जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
July 18, 2017
मालिका व नाटक अशा सर्वच क्षेत्रात आपला अभिनय लोकांपर्यंत पोहचवणारे अभिजित चव्हाण हे गेली २५ वर्षं अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
May 23, 2014
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
October 21, 2021
जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व 'एमएस' नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते.
एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला. एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. त्यांचे वडिल वीणा वादक होते. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं. १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या.
देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले होते. २३ ऑक्तोबर १९६६ रोजी राष्ट्रसंघाचे माजी सचिव दिवंगत यू. थॅंट यांनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅरकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. पं. नेहरूंनी मा.सुब्बुलक्ष्मी यांना‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले. सुब्बुलक्ष्मी या महान कलाकारासोबतच त्या एक महान व्यक्तीही होत्या. मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे श्री. वेंकटेश स्तोत्र
https://www.youtube.com/watch?v=1-VzQZowjBE
व्यंकटेश स्तोत्र शब्द
कौशल्या सुप्रजा राम ! पूर्व संध्या प्रवर्तते ,उत्तिष्ठ ! नारासर्दुला ! कर्तव्यं देवं अह्निकम . उत्तिश्ठोत्तिष्ठ ! मनोहर गोविंदा ! उत्तिष्ठ गरुडध्वजा ! उत्तिष्ठ कमलकान्त! त्रैलोक्यंमंगलम कुरु. मतससमस्तजगतमधुकैटभअरेह्वाक्सोविहारिणी ! मनोहर-दिव्यमूर्ते ! श्रीस्वामिनी ! श्रीतजनप्रिय -दानासिले ! श्रीवेंकटे सदायिते ! त्वसुप्रभातम त्वसुप्रभातम अरविन्द लोचने ! भवतु प्रसन्नमुख -चन्द्र मंडले ! विधि शंकरेन्द्र -वनिताभीर अर्चिते ! वर्सा सिला नाथ -दायिते ! दयनिधेअत्र्यदि - सप्तऋषयासमुपास्या संध्यामअक्सासिन्धु -कमलानी मनोहरनी, आद्यपदयुगम अर्चयितुम प्रपन्ना शेशाद्री -शेखर -विभो ! तव
December 11, 2017
कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला.
रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. मा.रा. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की कॉमन मॅन पुतळाचा एक पूर्णाकृती पुतळाही पुण्यात "सिंबायोसिस' कॉलेजमध्ये बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच 'मालगुडी डेज' या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केलेल्या या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले.
“यू सेड इट” नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नव्हती. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच मराठावाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली होती. आर. के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याच पुस्तकाचे ’लक्ष्मणरेषा’ नावाने मराठीत अनुवाद करण्यात आला आहे.
आर. के. लक्ष्मण यांचे २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
आयडल अवर्सआर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
आत्मचरित्र
आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.
October 23, 2016
शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले. ते तिथे जाऊन त्यांना भेटले. जुहूमधील मा.शत्रुघ्न यांच्या बंगल्याचे नावही ‘रामायण’ आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांनी १९६९ मध्ये `साजन’ चित्रपटाद्वारे सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी आतापर्यंत २०० हिंदी चित्रपटांसह बंगाली आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या सिनेमामधील अनेक डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. कालीचरण, विश्वनाथ, ब्लॅकमेल, दोस्ताना, शान आणि काला पथर हे त्यांची काही नावाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटात काम केल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत असून सध्या बिहार तालुक्यात पाटणा साहिब क्षेत्राचे लोकसभेचे खासदार होते. अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात.
सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये एकत्र काम केले होते.
शत्रुघ्न यांनी रिना रॉयसोबत प्रेमप्र करण गाजले होते, पण लग्न पूनम यांच्यासोबत केले. १९६८ मध्ये पूनम या मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेल्या होत्या. पूनम यांनी जोधा-अकबर’मध्ये तिने बादशहाच्या आईची भूमिका अत्यंत विश्वासार्हतेने साकारली आहे. शत्रुघ्न यांचा स्वभाव बडबड्या असला, तरी पूनम शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
November 1, 2019
पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते.
१९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने त्यांनी कामासाठी संघर्ष केला.
शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्य संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. तर ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 23, 2018
रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होती. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली.
७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या.
नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
May 19, 2017
मराठीतले विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा जन्म १९४५ रोजी झाला. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या ‘द रोड टू सायन्स फिक्शन’च्या १९८९ च्या आवृत्तीसाठी निवडली गेली.
आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत. कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे.
त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे. वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबऱ्याही लिहिल्या. लक्ष्मण लोंढे यांचे ६ ऑगस्ट, २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti