(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

    ‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

      July 21, 2017


  • गजानन दिगंबर माडगूळकर

    गजानन दिगंबर माडगूळकर

    अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

      January 22, 2010


  • भारतरत्न लता मंगेशकर

    लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.

      February 6, 2022


  • अभिनेते जसपाल भट्टी

    बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी झाला. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली.

    नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला ‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता.

    विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

    कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता. ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओ सोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली. मा.जसपाल भट्टी यांचे २५ ऑक्टोबर २०१२ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

      November 15, 2017


  • अभिनेता विलियम जोसेफ लारा

    मॉडेलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारली. 1996 ते 1997 मध्ये बीच ऑन एयर झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 एपिसोडमध्ये ज्यो ने प्रेक्षकांवर छाप सोडली. ज्यो ने टार्झनसह अमेरिकन साइबॉर्ग स्टील वॉरिअर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड आणि टीव्ही मालिका वेवॉच आणि कोनान द ॲ‍डव्हेंचरमध्ये काम केले होते. 2018मध्ये आलेल्या समर ऑफ 67मध्ये तो झळकला होता. ज्यो ने ग्वेनसोबत लग्न केले होते. दोघेही ब्रेंटवुडमध्ये आपल्या दोन मुलींसोबत रहात होते.

      May 31, 2022


  • गायिका बेला शेंडे

    बेला शेंडे' म्हटलं की आपल्याला कुठली गाणी आठवतात? 'नटरंग' ची 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली लावणीगीते आठवतात, 'सर सुखाची श्रावणी', 'का कळेना कोणत्या क्षणी' किंवा 'ओल्या सांजवेळी' सारखी हळुवार प्रेमगीते आठवतात. 'जोधा अकबर' मधलं 'मन मोहना' आठवतं.. पण तुम्ही बेलाचं कधी breathless गाणं ऐकलंय का? फार लोकांना माहिती नसलेलं हे एक अप्रतिम गाणं.. 'कण्हेरीची फुलं' album मधलं सुरेख लिहिलेलं आणि बेलाने अतिशय सुंदर गायलेलं. त्यांचा जन्म ४ जानेवारी रोजी झाला. त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली. बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या.

    दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांयचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज,अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्या् अर्थाने सुरुवात झाली. त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकीपिडीया.
    http://www.belashende.com

    बेला शेंडेची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=pxiXi1cy-R4

      January 4, 2018


  • माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन

    शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी हैदराबाद येथे झाला.

    शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी पदार्पणाच्या तीन कसोटींमध्ये तीन शतके झळकवत जागतिक विक्रमासह क्रिकेटमध्ये थाटात आगमन केले होते. मोहम्मद अझरुद्दीन हा आवडता खेळाडू होता तो मनगटी फटके आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. ३१ डिसेंबर १९८४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली. अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामने खेळत एकूण २२ शतके झळकवली, श्रीलंकेविरुद्ध १९९ सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. ४५ च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात ३७ च्या सरासरीने ७ शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले. ३०० एकदिवसीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला.

    १९८०च्या मध्यावर निवृत्त होत गेलेल्या काही मातब्बर फलंदाजांची उणीव अझरने भासू दिली नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी ४७ कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीन बऱ्यापैकी यशस्वी ठरला, तरी ते यश अझरच्या नेतृत्वगुणांचे नक्कीच नव्हते. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मॅच-फिक्सिंगमध्ये तो गुंतल्याचे आढळल्यानंतर अझरची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. २००९ मध्ये, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.

    १९८६ मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ साली त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. १९८७ मध्ये अझरुद्दीन यांनी नऊरीन यांच्याशी विवाह केला होता. १९९६ साली त्यांनी नऊरीन बरोबर घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. अझरचे संगीता बिजलानी बरोबरही २०१० साली घटस्फोट झाला.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      February 8, 2022


  • क्रिकेटपटू सिडने बार्न्स

    सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या

      April 26, 2021


  • मराठी कवयित्री आणि कथालेखक इंदिरा संत

    पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला.

    त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

    प्रेम, जीवनातील व्यथा, संघर्षातून आलेले अनुभव, निसर्ग, भक्तीभाव, स्त्रीत्वाच्या वेदना,मानवी नाती असे नानाविध विषय त्यांच्या काव्यातून बहरत जातात कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी ! त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे अन त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे इंदिरा संत यांच्या कवितात जागोजागी आढळतात. इंदिरा संत आणि त्याचे पती ना. मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला.

    विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. मा.इंदिरा संत यांचे १३ जुलै २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    इंदिरा संत यांची कविता.

    कुणी निंदावे त्यालाही
    करावा मी नमस्कार
    कुणी धरावा दुरावा
    त्याचा करावा सत्कार

    काही वागावे कुणीही
    मीच वागावे जपून
    सांभाळण्यासाठी मने
    माझे गिळावे मीपण

    कित्येकांना दिला आहे
    माझ्या ताटातील घास,
    कितिकांच्या डोळ्यातील
    पाणी माझ्या पदरास!

    आज माझ्या आसवांना
    एक साक्षी ते आभाळ
    मनातील कढासाठी
    एक अंधार प्रेमळसंत

      January 4, 2017


  • भालचंद्र पेंढारकर

    भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे, भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.

      July 13, 2022