जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले.
August 18, 2024
क्रीडापटू या नात्याने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, हे तर ते सांगायचेच पण काय टाळायला हवे याविषयी त्यांच्याइतकी माहिती देणारे दुसरे कुणीही सापडले नसते. त्यांनी या गोष्टीचा जणू ध्यास घेतला होता. उत्तमोत्तम क्रीडापटू तयार करून त्यांना स्पर्धेत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने ते मैदानामध्ये उतरायचे. एखादा खेळाडू चांगला दिसतो आहे, पण मार्गदर्शनाअभावी तो वा ती मागे पडण्याची शक्यता आहे असे दिसले तर ते त्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्याशिवाय राहणार नाहीत.
पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये अनेक वर्षे क्रीडाप्रशिक्षक या नात्याने काम पाहणारे बाबुलाल प्रेमराज झंवर आता आपल्यात नाहीत. ९४ व्या वर्षांपर्यंत आयुष्य लाभलेले बाबुलाल झंवर हे दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या स्वयंचलित दुचाकीवरून हिंडायचे आणि सायंकाळच्या सुमारास मैदानावर उभे राहायचे. या वयातही ते खेळ पाहून चुका दाखवून देत असत. त्यांनी सांगितलेले शास्त्रशुद्ध व्यायाम प्रकार अनेक वर्षे अनेकांना उपयुक्त ठरले आहेत. तुम्ही शारीरिकदृष्टय़ा त्या त्या क्रीडाप्रकारांसाठी तंदुरुस्त आहात की नाही हे तपासायचे त्यांचे मार्ग निराळे होते. ते म्हणायचे की, पाच मिनिटांमध्ये शंभर जोर, तीन मिनिटांमध्ये शंभर बैठका, १४ सेकंदांमध्ये शंभर मीटर धावणे, सहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावणे, हे सगळे तुम्ही न दमता करू शकणार असाल तर तुम्ही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धाना पात्र आहात, असे मानायला हरकत नाही. सर्व प्रकारच्या खेळात महत्त्व कशाला असेल तर ते तुमच्या पूर्ण तंदुरुस्त असण्याला.
नृत्य असो की गायनकला, त्यासाठीही तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा सक्षमच असावे लागते. त्यासाठी त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह रेझिस्टन्स प्रोग्राम’ या नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. त्याला त्यांनी ‘आयसोमेट्रिक’ प्रशिक्षणाची जोड दिली. त्यांच्या या प्रशिक्षणाचा अनेक पातळ्यांवर उपयोग करून घेतला गेला. शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि त्याबरोबरच स्वास्थ्य यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व होते. स्वास्थ्य म्हणजे केवळ काहीही न करता बसून राहणे नव्हे तर त्यात त्यांना निसर्गोपचार पद्धती अपेक्षित होती. तुम्ही जो काही खेळ खेळाल तो उत्तम खेळा आणि त्यात प्रावीण्य मिळवा, एवढेच त्यांचे सांगणे असे. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत असंख्य स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतील असे खेळाडू घडवले. त्यांच्या प्रशिक्षणात शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र, क्रीडामानसशास्त्र, अशा वेगवेगळ्या शास्त्रप्रकारांचा समन्वय असे. आपले मनगट मजबूत तर सर्व काही तुम्ही त्या जोरावर करू शकता हा त्यांचा विश्वास होता. ते कडवे गांधीवादी होते. साधी राहणी आणि स्वावलंबन यांना आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये स्थान दिले होते. त्यामुळेही ते विद्यार्थीप्रिय होते. भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर क्रीडाक्षेत्रावर पैसे खर्च होऊनही चांगले ‘स्टॅमिना’बाज खेळाडू तयार होत नाहीत, ही त्यांची खंत होती.
कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, अॅथलेटिक्स, सायकलिंग, शरीरसौष्ठव, पोहणे, क्रिकेट अशा कितीतरी क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी घडवलेले खेळाडू केवळ महाराष्ट्रभरच नव्हे तर सगळ्या जगात पसरलेले आहेत. त्यांच्या नावामधली ‘बा. प्रे.’ अशी आद्याक्षरे त्यांच्या शरीरसंपदेचे दर्शन घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांच्याकडे पाहून कुणीही एकदम चकीत होऊन ‘बापरे’ असे म्हणत असे आणि तीच त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या कारकिर्दीची पावती म्हणावी लागेल.
कुस्ती खेळायची असेल तर त्यासाठी मांसाहारच हवा हे थोतांड आहे, असे ते सांगायचे आणि त्यांच्या प्रचाराचाही तोच महत्त्वाचा मुद्दा ठरला. सामाजिक दृष्टय़ा अत्यंत प्रगत विचार आणि केव्हाही कुणालाही मदतीसाठी पुढे हे तर त्यांचे ब्रीद होते. ते १९३० च्या जंगल सत्याग्रहामध्ये होते आणि ते १९४२ च्या चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करण्यात अग्रभागी होते. एका निरलस अशा क्रीडा प्रशिक्षकाला जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना कधीच मिळाला नाही.
August 4, 2017
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.
भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.
१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 3, 2018
त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या “विवा” या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या “सो कूल” या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या चित्रपटातून सुरु केली.
April 13, 2010
भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. कोकणात येणार्या नाटक मंडळींशी मामा वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला.
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. मा.मामा वरेरकरांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबर्यास आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबर्यांतच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंसती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय.
नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते.
नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती.
मामा वरेरकर यांचे २३ सप्टेंबर १९६४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 27, 2017
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला.
April 11, 2022
यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. आग्रा घराण्याची तालीम त्यांनी जगन्नथबुवा पुरोहित यांच्याकडून घेतली.
यशवंत जोशी यांचा जन्म १९२७ साली झाला. त्यांचे बालपण पुण्यात गेले. लहानपणापासून संगीत व गायनाची प्रचंड आवड असल्याने संगीतविषयाशी निगडीत गोष्टींकडे त्यांचे मन सहज वेधले जात. त्याकाळी अनेक दिग्गज गायकांच्या कर्यक्रमांना हजेरी लावल्याने गायक बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नियमीत सराव व आपल्या सुरांना वळण लावण्याची जोड मिळाली. अशा तर्हेने त्यांच्यामधील गायक घडत गेला. त्या काळी केवळ गायक होण्याला, आजच्यासारखी सामाजिक प्रतिष्ठा वगैरे अजिबात नव्हती, तर गायक अधिक नट असणार्या कलाकारांनाच प्रसिध्दीचे वलय चाखण्याची संधी मिळत असे. पण यशवंतबुवांची साधना व गायननिष्ठा या सर्व भौतिक सुखांच्या पलीकडची असल्याने, त्यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने व सुरांवरील हुकुमतीने श्रोत्यांना तृप्त करण्याचा निर्णय घेतला, व त्यांच्या गायनप्रवासाची झोकात सुरूवात झाली. यशवंतबुवा मिराशी हे त्यांचे पहिले गुरू होते.
आयुष्यभर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिध्दीचे वलय फार उशीराने प्राप्त झाले. यशवंतबुवांची गायनशैली हीदेखील त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच वेगळी, उठावदार, व बहारदार आहे. इतर नवोदित गायक ज्याप्रमाणे आपल्या गायनशैलीत इतर घराण्यांच्या शैलींचा प्रभाव मिसळून नेहमी एका नव्या व तजेलदार गायनशैलीचा वेध घेण्यास उत्सुक असतात, त्याप्रमाणे यशवंतबुवा हे प्रत्येक शैलीचे वेगळेपण व स्वतंत्र असं अस्तित्व अबाधित ठेवणाचा सचोटीने प्रयत्न करतात. गायला सुरूवात करताच स्वरांवर घट्ट पकड बसविण्याची त्यांची क्षमता असो, किंवा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करण्याचे त्यांचे कसब असो, या सर्व गोष्टी त्यांच्या सर्जनशील गायकीचा प्रत्यय देत असतात.
आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणार्या या हाडाच्या कलावंताला हृदयेश आर्ट्स या संस्थेकडून देण्यात येणारा पहिला “हृदयेश संगीत सेवा पुरस्कार” प्राप्त झाला आहे.
January 12, 2015
टॉम ऑल्टर यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
August 7, 2021
पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा.
September 29, 2021
सलिल चौधरी यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत. सलिल चौधरी यांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे तर ऐकलेले किंवा सुचलेले स्वर लिपीबद्ध करू लागले. पियानो, हार्मोनियम व व्हायलिनसारखी पाश्चात्य वाद्ये आणि बासरी सारखी भारतीय वाद्येदेखील ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नानेच वाजवायला शिकले.
संगीताच्या क्षेत्रात अशी एकट्याने वाटचाल सुरू असतांना त्यांच्या मनावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडत होता. गरीब मजूरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यासाठी लढा देणे वगैरे गतिविधींना सुरुवात झाली. पुढील काळात ते संगीताकडे वळले नसते तर खचितच राजकीय पुढारी झाले असते, किंवा कदाचित प्रसिद्ध साहित्यिकही झाले असते. त्यांनी गाणी लिहिली तसेच कथा सुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्या गाजल्या. त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर आली आणि लोकप्रिय झाली. बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा व गाणी लिहिली ती सुद्धा यशस्वी झाली. बंगाली चित्रपटक्षेत्रात त्यांचे नांव झाले. ती पाहून तिचे हिंदीत रूपांतर करण्यासाठी स्व.बिमल रॉय यांनी सलिल चौधरी यांना मुंबईला पाचारण केले आणि या कथेवर आधारित 'दो बीघा जमीन' हा चित्रपट करण्यासाठी ते मुंबईला आले. हा चित्रपट चांगला गाजला.
बिमल रॉय यांचे कुशल दिग्दर्शन व बलराज साहनी यांनी विलक्षण ताकदीने साकारलेली त्यातली प्रमुख भूमिका तर लक्षात राहिलीच. पण सलिल चौधरींची कथा, त्यांनी दिलेले प्रभावी पार्श्वसंगीत आणि त्यातील 'धरती कहे पुकारके ... मौसम बीता जाये' हे गाणे खूप गाजले. त्यानंतर अनेक वर्ष ते बिमलदांच्या बरोबर राहिले. ‘मधुमती’ची सगळीच गाणी परत परत, ऐकावीत अशी. ‘आजा रे परदेसी’, ‘सुहाना सफर’ आणि ‘दिल तडप तडप के..’ ‘घडी घडी मेरा दिल धडके’, रफी साहेबांचे दर्द-भरे ‘टूटे हुवे ख्वाबों ने’ आणि ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा..’ ‘जागो मोहन प्यारे’ ‘ओ सजना बारखा बहार आई..’, ‘जा रे उड जा रे पंछी..’ ‘ना जिया लागे ना..’,ही गाणी ऐकल्यावर वाटते की सगळ्या गायकांना सलीलदांनी नावीन्यपूर्ण पद्धतीनेच हाताळले आहे. स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी. सलील चौधरी यांचे ५ सप्टेंबर १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सलील चौधरी यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=gSBO-VSTKrk
https://www.youtube.com/watch?v=TXBNME2EtXk&t=9s
https://www.youtube.com/watch?v=LP8Ma5Kb3JA&t=46s
September 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti