अभिनय सम्राट “डॉ. काशिनाथ घाणेकर”

…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे.



अभिनय सम्राट “डॉ. काशिनाथ घाणेकर” यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.

…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई.

डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. डॉ.काशीनाथ घाणेकर आपला वरळी येथील डेंटल क्लिनिकचा व्यवसाय सांभाळून ते नाटक करीत असत, मात्र नाटक हा त्यांचा व्यवसाय नव्हता तर ते त्यांचे सर्वस्व होते, जीवन होते, ध्येय होते.

त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. आजही भालजींचे चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… संभाजी म्हणजे फक्त आणि फक्त “डॉ.काशिनाथ घाणेकर”…रायगडाला जेंव्हा जाग येते मधला त्याचा संभाजी दुसरा कुणीही करू शकणार नाही…अंगकाठी नसली तरी केवळ जरब बसवणारे डोळे, उत्भेदक अभिनय आणि आवाज या हुकमी अस्त्रांवर त्यांचा संभाजी बघताना अंगावर शहारे येत असत., परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार म्हणताना कासावीस झालेला संभाजी अजूनही डोळ्यांपुढून जात नाही…

डॉक्टरांची रंगमंचावर पहिली एन्ट्री झाली ती गारंबीचा बापू या नाटकातून. त्याचे त्यांनी अनेक वर्ष प्रयोग केले. पण त्यांचा अभिनय गाजला तो प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदाकडून झालेल्या अश्रूंची झाली फुले या नाटकातील लाल्या या भूमिकेपासून. वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मराठी रंगभूमीवर आले या नाटकात मा.दत्ताराम शिवाजी करायचे तर डॉक्टर संभाजी ही जुगलबंदी पाहण्यासाठी नाट्यप्रेमी वारंवार या नाटकाला हजेरी लावत असत.

शरीरयष्टीने किरकोळ असणारे डॉक्टर पॅडींग लावून आणि मेकअप केल्यानंतर आपल्या घुमारदार आवाज आणि धारदार नजरेच्या सहाय्याने जो संभाजी उभा करत की, प्रेक्षक मध्यंतरात तर सोडाच पण नाटक संपल्यानंतरही त्या वातावरणातून बाहेर येत नसत. गारंबीचा बापू या चित्रपटाच्या शेवटी विठोबाssss म्हणून त्यांनी जी आर्त साद घातली होती ती आजही तशीच मनात घुमत राहते…तितक्याच आर्ततेने…

कुणा एकेकाळी संभाजी आणि “डॉ.काशिनाथ घाणेकर” हे कधीही वेगळं होऊ न शकणार समीकरण होतं. मधुचंद्र हा राजदत्त दिग्दर्शित एन. दत्ता यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील सगळी गाणी लोकप्रिय झाली. या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर, उमा यांच्या प्रमुख भूमिकाही गाजल्या. डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी काही हिंदी चित्रपटात कामे केली. कांचन घाणेकरांचे “नाथ हा माझा” हे वाचून तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले जाते.

डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी नाटकांबरोबर धर्मपत्नी, पाठलाग, मधुचंद्र, एकटी, प्रीत शिकवा मला, अभिलाषा, देवमाणूस, अजब तुझे सरकार, झेप, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटांतून कामे केली.

डॉ.काशिनाथ घाणेकर यांचे २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

Author