(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनुराधा पौडवाल

    अनुराधा पौडवाल – गायिका

      December 15, 2010


  • बॉलिवूडची ‘फॅशन आयकॉन’ – साधना

    आपल्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी 'फॅशन आयकॉन' म्हणून ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला.

    साधना यांचे नाव घेतले तरी कित्येकांच्या नजरेसमोर ‘मेरे मेहबूब’ चित्रपटातील नायक राजेंद्रकुमारकडे बुरख्याआडून पाहणारे बोलके डोळे उभे राहतात. या चित्रपटात पहिल्यांदाच नायक राजेंद्रकुमार यांची नायिकेशी गाठ पडते तेव्हा साधना यांचे बोलके डोळे त्यांचा आणि पर्यायाने प्रेक्षकांच्याही काळजाचा ठाव घेतात. हेच बोलके डोळे साधना यांचे अस्त्र होते.

    प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. १५ वर्षांच्या साधना यांना महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली.

    १९५८ मध्ये "अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता. त्याआधी १९५५ साली त्यांनी राज कपूर यांच्या 'श्री ४२०' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाण्यावर केलेल्या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि 'लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली.

    नितांतसुंदर वैदूर्यी डोळे, मोहक आणि मोनालिसासारखं गूढ हास्य हे साधना यांचे वैशिष्टय़. त्यात भर पडली ती तिच्या आगळ्यावेगळ्या केशरचनेची. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नप्रमाणे केसांच्या बटा कपाळावर रुळवण्याची फॅशन साधना यांनी आपलीशी केली व 'लव्ह इन सिमला' या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने रूढ झाली, इतकी की बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, दीपिका पडुकोन आदी नव्या जमान्यातील नायिकांनाही या कटची भुरळ पडली व कधी ना कधी त्याचे अनुकरण करावेसे वाटले. नायिकांसाठी घट्ट चुडीदार-कुर्ता हीसुध्दा साधना यांनीच रुढ केलेली फॅशन मानली जाते. या फॅशन रूपेरी पडद्यावरून नंतर समाजातही सहजतेने पाझरल्या.

    'लव्ह इन सिमला' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. १९९५ मध्ये दम्याच्या आजाराने नय्यर यांचे निधन झाले. त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.

    मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या "वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. त्यांच्या वाट्याला अनेक सुंदर गाणीही आली. ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. "झुमका गिरा रे, बरेली के बाजार में‘, "आजा आई बहार, दिल है बेकरार‘, "लग जा गले‘ यांसारखी अनेक अजरामर गाणीही त्यांच्यावर चित्रित करण्यात आली.

    साधना यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    साधना यांचा जीवनपट
    https://www.youtube.com/watch?v=z0UzgpHwLlo

    साधना यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=gpTtZYmp3So
    https://www.youtube.com/watch?v=LcrT5wZ4Tz8

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 15, 2017


  • कवी प्रदीप

    कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर (उज्जैन ) येथे झाला. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. मा.प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथे एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. १७०० गाणी लिहिणाऱ्या मा.प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. मा. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    कवी प्रदीप यांची काही गाजलेली गाणी
    अब तेरा सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया (किस्मत)
    आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँखी हिंदुस्तान की (जागृति, गायकः प्रदीप)
    आज आशिया के लोगों का काफिला चला (काफिला)
    आज मौसम सलोना सलोना रे (झूला)
    आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है (चित्रपट : किस्मत)
    इन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम)
    ऊपर गगन विशाल (मशाल)
    ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भरलो पानी (गीत)
    ओ अमीरों के परमेश्वर (पैगाम)
    कान्हा बजाये बांसरी और ग्वाले... (नास्तिक)
    गगन झन झना रहा (नास्तिक)
    चना जोर गरम बाबू (बंधन)
    चल चल रे नौजवान (बंधन)
    चल मुसाफिर चल (कभी धूप कभी छाँव)
    चलो चले माँ (जागृति
    देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)
    धीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे आ (किस्मत)
    पपीहा रे, पपीहा रे, मेरे पियासे (किस्मत)

      February 8, 2017


  • डॉ. सत्यपाल सिंग

    १९८० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले डॉ. सिंग यांनी ठाणे, नाशिक, बुलढाणा, गडचिरोलीचे अधीक्षक, मुंबईत वांद्रे परिमंडळाचे उपायुक्त, ईशान्य मुंबईत अतिरिक्त आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त, पुण्याचे आयुक्त आणि राज्याचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अशा विविधांगी जबाबदारी पार पाडल्या आहेत. डॉ. सिंग हे काही काळ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातही होते. ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली.

      August 27, 2012


  • हंसा वाडकर

    त्यांनी “रामशास्त्री’, “धन्यवाद’, “पुढचं पाऊल’, “मी तुळस तुझ्या अंगणी’, “नायकिणीचा सज्जा’, “सांगत्ये ऐका’ यांसारखे मोजकेच चित्रपट केले.

      July 23, 2017


  • अभिनेत्री पूर्णिमा

    अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती.

      March 2, 2024


  • बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर

    १९८० ते १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी जबान सँभाल के या विनोदी मालिकेद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली. बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर यांचा जन्म २९ मे रोजी झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी महात्मा गांधीच्या भूमिकेला आवाज दिला होता. पंकज कपूर यांनी आजवर हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय केला आहे. एक डॉक्टर की मौत (इ.स. १९९१) आणि २००३ मध्ये निघालेल्या विशाल भारद्वाज-दिग्दर्शित मकबूल ही त्यांची आजवरची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी होती. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. करमचंद जासूस १९८६ ची गाजलेली टीव्ही सिरियल जलवा, चालबाज, आताचा मासूम तसेच, मंडी, जाने भी दो यारो,गांधी, खामोश, हल्लाबोल राख यासारखे त्यांनी चित्रपट केले आहेत. पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि मोहनदास बीए एलएलबी, वाह भाई वाह, साहेबजी बिबीजी गुलामजी', दृष्टान्त, कनक डी बल्ली, अल्बर्ट ब्रिज आणि पांचवां सवार या चित्रवाणी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 29, 2017


  • कवी शांताराम नांदगावकर

    "हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती.

    सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले.

    'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याीला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

    चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.

    क्रिकेटपटू मा.सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. चित्रपटसृष्टीत 'डॅडी' या नावाने परिचित असलेले शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते.

    शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै, २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      July 14, 2017


  • दि. बा. खाडे

    बातमी कोणतीही असो ती सर्वप्रथम आपल्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी ईर्षां मनात बाळगणे हा आजचा प्रकार नाही. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र मर्यादित होते व फक्त सरकारी माध्यमे, मोजकी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था होत्या तेव्हापासून ही ईर्षां कायम आहे. मात्र आपण देत असलेली बातमी नुसती सर्वप्रथम देऊन उपयोग नाही ती बिनचूक असली पाहिजे, असा खाडे यांचा आग्रह असे. याच आग्रहामुळेच त्यांचा पत्रकारितेत दबदबा होता. त्यांचे पूर्ण नाव कदाचित कोणाला आठवणार नाही पण ‘दि. बा.’ म्हटले की पत्रकार व राजकीय नेत्यांच्या मनात लगेच खाडे हे नाव आलेच पाहिजे, अशी त्यांची ख्याती होती.

    दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. यांचे मंगळवारी वयाच्या ८२ व्या वर्षी मधुमेहाने निधन झाले. शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या पिढीतला आणखी एक दुवा आता निखळला आहे. मितभाषी, मनमिळावू आणि नेहमीच सर्वाना माहिती देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांपैकी ते एक होते. २००५ च्या अतिवृष्टीत घर पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे जमवून ठेवलेला माहितीचा खजिना नष्ट झाल्यावर खाडे हताश झाले होते. खाडय़ांच्या त्या साहित्याचे मोल फक्त अभ्यासकांनाच कळू शकते. त्यावेळी सरकारने फक्त पाच हजार रुपये मदत देऊ केली.

    वर्षांनुवर्षे मेहनतीने जमा केलेली माहिती पाच हजार रुपयांत परत मिळणार नव्हती. १९५२-५३मध्ये पत्रकारितेत आलेल्या खाडे यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रसिद्धी सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची पदोन्नती होत होत ते वृत्त विभागात आले आणि नंतर ते वृत्तसंपादक या पदापर्यंत पोहोचले. कोयनेचा भूकंप झाला तेव्हा खाडे त्यांच्या अंधेरी येथील घरी होते. मुंबईत त्या भूकंपाचे धक्के बसताच सगळी पळापळ झाली. मध्यरात्रीची वेळ व वीज बंद झालेली.

    खाडे यांनी आपल्या कुटुंबाला बाहेर काढले, पण स्वत: मात्र पुन्हा घरात शिरून मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी सर्वप्रथम कुलाबा वेधशाळा तसेच संबंधित यंत्रणांकडून भूकंपाबाबत माहिती घेतली. नंतर लाइटनिंग कॉल लावून (त्या काळात मुंबईबाहेर फोन करण्यासाठी ट्रंककॉल किंवा लाइटनिंग कॉल लावावा लागत असे) दिल्ली रेडिओवर भूकंपाची बातमी दिली. पुढल्याच बातमीपत्रात रेडिओवरून महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची माहिती देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाडे यांच्या नावासहित समजली. त्या काळी रेडिओवरून बातमी देणाऱ्या बातमीदाराचे नाव सांगण्यात येत नसे. तरीही त्यांच्या नावासहित ही बातमी देण्यात आली होती, याचे कारण त्यांनी घेतलेली मेहनत!

    त्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या चमूसहित कोयना येथे जाऊन तेथील भूकंपग्रस्तांच्या मुलाखती घेत तो अनुभव श्रोत्यांसाठी जिवंत केला होता. त्यांची बदली शिलाँग येथे काही काळासाठी झाली होती. मुंबई दूरदर्शन सुरू झाले तेव्हा त्यांची बदली दूरदर्शनच्या वृत्त विभागात झाली. मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तसंपादक होते. पण तेथे त्यांचे मन काही रमेना. ते पुन्हा आवर्जून ऑल इंडिया रेडिओत आले. जनता पक्ष सत्तेवर असताना जयप्रकाश नारायण मुंबईत जसलोक इस्पितळात उपचार घेत होते. अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेमध्ये जाहीर केले.

    सभागृहात श्रद्धांजलीही वाहण्यात आली. प्रत्यक्षात मात्र जयप्रकाश नारायण यांची प्रकृती फक्त चिंताजनक झाली होती. पण त्यांच्या निधनाचे वृत्त खरे की खोटे याची खातरजमा न करताच संसदेमध्ये त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि संसदेचे कामकाज थांबविण्यात आले. बातमीची पक्की खातरजमा करून घेण्याची सवय खाडेंना स्वस्थ बसू देईना. त्यांनी इस्पितळात धाव घेतली तेव्हा खरी परिस्थिती उघड झाली. खाडे यांनी तातडीने दिल्लीला खरे वृत्त कळविले. यामुळे सरकारचे हसे झाले. मात्र त्यानंतर प्रत्येक वृत्तसंस्था व वृत्तपत्राचा पत्रकार जसलोकमध्ये तळ ठोकून बसू लागला व इस्पितळातूनही रोज अधिकृतपणे माहिती देण्यात येऊ लागली. आता अशी माहिती देणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र या पायंडा खाडे यांच्यामुळे पडला हे विसरता येत नाही. बिनचूकपणा हाच खरा बातमीचा आधार, असा आग्रह धरणारे खाडे यांच्यासारखे पत्रकार आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात सापडणे कठीण!

    मंत्रालयात तेव्हा पीटीआय व युएनआय या दोन वृत्तसंस्थांचे पी.के. व व्ही.के. नाईक आणि रेडिओचे खाडे या त्रिमूर्तीचा दबदबा होता व त्यांच्यामुळे पत्रकार परिषदाही रंगत असत. तिघेही अत्यंत गप्पिष्ट असत आणि मैफल रंगविण्यात तिघांचाही हातखंडा असे. त्यातही खाडे नेहमीच आघाडीवर असत. कमी पण योग्य शब्दांत समोरच्याचे वर्णन करण्याची खाडे यांची हातोटीही वाखाणण्यासारखीच होती.खाडे यांच्या जाण्याने आता ती रंगत निघून गेली आहे.

      August 5, 2017


  • विजयराज मुरलीधर बोधनकर

    एक व्यावसायिक चित्रकार, लेखक व वक्ता अशी विजयराज मुरलीधर बोधनकार ह्यांची ओळख करुन देता येईल. जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतल्यावर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ ह्या वृत्तपत्रांमधून लेखन व चित्रकारीता केली.

      May 16, 2014