जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९८६-८७ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसचा व्यवसाय खूपच लहान प्रमाणात होता. काही मोठे प्रकाशक त्या वेळी डॉमिनेटिंग स्टेजला होते. तसंच आपणही मराठी प्रकाशन व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण करायला हवं असं ध्येय ठेवून ते व्यवसाय वाढवत गेले. पुढे मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाउसच्या माध्यमातून प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात भरारी घेतली.
March 3, 2022
मिलन चित्रपटातलं सावन का महिना, सरस्वती चंद्र चित्रपटातलं चंदन सा बदन , कर्मा चित्रपटातलं दिल दिया है जान भी देंगे सुजाता मधलं जलते है जिस के लिये, बंदिनी मधलं मेरे साजन है उस पार आणि दिल ही तो है मधलं तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी. व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसणे.
नूतन यांचे शालेय शिक्षण स्वित्झेर्लंडला झाले. नूतन यांनी अभिनयाच्या क्षेत्रात काम करावे हे शोभना समर्थ यांनीच ठरवले होते; म्हणून नूतन जेमतेम १४ वर्षांचीच असतांना त्यांच्या साठी त्यांनी हमारी बेटी या चित्रपटाची निर्मिती केली. हमारी बेटी इतका चालला नाही; पण नूतन नावाची एक नायिका चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे, हा संदेश योग्य लोकांपर्यंत गेला. त्यामुळे नूतन यांना नगिना हा रहस्यमय चित्रपट मिळाला. यात तिचा नायक होता नासिरखान. हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी असल्याने खुद्द नायिका नूतन या १६-१७ वर्षांचीच असल्याने प्रीमियर शो त्यांना बघता आला नव्हता. या नंतर नूतन यांना नायिका म्हणून जिया सरहद्दी यांचा कलात्मक चित्रपट हमलोग मिळाला. बलराज सहानी, अन्वर हुसेन, सज्जन, श्यामा अशा नामवंत कलाकारांच्या यात भूमिका होत्या. रोशन यांचे स्वरेल आणि लोकप्रिय होणारे संगीत होते. टीकाकारांनी वाखाणलेल्या या चित्रपटाला आर्थिक यश मिळाले नाही. नंतर शीशम , लैला मजनू , हीर शबाब असे चित्रपट करत त्यांना १९५५ साली अमिया चक्रवर्ती यांनी त्यांच्या स्वत: दिग्दर्शित केलेल्या सीमा या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. या भूमिकेने त्यांना पहिले सर्वोत्कृष्ट अभिनयाचे फिल्म फेयर पारितोषिक मिळवून दिले. बारिश , पेईंग गेस्ट, सोने की चिडिया, अनाडी, सुजाता अशा चित्रपटांत शहीद लतीफ, हृषीकेश मुखर्जी, बिमल रॉय यांसारख्या प्रथम श्रेणीच्या दिग्दर्शकांबरोबर नूतन यांनी काम केले. याच काळात चन्दन , कभी अंधेरा कभी उजाला, आखरी दाव, लाईटहाऊस सारखे सुमार चित्रपटही त्यांनी केले. दिल्ली का ठग या चित्रपटात त्यांनी स्विमिंग कॉच्युम घालून खळबळ उडवून दिली होती. नंतरच्या काळात त्यांनी सुजाता, छाबिली, छलिया, कन्हैया, सूरत और सीरत, बंदिनी, तेरे घरके सामने, दिल ही तो है, खानदान , मिलन , सरस्वती चंद्र असे सुंदर चित्रपट केले. यांतील सुजाता, बंदिनी , मिलन या चित्रपटांनी त्यांना ३ फिल्म फेयर पारितोषिके प्राप्त करून दिली. मिलन नंतर दहा वर्षांनी ती चाळिशीत असतांना तिला परत एकदा नायिकेच्या भूमिकेसाठी मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटाने पाचवे फिल्म फेयर पारितोषिक तिच्या पदरात टाकले. त्या वेळेस मीनाकुमारीसह अन्य कुठल्याही नायिकेला अशी आणि इतकी पारितोषिके मिळवता आली नाहीत. नंतरही मेरी जंग या चित्रपटाने तिला सहाय्यक भूमिकेसाठी हे पारितोषिक मिळवून दिले. याच्या जोडीने छलिया आणि अनुराग यांतल्या भूमिकांसाठी तिने नामांकनही प्राप्त केले होते. नूतन त्या लोकप्रियतेच्या ऐन भरात असतांना त्यांनी राज कपूर, देव आनंद आणि अशोककुमार या आघाडीच्या नायकांबरोबर बरेच चित्रपट केले. पण या आघाडीतला चौथा आणि अभिनयाचा बादशहा म्हणून गणल्या गेलेल्या दिलीपकुमारबरोबर तिचा एकही चित्रपट झाला नव्हता. त्या काळात दिलीपकुमारबरोबर काम करण्यासाठी सर्वच नायिका कमालीच्या उत्सुक असत. तसा नूतनचा दिलीपकुमारबरोबर शिकवा चित्रपटाचे शुटींग सुरू झाले होते. पण तो अपूर्णच राहिला होता. अशा काळात के. असीफने तिला मुघले आजम या चित्रपटातील अनारकलीच्या भूमिकेसाठी देकार दिला होता. सलीमच्या भूमिकेत दिलीपकुमार होता. पण नूतनचा मोठेपणा असा की तिने असीफला सांगितले, की अनारकली ही सौंदर्यवती म्हणून प्रसिद्ध होती; त्यामुळे या भूमिकेसाठी मधुबालाशिवाय पर्यायच नाही. नूतन यांनी राज कपूर, देव आनंद, अशोककुमार, बलराज सहानी अशा नामवंतांबरोबर अनेक चित्रपट केले, पण त्याचबरोबर त्यांनी शम्मी कपूर, शेखर, भारत भूषण, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मनीष, अशा त्यावेळेस नाव नसलेल्या नायकांबरोबर बर्यायच सामान्य चित्रपटांतून अनेक भूमिका केल्या. तसेच ती प्रथम श्रेणी नायिका झाल्यावरही शेवटपर्यंत तिने नवोदितांबरोबर चित्रपट स्वीकाण्यास खळखळ केली नाही. मा.संजीव कुमार यांच्या बरोबर तिने देवी, गौरी असे चित्रपट केले. नूतन १९५१ साली मिस इंडिया या किताबाची मानकरी ठरली होत्या. मा.नूतन यांचा सरस्वतीचंद्र हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटात नूतन यांनी दिलेली पोज तर त्याहूनही अधिक प्रसिद्ध झाली होती. सरस्वतीचंद्र चित्रपटात पलंगावर पहुडलेल्या नूतन यांच्या हातात पत्र आहे अशी पोज होती. गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतन यांना जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. १९७४ मध्ये भारत सरकार ने नूतन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रकाश चान्दे
February 21, 2017
वामन दाजी ओक म्हणजे मोरोपंत, मुक्तेश्वर, वामनपंडित, अमृतराव अशा पंतकवींचे महत्व आधुनिक मराठी कवितेच्या उदयकाळात स्पष्ट करणारे अभ्यासक. १७ जून १८८५ रोजी वामन दाजी ओक यांचे निधन झाले.
## Vaman Daji Oak
July 27, 2017
विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲडीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.
May 10, 2010
डॉ.अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे.
अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नीा डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणार्याा कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही. डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत.
त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळविणार्या व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरे.
डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११. डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२ व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 26, 2017
सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.
January 12, 2022
अशा हृदयातून ऐकणार्या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !
May 23, 2014
बालगंधर्व रंग मंदिराची योजना पुणे महानगरपालिकेची. त्याअगोदर आचार्य अत्रे यांनी स्वत: रंगमंदिराची वीस लाख खर्च करून रंग मंदिर उभारण्याची योजना असलेले पत्र पूर्वीच दिले होते ते पत्र आजही नगरपालिका दप्तरांत जमा आहे.
June 27, 2022
ते स्पष्टवक्ते, आशावादी व पक्षीय राजकारणांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दूर ठेवण्याची स्पष्ट दृष्टी असणारे असे समजले जातात.
September 11, 2021
वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे.
April 27, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti