जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शांतारामबापूंनंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल.
दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी "पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत त्यांनी "टाइमकीपर‘ची नोकरी स्वीकारली; पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांना व्ही. शांताराम यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं. चराचरसृष्टीचा "टाइमकीपर‘ ब्रह्मदेव; त्यानं दत्ताजींच्या कुंडलीत शुभवेळेची नोंद केली; ते शांतारामबापूंचे व दामले-फत्तेलाल यांचे सहायक दिग्दर्शक झाले! आणि १९५० मध्ये त्यांनी "मायाबाजार‘ (हिंदी व मराठी) हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. सुलोचना, बेबी शकुंतला, उषा किरण (यांना दत्ताजींनी नायिकेची प्रथम संधी दिली), राजा गोसावी, शरद तळवलकर (यांनाही रजतपटावर प्रथम संधी दिली), सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, राजा नेने, जयश्री गडकर, रेखा, चित्रा आदी कलावंतांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या. मराठीबरोबरच हिंदीतले प्रथितयश मोतीलाल, सोहराब मोदी, नलिनी जयवंत, गीता बाली, निरुपा रॉय, मीनाकुमारी आदी कलाकारांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं. "बाळा जो जो रे‘, "स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी‘, "भाग्यवान‘, "चिमणीपाखरं‘, "एक धागा सुखाचा‘, "अबोली‘, "सावधान‘, "सुहागन‘ (हिंदी) चित्रपटांबरोबरच "अखेर जमलं,‘ "आलिया भोगासी‘, "लग्नाला जातो मी‘, असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही. याशिवाय "थांब लक्ष्मी कुंकू लावते‘, "विठू माझा लेकूरवाळा‘, "सतीचं वाण‘, "सतीची पुण्याई‘, "सुदर्शनचक्र‘, "भक्त पुंडलिक‘ इत्यादी धार्मिक व पौराणिक चित्रपट तितक्याचच समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले. "भाग्यवान‘, "दीप जलता रहे‘, "मुझे सीने से लगा लो‘, "दौलत का नशा‘ इत्यादी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. "दैवे लाभला चिंतामणी‘, "कुंकू जपून ठेव‘ इत्यादी यशस्वी नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. "कुंकू जपून ठेव‘ या नाटकात नायिकेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती, तीही वयाच्या साठाव्या वर्षी. त्यांचा "महात्मा‘ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या "भाग्यवान‘ नाटकावर आधारित होता आणि तो मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये निर्माण केला होता. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातले पहिले निर्माता-दिग्दर्शक होते. सर्व समीक्षकांनी या चित्रपटाचं यथोचित कौतुक केलं होतं. दत्ताजींचं हास्य ही त्यांना ईश्वतरानं दिलेली देणगी होती आणि कोणत्याही संकटात ते हास्य त्यांना सोडून गेलं नाही. साधेपणा हा त्यां चा गुण होता. एवढंच नव्हे तर, संगीतकार वसंत पवार यांना हिंदी चित्रपटात त्यांनी संधी दिली व त्यांचा रुबाब वाढावा म्हणून त्यांना वूलनचा सूटही शिवून दिला होता. आपल्या "स्टाफ‘वर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. त्यामुळंच एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळातला पगारही ते देत असत! काही काम न करताही आपल्या या कुटुंबाला ते सहा-सहा महिने पोसत असत. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही आपले सहकारी अनंत माने यांना आपल्या मराठी व हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली होती. एखाद्या संतानं प्रेमळ मानवाचं रूप घेऊन तो या मायावी चित्रपटसृष्टीत वावरतोय, असं दत्ताजींना पाहून वाटायचं
दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 3, 2016
सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. 'बिवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट 'मैंने प्यार किया' सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या गाण्यांबरोबरच सलमान यांनी या चित्रपटातून आपले अभिनयाचे नाणेही खणखणीत वाजवून दाखवले आणि बॉलिवुडला एक नवा स्टार मिळाला. बॉलिवूडमध्ये दबंगची ओळख याच चित्रपटातून चाहत्यांना झाली. सलमान यांचा वॉंटेड, दबंग, दबंग-२ आणि एक था टाइगर या सर्व चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पेक्षा ही जास्तीचा गल्ला केला.
या चित्रपटाच्या व्यतिरिक्त सलमान खान यांनी साजन, हम आपके हैं कौन, तेरे नाम आणि हम दिल दे चुके सनम या सारख्या चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच सलमानने रियलिटी शो ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ द्वारे टी.व्हीवर आपली हजेरी लावून चाहत्याना भुरळ घातली. तसेच बॉलिवूडच्या दबंगला दुसऱ्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांना तब्बल ५० कोटी रुपये मोजावे लागतात. सलमान खान यांचे ‘एस.के.बी.एच’ प्रॉडक्शन म्हणजेच सलमान खान बिंग ह्यूमन प्रॉडक्शन या नावाने त्याची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे. या प्रॉडक्शन कपंनीची सुरुवात सलमानने २०११ मध्ये केली होती. या प्रॉडक्शन कपंनी द्वारे पहिला चित्रपट ‘चिल्लर पार्टी’ बनवण्यात आला या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. सलमान खान बिंग ह्यूमन नावाने सामाजिक संस्था देखील चालवतो. त्याच प्रमाणे बॉलिवूडचा दबंग गणपती बाप्पाचा भक्त आहे. सलमान चे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे.
सलमान आजचा सुपरस्टार असला तरी, तो इतक्या सहजतेने इथपर्यंत पोहोचलेला नाही. सलमान यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले, खस्ता खालल्ल्या. काळवीट शिकार प्रकरण, हिट अँण्ड रन प्रकरणामुळे त्याच्या डोक्यावर नेहमीच अटकेची टांगती तलवार राहिली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 28, 2017
मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत.
June 18, 2022
अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष हिने चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तीने काम केले आहे.. तिचा जन्म १३ मे रोजी झाला.
अमृता सुभाष यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/amruta-subhash/
June 4, 2017
जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला.जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला मा.जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे मा.जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे मा.जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले.
१९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड
जिगर मुरादाबादी यांची शायरी.
यूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में
जिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |
.वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,
जिस में ओस के बूँदों की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,
उनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,
उनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,
मदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |
September 9, 2017
दूरदर्शन साठी त्यांनी खूप वर्षे ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘मुखवटे आणि चेहरे’, अशा दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. अनेक साहित्य संमेलनांचे व नाट्य संमेलनांचे कव्हरेज केले. गाण्यापासून ते अभिनेते अभिनेत्रींच्या मुलाखती पर्यंत आणि सप्रेम नमस्कार पासून अनुबोध पटा निर्मीती पर्यंत असंख्य कार्यक्रम सादर केले आहेत.
June 9, 2022
राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील 'आंख का तारा', 'भक्त और भगवान', व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, 'शमशरे आलम' या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली होती. दुर्द्व्याने त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्यांचे पहिले गाणे त्या दहा वर्षाच्या असतना १९३४ साली एच.एम्.वी ने रेकॉर्ड केले होते. मा.राजकुमारी म्हटले की आठवतात तो मा.मधुबाला आणि मा.लता मंगेशकर या दोघीनाही एकाचवेळी इंडस्ट्रीत नाव मिळवून देणारा "महल". या चित्रपटात 'घबराके हम" आणि "एक तीर चला" ही मा.राजकुमारी यांची दोन गाणी अप्रतिम होती. मा.लता मंगेशकर यांनी राजकुमारी बरोबर काही सुंदर गाणी गायली आहेत. यातील काही कोई नैनो में मेरे आके न जाए (मेहरबानी) संगीत-हफीज खान, हम आह भी करते है (वफा) संगीत-विनोद, जिंदगी बदली मुहब्बत का मजा आने लगा (अनहोनी) मा.श्यामसुंदर, नौशाद, बर्मनदा, ओ.पी.नय्यर आदी दिग्गजांकडे काम मिळूनही मा.राजकुमारी फार गाजल्या नाही. रोशन यांनी "बावरे नैन", "अनहोनी" अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांना संधी दिली होती.
राजकुमारी यांची उतरत्या वयात इतकी वाईट परिस्थिती झाली की त्या पाकीजा चित्रपटात कोरस गाताना दिसल्या, संगीत कार नौशाद हे होते,त्यांना हे न बघवल्याने त्यांनी पाकीजासाठी राजकुमारी यांना चित्रपटासाठी काही ठुमरी गाण्याला सांगीतल्या,पण त्या कमाल अमरोही यांनी न वापरता बॅगराऊंडला वापरल्या,त्या अजुन ही एच.एम.व्ही व अमरोही कुटुंबाकडे असल्याचे म्हणतात.
राजकुमारी दुबे यांचे १७ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अमित सयानी यांनी घेतलेली राजकुमारी दुबे यांची मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=gVWMPSI2SNo#action=share
राजकुमारी यांची काही गाजलेली गाणी
'सुन बैरी बलमा कछू सच बोल', नजरिया की मारी-मरी मोरी दइया', 'मुझे सच सच बता दो कब मेरे दिल में समाए थे', 'जब तुम पहली बार देखकर मुस्कराए थे','आंख गुलाबी जैसे मद की प्यालियां', जागी हुई आंखों में है शरम की लालियां', 'एक तीर चला और घबरा के जो हम सर को टकरायें तो अच्छा हो', 'चुन चुन घुंघरवा'
March 21, 2017
शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते. भासाने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तमध्ये राजा उदयनाकडे हत्तीला वीणावादन करून आकृष्ट करण्याची विद्या अवगत होती असा उल्लेख आहे.
‘मातंगलीला’, ‘हस्तायुर्वेद’ अशा ग्रंथांमधून हत्तीच्या प्रशिक्षणाविषयी, त्याच्या आरोग्याविषयी व व्यवस्थापनाविषयी सखोल विचार केलेला आढळतो. सैन्यात हत्तीचा वापर सर्वप्रथम भारतात केला गेला असे सांगितले जाते. पूर्वीच्या राजेरजवाड्यांचे वैभव त्यांच्याकडे असलेल्या गजदळावरून तोलले जायचे. चक्रवर्ती राजाकडे बलाढ्य गजदळ असायचे. हत्तीला धर्मातही विशेष स्थान आहे. गजलक्ष्मी, ऐरावत, गणेश अशा अनेक दैवी रूपांमध्ये हत्तीची आराधना केलेली दिसून येते. लोकसाहित्यातही हत्ती वेगवेगळ्या रूपांत डोकावत राहतो. भारतीय संस्कृतीत हत्ती हे समृद्धी, सृजनशीलता, बुद्धी, औदार्य, शौर्य, मांगल्य व राजयोगाचे प्रतीक मानले गेले आहे.
हत्ती हा मुळात कळप-प्रिय प्राणी… चटकन माणसाळणारा… अशा ह्या विशालकाय, सस्तन, कळप-प्रिय प्राण्याची आपल्या भाई-बांधवांशी संपर्क साधायची क्षमताही अतिशय प्रभावी व संवेदनशील आहे. केवळ ध्वनीच्या माध्यमातूनही हत्ती आपल्या कळपाशी व इतर प्राण्यांशी व्यापक संपर्क साधू शकतो. ह्या लेखात आपण त्याच्या ह्या संवादकुशलतेचीच अधिक माहिती घेणार आहोत. हत्ती आपल्या दृष्टी, गंध, स्पर्श व ध्वनी ज्ञानाचा उपयोग इतर हत्तींशी व प्राण्यांशी संपर्क साधण्यासाठी करतो. त्याला स्पंदन-लहरी देखील चटकन जाणवतात आणि त्यांचा उपयोग तो आपल्या संवाद व हालचालींसाठी करत राहतो.
हत्तींनी दिलेले ध्वनी-संकेत हे वाऱ्यामुळे सर्व दिशांना जातात. त्यातून तो संदेश ज्यांसाठी आहे अशा प्राण्यांपर्यंत व ज्यांसाठी नाही अशांपर्यंतही जात असतो. ध्वनी-संकेत हे तात्कालिक स्थितीचे वर्णन करण्यासाठी जास्त करून वापरले जातात. त्यातही वातावरणामुळे अनेक अडथळे येऊ शकतात. पण त्यावर मात करत हत्ती आपल्या शरीररचनेचा व वेगवेगळे आवाज काढण्याच्या क्षमतेचा समर्थ वापर करून एकमेकांशी संपर्क साधताना दिसतात. त्यांची खासियत म्हणजे खर्ज स्वरांतील व दीर्घ पल्ल्यावर साधलेला संवाद.
हत्ती हा एक विशालकाय देहाचा प्राणी आहे. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.
हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो.
भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.
इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात.
हस्त नक्षत्र लागले की हत्तीची प्रतिमा पाटावर रेखून त्याच्याभोवती फेर धरत ”ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडिला करीन तुझी सेवा…..” अशी हादग्याची किंवा भोंडल्याची गाणी म्हणणे हे महाराष्ट्रातील स्त्री संस्कृतीचे अविभाज्य अंग! गणेशोत्सवात गजाननाची मनोभावे पूजा-अर्चा करून प्रत्येक मराठमोळ्या घरात विघ्नहर्त्या गणपतीला सादर वंदन केले जाते.
हत्ती हा बालगोपालांचा विशेष आवडता प्राणी. कधी ओवीत, कधी अभंगांत, कधी दोह्यांमध्ये, कधी पोथ्या पुराणांमध्ये तर कधी सुभाषितांमध्ये हत्तीविषयीची, त्याच्या स्वभावधर्माविषयीची माहिती पुढे येत राहते. तसेच त्याचे भारतीय संस्कृतीशी असलेले अतूट नाते वैदिक ग्रंथांपासून ते अगदी आताच्या नवकाव्यांपर्यंत साहित्य, कला, शास्त्रांतून आणि विविध माध्यमांतून अधोरेखित होत जाते. हत्तीच्या गुणवैशिष्ट्यांचा वापर करून रचलेली ही काही सुभाषिते त्याचेच प्रतीक म्हणता येतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
August 18, 2017
दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.
July 13, 2022
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्यात वास्तव्यास आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.
May 15, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti