जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध होते. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते.
October 25, 2021
नौशाद यांचे लहानपण लखनौमध्ये गेले. ते ज्या ठिकाणी राहायचे त्याच्या बाजूलाच एक थिएटर होतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला.पूर्वी चित्रपट चालू असताना त्याचं पार्श्वसंगीत पडद्यासमोर बसलेली मंडळीच द्यायची. घरात बसल्या बसल्या या पार्श्वसंगीताचे सूर नौशाद यांच्या कानांवर पडायचे. यामुळे ते संगीताकडे खेचले गेले. लादनसब हे अशा प्रकारचे संगीत देण्यास माहीर होते. त्यांचा वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असताना नौशाद त्यांच्या सार्या गोष्टी टिपून घ्यायचे. यामुळे त्यांच्या शाळेला दांड्या व्हायला लागल्या. पावलं आपोआप थिएटरकडेच वळायची. त्यांचे वडील तापट होते. त्यांना मा.नौशादचा हा नाद मुळीच पसंत पडलेला नव्हता. वयात आल्यावर नौशादनी घरदार सोडलं. ते सोडणं त्यांना क्रमप्राप्तच होतं. त्या वेळी लखनौमध्ये अनेक वाद्यवृंद तेव्हा कार्यरत होते. त्यात नौशादनी आपला स्वतःचा 'विंडसर एंटरटेनर' नावाचा वाद्यवृंद सुरु केला. दहा वर्ष त्यांच्या कानांवर जे संगीत पडलं होतं त्यातून त्यांना चाली स्फुरायला लागल्या. हा वादयावृदं स्वतःचा असल्याने त्यांचा स्वतंत्रपणे सारं काही करायला लागल्या. हा वादयवृदं स्वतःचा असल्याने त्यांना स्वतंत्रपणे सारं काही करायला मिळायचं यामुळे त्यांची प्रातिभा फुलली.
मुख्य म्हणजे आपणही संगीतकार होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांना लखनौमधल्या कार्यक्रमातून मिळाला. विंडसर एंटरटेनचे कार्यक्रम घेऊन त्यांनी मग जयपूर, जोधपूर, सिकर, माऊंट अबू, सिरोही, विरमगाम अशा ठिकाणी दौरे काढले. विरमगामला शेवटचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना मुंबई साद घालायला लागली. स्वप्नाची नगरी मुंबई एवढी जवळ आली असताना आपण माघारी लखनौला जाण्यापेक्षा मुंबईत जाऊन अपलं नशीब अजमावावं या विचाराने ते मुंबईला आले. तेव्हा ते फक्त १६ वर्षांचे होते आणि त्यांच्या खिशात दमडीही नव्हती. जवळ होता तो फक्त संगीतकार होण्याचा आत्मविश्वास. दादरला शिवाजी पार्क आणि ब्रॉडवे सिनेमाच्या आवारात रात्रीचे ते झोपायचे. सकाळी छोटंमोठं काम मिळतं का ते शोधत फिरायचे. पण याच ब्रॉडवेला एके दिवशी आपण संगीत दिलेला चित्रपट झळकेला याची त्यांना खात्री होती. सुरुवातीला एन्. ए. (म्हणजे नौशाद अली) दास या नावाने त्यांनी काही गाणी स्वरबध्द केली. उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे त्यांना शेवटी ४० रु. महिना पगार असलेली नोकरी मिळली. नंतर रणजित स्टुडिओत जाऊन काम मिळतं का ते पाहायला लागले आणि रणजित स्टुडिओच्या सरदार चंदूलाल खेमजी यांनी त्यांना आपले संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडे साहाय्यक म्हणून ठेवून घेतलं. या ठिकाणी नौशादंना खेमचंदजींकडून बरंच काही शिकायला मिळालं. पण अजूनही त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. दरम्यान गीतकार दीनानाथ मधोक त्यांना घेऊन मोहन भवनानी या निर्मात्याकडे घेऊन गेले. या भवानानींना एक नवा संगीतकार हवा होता. मधोकनी त्यांना नौशादचं नाव सुचवलं. मधोक यांनी नौशादमधले गुण पक्के हेरलेले होते. पण तेव्हा नौशाद अवघे वीस वर्षांचे होते. हा एवढा कोवळा पोरगा काय कपाळाचं संगीत देणार, असंच तेव्हा भवनानींना वाटलं होतं. पण तरीही मधोक यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी महिना १०० रुपये पगारावर आपल्या 'प्रेमनगर' चित्रपटाला संगीत देण्याचं काम नौशाद यांच्याकडे सोपवलं. मा.नौशादनी अवघ्या तीन महिन्यांत 'प्रेमनगर' ला संगीत दिलं. त्यांना फक्त तीनशे रुपये मिळाले. पण त्यापेक्षा त्या चित्रपटाच्या श्रेयनामावली संगीतकार म्हणून त्यांचं नाव झळकलं होतं याचं त्यांना विशेष अप्रूप वाटलं. १९४० च्या सुरुवातीला झळलेल्या 'प्रेमनगर'च संगीत लहानथोरांना आवडलं आणि संगीतकार नैशादचा उदय झाला. यानंतर्च नौशाद यांना छोटी-मोठी कामं मिळत गेली. विजय भट, कारदार यासारखे निर्माते त्यांच्यावर फिदा झाले. यामुळे 'माला', 'दर्शन', 'शारदा', 'कानून'. 'कीमत', 'पहले आप', नमस्ते', 'सन्यासी', 'संजोग', 'जीवन', 'गीत', 'शहाजहान', 'नाटक', 'दर्द', 'दिल्लगी', 'दुलारी', 'दिवाना' असे मा.नौशादजीचें चित्रपट आले.
नौशाद यांचा या चित्रपटसृष्टीत त्यामुळे जम बसला. पण त्यांची बऱ्याच जणांनी फसवणूकही केली. एका चित्रपटाद्वारे त्याकाळी लाख रुपये गोळा करणारे हे निर्माते त्यांच्या हातावर नाममात्र पैसे ठेवायचे. १९४४ साली गुलाम हैदर यांच्यापासून स्फूर्ती नौशादनी 'रतन' मध्ये उत्तर भारतीय ढंगाचं संगीत बेमालूमपणे वापरलं आणि 'रतन'च संगीत अफलातून लोकप्रिय झालं. नौशाद यांचा 'रतन'मुळे खूप गाजावाजा झाला. 'द मास्टरो विथ मिडास टच संगीतसम्राट नौशाद', 'नौशाद नौशद चालीस करोड में एकही नौशाद' अशी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली जाऊ लागली. १९५७ मध्ये 'मदर इंडिया'ची जुळवाजुळव सुरु होती. मेहबूब खानच्या आधीच्या 'अंदाज'ला नौशादनीच लाजवाब संगीत दिलेलं होतं म्हणून त्यांचीच 'मदर इंडिया'च्या संगीतासाठी त्यांनी निवड केली होती. पण आता नौशादनी पहिल्यांदा आपली रॉयल्टी मेहबूब खान यांच्याकडे मागितली आणि त्यांनीही ती दिली. यानतंर त्यांची आर्थिक चणचण संपली. नौशाद यांनी नंतर दर्जेदार संगीत देण्याचा सतत प्रयत्न केला. वर्षभरात ते एकच चित्रपट यासाठी करायचे. त्यांना गायकांकडून कसून तयारी करुन घेतल्याशिवाय गाणं रेकॉर्डिंग करायला आवडायचं नाही. लता मंगेशकर, रफी ही मंडळा त्यांच्याकडे तासनतास एकाच गाण्यासाठी रिहर्सल करायला न कंटाळता यायची. आजही नौशाद म्हणतात, 'आपल्याकडे गायक, गायिकांना संगीतकारांपेक्षा अधिक मान मिळतो हे सपशेल चुकीचे आहे. गाण्याची चाल, त्यावरचे संस्कार संगीतकार करत असतो. त्या गाण्याच्या सुरेलपणाचा वा बेसुरीपणाचा मालक तो संगीतकार असतो. आम्हा संगीतकारांमुळे अनेक गायक - गायिकांचं नावं झालं हे लक्षात घ्या. संगीतकाराविना गायक काहीच करु शकत नाही. लता, रफी हे चांगले गायक असल्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यांच्याकडून उत्तम प्रकारे गाऊन घेणार्या, संगीतकारांना तुम्ही कमी लेखू नका.' लताकडूनही आपल्या मनासारखं गाणं जोवर येत नाही तोवर तिला गायला लावण्याचा हट्ट नौशाद धरायचे. रफीने गायलेलं 'कोई सागर दिल को बेहलाता नही' किंवा शमशाद बेगमचं 'छोड बाबुल का घर' ही गाणी केवळ मा.नौशाद हा संगीतातला चमत्कार होता. यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असायचे. ते जे काही करायचे ते मात्र मनापासून असायचं. ते श्रध्दापूर्वक रेकॉर्डींगही करायचे. 'बैजू बावरा'तल्या 'मोह भूल गये सावरियाँ' गाण्याच्या रेकॉर्डींगची गोष्ट अशी आहे. हे गाणं भैरव रागातलं असल्याने भैरव म्हणजे शिवशंकर म्हणून नौशादनी रेकॉर्डिंग करायच्या आधी सर्वाना स्नान करुन शुचिर्भूत होऊन रेकॉर्डिंग करायचा आग्रह धरला होता.
'बैजू बावरा'ने नौशादना तुफान लोकप्रियता तर दिलीच, पण त्यांना स्वतःला फार मोठं समाधान दिलं. या एका चित्रपटात त्यांनी बहुतेक सगळ्या रागांचा वापर केला. रफीच्या आवाजातली 'मन तडपत हरी दर्शनको आज' मालकंसमध्ये, ओ दुनियाके रखवाले' दरबारीमध्ये त्यांनी तयार केलेलं होतं 'तू गंगांकी मौज मै', 'दूर कोई गाये', 'इन्सान बनो' ही सगळी गाणी गाजली. नौशाद यांच्या कारकीर्दीतला 'बैजू बावरा' हा कोहिनूर हिरा ठरला. पलुस्कर आणि उस्ताद आमिर खान यांची जुगलबंदीही पेश केली. सुरुवातीला 'बैजू बावरा'मध्ये दिलीपकुमार - नर्गिस अशी जोडी घेतली जाणार होती. पण नौशादनीच यामुळे प्रेक्षक निव्वळ या जोडीला पाहायला येतील. याचं कथानक, संगीत उपेक्षित राहील अशी शंका व्यक्त करुन नव्या कलाकारांना घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मीनाकुमारी, भारतभूषण ही जोडी घेतली गेली आणि या जोडीलाही पुढे स्थिरावता आलं. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात बँडवर 'छोड बाबुलका घर' वाजवलं गेलं होतं आणि त्यांच्या सहाव्या आणि सर्वात धाकट्या मुलीच्या लग्नालाही बँडवर. हेच गाणं वाजवलं गेलं तेव्हा त्यांना भरुन आलं होतं. आपण दिलेलं संगीत चिरकाल टिकणात्रं आहे याचीच साक्ष बँडवाल्यांनी दिली होती. याचं कारण हे गाणं यांनीच 'रतन'साठी शमशाद बेगमकडून गाऊन घेतलेलं तर होतं! मा.नौशाद यांचे निधन ५ मे २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 8, 2017
ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द कवी भास्कर दामोदर पाळंदे यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
मूळ ठाण्याचे रहिवाशी असलेल्या भास्कर पाळंदे आपल्या परिसरातील स्थानिकांना आपल्या रसभरित व जातीवंत कवितांनी मंत्रमुग्ध करून, रसिकतेचा दरवळणारा पारिजात आपल्या वाचकांच्या सामुहिक मनांमध्ये दीर्घकाळ फुलवून ठेवला होता. इंग्रज राजवटीत ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भास्कर पाळंदे यांनी “विक्रमोर्वशीयम्” या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबध्द भाषांतर केले आहे. त्यांनी लिहीलेल्या “रत्नमाला” या प्रसिध्द भक्तीपर पद्यग्रंथाचे वाचन करताना सर्वसामान्य व्यक्ती गहिवरून जातो.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
रमाबाई पंडिता यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.
रमाबाई पंडिता या स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी!
परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत.
रमाबाई पंडिता यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १५-१६ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून-विशेषतः आईकडून-संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या.
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले. परदेशातील वास्तव्यात त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या व त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक काऱ्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या.
भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ ज्यू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले. ११ मार्च, १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.
अशा या थोर विदुषीला १९१९ साली ‘कैसर-ए-हिंद’ सुवर्णपदक मिळाले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व काऱ्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवला होता.
पंडिता रमाबाई यांचे ५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे पंडिता रमाबाई यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
April 5, 2022
’सुखाचे सोबती’, ’बोलकी बाहुली’, ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ’मानाचा मुजरा’, ’करावं तसं भरावं’, ’दीड शहाणे’, ’ठकास महाठक’, ’गडबड घोटाळा’, ’तुझी माझी जमली जोडी’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. राजा बारगीर यांचे १८ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 6, 2017
तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले.
April 27, 2021
१९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात.
July 5, 2022
ओमप्रकाश यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी झाला. ओमप्रकाश यांचे पूर्ण नाव 'ओम प्रकाश बक्शी' होते. शिक्षण लाहोर मध्ये. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. १९३७ मध्ये मा.ओमप्रकाश 'ऑल इंडिया रेडियो सिलोन' मध्ये २५ रुपये वेतनावर नोकरी करत होते. रेडियो सिलोन वर त्यांचा 'फतेहदीन' हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
ओम प्रकाश आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटात 'पड़ोसन', 'जूली', 'दस लाख', 'चुपके-चुपके', 'बैराग', 'शराबी', 'नमक हलाल', 'प्यार किए जा', 'खानदान', 'चौकीदार', 'लावारिस', 'आंधी', 'लोफर', 'ज़ंजीर' यांचा समावेश आहे 'कोणीही' वादळ ',' भटक्या ',' जंजीर ', त्यांचा 'नौकर बीवी का' थी हा चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांचे खूप छान ट्युनिंग होते. 'नमक हलाल' मधील दद्दू व 'शराबीतील' मुंशीलाल या व्यक्तिरेखानी मा.ओमप्रकाश यांनी कमाल केली होती. देव आनंद यांना कोणतीही चित्रतारका 'भैय्या' असे म्हणत नाहीत, पण आपणाला मात्र त्या अगदी तरूण वयात असल्यापासून 'भैय्या' म्हणतात अशी तक्रार चरित्र अभिनेता ओमप्रकाश अनेकदा करीत असत. ओमप्रकाश यांचे निधन २१ फेब्रुवारी १९९८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.
April 7, 2021
जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले.
१९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. मा.जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड
जिगर मुरादाबादी यांची शायरी.
यूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में
जिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |
.वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,
जिस में ओस के बूँदों की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,
उनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,
उनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,
मदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |
September 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti