(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • धर्मेंद्र

    आज हिमॅन धर्मेंद्र यांचा वाढदिवस
    धर्मेंद्र चा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
    १९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि 'गरम धरम' अशा नावाने पण ओळखले जाते. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मा.धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले.२०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

      December 13, 2016


  • गीत एक – आठवणी अनेक : “आएगा आनेवाला”

    संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने खेमचंद प्रकाश यांचे magnum opus "आएगा आनेवाला"

    *1940 च्या दशकातील सुपरस्टार अशोककुमार एकदा लोणावळ्याला आपल्या मित्राच्या बंगल्यावर रहायला गेले होते . तिथे त्यांना प्रत्येक रात्री काही विचीत्र भास झाले . त्यांनी हे भुताटकीचे आपले अनुभव आपल्या मुंबईतील मित्रांना सांगितले व त्यावरून कमाल अमरोही यांनी "महल" चित्रपट लिहीला.

    * त्यातलं "आएगा आनेवाला" हे गाणं सात मिनीटं लांबीचं होतं. ते प्रेक्षकांना कंटाळवाणं होईल म्हणून पिक्चरमधून काढून टाका, अश्या सूचना अशोककुमारनी दिल्या . पण खेमचंदजींच्या आग्रहाखातर हे गाणं पिक्चर मध्ये राहिलं व त्याने इतिहास घडवला. हे गाणं रद्द करू नये म्हणून नवोदित गायिका लता मंगेशकर हिने अशोककुमार यांची भेट घेतली होती.

    * त्या काळात रेकॉर्डवर गायकाचं नाव छापायची पध्दत नव्हती . त्या व्यक्तिरेखेचं चित्रपटातलं नाव छापलं जात असे . त्यामुळे या रेकॉर्डवर लताचं नाव नसून "कामिनी" असं नाव आहे. त्यामुळे या गाण्याच्या रॉयल्टीसाठी लताला अनेक वर्ष झगडावं लागलं.

    * या गाण्याच्या वेळी खेमचंदजी गंभीर आजारी होते. आपला मृत्यू जवळ आला आहे असं त्यांना वाटायचं. रिहर्सलसाठी ते गाडीच्या मागच्या सीटवर झोपून येत असत. त्यांच्या या भावावस्थेमुळे गाण्याला असलेली गूढतेची किनार अधिकच गडद झाली .

    * हे गाणं पहिल्यांदा रेडिओ सिलोन वरुन प्रसारित झालं. तेव्हा 'ही गायिका कोण ?' असा प्रश्न विचारणा-या पत्रांचा पाऊस रेडिओ सिलोनवर पडला. त्यांनी मुंबईला HMV कडे चौकशी करून गायिकेचं नाव "लता मंगेशकर" असल्याचं जाहीर केलं.

    * पुढच्या वर्षी (1950) खेमचंद प्रकाश निधन पावले. त्यांचं वय होतं फक्त 43. त्यांना मूलबाळ नव्हतं . एका अनाथ मुलीला त्यांच्या पत्नीने सांभाळले होते व तिला स्वतःची मुलगी मानले होते . तिचे लग्न करुन दिले . मात्र शेवटची काही वर्षे खेमचंदजींच्या पत्नीला विपन्नावस्था आली. काही दिवस रेल्वे स्टेशनवर भीक मागून काढावी लागली. कालांतराने, Indian Performance Right Society ही संस्था, गायक व संगीतकार यांची जी गाणी रेडिओवर वाजतात त्याची राॅयल्टी वसूल करू लागली. "आएगा आनेवाला" या गाण्याच्या रॉयल्टीपोटी तब्बल 50 लाख रुपये बँकेत जमा झाले . परंतु खेमचंद प्रकाश यांना कोणीही वारस नसल्यामुळे ते तसेच पडून राहिले . त्यांच्या मानलेल्या मुलीचेही निधन झाले होते . 2001 च्या सुमारास तिच्या मुलाने ( कथ्थक शैलीचे प्रसिद्ध डान्सर राजकुमार झाबरा ) या 50 लाखासाठी कोर्टात दावा लावला . ( त्याचे पुढे काय झाले ते माहिती नाही)

    * आणि या गाण्याबाबतचा हा सुप्रसिद्ध किस्सा : वर्ष 1949. उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब आपले स्वरमंडल जुळवीत बसले होते. अचानक घरातल्या कोणीतरी ग्रामोफोनवर एक रेकॉर्ड लावली. आएगा आनेवालाचा पहिला भाग - खामोश है सितारे चुपचाप है जमाना

    सर्वसाधारणत: आेळीची सुरुवात करताना गायकाला एखाद्या वाद्यावर सूर दिला जातो व मग गायक आपला स्वर त्यात मिसळतो.

    परंतु इथे उलटाच प्रकार होता. लता प्रत्येक आेळीची सुरुवात कोणत्याही आधाराविना करत होती व मग वाद्ये त्यात आपले स्वर मिसळत होती. आणि तरीही स्वर संपूर्णपणे निर्दोष होते .

    खाँ साहेब अवाक झाले. त्यांनी स्वरमंडल बाजूला ठेवले. वारंवार ती रेकॉर्ड त्यांनी एेकली आणि चकीत होऊन उद्गारले.. " ये ससुरी तो कभी बेसुरी होती ही नहीं "

    या गाण्याने लता masses मध्ये लोकप्रिय झाली व classes मध्ये मान्यता पावली .

    माहिती संकलन : धनंजय कुरणे
    9325290079

      January 31, 2017


  • अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’

    आजच्या दिवशी सन १८८२ साली, अण्णासाहेब किर्लोस्करांचे 'संगीत सौभद्र' हे नाटक रंगभूमीवर आले होते.
    नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. ‘संगीत सौभद्र’ मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी. यावर मल्लिनाथी करताना आद्य नाटककर्ते विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग पाहून ‘यात फक्त डोअरकीपरला तेवढं गाणं द्यायचं राहिलंय,’ असे उद्गार काढल्याचं सांगतात. सौभद्र’ने नट, नाटक आणि नाटककाराबरोबरच मराठी रंगभूमीलाही प्रतिष्ठा मिळवून दिली. ही बाब फक्त पहिल्यांदा सौभद्र सादर झाले तेव्हाच घडली नाही, तर जेव्हा जेव्हा नवीन संचात ‘सौभद्र’ सादर झाले, त्या त्या वेळी घडली. या निमित्ताने एकाच नाटकाने अनेक महान दिग्दर्शक, नट, संगीतकार, नेपथ्यकारच नाही तर अनेक नाटक कंपन्यांना ओळख निर्माण करून दिली.

    सुभद्रा-अर्जुनाच्या प्रेमाची आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी कृष्णानं रचलेल्या चालींची कहाणी ‘संगीत सौभद्र’मध्ये उलगडते. ‘नमुनि ईशचरणा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘लग्नाला जातो मी’, ‘प्रिये पहा..’, ‘जरतारी लाल शालजोडी’, ‘नच सुंदरी करू कोपा..’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘कोण तुजसम मज सांग गुरुराया कैवारी माझा’, ‘पावना वामना या मना..’, ‘बलसागर वीरशिरोमणी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘किती किती सांगू तुला..’ अशा एकाहून एक सरस पदांनी या नाटकातले नाटय़पूर्ण क्षण चढत्या रंगतीनं उत्कर्षबिंदूप्रत जातात. आज महाराष्ट्रात ज्या काही संगीत नाटक करणा-या कंपन्या झाल्या आणि आहेत, त्यातली अशी एकही कंपनी नाही, ज्या कंपनीने ‘सौभद्र’ केले नाही.

    किर्लोस्कर नाटक कंपनीनंतर महाराष्ट्रात कोणतीही नवीन नाटक कंपनी निघाली, मग ती ललितकलादर्श, नाट्यकलाप्रवर्तक, यशवंत, नूतन संगीत मंडळी, बलवंत, नूतन संगीत विद्यालय, राजाराम ते अगदी कालपरवाच्या नाटक संस्था असोत, ज्यांनी ज्यांनी संगीत नाटके केली, त्या सर्व संस्थांचे/कंपन्यांचे पहिले प्रयोग ‘संगीत सौभद्र’चेच असत. आजवर जवळपास शेकडोच्या वर संस्था, कंपन्या, क्लबांनी सौभद्र सादर केले आहे. जे नाटक १८८२ मध्ये लिहिले गेले, सादर झाले, ते आज २०१७ मध्येही कुठे ना कुठे, कुठल्या तरी संस्थेतर्फे सादर होत असते.
    अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र कसे लिहिले हे पाहणे खरेच मनोरंजक आहे. किर्लोस्करांनी लिहिलेले पहिले नाटक ‘शाकुंतल’ खूप गाजले. पण कितीही झाले तरी ते होते भाषांतरित. सच्च्या लेखकाला स्वत:चे स्वतंत्र नाटक लिहिण्याची ऊर्मी अधिक तीव्र असते. त्यानुसार अण्णासाहेब किर्लोस्करांना स्वत:च्या नाटकाने पछाडले होते. त्यांच्या डोक्यात ‘अर्जुन सुभद्रा’ हा विषय घोळत होता. त्या काळानुसार नाटकांचे विषय हे प्रामुख्याने पौराणिक असत. कारण त्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत असत आणि पुराणकथांतल्या नीतिमूल्यांचे, भव्यतेचे, लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्त्वांचे, राजा-राण्यांच्या संबंधांचे समाजमनावर गारूड असणे स्वाभाविकच होते. आणखी त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, सामान्य माणसाचे आयुष्य नाटक लिहिण्याएवढे, विचार करण्याएवढे त्या काळी गंभीर नव्हते. सामान्य माणूस हा प्रहसनातच असायचा. तोही असल्यास. असो.

    तर अण्णासाहेबांनी ‘सौभद्र’ची कथा कल्पिली आणि पहिले तीन अंक लिहून काढले. त्या कथेचा विषय ऐकून त्या वेळच्या मुंबई हायकोर्टाचे प्रख्यात वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी किर्लोस्करांना पत्र लिहिले होते की तुमचे ‘शाकुंतल’ हे नाटक सर्व रसपरिपोषक आहे. त्यातली पदे उत्तम आहेत. लोकांना ते आवडले आहे. नवीन नाटकात तीनच रस प्रामुख्याने दिसतात, त्यानुसार येणारी पदे किती वैविध्य निर्माण करणार? आणि हा विषय लोकांना किती रुचेल याबद्दल शंका वाटते. त्यामुळे ‘सौभद्र’विषयी पुनर्विचार करावा. हे पत्र १८८२ च्या ऑक्टोबरला किर्लोस्करांना मिळाले. आणि किर्लोस्करांनी १८ नोव्हेंबर १८८२ रोजी पुण्याच्या ‘पूर्णानंद’ नाट्यगृहात पहिल्या तीन अंकांचाच प्रयोग सादर केलाही. एक तर पूर्ण नाटकाऐवजी फक्त तीन अंकांचेच नाटक ते लोक कसे काय सादर करत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. (कारण अण्णासाहेबांनी ‘शाकुंतल’चाही सुरुवातीला फक्त पहिल्या चारच अंकांचा प्रयोग सादर केला होता.) ‘सौभद्र’चा प्रयोग इतका अभूतपूर्व झाला की लोकांनी त्याचे प्रचंड प्रमाणात स्वागत केले. सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच समाजातील मान्यवरांनी, प्रतिष्ठितांनी या नाटकाला गौरवले. त्या काळच्या या काही प्रतिक्रिया बोलक्या ठराव्यात. त्या वेळच्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात अशी समीक्षा केली होती, की ‘मराठी भाषेत निबंधमाला व संगीत सौभद्र ही दोनच काय ती नवीन व उत्कृष्ट पुस्तके आहेत.’ ना. सी. फडके लिहितात, ‘हल्लीच्या चंदेरी आणि सोनेरी ज्युबिल्यांच्या काळात सौभद्रची ज्युबिली करायची झाल्यास रेडियम ज्युबिली करावी लागेल.’

    वि. स. खांडेकर म्हणाले, ‘देवांना कधीही वार्धक्य येत नाही, अशी समजूत आहे. अशा देवकोटीला पोहोचलेल्या मराठी नाटकांची यादी करू लागल्यास तिच्यात श्रीकाराच्या खाली ‘सौभद्र’चे नाव घालावे लागेल.’ या अशा आणि कित्येक प्रतिक्रिया वाचायला मिळतात. पण त्या काळी या नाटकाचा फक्त गवगवाच झाला असे नाही; तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गंगाधर गाडगीळ यांसारख्या टीकाकारांनी कठोर टीकाही केली.

    किर्लोस्कर अत्यंत दृढनिश्चयी असावेत. कारण एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर ती हवी तशी केल्याशिवाय ते कधीही गप्प बसले नाहीत. संगीत नाटक असले तरी नटांना मनमुराद मुक्तपणे ताना आणि आलापी त्यांनी कधी करू दिली नाही. गाणे आवश्यक त्या वेळेत पूर्ण करण्याबाबत ते अतिशय आग्रही असत. तसेच नाटकाच्या विषयाबद्दल, पदे किंवा त्यांच्या चालींबद्दल भलताच युक्तिवाद केलेला त्यांना खपत नसे. आपण लिहिलेल्या पदांबद्दल, शब्दांबद्दल, चालींबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास असायचा. परंपरेनुसार पडद्यातली नांदी त्यांनी स्टेजवर आणली; त्याबद्दल नाट्यशास्त्राचा नियम दाखवणा-याला ते उभे करत नसत. कदाचित महादेव आपट्यांच्या शंकेला तडकाफडकी प्रयोग करूनच त्यांनी उत्तर दिले की काय असे वाटते.

    तर १८८० ला सौभद्रचे पहिले तीन अंक लिहून त्याचा प्रयोगदेखील झाला, पण पुढच्या अंकाचे गाडे काही पुढे सरकेना. अशातच एकदा ते बाजारातून येताना त्यांना एका दुकानात काचेचा गणपती दिसला; त्यांनी तो चांगलीच किंमत देऊन विकत घेतला. बाजारातून येतायेताच त्यांना सौभद्रच्या पुढच्या अंकांची कथा सुचली आणि त्यांनी दुस-याच दिवशी सगळ्यांना पूर्ण नाटकाचे कथानक ऐकवले. अशी सुरस कथा अण्णांच्या चरित्रात वाचायला मिळते. ज्या तिस-या अंकावर गाडे अडले होते, त्याच्या पुढे कथानक नेण्यास अचानक नाटकात ‘गर्गमुनी’ आल्याने अण्णासाहेबांच्या लेखी पुरेसा गुंता सुटला होता. नाटक वाचल्यास पहिल्या तीन अंकांमध्ये आणि पुढच्या अंकांमध्ये नाटकाच्या रचनेचा, पात्रांच्या संगतीचा, स्थायिभावाचा निरनिराळा परिणाम दिसून येतो. पण हे सगळे नाटक अभ्यासणा-यांसाठी. सामान्य लोकांवर याचा काहीच परिणाम झाला नाही आणि एक वर्षानंतर पुढचे अंक लिहून १८८३ मध्ये ‘संगीत सौभद्र’च्या पाचही अंकांचे पूर्ण लांबीचे नाटक पुण्यात सादर झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट / हृषीकेश जोशी

      November 18, 2018


  • ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते चंद्रशेखर

    आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.

      June 16, 2022


  • राजकुमार केतकर

    राजकुमार केतकर

    नृत्याचार्य राजकुमार केतकर हे ज्येष्ठ कथ्थक नृत्यकार आणि पुरुषप्रधान कथ्थक नर्तक प्रचारक आहेत. राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (एन.सी.पी.ए.) चे प्रचारक.

      May 29, 2014


  • डॉ. पांडुरंग वामन काळे

    (१८८०-१९७२)

    जन्म - ७ मे १९८०
    संस्कृत विद्येचे महापंडीत,
    धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहीला.
    मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
    १९४२ महामहोपध्याय ही पदवी
    १९४६ साली भारतीस प्राच्यविद्यापरीषदेचे अध्यक्ष
    १९६३ साली भारतरत्न प्रदान
    संस्कृत नैपुन्याबद्दल ‘भाऊ दाजी‘ पारीतोषिक
    शिक्षकी नंतर वकीली सुरू केली.
    मृत्यु - १८ एप्रिल १९७२

      March 11, 2015


  • शंकर नारायण (शन्ना) नवरे

    नाटककार, कादंबरीकार, कथाकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर नारायण नवरे. शंकर नारायण नवरे हे नाव शन्ना म्हणूनच सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. २१ नोव्हेंबर १९२७ रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला.

      January 22, 2010


  • अंगद काशिनाथ म्हसकर

    अनेक दर्जेदार नाटकं, मालिका व चित्रपटातून आपल्या लक्षवेधी अभिनयाची छाप पाडणारा होतकरू अभिनेता अंगद काशिनाथ म्हसकर हा देखील ठाण्याला लाभलेल्या रत्नांपैकी एक आहे.

      May 23, 2014


  • सुप्रसिद्ध लेखक श्री अनंत काणेकर

    अनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.

      December 12, 2021


  • अनंत गीते

    अनंत गीते

    अनंत गंगाराम गीते हे एक राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. अनंत गीते हे २०१४ – २०१९ ह्या काळात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते , तसेच ऑगस्ट २००२ – मे २००४ पर्यंत ते केंद्रीय ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

      October 31, 2020