जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य’ या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेट समकक्ष पदवी मिळवली आहे.
January 5, 2022
छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला.
संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणत, ""हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.'' शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली.
राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले.
राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, ""राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर होते. राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः १६९० मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता.
स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून "शिवचरित्र' लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
१६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली. पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली, मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराज यांचे ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. १९४८ साली गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते . या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले.
February 29, 2024
वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ब्रूस ली च्या ‘ फिस्ट ऑफ फ्यूरी ‘ आणि ‘ एंटर द ड्रॅगन ‘त्याने मध्ये स्टंटमन म्ह्णून काम केले. एटर द ड्रॅगन मध्ये तो ब्रूस ली बरोबर फाईट करताना दिसतो. पुढे त्याने अनेक चित्रपटात कामे केली . रश अवर , पोलीस स्टोरी , शांघाय नून , शांघाय नाइट्स अशी कित्येक नावे घेता येतील. तो अनेक वेळा स्टंट करताना जखमीही झालेला आहे.
April 7, 2021
सुलोचनाबाई यांनी भालजी पेंढारकर यांना अगुरु मानले. रेखीव आणि बोलक्या डोळ्याच्या रंगू दिवाण यांचे नामकरण भालजींनी ‘ सुलोचना ‘ असे केले आणि ह्याच नावाने त्या खूप लोकप्रिय झाल्या.
August 15, 2021
वयाच्या ८ व्या वर्षापासून “बॅडमिंटन” खेळणार्या अक्षय देवलकर ह्याने क्रीडाक्षेत्रात ठाण्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
May 3, 2014
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.
June 28, 2022
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला.कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य करुण काव्य आहे. कोठा आणि तवायफ हा हिंदी चित्रपटांमध्ये तसा खूप वेळा येणारा विषय. केवळ याच विषयाला वाहिलेले चित्रपटही बरेच आहेत. पण भव्यतेचे आणि परिपूर्णतेचे कमालीचे आकर्षण असणार्याय कमाल अमरोहींच्या दिग्दर्शनाने एरवी घिस्या-पिट्या विषयावरील या चित्रपटाला सौंदर्याचे एक वेगळेच मूल्य मिळवून दिले आहे. पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. मा.कमल अमरोही यांचे निधन ११ फेब्रुवारी १९९३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 13, 2017
आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.
June 8, 2011
जन्म:१९३०
गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते. राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर गीता बाली यांचे सेक्रेटरी होते. गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
January 23, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti