(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. प्रमोद पाटील, (पक्षीसंवर्धक आणि संशोधक)

    पदवीने एमबीबीएस असणारे डॉ. प्रमोद पाटील यांनी पक्षीसंवर्धनाच्या क्षेत्रात पारदर्शी असे काम केले आहे. काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या माळढोक पक्षाला वाचविण्याच्या कामात डॉ. प्रमोद पाटील यांच्या संशोधनाने मुख्य बळ मिळाले. निसर्गरक्षक गिधाडांना वाचविण्याच्या कामीही त्यांनी असेच भरीव कार्य केले आहे. गिधाडांचा जीव घेणार्‍या औषधांवर बंदीसाठी त्यांचे काम मार्गदर्शक ठरले.

    महाराष्ट्र टाईम्समध्ये मटा नोंद डॉ. प्रमोद पाटील यांच्यावर आलेला माळढोक-गिधाडांचा रक्षणकर्ता हा लेख पुढील पानावर वाचा.


    महाराष्ट्र टाईम्समध्ये डॉ. प्रमोद पाटील यांच्यावर आलेला माळढोक-गिधाडांचा रक्षणकर्ता हा लेख खाली देत आहोत.

    patil-dr-pramod-modified

      July 24, 2015


  • कमलाकांत सिताराम राजे

    कै. कमलाकांत राजे यांनी श्री गणेश या एकाच विषयावर दोनशेहून अधिक चित्रे काढली. त्यांचे गणेशाभोवती नाचणारे ऊंदिर किंवा बिळात गणेश उत्सव मनवणारे ऊंदिर हे बघून वॉल्टडिस्ने चा मिकी माऊस एकच प्रकारचा व कंटाळवाणा वाटतो !

      August 16, 2010


  • जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.

      November 13, 2021


  • पांडुरंग नारायण कुलकर्णी

    प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

    “संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले.

    Pandurang Narayan Kulkarni

      November 7, 2017


  • विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी

    एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व 'एमएस' नावाने ओळखल्या जाणार्या४ सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला. एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. त्यांचे वडिल वीणा वादक होते. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं. १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले होते. २३ ऑक्तोबर १९६६ रोजी राष्ट्रसंघाचे माजी सचिव दिवंगत यू. थॅंट यांनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅसकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. पं. नेहरूंनी मा.सुब्बुलक्ष्मी यांना‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले. मा.सुब्बुलक्ष्मी या महान कलाकारासोबतच त्या एक महान व्यक्तीही होत्या. मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट
    एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे श्री. वेंकटेश स्तोत्र

      January 3, 2017


  • विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओम प्रकाश सैनी

    राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी!

      February 12, 2018


  • संतूरवादक पं. उल्हास बापट

    अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

    त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.

    पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले.

    दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

    संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत.

    प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते.

    पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

    पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

    दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

    पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
    https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
    http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #PtUlhasBapat #UlhasBapat

      June 7, 2022


  • मराठी नाट्य-सिने अभिनेते मोहन गोखले

    घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत मोहन गोखले लीलया वावरले.

    मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे.

    शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. पुढे सर परशुराम आणि फर्गसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा अभिनय आणि दिग्दर्शन करून गाजविली होती. पुरुषोत्तम करंडकातील 'ती येते', 'कैद' या त्याच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या. ते राज्यनाट्य स्पर्धेत विजेता पण राहिले होते. त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ' घाशीराम कोतवाल ' मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ' महापूर ' हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच 'मिकी आणि मेमसाब ' , सतीश तांबेंचं ' बीज ' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं.

    मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ' कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ' बेबी' , 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , ' नरू आणि जान्हवी ' ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णी यांच्या 'बन्या -बापू' मधला प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणारा मोहन गोखले यांचा बन्या प्रेक्षकांना आवडला.

    'श्वेतांबरा' या मालिकेने मोहन गोखले यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'मिस्टर योगी' मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी 'हिरो हिरालाल',' मोहन जोशी हाजीर हो' या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भुमिका केल्या.

    समांतर सिनेमांमधेही मोहन गोखले यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच ' मिर्च मसाला' , सई परांजपेंचा “ स्पर्श' , सईद मिर्जा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' , मीरा नायरच्या ' मिसिसीपी मसाला' या भूमिका चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.

    शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी व सखी गोखले ही कन्या. शुभांगी गोखले यांनी अनेक सिनेमे, मालिकांमध्ये कामे केली आहेत. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. त्यांनी 'आत्मकथा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. अनेक मालिका, सिनेमांतून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कथा, ललित लेख यांद्वारेही वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मराठी मालिका आणि 'लापतागंज' या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.

    कमल हसनाच्या ' हे राम ' च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना मोहन गोखले यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मा.मोहन गोखले यांची कारकीर्द

    नाटके
    कस्तुरीमृग, सावित्री, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, घाशीराम कोतवाल, बीज, सूर्याची पिल्ले, देणाऱ्याचे हात हजार, गिधाडे, हरी अप हरी, नरु आणि जान्हवी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, हसा फुलांनो हसा, मी कुमार, बेबी, शॉर्टकट.

    दूरदर्शन मालिका
    श्वेतांबरा, देखो मगर प्यारसे, यात्रा,भारत एक खोज, लेखू, दोपहर का ठहराव, जंजीरें, अल्पविराम, मिस्टर योगी, भंवर, सी आय डी, करमचंद, जमीर, जुनून, आशीर्वाद, उजाले की अौर, शक्तीमान, बायबल, आहट, देखो मगर प्यारसे, दुनिया रंग रंगीली.

    एकांकिका
    मात, कैद, लिफ्ट, ती येते, बदाम राणी चौकट गुलाम, स्वराज्याचा कानमंत्र, झुलता पूल, खलित्यांची लढाई, डियर पिनाक, कदाचित, एका म्हाताऱ्याचा खून.

    मराठी चित्रपट
    बन्याबापू, ठकास महाठक, हेच माझे माहेर, संसार पाखरांचा, माफीचा साक्षीदार, अरे संसार संसार, आज झाले मुक्त मी, जगावेगळी प्रेमकहाणी, धाकटी जाऊ, अंगार, राजाने वाजवला बाजा, ध्यासपर्व, कैरी.

    हिंदी चित्रपट
    स्पर्श ,हिरो हिरालाल,मिर्च मसाला,अंधेरनगरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,हंगामा बॉंम्बे स्टाईल ,मोहन जोशी हाजिर हो,कल का आदमी,मिसिसिपी मसाला(English)आदि मिमांसा(अोरिया)भवनी भवाई(गुजराथी)हंसी हंसलाल (गुजराथी)हे राम (अपूर्ण)

    दिग्दर्शन
    महापूर,बीज,भाऊ मुरारराव,फरारी

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 29, 2017


  • प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

    विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या.

    बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले.

    सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. १९६५ पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली.

    १९५७ मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. मा.नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 8, 2019


  • मनोहर लेले

    इ-पुस्तकात लेले यांनी तुलसीदासांच साहित्य श्राव्य माध्यमातही उबलब्ध करून दिले आहे. या शिवाय तुलसीदासांच्या दोह्यांचे अर्थ वाचकांसाठी सुस्पष्ट करून दिला आहे.

      July 12, 2011