जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मौज साप्ताहिक आणि सत्यकथे मधून ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ या नावाने त्यांनी लेखन केले.. त्यांचे ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ हे नाव आणि लेखन त्यावेळी खूपच गाजले. १९५१ ते १९५३ या काळात त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य होते . त्यांनी भारतीय परराष्ट्रीय हायकमिशनच्या परराष्ट्र खात्यात नोकरी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी पत्रकारितेत स्थिरावले .
May 30, 2021
अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत.
April 18, 2011
उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.
May 31, 2022
हेमकांत नावडीकर यांनी २६ एप्रिल २०२० रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘संगीत संवाद रेडिओ’ या ‘इंटरनेट रेडिओ’ला सुरवात केली आहे. संगीत संवाद या इंटरनेट रेडिओवर २४७ शास्त्रीय संगीत ऐकता येते. याला जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. श्रोत्यांकडून तर त्याला उत्तम प्रतिसाद आहेच, पण कलाकारांकडून ही उत्तमोत्तम ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून देण्यात त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे.
June 7, 2022
मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी अमरावती जिल्यातील अचलपूर येथे झाला. भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले.
नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे.
कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.
भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
"आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे"
भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2018
कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर, मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “we चार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे.
देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं संगीत देवबाभळी हे नाटकही प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय ठरलं.
June 7, 2022
विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक. रा.भा.पाटणकरांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध आणि समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.
February 19, 2010
गो. आ. भट हे जातिवंत पत्रकार होते. शिकाऱ्याला आपल्या सावजाचा 'वास' लागल्यावर तो जिद्दीने, चिकाटीने माग काढतो आणि शेवटी आपली शिकार साधतो. त्यासाठी त्या शिकाऱ्याला प्रचंड कष्ट करावे लागतात. 'योग्य' वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागते. अनेकवेळा भोवतालची परिस्थिती प्रतिकूल असते. परंतु कसलेला शिकारी प्राप्त परिस्थितीला अनुकूल करून घेतो आणि यशस्वी होतो. प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलेल्या गो. आ. भटांकडे या साऱ्याच गोष्टी उदंड होत्या.
एखाद्या बातमीचा 'वास' लागला की भट ते वृत्त मिळविण्यासाठी अक्षरश: जिवाचं रान करायचे. त्यासाठी अनेकांना भेटायचे. फोन करायचे. अनेकवेळा संबंधित व्यक्ती विविध कारणांनी फोनवर भेटायची नाही. पण भट चिकाटीने अनेक ठिकाणी फोन करायचे आणि शेवटी त्या व्यक्तीला हुडकून काढायचे. त्याच्याकडून माहिती घ्यायचे. ती माहिती आपल्या माहितीशी ताडून बघायचे. मिळालेल्या माहितीची पुन:पुन्हा खातरजमा करून घ्यायचे. आणि मग ती बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये द्यायचे.
कधी ती बातमी दुधाच्या भेसळीची असे, कधी कलानगरचा परिसर खचत असल्याची असे. पण त्यांची बातमी प्रसिद्ध झाली की सरकारलाही त्याची दखल घ्यावीच लागे. याचे मुख्य कारण म्हणजे भटांनी त्या बातमीवर प्रचंड मेहनत घेतलेली असे आणि त्यातील माहिती अचूक असे. राष्ट्रपती गिरी मुंबईत आल्यावर आपले एकेकाळचे सहकारी कॉम्रेड काळे यांना भेटायला त्यांच्या किंग्ज सर्कलच्या घरी गेले होते. भेट खाजगी होती; परंतु भटांना त्याबाबत कळताच त्यांनी ती बातमी मिळवलीच. दीर्घकाळ त्यांनी मंत्रालय हा 'बीट' सांभाळला होता. अनेक राजकारणी आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्याकडे त्यांची उठबस होती. 'ए जर्नालिस्ट शूड बी टाइट लिप्ड' असा एक संकेत आहे. पत्रकाराने कान-डोळे उघडे ठेवावेत; तोंड मात्र जरुरीपुरतेच उघडावे, असा त्याचा मथितार्थ. भटांच्या स्वभावात हा संकेत जणू पूर्र्ण मुरलेला होता.
एरवी अघळपघळ गप्पा मारणारे भट कामाच्यावेळी अगदीच वेगळे असत. कष्टाला पर्याय नाही, हा त्यांच्या पत्रकारितेचा जणू मूलमंत्र होता. तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. वांद्याच्या साहित्य सहवासात राहणाऱ्या भटांनी त्या सोसायटीसाठीही बरेच काम केले होते आणि 'अजब सहवास' हे पुस्तकही लिहिलेे. त्यांचा स्वभाव अतिशय साधा. मनाने ते निष्कपट होते. टिंगलटवाळी करणे, उणेदुणे काढणे, एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवून त्याला जाणीवपूर्वक घायाळ करणे यापासून चार हात लांब राहणारे भट आपल्या सिध्यासाध्या, मदतशील स्वभावामुळे सहकाऱ्यांतच नाही, तर सर्वत्रच प्रिय होते. त्यांच्या निधनाने एक कष्टाळू आणि जातिवंत पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
August 9, 2017
ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला आई-वडिलांनी इंग्लंडला शिकण्यासाठी नेलं होतं. पुढे ते वयाच्या १८व्या वर्षी पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी पत्रकारिता केली. भारतातलं ग्रामीण जीवन त्यांनी जवळून अनुभवलं होतं. कथेइतकंच त्या काळात त्याचं काव्यलेखनसुद्धा सुरू होतं आणि ‘गंगादीन’, ‘मंडाले’, ‘डॅनी डिव्हर’ या त्यांच्या ब्रिटिश राजवटीतल्या कविता चांगल्याच गाजल्या होत्या.
त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथाही गाजल्या होत्या. त्याची ‘दी जंगल बुक’, ‘दी सेकंड जंगल बुक’ आणि ‘किम’ ही पुस्तकं अफाट लोकप्रिय झाली. बच्चे कंपनीला प्रिय अशा मोगली आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जंगलातल्या त्याच्या साथीदारांवर अनेक फिल्म्स, टीव्ही सीरिज बनल्या आणि लोकप्रिय झाल्या. त्यांना १९०७ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
जस्ट सो स्टोरीज, रिकी टिक्की तावी, कॅप्टन्स करेजस, दी मॅन हू वुड बी किंग, प्लेन टेल्स फ्रॉम दी हिल्स, स्टॉकी अँड कंपनी, अंडर दी देवदार्स, तुमाई ऑफ दी एलिफंट्स अशी त्याची इतर अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत. जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचे १८ जानेवारी १९३६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 30, 2018
नारायण बापूजी कानिटकर हे लेखक, नाटककार आणि अनुवादक होते.
“तरुणी शिक्षण नाटिका” आणि “संतती कायद्याचे नाटक” लिहून सद्य सामाजिक विषयांवरील मराठी नाटकांचा पाया त्यांनी रचला.
४५ वर्षाच्या आयुष्यात, वकिली शिक्षणानंतर त्यांनी १० नाटके लिहिली होती. त्यांत बडोदे संस्थानातील विषप्रयोग (मल्हारराव महाराज), क्रॉफर्ड प्रकरण (नाट्यविजय) हे विषय, ऐतिहासिक कथा व अनुवाद यांचा समावेश होता.
२५ जुलै १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
Narayan Bapuji Kanitkar
November 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti