छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे

हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते.



चारुदत्त दुखंडे यांचा जन्म १९५४ सालात झाला.

चारुदत्त दुखंडे यांनी माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शन केले होते. तसेच हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते. त्यात भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , तर माहेरची साडी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, आमच्या सारखे आम्हीच, दोघी, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. चारुदत्त दुखंडे यांना ‘निष्पाप ’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम छाया दिग्दर्शनासाठी राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.

चारुदत्त दुखंडे यांचे निधन २७ मार्च २०१९ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →