(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक दिग्दर्शक अभिनेता विराजस कुलकर्णी

    विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्यांनी एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कनिष्ठ महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात गेले. त्यानंतर त्यांनी यूपीजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन्सचे शिक्षण घेतले.

      March 1, 2024


  • आंनदयात्री कवी बा भ.बोरकर

    आंनदयात्री कवी बा भ.बोरकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यातील कुडचडे येथे झाला.
    देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
    चांदणे ज्यातून वाहे, शुभ पाऱ्यासारखे.
    असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी! बाळकृष्ण भगंवत बोरकर उर्फ बा भ. बोरकर.

    १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ. बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. मा.बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

    निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.

    १९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी मा.भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

    कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. मा.बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता .भारत सरकारने ‘पद्मकश्री ’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    बा भ. बोरकर यांची मा.पु.ल.देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
    https://www.youtube.com/watch?v=JbqvWiVvJoI
    https://www.youtube.com/watch?v=gFFLRyizEKQ

    तव नयनांचे दल हलले ग
    https://www.youtube.com/watch?v=34DeXdkusBY

    आयुष्याची आता
    https://www.youtube.com/watch?v=q_6Pp56xHSU
    बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
    इतुक्या लवकर येई न मरणा
    https://www.youtube.com/watch?v=UGmkOw7M1eU
    बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
    बा. भ. बोरकर यांच्या 'जपानी रमलाची रात्र' या कवितेचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले वाचन
    https://www.youtube.com/watch?v=uQrxXJ70lcM

      November 30, 2018


  • कविता राऊत

    आंतरराष्ट्रीय पातळीवर भरवल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धा असोत, या स्पर्धामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा आणि थरारकतेचा कोणता भाग असेल तर तो अ‍ॅथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्सचा! अ‍ॅथलेटिक्समध्ये तर अगदी ‘पळा पळा कोण पळे पुढे तो’ अशी चुरस आणि त्यामागे असणारी जिद्द यांचे प्रदर्शन असते. गुआँगझूमध्ये सध्या चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत या दोघींनी पाठोपाठ येऊन अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले.

    प्रीजा श्रीधरन हिने ही स्पर्धा ३१ मिनिटे आणि ५०.४७ सेकंदांमध्ये जिंकली. तिच्यामागे अगदी सूतभरावरच असणारी कविता दुसरी आली आणि ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. तिने हे अंतर ३१ मिनिटे आणि ५१.४४ सेकंदांत पार केले. म्हणजेच एका सेकंदापेक्षाही कमी वेळाने ती मागे पडली. कविताचा ही सर्वोत्तम वेळ आहे, असे म्हटले पाहिजे. गेल्याच महिन्यामध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत तिला एवढय़ाच अंतरासाठी ३३ मिनिटे आणि ५.२८ सेकंद एवढा वेळ लागला होता. त्या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. त्या तिच्या यशाविषयी ‘लोकसत्ता’ने ‘सावरपाडय़ाची कविता’ हा अग्रलेख (११ ऑक्टोबर) लिहिला होता. प्रीजा आणि कविता यांच्यात पहिला आणि दुसरा क्रमांक हा अक्षरश: ‘फोटोफिनिश’ने ठरवण्यात आला. प्रीजाला सुवर्णपदक मिळाले आणि आपल्याला ते मिळाले नाही म्हणून कविताला नक्कीच वाईट वाटलेले नाही. प्रीजा श्रीधरन ही केरळची मुलगी. तिचा जन्म १३ मार्च १९८२ रोजी इडुक्की जिल्हय़ात मुल्लकाणममध्ये झाला. २००६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती पाच हजार आणि दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पाचवी आली होती. थोडक्यात तिचे पदक हुकले होते. २००७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मात्र तिने रौप्यपदक मिळवले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत ती पात्र ठरली, पण प्रत्यक्ष तिचा क्रमांक पंचविसावा आला होता. गुआँगझूमध्ये तिचा धावण्याचा वेग हा तिचा विक्रमी आहे, असे म्हटले तरी चालेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यासाठी तिने ३२ मिनिटे आणि ४९.४७ सेकंद एवढा वेळ घेतला होता. ती तिची सर्वोत्तम वेळ होय. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रीजा तापाने फणफणली होती. त्यामुळे तिला स्पर्धेपासून दूर राहावे लागले होते. आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आईला देते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिला तिच्या आईने अगदी तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपले होते. तिला एक भाऊ आहे आणि आई हे तिचे सर्वस्व आहे. तिने आपले पदक आई आणि तिचा भाऊ यांना अर्पण केले आहे. तिची आई आजही दुसऱ्यांच्या घरी काम करून आपला संसार चालवते. सुधा सिंग ही दुसरी सुवर्णपदक विजेती! अडथळय़ांच्या स्पर्धेत तिने तीन हजार मीटरसाठी नऊ मिनिटे आणि ५५.६७ सेकंद एवढा वेळ घेतला. गुआँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला मिळालेले यश हे अनपेक्षित आहे, असे तिनेच म्हटले आहे. या स्पर्धेतल्या चिनी स्पर्धकांमुळे आपल्या मनावर प्रचंड दडपण होते, असे ती म्हणाली आहे. सुधा ही उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीची कन्या होय. तिने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असले तरी आपल्याबद्दल खेळाडूंची उपेक्षा वृत्ती आपल्याला बोचत होती, असे तिचे म्हणणे आहे. कदाचित त्यामुळेच तिला या यशाचे अप्रूप वाटत असले पाहिजे. शेवटच्या चारशे मीटरमध्ये तिने ही बाजी मारली, अन्यथा तिचे पदक हुकण्याचीच शक्यता होती. कविता राऊत ही महाराष्ट्राची कन्या. तिचे वडील वनखात्यात कामाला आहेत. ती आदिवासी भागातून आलेली आहे. तीही गरिबाघरची लेक आहे. घराची जमीन शेणाने सारवण्यापासूनची सर्व कामे तिने केलेली आहेत आणि आताही ती करताना तिला ओशाळवाणे वाटणार नाही. नाशिक जिल्हय़ात हरसूल तालुक्यातील सावरपाडा या गावची ही कन्या. दहावीस किलोमीटर पाण्यासाठी वणवण करायची सवय असलेली ही मुलगी एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत यशस्वी होईल, अशी महिन्याभरापूर्वी कुणी अपेक्षाही केली नसती. पण तिच्या पदरी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचे यश होते. तिला मिळालेले कांस्यपदक तिला अधिक उंची गाठण्यासाठी खुणावत होते! ५ मे १९८५ रोजी जन्मलेली कविता लागोपाठच्या दोन महिन्यांत दोन पदकांची मानकरी ठरली आहे आणि याच क्रमाने पाहिले तर या तिघी २०१२ मध्ये लंडनला होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी होतील, अशी आशा करायला हरकत नाही. या तिघींमधला एक समान दुवा हा, की त्या सामान्य परिस्थितीतून पुढे आल्या आणि त्या ग्रामीण भागात वाढल्या आहेत. त्या जिंकतील आणि त्यांनी जिंकावे यासाठी अर्थातच समाजाने आणि सरकारने त्यांची जिद्द टिकावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारने त्यांना आतापासूनच धावण्यायोग्य वातावरण निर्माण केले तरी खूपच साहय़ होईल.

    -----------------------------------------------

    राऊत, कविता

    सावरपाडा एक्स्प्रेस अर्थात कविता राऊत. भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर रोवणा-या कविताने हे सारं अल्पावधीत कमावलेलं नाही. कित्येक वर्षांची तपश्चर्या यामागे आहे. धावणं तिच्या नसानसात आहे. तिने लहानपणासूनच काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या होत्या. त्याप्रमाणेच तिची पावलं पडताहेत. पायाला भिंगरी लावून पळणारी कविता घरात मात्र अतिशय शांत आहे... सांगताहेत रामदास काशिनाथ राऊत.

    मला आजही ते दिवस लख्खपणे आठवताहेत. तेव्हा कविता ठाणापाडा आश्रमशाळेत होती. सणाच्या दिवशीही तिचं दर्शन आम्हाला दुर्लभ होतं. एकुलत्या एका मुलीसाठी मी डब्यात काही गोडधोड घेऊन जात असे. मी पोहोचलो की ती डबा उघडण्याआधी सुमित्राची, तिच्या आईची चौकशी करीत असे. त्यावेळी डोळे भरून यायचे. घरी असल्यावर कविता हाताला धरून शेतात जात असे. तिने लहानपणी कधीही उचलून घेण्याचा हट्ट केला नाही की तालुक्याच्या गावी बाजारला जाताना पायी चालण्याचा कंटाळा केला नाही. त्यातूनच की काय तिला भविष्य खुणावताना दिसलं असावं. झोळीतून उतरल्यावर बोट धरून चालायला ती शिकली असेल, पण आज सगळ्या जगाच्या पुढे पळूनही तिने माझं बोट सोडलेलं नाही. खेळता खेळता कविता कधी मोठी झाली ते कळलंच नाही. शाळेसाठी स्वत: तयारी करताना ना दप्तर ना खाऊसाठी पैसे. तिला परिस्थितीची जाणीव होती. सात किलोमीटर अनवाणी शाळेत जाणं, लहान भावांचा सांभाळ करून घरातील सर्व कामं करणं हे सारं ती प्रेमानं करायची. तिने कोणत्याही कामाला कधी नाक मुरडलं नाही. ठाणापाडा आश्रमात दाखल झाल्यावर तिचं जग आश्रमापुरतंच मर्यादित राहिलं. तिने हरसुल किंवा इतर तालुक्याचं ठिकाण कधी पाहिलं नाही. या आश्रमशाळेत प्रवेश घेतल्यानंतर ननाशी येथे प्रथमच १०० मीटरमध्ये विभागीय पातळीवर तिने प्रथम क्रमांक पटकावला. हे तिचं पहिलंवहिलं घसघशीत यश, त्यानंतर मात्र आयुष्यात तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

    ठाणापाडा आश्रमशाळेत मुख्याध्यापक खंडु भोये यांनी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. पुढे कविताने सातवीसाठी हरसूल केबीएच विद्यालयात प्रवेश घेतला. येथे तिने पुन्हा प्रशिक्षक केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदकाची कमाई करून शाळेचं नाव उंचावलं. सुटीमध्ये घरी आल्यावर कविता विहिरीवर पाणी आणण्यास स्वत: जात असे. यशाची हवा तिच्या डोक्यात कधीच गेली नाही. तिचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. ती सुमित्राला स्वयंपाकातही मदत करत असे. घरकामाला तिने कधी नाही म्हटलं नाही. यावरून मला एक आठवण झाली, कविताला स्वयंपाकाचं खूप वेड आहे. स्वयंपाकघरात लुडबुड करायलाही तिला आवडत असे. एकदा तिच्यावर जबाबदारी सोपवून सुमित्रा बाहेर गेली होती. चुलीवर डाळ शिजत ठेवलेली, पण लक्षात न राहून कविता खेळायला निघून गेली. इकडे डाळीचा कोळसा झाला. घरी आल्यावर सुमित्राने तिला खुप सुनावलं परंतु कविताने हूं की चू न करता सर्व ऐकून घेतलं. चूक झाल्यावर ती स्वीकाराणं हा तिचा गुण आहे. त्यानंतर मात्र कविताने पुन्हा अशी चूक कधीच केली नाही. एका वेळी एकच काम हा खाक्या तेव्हापासून तिने स्वीकारला.

    विश्व हिंदु परिषदेच्या वसतीगृहात प्रवेश घेतल्यावर तिथल्या महिला व्यवस्थापक त्रैलोक्य यांनी कविताला पुढे जाण्यास मदत केली. या शाळेतर्फे कविता एका विभागीय स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, योग्य प्रशिक्षण नसल्याने तिला या स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया(साई)च्या नाशिक केंद्रात आणलं गेलं. त्या स्पर्धेत कविताने एक पदक तर मिळवलंच पण तिला या केंद्राचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्या रूपाने गुरूही लाभले. तत्पूर्वी पुरेसं प्रशिक्षण नसतानाही तिने बंगलोरला झालेल्या शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पधेर्त एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली होती. कविता मला नेहमी विचारायची की, बाबा मला मोठ्या स्पर्धेत कधी भाग घ्यायला मिळेल. तिची ही आकांक्षा लवकरच पूर्ण होणार होती.

    भोसला मिलिटरी कॉलेजला गेल्यावर तेथे शहराच्या चमचमत्या विश्वात ही हरवून जाईल असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही. तिला तिथे विजेंदर सिंग यांच्यासारखे प्रशिक्षक भेटले आणि तिचं आयुष्यच उजळून गेलं. विजेंदर तिचे प्रशिक्षकच नाही तर तिचे पालकही झाले. कविताच्या धावण्यात दम आहे, हे लक्षात आल्यावर विजेंदसिंग यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केलं. प्रारंभीच्या काळात शनिवार सायंकाळ ते सोमवार सकाळ या काळात प्रशिक्षणासाठी कविता हरसूलहून नाशिक गाठत असे, पण हे अवघड होऊ लागल्यावर तिला नाशिकच्या 'भोसला'मध्ये प्रवेश देऊन विजेंदरसिंग यांनी स्वत:च्या घरीच कविताच्या राहण्याची सोय केली. ती आज यशस्वीतेच्या शिखरावर आहे, त्यामागे विजेंदर यांचा हा पाठिंबा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गाजवण्यासाठी गेलेली कविता आम्हाला तब्बल तीन वर्षांनी दिसली. सरावासाठी ती बेंगलोरला होती त्यावेळी आम्ही केवळ मोबाइलवर संपर्क साधायचो. सुमित्राचे डोळे नेहमी तिच्या आठवणीने ओले व्हायचे. मी तिची समजू्त काढायचो. आपली मुलगी देशासाठी खेळतेय, तिला असं भावनेत अडकवू नको, असं तिला सांगायचो. मात्र एकांतात असल्यावर मलाही तिची फार आठवण यायची. लहानपणचे सारे दिवस डोळ्यात गोळा व्हायचे. त्यावेळी कधी वाटायचं, तिला म्हणावं 'कविता सारं सोडून दे बेटा अन् निघून ये परत', पण मग माझ्यातील पित्यापेक्षा माझ्यातील समाजसेवक प्रभावी ठरायचा. सुमित्राचा जीव मात्र वरखाली होत असे. मी तिला म्हणायचो की, हे दिवस लवकरच जातील. राष्ट्रकुलच्या वेळी कविताला खेळताना पाहण्याची हरसूलच्या ग्रामस्थांची फार इच्छा होती. त्यासाठी नितीन देवरगावकर यांनी लाइव्ह सोय करून दिली. तिचं यश पाहून गावकर्‍यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मी भरून पावलो. कविताच्या यशामागे तिच्या मेहनतीबरोबरच तिच्या आईचा त्यागही आहे. सावरपाडा येथे आई एकटीच राहते. लहान भाऊ शिक्षणासाठी बाहेर, वडील नोकरीनिमित बाहेर. आई शेतामध्ये एकटीच राबते म्हणून मला तिने राजीनामा देण्यास सांगितलं. तिचा तो हट्टाचा निर्णय ऐकून ती माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे असं वाटलं. वाटलं, आता कविता खर्‍या अर्थाने मोठी झाली आहे. जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा वाटतं की तिनं लग्न तर करायला हवं, पण आम्ही तो निर्णय तिच्यावर सोपवला आहे. आम्ही तिच्या भावना समजू शकतो. ती म्हणते की, 'भारतासाठी मला मेडल आणायचंय. लग्न वगैरे नंतर करू. मी राष्ट्रकुलनंतर ऑलम्पिकमध्ये तिरंगा फडकवला तर मला लग्नापेक्षा अधिक आनंद होईल.' कविताच्या या विचारांचा मला अभिमान वाटतो.

      August 5, 2017


  • अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक फराह खान

    फराह खानने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले असून चार चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९६५ रोजी झाला.
    २०१२ सालच्या शिरिन फरहाद की तो निकल पडी ह्या चित्रपटामध्ये तिने नायिकेची भूमिका केली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 11, 2017


  • ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते

    आज ३१ ऑक्टोबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांची पुण्यतिथी.

    मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे मा.सुमती गुप्ते.

    त्यांचा जन्म १९१९ मध्ये वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी मा. विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले. ‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत.

    सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 31, 2016


  • बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन

    बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला.विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

    एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले.

    त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते.

    प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2018


  • शोभना समर्थ

    साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.

      April 22, 2010


  • विजयसिंह मोहिते-पाटील

    कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नरत असणारे नेते.

      September 3, 2010


  • पूजा विजय सहस्त्रबुद्धे

    वयाच्या ९ व्या वर्षांपासूनच तिनं बुस्टर क्लब इथे सौ. शैलजा गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली टेबलटेनिसचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. २००१ पासून २०११ पर्यंत राज्यस्तरावर ठाण्याचे प्रतिनिधीत्व करुन वैयक्तिक ६ सुवर्णपदकांसह; सांधिक १० सुवर्ण, १ रौप्यपदक तिने पटकावलं आहे.

      May 16, 2014


  • चंदू बोर्डे

    १९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही.

      July 21, 2021