ मध्ये ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती बनले. समाजशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेल्फेअर’ने केला होता. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा किताब देऊन गौरवण्यात आले होते. समाजशास्त्र क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल २००६ मध्ये त्यांना ‘इंडियन सोशालॉजिकल सोसायटी’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. २००३ पासून त्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. ते अतिशय शिस्तशीर आणि व्यासंगी प्राध्यापक या नात्याने विद्यार्थिवर्गामध्ये प्रिय होते. त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मूलभूत संशोधन केले आहे. ‘इंडियन यूथ : प्रोसेसेस ऑफ सोशलायझेशन’ हे त्यांचे पुस्तक आधुनिक भारतातील तरूणांची समाजशास्त्रीय चिकित्सा करणारे आहे. १९७७ मध्ये त्यांनी याच विषयावर दिलेल्या व्याख्यानसत्रावर आधारित असे हे पुस्तक आहे. डॉ. गोरे यांनी ‘होमी भाभा फेलोशिप्स कौन्सिल’साठी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीची समाजशास्त्रीय चिकित्सा केली होती. याच काळात त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्राचा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीवर पुस्तकही लिहिले. याच विषयावर त्यांनी अलाहाबादच्या ‘गोविंद वल्लभ पंत इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज’मध्ये व्याख्यानसत्रात भाग घेतला होता. त्यांचे असंख्य प्रबंध देशात आणि परदेशात प्रसिद्ध झाले आहेत. समाजशास्त्र या विषयाशी संबंधित अनेक आयोगांवर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली होती. ते ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’च्या संचालकपदावरही काही काळ होते. १९७१ ते १९७५ या काळात ते ‘धंदेवाईक शिक्षणात समाजशास्त्राची भूमिका’ या विषयावर काम करणाऱ्या अभ्यासगटाचे प्रमुख होते. १९७७ ते १९७९ या काळात ते ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी’ या संस्थेचे अध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’चे संचालकपद स्वीकारले. ‘सोशल डेव्हलपमेंट : चॅलेंजेस फेस्ड इन अनइक्वल अ‍ॅण्ड प्लुरल सोसायटी’ हेही त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘द सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ अ‍ॅन आयडॉलॉजी : आंबेडकर्स पोलिटिकल अ‍ॅण्ड सोशल थॉट’ हे पुस्तक लिहिले होते. समाजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून त्याची मानसशास्त्रीय चिकित्सा करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षांपासून केले आहे. देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या सामाजिक अभिसरणाचा अभ्यास अलीकडच्या काळात त्यांच्याइतका अन्य कोणाचा असेल, अशी शक्यता नाही. एक अतिशय डोळस अशा समाजशास्त्रज्ञास त्यांच्या निधनाने आपण मुकलो आहोत. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

      August 5, 2017


  • ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले

    ‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं.

      September 26, 2021


  • माधव कृष्ण पारधी

    “मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.

      November 7, 2017


  • पी.सी. अलेक्झांडर

    पी.सी अलेक्झांडर यांना भारतीय राजकारणात गांधी घराण्याचे विश्वाकसू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म २० मार्च १९२१ रोजी झाला.

    संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून १९८१ ते ८५ या काळात त्यांनी त्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.

    एक सनदी अधिकारी असलेले डॉ. अलेक्झांडर १९८८ मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. १९९३ ते २००२ असा प्रदीर्घकाळ ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तसेच १९९६ ते १९९८ या काळात त्यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रशी जुळलेले त्यांचे संबंध सर्वाधिक जवळचे राहिले. त्यामुळेच त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधींच्या पंतप्रधानकाळात त्यांचे सचिव म्हणून काम करीत असतांना आलेल्या अनुभवावर इंदिरा : अंतिम पर्व हे डॉ. अलेक्झांडर यांनी लिहिलेले पुस्तकही प्रसिद्ध आहे. डॉ.अलेक्झांडर यांचे १० ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले. डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे स्वांतत्र्योत्तर कालखंडातील विख्यात व आदरणीय लोकसेवकांपैकी एक होते. विख्यात व आदरणीय अशासाठी की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये उच्चप्रतीची कार्यक्षमता, नि:पक्षपातीपणा व सचोटी हे गुण जोपासलेले होते. एक कुशल, मुसद्दी व प्रशासक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक जीवनामध्ये अर्धशतकाहून अधिक काळ विविध प्रकारची उच्च पदे भूषवलेली होती, ते लंडन येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून तीन वर्षे होते, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार येथे सचिव म्हणून तीन वर्षे काम केले, डॉ.अलेक्झांडर यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांच्या दिवसांत वक्तृत्व व वाद-विवाद यांमध्ये आंतरशालेय व आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सातत्याने पहिले बक्षिस जिंकून आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले होते. त्रावणकोर विद्यापीठात शिकत असताना ते त्रावणकोर विद्यापीठ वादविवाद संघाचे प्रमुख होते. आंतर-विद्यापीठ वादविवाद स्पर्धांसाठी इतर विद्यापीठांना भेट देण्याकरिता या संघास पाठविण्यात आले होते. १९४०-४१ मध्ये ते त्रावणकोर विद्यापीठ युनियनचे अध्यक्ष होते. डॉ.अलेक्झांडर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू होण्याअगोदर त्रावणकोर विद्यापीठातून इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी आणि अण्णामलाई विद्यापीठातून संशोधनाद्वारे एम.लिट. व डी.लिट. या पदव्या संपादन केल्या होत्या. तेव्हाच्या मद्रास व त्रावणकोर-कोचीन राज्यांतील जिल्ह्यांमध्ये काम केल्यानंतर ते १९५५ मध्ये केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल झाले. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय अधिकारी संकोषासाठी निवड झाली तेथपासून त्यांच्या नियत सेवावधीपर्यंत ते भारत सरकारच्या सेवेत विविध हुद्यांवर काम करत राहिले. डॉ.अलेक्झांडर यांनी नूफिल्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत युनायटेड किंग्डम व्यापार मंडळ येथे प्रशिक्षण घेतले होते आणि फोर्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत कॅलिफोर्नीया यु.एस.ए. येथील स्टॅनफोर्ड संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले होते. डॉ.अलेक्झांडर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये, राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर भाष्य करणारा ईश्वरी देणगी असलेला व विद्वान वक्ता म्हणून आपल्या श्रोतृसमाजाची स्तुती व प्रशंसा लाभली. त्यांना १९९९ मध्ये प्रतिष्ठित अशा लोक प्रशासनामधील अग्रगण्य कांची परमाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. डॉ. अलेक्झांडर हे जगभर पसरलेल्या भारतीय विद्याभवनच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे एक दशकाहून अधिक काळ सदस्य राहिलेले होते. ते जून १९८९ पासून केंब्रिज विद्यापीठाच्या नेहरू न्यासाचे अध्यक्ष होते.

    पी.सी.अलेक्झांडर यांचे १० ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 21, 2017


  • व्हायोलिन सम्राट व्ही.जी. जोग

    पंडित व्ही जी जोग म्हणून ओळखले गेलेले पंडित विष्णू गोविंद जोग यांनी व्हायोलिन चे प्रारंभिक प्रशिक्षण एस सी आठवले आणि गणपतराव पुरोहित यांच्याकडे घेतले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९२१ रोजी झाला. त्यानंतर सुप्रसिद्ध बाबा अल्लाउद्दीन खान, प्रख्यात संगीतकार विश्वेश्वर शास्त्री हे त्याचे गुरु होते. पंडित व्ही जी जोग हे व्हायोलिन या वाद्याला हिंदुस्तानी संगीतात मानाचे स्थान देणारे प्रथम व्यक्ती होत. व्हायोलिनच्या सुरावर हुकुमत असलेल्या मा.जोग यांनी या वाद्याला हिंदुस्तानी संगीतात मानमरातब मिळवून दिला. पंडित व्ही जी जोग यांना व्हायोलिन सम्राट असेही म्हणत. पद्मविभूषण व कालिदास या किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आकाशवाणीवर अधिकारी म्हणुन काम केले आहे.

    जुगलबंदी वादक म्हणुन तर ते चांगलेच गाजले. बिस्मील्ला खां बरोबरच्या जुगलबंदी अजुनही लोकांच्या स्मरणात आहेत. मा.पंडित व्ही जी जोग यांचे ३१ जानेवारी २००४ रोजी निधन झाले.

    संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      January 31, 2017


  • मराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले

    “शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.

      March 18, 2019


  • योगेश दामले

    योगेश दामले हे महाराष्ट्रामधील परिचीत व सुप्रसिध्द पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेशी व महाराष्ट्राच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्‍या आपल्या बांधवांशी दाखविलेली निष्ठा खरोखरीच स्पृहणीय आहे. असं म्हणतात की पत्रकारामध्येही एक समाजसेवक दडलेला असावा, व योगेश हे या अशा काही दुर्मिळ पत्रकारांच्या माळेमधील मणी आहेत, की ज्यांच्यातील झुंजार व तेजस्वी समाजसुधारक आपले दर्शन वारंवार इतरांना घडवित असतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास आहे व इतरांना जागृत करण्यासाठी चालविलेले व्रत आहे.

      August 16, 2011