(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उदय पारकर

    एका चष्माविक्रेत्या कंपनीची जाहिरात होती- बाई वर्गात येतात आणि फळ्यावर लिहायला लागतात. मात्र, त्यांना लिहिताना बघून मुले बुचकळ्यात पडतात. कारण बाई फळ्याऐवजी भिंतीवर लिहित असतात. चष्मा कंपनीच्या या जाहिरातीतील कल्पक संकल्पनेचा उदगाता होता एक मराठी तरुण उदय पारकर. कोकणच्या मातीचा ठेवा मनात जपणार्‍या पारकर यांनी जाहिरात जगतात १२७ मानाचे पुरस्कार मिळवले. आता स्वत:ची जाहिरात कंपनी आहेच, पण सिंधुदुर्गात युरोपच्या तोडीचा स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत...

    उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख पुढील पानावर वाचा.

    उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख वाचा.

    parkar-uday-modified

      September 11, 2015


  • अरुणा इराणी

    साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांचा जन्म ३ मे १९५२ रोजी झाला. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. 'जहां आरा', 'फर्ज', 'उपकार', 'आया सावन झूम के', 'कारवां' यांसारख्या हिट सिनेमांमध्ये मा.अरुणा इराणी यांनी काम केले. कारवां या सिनेमातील मा.अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', आणि 'दिलबर दिल से प्यारे' ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली. १९७२ मध्ये मा.अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह 'बॉम्बे टू गोवा' या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूदसुद्धा होते.

    अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह 'औलाद', 'हमजोली', 'नया जमाना', 'गरम मसाला' आणि 'दो फूल' या सिनेमांमध्ये काम केले.
    'थोड़ा रेशम लगता है', 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे', 'मैं शायर तो नहीं' हे ही जी सुपरहिट गाणी आहेत, ती मा.अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. मा.अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते. त्यांनी 'फर्ज'मध्ये जितेंद्र, 'बॉबी'मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम'मध्ये जयाप्रदा, 'लवस्टोरी'मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी'मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या. 'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या करिअरमध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली 'जमाना बदल गया' या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 3, 2017


  • विजय जाधव

    पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.

      July 26, 2011


  • भारती गोखले-रुस्तम

    सत्तरीच्या दशकातील उत्तरार्धात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरुन घराघरात पोहोचलेला एक सुमधुर आणि लक्षणीय आवाज म्हणजे भारती गोखले-रुस्तम यांचा.

      July 9, 2012


  • मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्‌स

    बिल गेटस्‌नी १९९३ मध्ये “विंडोज ३.१‘ बाजारात आणले. त्याची महिनाभरात लाखोंवर विक्री झाली. १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस, फ्रंट पेज, इंटरनेट एक्सआपोजर यांची निर्मिती बिलच्या कंपनीने केली.

      October 28, 2021


  • दिग्दर्शक राज खोसला

    मुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले.

    १९५४ मध्ये देव आनंद यांच्या बरोबर राज खोसालांनी "मिलाप" बनवला पण हा चित्रपट तिकीटबारीवर सपाटून आपटला. पण मग सीआयडी आला आणि राज खोसलांच्या विमानानी टेक ऑफ घेतला. काला पानी, सोलवा साल, बंबई का बाबू, एक मुसाफीर एक हसीना, वोह कौन थी, मेरा साया, दो बदन, अनिता, चिराग, दो रास्ते, शरीफ बदमाश, कच्चे धागे आणि अनेक असे अप्रतीम चित्रपट राज खोसला यांनी बनवले.

    अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी एक चित्रपट केला तो म्हणजे दोस्ताना. मेरा साया हा राज खोसला यांचा सर्वात गाजलेला चित्रपट.

    राज खोसला यांचे निधन ९ जुन १९९१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 31, 2018


  • जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला

    बेबी शकुंतला यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला.अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. त्यांचे वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली मराठी अभिनेत्री मा.बेबी शकुंतला अशी ओळख होती, प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़. बेबी शकुंतला यांनी ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्या सारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले होते. रामशास्त्री, शारदा, मायाबाजार, मायबहिणी, सौभाग्य या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. मा.बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत. पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला.बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 18, 2017


  • मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

    लीला नगरकर हे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी धारवाड येथे झाला. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. लीला चिटणीस यांचे वडील त्याकाळी गाजलेल्या नाट्यमन्वतर या मराठी नाट्यसंस्थे मध्ये होते. मा.लीला चिटणीस लीला यांनी हास्यप्रधान चित्रपट, ' उसना नवरा ' यात काम केले. नंतर काही काळ स्टंट अभिनेत्रीच्या रूपात व एक्स्ट्रॉ म्हणूनही कामे केली. लवकरच मास्टर विनायक यांच्याबरोबर, ' छाया- साल, १९३६ ' व प्रभात चे केशव नारायण काळे यांच्याबरोबर, ' वहाँ -१९३७ ' आणि सोहराब मोदी यांच्याबरोबर, ' जेलर -१९३८ ' या त्यावेळी टॉप वर असलेल्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. १९३९ साली मा.लीला चिटणीस यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती विष्णूपंत पागनीस यांच्या जोडीने पागनीसांची बायको म्हणून ' संत तुलसीदास' यातील कामामुळे. पुढे अशोक कुमारबरोबर त्यांची जोडी अतिशय गाजली. लागोपाठ आलेल्या, ' कंगन, बंधन व झुला ' या तीन सिनेमांनी हॅटट्रिक करून त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. मा.लीला चिटणीस यांनी जवळपास शंभर एक चित्रपट केले. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी १९२८ साली झाला होता. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य अल्पजीवी ठरलं. अवघं सहा वर्षांचं! या काळात तीन मुलांचं मातृत्व पदरी आलं. मुलांसाठी, त्यांना चरितार्थासाठी उभं राहणं भाग होतं. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. मा.लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ, तशीच ती धाडसी होती. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे, त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी 'शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची मा.लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्य सिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून मा.लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. मा.लीला चिटणीस या १९७० ला न्यूयॉर्क मध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांना, क्वचित अमेरिकेत येणाऱ्या सहकलाकारांना भेटत होत्या. मा.लीला चिटणीस यांनी ’चंदेरी दुनियेत’ हे जीवनचरित्र लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      July 17, 2017


  • लेखक केशव मेश्राम

    १९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.

      November 24, 2021


  • अश्विनी भावे

    अश्विनी भावे

    मराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातुन तिने हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

      June 9, 2017