(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सीमा देव

    सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ. सीमा देव ह्या गिरगावात राहत होत्या. त्यांचा जन्म २७ मार्च १९४२ रोजी झाला.तीन बहिणी व एक भाऊ यांच्यापैकी त्या सगळ्यात लहान. वडील गोल्डन टोबॅकोमध्ये कामाला होते. दहा बाय चौदाच्या लहानशा खोलीत त्यांचे जवळजवळ आठ-दहा माणसांचं कुटुंब राहत असे. काही कारणाने कुटुंब चालवण्याची जबाबदारी मा.सीमा देव आईवर पडली. पण जेव्हा थोडं आर्थिक स्थैर्य आलं तेव्हा त्यांनी मा.सीमा देव यांना नृत्य शिकायला पाठवलं. कथ्थक शिकायचा विचार सोडून दिला. मा.सीमा देव या नऊ वर्षाची असताना एका बॅलेमध्ये गेल्या. आमच्या शेजारी राव म्हणून फॅमिली होती. त्यांनी भारती विद्या भवनमध्ये होणा-या या बॅलेबद्दल सांगितलं. त्यात त्या काम करू लागले. ‘राम’ नावाच्या बॅलेमध्ये कनक रेळे सीतेचं काम करत. ‘गीत गोविंद’ आणि ‘नुरजहाँ’, हे आणखी दोन बॅले होते. विरेंद्र देसाई यांनी हे बॅले बसवले होते. त्यांना या बॅलेच्या एका शोचे वीस रुपये मिळत होते. दर महिन्याच्या शनिवार-रविवारी त्या बॅलेत काम केल्यावर ऐंशी रुपये मिळायचे. घरासाठी ते खूप होते. इब्राहिम नाडियादवाला एकदा हे बॅले पाहायला आले. या बॅलेत मा.आशा पारेख नुरजहाँची भूमिका करत असे तर मा.सीमा देव धोबिणीची भूमिका करायच्या. इब्राहिम नाडियादवाला यांनी आशा पारेख आणि मा.सीमा देव यांना चित्रपटात काम करणार का, असं विचारलं. चित्रपटाचं नाव होतं ‘अयोध्यापती’. उषा किरण, अचला सचदेवही त्यात होत्या. या चित्रपटात मा.सीमा देव यांनी लक्ष्मणाच्या पत्नीची म्हणजे ऊर्मिलाची भूमिका केली होती. दोघींचं शूटिंग झालं, मात्र आम्हाला अजिबात संवाद नव्हते. आम्ही दररोज सजूनधजून सेटवर बसून राहत असू. मात्र त्या कामाचे त्यांना त्या काळात पाचशे रुपये मिळाले होते. तो काळ होता १९५७चा. मा.निवेदिता जोशी यांचे वडील गजानन जोशी यांनी त्यावेळी रंगभूमीवर प्रयोग सुरू असलेल्या ‘अंमलदार’ या नाटकात काम करण्याबद्दल मा.सीमा देव यांना विचारलं. मा.प्रभाकर पणशीकर या नाटकात भूमिका करत होते. त्यातली कुंदाची भूमिका करण्यासाठी त्यांनी मला विचारलं. एका प्रयोगाचे तीस रुपये मिळणार होते. या नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच त्या वेळच्या ‘लोकमान्य’ या वर्तमानपत्रात मा.सीमा देव यांच्या कामाचं कौतुक छापून आलं होतं. हे नाटक सुरू असतानाच सीमा देव यांना असे समजले की फिल्मिस्तान मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. मा. सीमा देव रेल्वेने गोरेगावला जायला निघाल्या. पुढच्याच स्टेशनवर म्हणजे ग्रॅण्ट रोडवर त्यांच्या डब्यात एक तरुण चढला. तो चित्रपटात काम करणाराच होता. ते मा.रमेश देव होते. मात्र त्यावेळी एका चित्रपटात त्यांची खलनायकी भूमिका गाजली होती. जालान त्यावेळी फिल्मिस्तानचे मालक होते. दत्ता धर्माधिकारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. चित्रपटाचं नाव होतं ‘आलिया भोगासी’. यात जयश्री गडकर या प्रमुख भूमिकेत होत्या. मा.सीमा देव यांनी फिल्मिस्तान एकूण तीन चित्रपटांत लहानसहान भूमिका केल्या. फिल्मिस्तानमध्ये त्यांनी मा.रमेश देव यांच्या बरोबरही एका चित्रपटात काम केलं. फिल्मिस्तान सोडल्या नंतर, मा.व्ही. शांताराम यांचे कनिष्ठ बंधू व्ही. अवधूत ‘ग्यानबा तुकाराम’ या सिनेमाची जुळवाजुळव करत होते. हा चित्रपट मा.सीमा देव यांना मिळाला. याच चित्रपटाच्या काळात मा.सीमा देव व रमेश देव यांचे प्रेम जमलं, या चित्रपटात ते एका बैलगाडीवर ठेवलेल्या गवतात बसलेले आहेत, असा सीन होता. बैलगाडी दूरवर नेण्यात आली. शॉट घेणार तेवढ्यात एक ढग आला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, तिथेच बसून राहा. ते दोघे तिथे बसले असतानाच रमेश देव यांनी त्यांना विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का? त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९६३ ला त्यांचा विवाह झाला, तो कोल्हापूर येथील राजाराम थिएटरमध्ये. चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडपे म्हणून अमिताभ आणि जया यांच्या तोडीस तोड रमेश व सीमा देव यांचे उदाहरण दिले जाते.मा.रमेश देव यांच्याबरोबरच्या त्यांच्या संसाराचं वर्णन तर एक दाम्पत्यजीवन असंच करावं लागेल. फिल्मिस्तान मध्ये काम करत असताना तेव्हा मा.सीमा देव यांनी आपले नाव बदलेले कारण त्यावेळी चित्रपटसृष्टीत तीन नलिनी होत्या. एका ज्योतिषांनी त्याच्या आईला हिचं नाव ‘स’वरून ठेवा, असं सांगितलं होतं. मॅजेस्टिकमध्ये तेव्हा एक चित्रपट लागला होता, त्यातल्या नायिकेचं नाव सीमा होतं, म्हणून मा.सीमा देव यांच्या भावाने, त्यांना आपण सीमा हे नाव ठेवू या, असं सुचवलं.
    मा.सीमा देव यांचे गुरु मा.राजा परांजपे. ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’ या आपल्या त्याकाळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांचे अनुभव सांगताना मा.सीमा देव यांनी राजाभाऊ परांजपे यांच्यासारखे गुरू मिळणे हे आपले भाग्यच होते असे म्हणतात. कारण इतक्या बारीकसारीक गोष्टी ते समजावून सांगायचे की राजाभाऊंसमोर ‘मला जमत नाही’ असे म्हणणे फारच अवघड होऊन बसायचे. त्यांनी घेतलेल्या अभिनयाच्या ‘तालमी’ मुळेच माझा अभिनय परिपूर्ण झाला आणि मराठीप्रमाणे हिंदीतही मला अनेक चित्रपटांत कामे मिळाली, असे त्यांनी सांगितले. मा.राजा परांजपे यांच्या प्रमाणेच मा.राजा ठाकूर आणि मा.मधुकर उर्फ बाबा पाठक या दिग्दर्शकांची ही त्यांना खूप मदत झाली. मा.सीमा देव यांनी मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटातही अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि नामवंत कलाकारांबरोबर काम केले. मा.सीमा देव या बाबत एका मुलाखतीत म्हणतात, मा.संजीव कुमार सारख्या संवेदनशील अभिनेत्याबरोबर काम करताना मला सुरुवातीला अवघड वाटले होते मात्र जेंव्हा त्याने आपणहून ‘मी तुमचा ‘फैन’ आहे असे सांगितले तेव्हा मला खूप हायसे वाटले. आज त्या अभिनयाच्या क्षेत्रातून निवृत्त झाल्यात. मुलं, सुना, नातवंड यांच्यात रमल्यात. परंतु आपलं सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व त्यांनी जसंच्या तसं जपलंय. घरंदाज सौंदर्य आणि आपल्या लाघवी अभिनयाने मा.सीमा देव यांनी प्रेक्षकांना थोडीथोडकी नव्हे तर मराठी पंन्नासेक वर्ष भुरळ घातली. आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या अनेक भूमिकांचं कौतुक झालं. आपलं शालीन व्यक्तिमत्त्व त्यांनी काय जपलं. मा.सीमा देव यांनी मराठी चित्रपटाबरोबरच काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘आनंद’, ‘मर्द’, ‘रूप की रानी, चोरों का राजा’, ‘जय जय शिवशंकर, ‘संसार’ हे काही हिंदी चित्रपट.

    त्यांनी "सुवासिनी" या नावाने आपले आत्मचरीत्र लिहिले आहे. सीमा देव यांना नुकतेच झी गौरवच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सोहळ्यात सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सीमा देव यांची गाणी.

    https://www.youtube.com/watch?v=uydtu9b83Mc

    https://www.youtube.com/watch?v=cI7_7ntHgu8

    https://www.youtube.com/watch?v=NTnmpvviTbI

    सीमा देव यांचे चित्रपट.
    https://www.youtube.com/watch?v=nFiuYXF9nh8

    https://www.youtube.com/watch?v=E7nTbu5nm9o&t=170s

    https://www.youtube.com/watch?v=jPRAZHd6F90

      March 27, 2017


  • विनायक लक्ष्मण भावे

    प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक अशी ख्याती असलेल्या विनायक भावे यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८७१ साली कोंकणातील पळस्पे या गावी झाला होता. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. विनायक भावे यांनी विल्सन विद्यापीठातून बी. एस्सी ची पदवी संपादन केली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.

    विनायक भावे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य महाराष्ट्र कवी नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मासिकाने अनेक मराठी काव्ये, बखरी, व इंग्रजी अमदानीच्या पुर्वी होऊन गेलेल्या कवींच्या कवीतांना पुन्हा उजाळा देऊन या सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची धडक मोहिम राबवली होती. हे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे त्यांचे वाचून झालेल्या ग्रंथसंपदेचे विवेचनात्मक व रसभरित विश्लेषण करणेही चालूच होते. त्यांनी इतिहास संशोधनाची नवी व प्रगल्भ दालने इतरांसमोर उघडली होती.

    साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे. विनायक भावे यांनी आजवर अनेक जुने अप्रकाशित लेखक व कवींच्या, काव्य-लेखनसंपत्तीचे आभ्यासपुर्ण मंथन केले. आध्यात्मिक व वृत्तालंकारादी व्याकरणाच्या जंजाळात फसलेल्या कवितांपेक्षा, त्यांनी मुक्तेश्वरांच्या व शाहिरांच्या कवितांचे, रसग्रहण करण्यात अधिक धन्यता मानली. कारण या कवितांमध्ये भक्तीरसापेक्षा, त्या कवितेच्या आशयाला व भावनेला अधिक आपलेसे केले गेले होते. “महाराष्ट्र सारस्वत“ ही तर त्यांच्या काव्यप्रेमाने गाठलेली उत्कटतेची परिसीमा मानली जाते. ह्या कधीही विसरता न येणार्‍या दर्जेदार साहित्य विवेचकी वृत्तीने रसिकांसमोर उलगडुन दाखविले होते.

    महाराष्ट्र सारस्वतची पहिली आवृत्ती ग्रंथमाला नावाच्या मासिकामध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात सतत भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसर्‍या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. “ग्रंथमाला“त पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे “चक्रवर्ती नेपोलियन“ हा देखील त्यांच्यामधील प्रतिभावंत व बोलक्या लेखकाचा, एक विनम्र प्रयत्न होता. भावे हे कोणताही ऐतिहासिक प्रसंग आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या बळावर जिवंत करण्यात तज्ञ होते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना वारंवार येतो.

    १२ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

      January 12, 2015


  • ई. एस. मोडक

    ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.

    त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.

      August 5, 2017


  • केशवसुत कृष्णाजी केशव दामले

      December 15, 2010


  • डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात.

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत.

    त्यंचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला. ते MS Orthopaedic आहेत. च्या केवळ २८ व्या वर्षी त्यांनी १६व्या लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदारी स्विकारली.

    वेबसाईट : http://drshrikanteknathshinde.in/

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 14, 2016


  • राजमाता जिजाऊ

    जिजामाता या राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.

      January 12, 2022


  • डॉ. तुकाराम मोरे

    भाजीपाल्याच्या भडकत्या भावांची, जनुकीय बदल केलेल्या कृषिमालाबाबतच्या वादाची चर्चा होण्याच्या या काळात भाजीपाला-फळे यांबाबत विशेष संशोधन केलेल्या डॉ. तुकाराम मोरे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती होणे, हा योग महत्त्वपूर्ण मानला जायला हवा.

    ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मोरे यांनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाडलेल्या लक्षणीय प्रभावाची माहिती असणारे कोणीही या नियुक्तीमुळे कृषी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याचीच अपेक्षा करतील. कोल्हापूरच्या ज्या कृषी महाविद्यालयातून डॉ. मोरे यांनी कृषी विषयाची पदवी घेतली, त्याच महाविद्यालयात ते व्याखाता या पदावर रुजू झाले. अर्थातच त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय फळबागा हा होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच आपली डॉक्टरेटही संपादन केली. या परिषदेशी त्यांचा नातेसंबंध दीर्घकाळ टिकला. प्रथम शिक्षणासाठी आणि नंतर शिकवण्यासाठी! या संस्थेत त्यांनी तब्बल सतरा वर्षे अध्यापन केले तसेच संशोधनही केले. फळे आणि भाजीपाल्याचे नवे वाण विकसित करण्याच्या त्यांच्या संशोधनाला खूपच चांगले यश मिळाले. त्यांनी विकसित केलेल्या नव्या जातींची संख्या तब्बल एकतीस एवढी आहे, तर त्यातील नऊ जाती या संकरित आहेत. हेमांगी काकडी, प्राची घेवडा या जाती पुढे लोकप्रिय झाल्या, त्याचे सर्व श्रेय हे डॉ. मोरे यांच्याकडेच जाते. देशाच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सरकारी पातळीवरील सर्व लक्ष हे अन्नधान्याच्या उपलब्धतेकडे होते. देशातील १९७२च्या भीषण दुष्काळामुळे तर अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्याकडे सरकारचा भर होता. अर्थात, अन्नधान्याची गरज मान्य करूनही फळफळावळे-भाजीपाला यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. दिल्लीसारख्या केंद्रस्थानी ते असल्याने आणि त्यांचा त्या क्षेत्रातील अधिकार मोठा असल्याने त्यांच्या विचारांची दखल केंद्रीय नेत्यांना घ्यावी लागली. चौथ्या योजनेपासून फळे-भाजीपाल्याकडे लक्ष दिले जाऊ लागले होते आणि डॉ. मोरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यानंतर मिळू लागले. उद्यानविद्या, समुद्रतीरावरील पिके, सेंद्रिय शेती या तीन विषयांसाठी दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या तरतुदीमध्ये वाढ करावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि या विषयांसाठीची तरतूद चार ते पाच पटींनी वाढविण्यात आली. केंद्रीय शुष्क बागवानी संस्थेत काम करतानाही डॉ. मोरे यांनी देशाच्या दीर्घकालीन गरजेकडे लक्ष दिले आणि अनेक मूलगामी परिणाम करणाऱ्या योजना सुरू केल्या. गोधरा हे ठिकाण जातीय विद्वेषातून रेल्वे जाळण्यात आल्याच्या आरोपामुळे देशामध्ये काही वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र कृषी क्षेत्रातील जाणकारांमध्ये या ठिकाणाची ओळख शेतीसंशोधनाच्या दृष्टीने मोठी आहे. डाळिंब, चिकू आदी फळांच्या संशोधनाचे मोलाचे काम या ठिकाणी चालते. तेथे जांभळाच्या नव्या जाती विकसित करण्यात आल्या. केंद्रीय संस्थेत काम करताना डॉ. मोरे यांनी महाराष्ट्राला न विसरता आपल्या राज्यालाही लाभ करून दिला. पुण्याजवळील जाधववाडी येथे अंजीर-सीताफळ या फळांच्या संशोधनासाठी केंद्र उभारले. त्या केंद्रासाठी एक कोटी नव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आले. केवळ आर्थिक मदत मंजूर करून ते थांबले नाहीत, तर सहा संशोधकांचे पथकही तेथे नेमण्यात आले. अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र उभारण्यात आले, तर अकोल्यामध्ये संत्री संशोधन केंद्र उभारण्यात आले. प्राध्यापक म्हणून डॉ. मोरे यांनी केलेल्या कामगिरीचे मोठेपण काही आकडय़ांवरून दिसून येते. त्यांच्या बत्तीस विद्यार्थ्यांनी पीएच. डी. केली असून तब्बल तेवीस पुस्तके लिहिली आहेत. एकूण ६६६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भाग घेतला आहे. अमेरिकेतील विख्यात कार्नेल विद्यापीठात पीएच.डी.नंतरच्या शिक्षणासाठी ते अडीच वर्षे होते. त्याखेरीज इस्त्रायलसारख्या देशातील शेतीचा अभ्यासही त्यांनी केला आहे. शेती क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाबाबत तसेच निर्माण होणाऱ्या वादांबाबत त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली आहे. हरितगृह म्हणजेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञान नव्याने जेव्हा आले, तेव्हा ते तंत्रज्ञान किती उपयोगी आहे, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. यासाठी आवश्यक असलेले देशी तंत्रज्ञान त्यांना पुरविले. जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मोडिफाईड) शेतीमालाबाबतचा वाद चांगलाच रंगला. हा शेतीमाल आरोग्यास हानिकारक असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्याबाबत दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होऊ लागली. त्यावरून अशा जनुकीय बदल केलेल्या शेतीमालावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र अशा वेळी डॉ. मोरे यांनी ठाम भूमिका घेतली. ‘याबाबत देशपातळीवर संशोधन होऊ द्या, ते संशोधन पूर्ण झाल्यावर मगच त्यावर काय कृती करायची ते ठरवा,’ असे मत ते मांडू लागले. अर्धवट अवस्थेत संशोधन थांबविणे चुकीचे ठरेल, हे त्यांचे मत सर्वानाच मान्य करावे लागले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती आल्यावर त्याचा लाभ ते शेतीला निश्चितच करून देतील, असा विश्वास म्हणूनच सर्वाना वाटतो आहे. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनात आपला देश जगात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्यात प्रचंड सुधारणेस वाव आहे. आपल्या देशातील फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनाचे क्षेत्र अधिक असले तरी एकरी उत्पादन फारच कमी आहे. तसेच निर्यातीतही या उत्पादनांचा वाटा फारसा नाही. आपल्या देशातील अन्नधान्याचे उत्पादन २३ कोटी टनांचे असून भाजीपाल्याचे २२.६ कोटी, तर फळांचे उत्पादन १२.६ कोटी टन एवढे आहे. एवढे उत्पादन असले तरी त्याची योग्य किंमत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचण्यासाठीही काहीतरी करणे आवश्यक असून, त्यासाठी या काळात भरीव काहीतरी होणे अपेक्षित आहे.

      August 5, 2017


  • रंजना देशमुख

    १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. रंजना देसमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’

      April 14, 2010


  • किसन तुळपुळे

    विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार चळवळ ज्या प्रामाणिक आणि निस्वार्थी पुढाऱ्यांच्या जीवावर फोफावली त्या पुढाऱ्यांमध्ये किसन तुळपुळे यांचा समावेश अपरिहार्यपणे करावा लागेल. किंबहुना त्यांच्या समावेशाशिवाय या पुढाऱ्यांच्या यादीला कुठेतरी अपूर्णपणा येईल. महात्मा गांधींनी १९४५ मध्ये अहमदाबादला जाऊन ‘मजदूर महाजन’ या कामगार संघटनेचे काम करण्याचा दिलेला सल्ला धुडकावणाऱ्या तुळपुळेंनी नंतर अहमदाबादमधील सूत गिरणी कामगारांसाठी ‘मिल मजदूर सभा’ स्थापन केली.

    अर्थात कामगार हा त्यांचा प्राण होता आणि ‘मिल मजदूर सभा’ हा श्वास होता. पुण्यामध्ये १९२१ मध्ये जन्म झालेल्या किसन तुळपुळ्यांची मुंबई ही कर्मभूमी होती. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांनी तयारी केली. त्याचबरोबर खडकीच्या दारूगोळा कारखान्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.

    जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया आदी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत नेते त्याकाळातील तरूणांचे आदर्श होते. तुळपुळेही त्याला अपवाद नव्हतेच. या नेत्यांच्या ते संपर्कात आले. चळवळीसाठी काम करीत असतानाच त्यांना १९४३ मध्ये अटक होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली. या दोन वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्या ‘माझी जेलयात्रा’ या पुस्तिकेत नोंदवला आहे. तुरूंगातून सुटल्यावर ते मुंबईला कामगारांच्या चळवळीकडे आकर्षित झाले. साम्यवाद्यांच्या ‘गिरणी कामगार युनियन’मध्ये अनुभव घेतल्यावर ते ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’त गेले.

    राजकीय मुद्दय़ांवर संघ फुटल्यावर ते साथी अशोक मेहतांबरोबर बाहेर पडले आणि ‘मिल मजदूर सभे’त गेले. या संघटनेचे ते पहिले खजिनदार होते. पण नंतर त्यांनी तब्बल २७ वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ही संघटना म्हणजे त्यांचा खरोखरच श्वास होता. दर बुधवारी या संघटनेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. हा त्यांचा नेम शेवटपर्यंत होता. १९५८ मध्ये त्यांची निवड वेतन मंडळावर झाली. त्याचवर्षी अमेरिकेत झालेल्या ‘लीडर एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.

    राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांच्याशी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. १९६८ मध्ये तुळपुळ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिल मजदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी’ स्थापन करण्यात आली. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यामध्ये या सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्य निर्वाह निधीच्या मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती होताच त्यांनी कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली. आणीबाणीच्या काळात त्यांना या मंडळावरून दूर करण्यात आले पण १९७७ नंतर पुन्हा त्याची नियुक्ती करण्यात आली. केवळ कामगारांच्या संघटनांमध्ये त्यांनी काम केले नाही तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.

    कामगार आणि मालक यांच्यात नेहमी सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे, न्याय्य मागण्यांसाठी मिल बंद करायची नाही तर ती सुरू ठेवून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायचा, यावर त्यांचा नेहमी भर असे. रेशम उद्योगातील कामगारांचा लढा लढताना ‘अशोक सिल्क मिल’ आणि एल्डी व्हेल्वेट अ‍ॅण्ड सिल्क मिल’ या दोन बंद गिरण्यांचा प्रश्न त्यांनी याच पद्धतीने लढवला. पाच वर्षे लढा दिल्यावर त्यांनी त्या पुन्हा सुरू केल्याच पण कामगारांची थकीत देणीही मिळवून दिली.

    ५५ वर्षे कामगार संघटनेत काम केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली. किसन तुळपुळे यांनी कामगार चळवळीवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करीत राहणाऱ्या तुळपुळ्यांची श्रीमंती ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या संख्येत होती. त्यांचा साधेपणा सर्वानाच भावणारा होता.

    सच्छिल, निस्वार्थी आणि प्रामाणिक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. कामगारांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात ठेवणारी आहे. मरगळलेल्या कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अखेर ५ सप्टेंबर रोजी विसावली.

      August 5, 2017


  • अभिजीत झुंजारराव

    अभिजीत झुंजारराव

    अभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो.

      October 31, 2020