(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिकेटपटू सिडने बार्न्स

    सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या , तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 1 विकेट घेतली , हा सामना इंग्लंडने 1 इनिंग आणि 124 धावांनी जिंकला. त्यावेळी इंग्लन्डच्या संघात सिडने बार्न्स , कॉलिन ब्लाथे , लेन ब्रॉड हे तिघेही त्यांचा पहिला सामना खेळत होते आणि या तिघांनी दोन्ही इनिंग मिळून 20 विकेट्स म्हणजे त्या सामन्यातील सर्व विकेट्स घेतल्या.

      April 19, 2021


  • निसर्गकवी माधव केशव काटदरे

    हिरवे तळ कोकण' लिहिणारे काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी झाला. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. त्यांची नोकरी कस्टम खात्यात होती. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या. काटदरे यांनीही गोविंदाग्रजांच्याच धर्तीवर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे, कविवर्य़ ना. वा. टिळक, गोविंदाग्रज, कवी विनायक आदी कविश्रेष्ठांवर कविता लिहून त्यांना नमन केलेले आहे. ऐतिहासिक कवितांमध्ये 'पानपतचा सूड', 'तारापूरचा रणसंग्राम', 'जिवबादादा बक्षी' या त्यांच्या कविता उल्लेखनीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचीही अतिशय प्रासादिक भाषांतरेही काटदरे यांनी केलेली आहेत.

    काटदरे यांची रचना विलक्षण सुघड, सौष्ठववूर्ण आहे. मा.काटदरे यांची स्वतःची घाटदार रचना शैली होती. 'ध्रुवावरील फुले', 'फेकलेली फुले' हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत अनुक्रमे १९१५ व १९२१ साली ते प्रकाशित झाले. 'हिरवे तळकोकण' ही कविता १९२१ साली लिहिलेली आहे. माधवांची कविता (१९३५) व गीतमाधव (१९४२) हेही त्यांच्या कवितांचे संग्रह आहेत. काटदरे यांच्या कवितेचा विशेष म्हणजे जुने अनेक सुंदर सुंदर शब्द ते कवितांमध्ये आवर्जून वापरत असत. वापरात नसलेले; पण नेमका अर्थ व्यक्त करणारे शब्द वापरण्याची त्यांची ही खुबी अनेक कवितांमधून आढळते. माधव केशव काटदरे यांचे ३ सप्टेंबर १९५८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 3, 2017


  • त्र्यंबक विनायक सरदेशमुख

    साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि कवी असलेल्या त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २२ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले.

      January 22, 2010


  • पुष्पा पागधरे

    त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.

      July 6, 2022


  • लीला भोसले

    भोसले, लीला

    लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
    लीला भोसले म्हणजे पूर्वाश्रमीच्या लीला चव्हाण. लाल निशाण पक्षाचे नेते यशवंत चव्हाण यांच्या त्या भगिनी. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या लीलाताईंचा वावर सुरू झाला की आपोआपच स्वयंशिस्तीची आणि स्वावलंबीपाणाची झुळूक फिरायला लागायची.

    भावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या राजकीय मार्गदर्शनामध्येच त्या चळवळीमध्ये आल्या. त्यासाठी त्यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पिकेटिंग करणे, प्रभातफेऱ्या काढणे यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना कधी तुरुंगवास झाला नसला तरी तुरुंगामधील राजबंद्यांना बाहेरचे निरोप पोहोचवण्याचे काम त्या करीत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्याने चळवळीतील स्त्रियांच्या भागीदारीवर थोडय़ा मर्यादा होत्या. तरीही सुशीला कुलकर्णी, विमल चव्हाण, सुमन कात्रे, लीला फडके (पाटील), सरल राशिंगकर (नाईक), प्रभा राशिंगकर, शशिकला सबनीस यांच्यासमवेत लीलाताई विविध राजकीय कामे करण्यात पुढे असत. स्त्री शिक्षण, जातिभेदविरोधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. लीलाताईंचे वडील (व्ही. जी. चव्हाण) कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये निस्पृह न्यायाधीश म्हणून ओळखले जात. त्यांनी कधी आपल्या मुलांना चळवळीमध्ये जाण्यापासून रोखले नाही. लीलाताईंच्या राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरचा मोठा वाटा होता. लीलाताईंचे सासरे कै. डी. बी. भोसले हे साखर कारखान्याचे इस्टेट मॅनेजर असल्याने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध होता. चळवळीत वॉरंट असलेल्या कार्यकर्त्यांला आपल्या घरात आश्रय देणे हे जोखमीचे काम लीलाताईंनी आपले आईवडील, सासूसासरे, मोठी बहीण शकुंतला, तिचे पती एस. जी. पाटील यांच्या मदतीने केले. १९४७ मध्ये कॉ. आप्पासाहेबांबरोबर विवाह झाल्यावर त्या पुण्याला आल्या. पुणे महानगरपालिका युनियनच्या कामकाजात सहभागी झाल्या. लाल निशाण पक्षाच्या ‘लाल निशाण’ या पाक्षिकाच्या व्यवस्थापन आणि प्रकाशनाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. माणसाचे गुण हेरून त्याला पोषक असे वातावरण तयार करणे हा त्यांचा गुण होता. १९८० मध्ये त्यांनी मोलकरणींची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टय़ा पालथ्या घातल्या आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले. संघटित आणि सामुदायिक नेत्तृत्व तयार करणे यावर त्यांचा अधिक भर होता. वार्धक्य आणि आयुष्यभर चळवळीत खालेल्या खस्ता यामुळे शरीर थकले तरी मन थकले नव्हते. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी जीवन वाहिले होते.

      August 5, 2017


  • अरविंद गोपीनाथ देशपांडे

    सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव

      December 7, 2011


  • मराठी नाटककार सतीश आळेकर

    महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’सारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! त्यांचा जन्म ३० जानेवारी १९४९ रोजी झाला.

    आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते.

    आळेकरांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. मा.आळेकरांचे शिक्षण पुण्यात झाले. त्याचे मामा काकासाहेब गाडगीळ.

    शाळकरी वयात शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होतं. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.

    फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.

    'मेमेरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध केली. 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.

    'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब', 'महापूर', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. मा.आळेकर यांनी 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. मा. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.

    आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.

    सतीश आळेकर यांचा भारत सरकारने २०१२ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार,द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    नाटककार म्हणून त्यांची प्रतिमा असली तरीही त्यांनी नुकत्याच आलेल्या `व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटात अत्यंत संस्मरणीय भूमिका केली आहे.

    संगीत नाटक अकादमीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.

    सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके
    अतिरेकी, एक दिवस मठाकडे, दुसरा सामना, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, शनिवार-रविवार.
    एकांकिका
    आधारित, आळशी अत्तरवाल्याची गोष्ट, कर्मचारी, जज्‍ज, झुलता पूल, दार कोणी उघडत नाही, नशीबवान बाईचे दोन, बसस्टॉप, भिंत, भजन, मेमरी, यमूचे रहस्य, वळण, सामना, सुपारी.

    सतीश आळेकर यांची वेबसाईट.http://satishalekar.com/

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 31, 2017


  • संशोधक,संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक पं. विष्णु नारायण भातखंडे

    पं. विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी झाला. भातखंडे हे लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले.

    ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल्.एल्. बी. झाले. मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चाल नाही मिळाली. ह्या संस्थेत त्यांनी कितीतरी वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपारिक धृपदे, ख्याल, होऱ्या, तराणे, ठुमऱ्या यांची माहिती व चिजा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना असे आढळून आले, की गायकांच्या चिजांमध्ये व्यक्त होणाऱ्या रागस्वरुपांचा प्राचीन ग्रंथातील रागविचारांशी व उपपत्तींशी नीट मेळ बसत नाही. शास्त्रीय स्वरलिपिपद्धतीचा प्रचार नसल्याने आणि उपपत्तींचे गायकांना ज्ञान नसल्याने ते पारंपारिक चिजांमध्ये बदल करीत आणि नवीनही चिजा बनवीत. त्यामुळे उपलब्ध रागरागिण्या व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तींचा पाया मानून भातखंड्यांनी आपल्या जन्मभर चालविलेल्या संगीतकलेच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रारंभ केला. गायनोत्तेजक मंडळीच्या नियतकालिक बैठकांमध्ये ते वरील विषयासंबंधी पद्धतशीर विचार मांडू लागले. जुन्या ग्रंथांतील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. तद्वतच प्राचीन ग्रंथांर्गत संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यांतील पूर्ण फारकतही त्यांच्या निदर्शनास आली होतीच. त्यातून संगीतशास्त्राची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी करणे व प्रचलित संगीतव्यवहाराशी त्याची सांगड घालणे, हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागले.

    आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रंमती केली (१९०४; १९०७ व १९०८-०९). ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत ह्यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केल्या. संगीतावरचे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन, त्यांतील तत्वविचारांची चिकित्सा केली. महत्वाची हस्तलिखिते नकलून काढली. हिंदूस्थानी संगीतातील स्वरलिपिरचना,रागविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार,थाटपद्धती, वादी-संवादी स्वर इ. विषयांसंबंधी तात्त्विक सांगोपांग चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांतून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपिपद्धती प्रस्थापित केली.

    पंडित भातखंडे यांच्या संगीतकार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि ह्या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीतविद्यालयाची स्थापना केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीतपाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखड्यांच्या हवाली केली (१९१६). ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनी त्यांच्या देखरेखीखाली ‘माधव संगीत महाविद्यालय’ नव्याने स्थापन केले (१९१८) आणि मुख्य म्हणजे भातखंडे यांनी लखनौला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘मॅरिज कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्यूझिक’ हे स्थापन केले (१९२६). या संस्थेचेच रुपांतर पुढे ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’ मध्ये झाले. तसेच या संगीतविद्यालयांसाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम त्यांनी आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यांद्वारे संगीप्रसार व्हावा, म्हणून संगीतपरिषदा भरवण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच होय. त्यानुसार बडोदे (१९१६), दिल्ली (१९१८),वाराणसी (१९१९) व लखनौ (१९२४ व १९२५) येथे परिषदा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीतसंग्रहासारख्या ग्रंथरचनाही केल्या. बव्हंशी १९०८ ते १९३३ या कालावधीत त्यांनी आपली ग्रंथरचना केली.

    त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :

    स्वनिर्मिती ग्रंथ : (१) श्रीमल्लक्ष्यसंगीतम् वअभिनव रागमञ्जरी (संस्कृत); (२) हिंदूस्थानी संगीतपद्धती (मराठी, भाग ४, पृष्ठे सु. २,५००); (३) हिंदुस्थानी संगीतपद्धती क्रमिक पुस्तकमालिका (मराठी, भाग १ ते ६, एकूण चिजा १,८५२); (४) अ शॉर्ट हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ द म्यूझिक ऑफ अपर इंडिया (इंग्रजी); (५)अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सम ऑफ द लीडींग म्यूझिक सिस्टिम्स ऑफ द फिफ्टीन्थ,सिक्सटीन्थ, सेव्हन्टीन्थ अँन्ड एटीन्थ सेंचुरीज(इंग्रजी); (६) हिंदुस्थानी म्यूझिक (इंग्रजी); (७)लक्षणगीतसंग्रह (३ भाग); (८) गीतमालिका (२३ मासिक अंक; प्रत्येक अंकात सु. २५ गीतांच्या बंदिशी); (९) पारिजात प्रवेशिका : पं. अहोबलकृत संगीतपरिजात ग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाषा (मराठी); (१०)रागविबोधप्रवेशिका : पं. सोमनाथकृत रागवियोधग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाष्य (मराठी).

    तसेच त्यांनी काही संगृहीत ग्रंथही प्रकाशित केले,ते असे : (१) पं. रामामात्यकृत स्वरमेलकलानिधी(संस्कृत); (२) पं. व्यकंटमखीकृतचतुर्दण्डिप्रकाशिका (संस्कृत); (३) रागलक्षणम्(कर्ता अज्ञात); (४) राजा तुळजेंद्रकृतसंगीतसारामृतोद्धार (संस्कृत); (५) कवी लोचनकृत रागतरड्‌गणी (संस्कृत); (६) पुंडरीक विठ्ठलकृत सद्रागचन्द्रोदय; रागमञ्जरी, रागमाला,नर्तननिर्णय (चारही ग्रंथ संस्कृतामध्ये); (७) हृदयकौतुककृत हृदयकौतुक व हृदयप्रकाश(संस्कृत); (८) पं. भावभट्टकृतअनूपसंगीतरत्नाकर, अनूपसंगीतविलास वसंगीतअनूपांकुश (सर्व संस्कृतामध्ये); (९) पं. श्रीनिवासकृत संगीतरागतत्त्वविबोध (संस्कृत); (१०) श्रीकंठकृत संगीतकौमुदी (संस्कृत); (११) पूर्ण कविकृत नादोदधि (हिंदी); (१२)चत्वारिशच्छतरागनिरुपणम् (संस्कृत); (१३)अष्टोत्तरशतताललक्षणम् (संस्कृत; ग्रंथकर्ता अज्ञात); (१४) पं. काशिनाथशास्त्री अप्पा तुलसीकृत संगीतसुधाकर,संगीतरागकल्पद्रुमड्‌कुर, संगीतरागचन्द्रिका(सर्व संस्कृतामध्ये) व संगीतरागचन्द्रिकासार(हिंदी).

    यांपैकी काही ग्रंथाची रचना त्यांनी टोपणनावाने केली. उदा., लक्ष्यसंगीत ग्रंथासाठी'भरतपूर्वखंडनिवासी चतुर पंडित' ; हिंदुस्थानीसंगीतपद्धतीसाठी ‘पं. विष्णुशर्मा’; तर चिजांसाठी‘चतुर’ व ‘हररंग’ ही नावे त्यांनी घेतली. शिवाय जुन्या संस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनासाठी‘भारव्दाजशर्मा’ हे नाव स्वीकारले. त्यांची ही ग्रंथसंपदा व मौलिक संशाधन संगीतशास्त्रज्ञांच्या व कलावंतांच्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरक ठरले.

    पं. भातखंडे यांचे १९ सप्टेंबर १९३६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.अरविंद मंगरुळकर,/ गिंडे / मराठी विश्वकोश

      September 19, 2016


  • सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू

    पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता.

      September 25, 2020


  • डॉ. वा. भ. पंडित

    व्यवसायाने शल्यविशारद अशी ख्याती असणारे डॉ. वा. भ. पंडित हे संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासकही होते.

    “शब्दांगण” या प्रसिध्द मासिकाचे जनक म्हणून ते सर्वसामान्यांना परिचित आहेत. कविवर्य म. पां. भावे हे या नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.

    डॉ. अनंत देशमुख, डॉ. महेश केळुस्कर, शिरीष लाटकर, पद्माकर चितळे, गोविंद मुसळे अश्या मान्यवर लेखकांनी “शब्दांगण” मध्ये विविध विषयांवरील सकस लेख लिहून या मासिकाची वैचारिक पातळी अनोख्या उंचीवर नेऊन ठेवली होती.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015