(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गायिका नीला भागवत

    हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.

    कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.

    संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
    केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.

    नीला भागवत यांचे साहित्य.
    मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
    तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
    कबीर गाता गाता (२००४)
    शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)

    https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI

    https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NeelaBhagwat

      May 5, 2022


  • माझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर

    पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली.

      July 19, 2019


  • डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता

    अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
    खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
    गालात हासून, ओठात बोलून...
    हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
    जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
    सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
    रांगत रांगत, हअम डौलात...
    गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
    फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
    कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
    झेप झेपावून, तोल सावरून...
    नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
    काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
    माझ्या जीवाचं, सुख दाटलं...

      April 19, 2017


  • अंजनीबाई मालपेकर

    अंजनीबाई मालपेकर

    अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले.

      June 9, 2022


  • गीतकार व संगीतकार आनंद शंकर

    आनंद शंकर यांनी १९६० च्या दशकात लॉस एंजेलिसचा दौरा केला. येथे त्यांनी रॉक संगीतकार ‘जिमी हेंड्रिक्स’ सारख्या पाश्चात्य संगीत दिग्गजांसोबत काम केले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १९७० साली त्यांचा पहिला संगीत अल्बम प्रसिद्ध झाला. इथेच त्यांनी सतारीवर आधारित ‘रोलिंग स्टोन्स’, ‘जम्पिन जैक फ़्लैश’ व ‘लाइट माय फायर’ यासारख्या वेस्टर्न हीट केल्या की ज्या खूप लोकप्रिय झाल्या.

      March 26, 2022


  • बी. जी. चितळे डेअरीचे संचालक भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे

    काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले.

      February 8, 2022


  • बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते जी. पी. सिप्पी

    सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल.

      September 14, 2017


  • शंकर बाळकृष्ण दिक्षीत

    ठाण्यामधील व्यासंगी विद्वानांपैकी घेतले जाणारे नाव म्हणजे शंकर बाळकृष्ण दिक्षीत हे ज्योतिषशास्त्राच्या विविध पैलुंवरील त्यांचा आभ्यास परिपूर्ण पध्दतीचा होता. भारतीय प्राचीन ज्योतिषशास्त्राला मिळालेली अचूकतेची व परिपक्वतेची किर्ती, ही ग्रीसमधील किंवा इतर परकीय ज्योतिषशास्त्रांच्या मुलतत्वांचे अनुकरण केल्याने मिळालेली नसून, हे ज्ञान भारतात रुळलेले आहे व ते स्वकियांच्या इतक्या वर्षांच्या वैज्ञानिक विचारमंथनामुळे व चतुरस्त्र आभ्यासपध्दतींमुळे, पावन व दगडावरच्या रेषेसारखे अनाशवंत झाले आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. भारतातील निरनिराळ्या ज्योतिषशास्त्रीय संकल्पना व निकष हे इथल्या संस्कृतीचे पाईक आहेत, व टॉलेमी पासून इथले ज्योतिर्विज्ञान अस्तित्वात आलेले नाही हे पुराव्यांसहित पटवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    शंकर दिक्षितांनी विद्यार्थीबुध्दिवर्धिनी, सृष्टी चमत्कार, सोपपत्तिक अंकगणित, धर्ममीमांसा व ज्योर्तिविलास, ही विज्ञानावर अधिष्ठीत पुस्तके लिहीली. भारतीय ज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्राच्या इतिहास व विकासावर लिहिलेला ग्रंथ तत्कालीन विद्वानांमध्ये मान्यता पावला होता. दिक्षीत यांचे मराठी ज्योतिषशास्त्राच्या परंपरेला अधिक भरीव व प्रगतशील बनविणारे योगदान म्हणजे त्यांनी, जानार्दन मोडक व भास्कर पाळंदे या तिघा विद्वानांनी मिळून मराठीतील पंचांगांवर पहिले सायंपंचांग प्रसिध्द केले. त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या सखोल आभ्यासामुळे पाश्चात्य इतिहासकार फ्लांट व डॉ.रॉबर्ट सेबेल यांना प्राचीन भारताची कालगणना करणे सोपे गेले. डॉ. फ्लांट यांचा प्रसिध्द शोधग्रंथ गुप्त इन्स्क्रिप्शन्स यात दिक्षितांबद्दल आदर व्यक्त गेला आहे. डॉ. सेबेल यांनीही इंडियन कॅलेंडर या त्यांच्या पुस्तकात दिक्षितांच्या कार्याचा सार्थ गौरव केलेला आहे.

      January 12, 2015


  • कॉमेडी अभिनेते राजपाल यादव

    प्रत्येकजण राजपाल यादव यांच्या अभिनयाचे फॅन आहेत. जरी त्याची उंची खूप कमी असली, तरी त्याची प्रतिभा तितकीच मोठी आहे.

      March 16, 2022


  • प्रतिभावान – संपदा जोगळेकर–कुलकर्णी

    संपदा जोगळेकर–कुलकर्णी अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका … तिची प्रतिभा छायाचित्रांतूनही जाणवते…

    अभिनय, निवेदक, सूत्रसंचालिका, आयोजक, साहित्यिक, कथ्थक नृत्यांगणा, गायिका, दिग्दर्शिका, कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाण करणारी लेखिका अशा नानाविध रूपांतून सहज वावरणारी आणि प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी हरहुन्नरी कलावती म्हणजे संपदा जोगळेकर-कुलकुर्णी. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाच्या पहिल्या संचात अंकुश चौधरी, संजय नार्केकर आणि भरत जाधक या कलावंतांसोबत संपदाने आपला विशेष ठसा उमटवला. ठाणे गौरव पुरस्कार, कलांगण पुरस्कार, अक्षरधारा पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार अशा बड्या पुरस्कारांनी गौरवलेली संपदा जोगळेकर-कुलकुर्णी हे एक वेगळं गुणी व्यक्तिमत्त्व.

    २००८ साली संपदा लिखित ‘गुंथी’ या लघु कादंबरीच्या बातमीच्या निमित्ताने मी आणि संपदा भेटलो होतो. यानंतर विविध वृत्तपत्रांसाठीच्या लेखांकनासाठी आमची भेट होत होती. यानंतर नाटकांच्या निमित्ताने, अनेक संस्थांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आमची भेट होत होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात संपदाची वेगळी छाप असायची. या गाठीभेटी दरम्यान संपदातले विविध कलागुण समोर येत होते. संपदाने सौंदर्यशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पी.एचडी.चा तिचा अभ्यास सुरु आहे. कला सरगम या संस्थेच्या बालनाट्यातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. मग एकांकिका, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा यात तिने यशाची मोहोर उमटवली. कथ्थक गुरु डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडे १८ वर्षे तर पुढे दोन वर्षे डॉ. मंजिरी देव यांच्याकडे तिने कथ्थकचे धडे गिरवले.

    ‘आईचं घर उन्हाचं’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून अभिनयाची सुरुवात केलेल्या संपदाने ‘घर तिघांचं हवं’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘तुंबाडचे खोत’ अशा अनेक नाटकांतून अभिनय सादर करत आपल्या अभिनयानं रसिकमन जिंकलं. तर ‘प्रेम भेट’, ‘पाऊलखुणा’, ‘दामिनी’ अशा पंधराहून अधिक मालिकांतून ती घराघरात पोहोचली. ‘उदय’, ‘शर्यत’ अशा सिनेमांतून तिने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अभिनयाचं हे वेगळं क्षेत्र चोखाळत असतानाच ‘काचपाणी’ (कथासंग्रह), ‘बकुळ फुले’ (वैचारिक लेखसंग्रह), ‘गुंथी’ (लघु कादंबरी) यासाठीच तिने लिखाण केलं. अनेक कार्यक्रमांसाठी, मैफिलींसाठी सूत्रसंचालक, निवेदिका तसेच कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाणदेखील तिने एकीकडे सुरू ठेकलं होतं. गेल्या काही वर्षांत नाटकांत अभिनयासोबतच लिखाण आणि दिग्दर्शिकेच्या भूमिकेतूनही संपदाचा चेहरा पुढे आला.

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या संपदाचं शूट अनेकदा करण्याची संधी मला मिळाली. संपदा नेहमीच फोटोतून समोर आली ती पारंपरिक वेशभूषेतून. मराठमोळ्या वेशभूषेतली, पारंपरिक पेहरावातली संपदा मी अनेकदा कॅमेराबद्ध केली होती. मात्र वैचारिक संपदाचं तिला शोभेल असं कॉर्पेरेट लूकमधलं शूट करण्याचं आम्ही ठरवलं. हा लूक तिच्यासाठी-फोटोच्या दृष्टीने नवा होता. हेच हेरून सुरुवातीला काही पारंपरिक वेशभूषेत तिचे फोटो टिपले. पंजाबी ड्रेसमध्ये संपदाचा हसरा, सोज्वळ चेहरा मी कॅमेराबद्ध केला. हे शूट आउटडोअर करण्यात आलं. यावेळी नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग शूटसाठी झाल्याने हे फोटो अधिक खुलले. यानंतर संपदाचे काही फोटो तिला मिळालेल्या पुरस्कारांसोबत आम्ही टिपले. यावेळी ‘ऑल दी बेस्ट’ची ट्रॉफी हातात घेऊन करण्यात आलेल्या शूटच्यावेळी संपदाचा चेहरा अधिक हसरा वाटत होता. जणू त्यावेळच्या आठवणी एकदम दाटून आल्या असाव्यात. तेव्हाच्या तिच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच नाटकाबद्दलच्या गमती जमती संपदा सांगत होती. यानंतर सिंगल लाईट सिस्टममध्ये संपदाचे इनडोअर शूट आम्ही केलं. या लाइट सिस्टममुळे प्रकाशावर नियंत्रण मिळवणं, विशिष्ट ठिकाणी प्रकाशझोत टाकणं, त्याची तीव्रता कमी जास्त करणं हे यामुळे शक्य झालं होतं.

    साधारणपणे दोन-अडीच तासांच्या शूटनंतर आम्ही कोर्पेरेट शूटकडे वळलो. लाल रंगाचा टीशर्ट त्यावर परिधान केलेला राखाडी रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझरमध्ये संपदाचा कॉर्पेरेट लूक अधिक खुलून दिसत होता. यात वैचारिक संपदा दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. एरवी हसऱ्या चेहऱ्याशी, सहज संवाद साधणारी संपदा मला गंभीर चेहऱ्याची, वैचारिक हवी होती. हा लूक संपदाला सांगितल्यानंतर तिने तसे हावभाव केलेही. मात्र यावेळी तिचं स्मितहास्य काही केल्या संपदाला लपवता आले नाही. संपदा जशी आहे तसेच तिचे हावभाव तिच्या चेहऱ्यावर आणि अर्थातच फोटोत येत होते. या पेहरावात तीच पहिल्यांदाच शूट झालं होत. सुरूवातीला या लूकमध्ये थोडीशी अस्वस्थ असलेली संपदानंतर सहज वावरत होती… आणि त्यामुळेच मला तिचे वेगळे फोटो टिपणं शक्य झालं.

    अनेक वर्षांच्या ओळखीतून मला संपदातले विविध अंगभूत गुण अनुभवता आले. संपदा विविध क्षेत्रामध्ये सहज जरी वावरत असली तरीही तिचा मूळ स्वभाव अभ्यासू आहे. कोणत्या क्षेत्रात किती रमायचं, कधी एखादा विषय सुरू करायचा आणि कधी तो संपवायचा याचा अभ्यास तिने चांगलाच केलेला असतो. सध्या नाटकांत रमलेली संपदा येत्या काही काळात विविध क्षेत्रातही तितकीच सहज वावरताना दिसेल, हे नक्की.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

      February 2, 2019