जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला , जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जयजय गौरीशंकर ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण साक्षीदार, अमृत झाले जहराचे, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर बावनखणी हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. गझलसम्राट गालिब, शायरेआजम, शायरीचा शालिमार ही गालिबचे काव्य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे कविकथा हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. शंकर सुखकर हो हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच दृष्टी देऊन जातो. गोखले यांची लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. मा.विद्याधर गोखले यांचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ ग्लोबल मराठी
January 4, 2017
मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.
July 13, 2022
खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं.
July 2, 2022
विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला. बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.
विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते. प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2017
हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर २००८ पासून तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
April 28, 2022
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले.
July 6, 2021
डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेगवेकर हे त्यांचे वडील. . त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.
चंडू डेगवेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले . 'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखाँच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्नाेथमध्ये कलंदरखाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेगवेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्ना'थ या नाटकातली भूमिका वठवली. पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेगवेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते.
'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.
चंदू डेगवेकर हे दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत असत.
डेगवेकर यांनी त्या काळात नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी व प्रयोग केले. चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. पण चित्रीकरणासाठी अनेक दिवस मुंबईबाहेर जावे लागेल आणि नोकरी करत असताना ते शक्य होणार नाही म्हणून ते चित्रपटाकडे वळलेच नाहीत.
डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेगवेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेगवेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. नव्या पिढीकडून बसवून घेतलेली जुनी संगीत नाटके हे डेगवेकर यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. विशेष म्हणजे ही नाटके बसविण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या त्या संगीत नाटकातील विविध पात्रे, त्यांच्या भूमिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला/मानधन आजवर कधीही घेतले नाही. त्यांच्या या निरलस व नि:स्वार्थी सेवेविषयी त्यांना विचारले असता डेगवेकर म्हणतात, संगीत रंगभूमीने मला मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, आर्थिक स्थैर्य असे सर्व काही दिले. संगीत रंगभूमीच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणतेही आणि मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी मी हे काम केले. शिवरंजनी (पुणे), नादब्रह्म परिवार (चिंचवड), कलाद्वयी (पुणे), ऋतुरंग (डोंबिवली) आदी संस्थांसाठी मी जुनी संगीत नाटके नव्याने बसवून दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 17, 2018
साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला.
साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’' पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. 'श्यामची आई'चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. प्रत्येकाची आई `श्यामची आई’प्रमाणेच असावी, असे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटते. दिग्दर्शक मा.आचार्य अत्रे यांचे सृजनशील दिग्दर्शन, तर वनमाला, दामूअण्णा जोशी, माधव वझे, हे सर्वच कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्यावर श्यामच्या आईच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. मराठीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटापैकी एक असणाऱ्या श्यामची आई मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. प्रेमळ पण योग्यवेळी कडक असणाऱ्या श्यामच्या आईची भूमिका अभिनेत्री वनमाला यांनी चपखलतेने बजावली की त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही अभिनेत्रीचा विचार करत येणार नाही. अवखळ, पण गोंडस आणि आईवर मनस्वी प्रेम करणाऱ्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी लीलया साकारली. आई-मुलाचे निःस्वार्थी प्रेम, शिकवण, संस्कार, त्याग या सर्व भावना दिग्दर्शक मा. आचार्य अत्रे यांनी सुंदरतेने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मा.वसंत देसाई यांचे छडी लागे छम छम… आणि भरजरी ग पितांबर… ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर असतात. श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
या चित्रपटाची लिंक
https://www.youtube.com/shared?ci=WZnZCqE5Jg8
March 6, 2017
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
February 11, 2022
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार चळवळ ज्या प्रामाणिक आणि निस्वार्थी पुढाऱ्यांच्या जीवावर फोफावली त्या पुढाऱ्यांमध्ये किसन तुळपुळे यांचा समावेश अपरिहार्यपणे करावा लागेल. किंबहुना त्यांच्या समावेशाशिवाय या पुढाऱ्यांच्या यादीला कुठेतरी अपूर्णपणा येईल. महात्मा गांधींनी १९४५ मध्ये अहमदाबादला जाऊन ‘मजदूर महाजन’ या कामगार संघटनेचे काम करण्याचा दिलेला सल्ला धुडकावणाऱ्या तुळपुळेंनी नंतर अहमदाबादमधील सूत गिरणी कामगारांसाठी ‘मिल मजदूर सभा’ स्थापन केली.
अर्थात कामगार हा त्यांचा प्राण होता आणि ‘मिल मजदूर सभा’ हा श्वास होता. पुण्यामध्ये १९२१ मध्ये जन्म झालेल्या किसन तुळपुळ्यांची मुंबई ही कर्मभूमी होती. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांनी तयारी केली. त्याचबरोबर खडकीच्या दारूगोळा कारखान्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.
जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया आदी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत नेते त्याकाळातील तरूणांचे आदर्श होते. तुळपुळेही त्याला अपवाद नव्हतेच. या नेत्यांच्या ते संपर्कात आले. चळवळीसाठी काम करीत असतानाच त्यांना १९४३ मध्ये अटक होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली. या दोन वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्या ‘माझी जेलयात्रा’ या पुस्तिकेत नोंदवला आहे. तुरूंगातून सुटल्यावर ते मुंबईला कामगारांच्या चळवळीकडे आकर्षित झाले. साम्यवाद्यांच्या ‘गिरणी कामगार युनियन’मध्ये अनुभव घेतल्यावर ते ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’त गेले.
राजकीय मुद्दय़ांवर संघ फुटल्यावर ते साथी अशोक मेहतांबरोबर बाहेर पडले आणि ‘मिल मजदूर सभे’त गेले. या संघटनेचे ते पहिले खजिनदार होते. पण नंतर त्यांनी तब्बल २७ वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ही संघटना म्हणजे त्यांचा खरोखरच श्वास होता. दर बुधवारी या संघटनेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. हा त्यांचा नेम शेवटपर्यंत होता. १९५८ मध्ये त्यांची निवड वेतन मंडळावर झाली. त्याचवर्षी अमेरिकेत झालेल्या ‘लीडर एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.
राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांच्याशी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. १९६८ मध्ये तुळपुळ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिल मजदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी’ स्थापन करण्यात आली. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यामध्ये या सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्य निर्वाह निधीच्या मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती होताच त्यांनी कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली. आणीबाणीच्या काळात त्यांना या मंडळावरून दूर करण्यात आले पण १९७७ नंतर पुन्हा त्याची नियुक्ती करण्यात आली. केवळ कामगारांच्या संघटनांमध्ये त्यांनी काम केले नाही तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.
कामगार आणि मालक यांच्यात नेहमी सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे, न्याय्य मागण्यांसाठी मिल बंद करायची नाही तर ती सुरू ठेवून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायचा, यावर त्यांचा नेहमी भर असे. रेशम उद्योगातील कामगारांचा लढा लढताना ‘अशोक सिल्क मिल’ आणि एल्डी व्हेल्वेट अॅण्ड सिल्क मिल’ या दोन बंद गिरण्यांचा प्रश्न त्यांनी याच पद्धतीने लढवला. पाच वर्षे लढा दिल्यावर त्यांनी त्या पुन्हा सुरू केल्याच पण कामगारांची थकीत देणीही मिळवून दिली.
५५ वर्षे कामगार संघटनेत काम केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली. किसन तुळपुळे यांनी कामगार चळवळीवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करीत राहणाऱ्या तुळपुळ्यांची श्रीमंती ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या संख्येत होती. त्यांचा साधेपणा सर्वानाच भावणारा होता.
सच्छिल, निस्वार्थी आणि प्रामाणिक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. कामगारांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात ठेवणारी आहे. मरगळलेल्या कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अखेर ५ सप्टेंबर रोजी विसावली.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti